जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
दिनकर देशपांडे यांच्या निधनामुळे विदर्भाच्या साहित्य आणि पत्रकारितेतील एक कलंदर व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. आपल्या दिनकर या नावापुढे ‘राव’ हे विशेषण स्वत:च लावणारे अस्सल आणि स्वत:च ते उच्चारत मिरवणारे वैदर्भीय मोकळेढाकळे, वेगळेपण स्वभावात असणारे दिनकरराव आयुष्यभर कलंदरीवृत्तीने जगले. शासकीय सेवेत चांगली ग्रामसेवकाची नोकरी सुमारे ५० वर्षांपूर्वी त्यांना चालून आली आणि त्यांनी ती स्वीकारलीही. मात्र, त्या नोकरीत मन रमले नाही आणि बालनाटय़ाच्या क्षेत्रात लक्षवेधी धडपड करण्याच्या उर्मीने दिनकरराव नागपुरात परतले.
महाराष्ट्र, लोकमत, नागपूर पत्रिका अशा विविध दैनिकात पत्रकारिता करत विशेषत: बालनाटय़ लेखनाच्या क्षेत्रात दिनकररावांनी अजोड कामगिरी बजावली. सुधा करमरकर यांच्या लिटल थिएटर्सनी दिग्दर्शित केलेले दिनकररावांचे ‘हं हं आणि हं हं हं’, हे बालनाटय़ सत्तरीच्या दशकात खूपच गाजले. ‘बहरले झाड सोन्याचे’, ‘देव भावाचा भुकेला’, ‘जंगलातील वेताळ’ आणि ‘बं बाबू हो बं बाबू’ या त्यांच्या बालनाटय़ांनी त्या काळात बालरंगभूमी अक्षरश: उजळून टाकली होती. बालनाटय़ हा दिनकररावांचा खऱ्या अर्थाने श्वास होता.
बालनाटय़ाच्या रंगमंचावर लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, अभिनय आणि लहान मुलांची मानसिकता अशा विविध पैलूंचा दिनकरराव साकल्याने विचार करत असत. आणि त्याप्रमाणे सादरीकरण करवून घेत. म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात बालनाटय़कार म्हणून त्यांची कामगिरी अतुलनीय समजली जाते. त्यांच्या या कामगिरीचा सन्मान म्हणूनच ठाण्यात भरलेल्या अखिल भारतीय बालकुमार मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड करण्यात आली होती. बालनाटय़ लेखनासाठीचा राज्य शासनाचा राम गणेश गडकरी हा वाङ्मय पुरस्कार दोन वेळा मिळवणारे दिनकरराव हे एकमेव बालसाहित्यिक होते.
सुमारे १०० बालनाटय़ांसह मोठय़ांसाठीही त्यांनी कथा, कादंबऱ्या अशी विपुल साहित्य निर्मिती केली. नागपूर पत्रिका या दैनिकात वऱ्हाडी शैलीत त्यांनी रंगवलेली ‘इब्लिस माणसं’ आजही वाचकांच्या स्मरणात आहेत. पत्रकार म्हणून दिनकर देशपांडे यांनी लौकिक प्राप्त केला तो त्यांच्या निष्कपट स्वभावामुळे. त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक माणसाची खास वऱ्हाडी इब्लिश शैलीत दिनकररावांनी सातत्याने भोचक फिरकी घेतली मात्र, पत्रकारिता करताना त्यांनी कधीही कुणाला दुखावले नाही. तो त्यांचा स्वभावच नव्हता आणि त्यामुळेच समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांचा अफाट असा लोकसंग्रह होता.
समाजाच्या कोणत्याही क्षेत्रातील नेत्याने मन मोकळे करताना एका अर्थाने दिलेल्या कबुलीजबाबाचा साधा उच्चारही कधी दिनकरराव देशपांडे यांनी केला नाही. पत्रकारितेत अतिशय परोपकारी सहकारी म्हणून ते ओळखले जात. सहकारी पत्रकारांच्या अडीअडचणीच्या, दु:खाच्या क्षणी धावून जाणे हे दिनकररावांचे जणू व्रतच होते. त्यामुळे अनेक पत्रकारांच्या कौटुंबिक आयुष्यातही दिनकररावांना मानाचे स्थान होते.
अत्यंत लोकप्रिय बालनाटककार, यशस्वी साहित्यिक आणि हेवा करावा असा अफाट लोकसंग्रह असणारा पत्रकार अशी श्रीमंती असणारे दिनकरराव अतिशय साधेपणाचे जीवन जगले. लौकिकाधारित श्रीमंतीच्या भरवशावर त्यांनी ना कधी कोणाकडून कशाची अपेक्षा ठेवली किंवा कोणाकडून काही तरी मागणी कोणा नेत्या वा श्रीमंत परिचिताकडे केली. नाटय़लेखनावर आटोकाट निष्ठा ठेवत आणि कलंदरी वृत्तीने पत्रकारिता करत जगण्याचा हा साधेपणा दिनकररावांनी व्रतस्थपणे शेवटपर्यंत जपला.
August 5, 2017
संगीतरंगभूमीवरील सुप्रसिद्ध मराठी गद्यनट आणि नाट्यनिर्माते अभिनेते चिंतामणराव कोल्हटकर जन्म १२ मार्च १८९१ रोजी झाला. चिंतामणराव कोल्हटकर यांचे वडील वर्तमानपत्र लेखक व उत्कृष्ट वक्ते होते. चिंतामणरावांच्या वयाच्या सातव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांना नाटके वाचण्याची आणि करण्याची अतिशय आवड होती. ते महाराष्ट्र नाटक मंडळीत १९११ मध्ये दाखल झाले आणि पुढच्याच वर्षी ते ’भरत नाटक मंडळी’त गेले. १९१४ मध्ये ते ’किर्लोस्कर नाटक मंडळी’त आले आणि त्यांचा भाग्योदय झाला.
१९१८ मध्ये त्यांनी दीनानाथ मंगेशकरांच्या भागीदारीत त्यांनी ’बलवंत नाटक कंपनी’ काढली. त्यानंतर त्यांनी नाट्यक्षेत्रात अनेक विविध भूमिका पार पाडल्या. अगदी होतकरू नटापासून सुरुवात करून मग प्रमुख भूमिका केल्या. १९३३ मध्ये चितामणरावांनी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. त्यांची वसंतसेना या चित्रपटातली भूमिका गाजली. पुढे त्यांनी गंगाधरपंत लोंढे यांच्या ’राजाराम संगीत मंडळी’त प्रवेश केला आणि परत नाटकांतून कामे करायला सुरुवात केली. पुढे ते मो.ग. रांगणेकरांच्या ’नाट्यनिकेतन’ मध्ये गेले. अखेरीस त्यांनी 'ललित कला कुंज' नावाची स्वतःची नाटक मंडळी काढली. या कंपनीनेच पु.ल. देशपांडे यांना उदयास आणले. चिंतामणराव कोल्हटकरांनी मराठीबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतही भूमिका केल्या आहेत. पुण्यप्रभाव या नाटकातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचा मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सत्कार केला होता. त्यांचे विविधढंगी काम पाहून जवाहरलाल नेहरूंमी त्यांना बहुरूपी म्हणून नावाजले होते. त्यामुळेच चिंतामणरावांनी आपल्या आत्मचरित्राला ’बहुरूपी’” हे नाव दिले आहे.
जवळजवळ ५० वर्षे त्यांचा रंगभूमीवरील कलाकारांशी कधी नाटककार म्हणून, कधी नट म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून संबंध येत गेला. जेष्ठ नट चित्तरंजन कोल्हटकर हे चिंतामणरावांचे सुपुत्र होते. चिंतामणराव कोल्हटकरांच्या भूमिकांनी गाजलेली नाटके : पुण्यप्रभाव, राजसंन्यास, भावबंधन वगैरे. 'वेड्यांचा बाजार' हे राम गणेश गडकरी यांचे अपूर्ण नाटक पुढे मा.चिंतामणराव कोल्हटकर यांनी पूर्ण केले.
चिंतामणराव हे १९४६ साली अहमदनगर येथे भरलेल्या ३५ व्या, आणि इ. स. १९४९ मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या ३६व्या नाट्यसंमेलनांचे अध्यक्ष होते. मा.चिंतामणराव कोल्हटकर यांना रंगभूमीच्या सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन शासनाने त्यांचा सन्मान केला. मा.चिंतामणराव कोल्हटकर यांचे २३ नोव्हेंबर १९५९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 12, 2018
प्रत्येक खेळाडूची अशी इच्छा असते की त्यावेळी विस्डेन ( WISDEN ) च्या पहिल्या पाच खेळाडू मध्ये यावे. विनूभाई यांचे नाव १९४७ साली त्यामध्ये आले. त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीमधील दुहेरी कामगिरी करून विक्रम त्यावेळी कसोटी सामन्यांमध्ये रचला तो म्हणजे १००० ध्वनीचा आणि १०० विकेट्सचा. याला इंग्लिशमध्ये ‘ डबल ‘ म्हणतात. त्यांनतर हा विक्रम इयान बोथट ने मोडला. ही दुहेरी कामगिरी त्यांनी २३ कसोटी सामन्यांमध्ये पुरी केली तर एम. ए . नोबल या खेळाडूला २७ कसोटी सामने लागले तर कीथ मिलरला ३३ कसोटी सामने लागले.
April 12, 2021
बाळकृष्ण रंगराव सुंठणकर हे लेखक व बेळगाव तरुण भारतचे माजी संपादक होते.
January 4, 2021
फाटक, कमल
लढवय्या साम्यवादी चळवळीतील आपल्या साथीदाराचा संसार नेटाने चालवताना डाव्या चळवळीमध्येही योगदान देणाऱ्या त्या तिघीजणी. एकाच पक्षाशी म्हणजे लाल निशाण पक्षाशी बांधिलकी असलेल्या या तीन रणरागिण्यांचे अवघ्या काही दिवसांच्या अंतराने निधन झाले आणि एक पर्व संपले.
कमल फाटक म्हणजे स्त्रीमुक्ती संघटनेतील लोभस व्यक्तिमत्व! लाल निशाण पक्षाच्या कम्युनमधील सर्व मुलांची आई म्हणजे कमलताई.
त्यांना ओळखणारे सर्व त्यांना कमलआई म्हणूनच ओळखत. कमलताई म्हणजे नितळ वागणे, स्वयंशिस्त, कामाचा प्रचंड उरक आणि टापटीप. कम्युनमध्ये सगळी कामे तन्मयतेने त्या करीत असत. कोणत्याही चर्चेत बोलणे जवळजवळ नाही, पण तपशील हवा असेल तर तो त्यांनीच द्यावा. कधीही अटक न झालेल्या त्या स्वातंत्र्यसैनिक होत्या. पण भूमिगत कामे करणे, पुढाऱ्यांचे गुप्त संदेश पोहोचविणे, कार्यकर्त्यांची काळजी घेणे आदी कामे त्या करीत असत. कमलताईंचा जन्म १९२१ मधला. आजी आणि आई या दोघींचेही संस्कार त्यांच्यावर झाले होते. देशप्रेमाचे बाळकडू त्यांना आई-वडिलांकडून मिळाले होते. १०-११ वर्षांच्या कमलताईंना वडील प्रभातफेरीसाठी ओंकारेश्वराच्या देवळात नेऊन सोडत असत. आई न चुकता ‘केसरी’चे वाचन करीत. सोन्याचांदीच्या कपाटात स्वराज्याच्या सनदा ठेवण्याचे विचार त्याकाळी त्या व्यक्त करीत. समजत नसले तरी जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी त्यांना स्वातंत्र्याचाच ध्यास होता. परदेशी साखरेवर बहिष्कार घातल्यामुळे त्यांनी कधी चहा घेतला नाही पण त्यांनी बनविलेल्या चहाची चव कधी बिघडली नाही. स्वयंपाक आणि मुले यांची त्यांना कधीच आवड नव्हती, पण त्यांनी केलेला स्वयंपाक आणि मुलांचे करणे दोन्हीही लाजवाब असायचे. सर्वच कामे त्यांनी कर्तव्यबुद्धीने पण मनापासून केली म्हणूनच त्या कमलआई म्हणून सर्वाच्या हृदयात विराजमान झाल्या. कमलताईंच्या आईला जडीबुटी औषधांची जाण होती. त्यांचे आजोबा (वडिलांचे वडील) ग्वाल्हेर संस्थानाचे दिवाण होते. घरात पिढीजात सावकारी होती, पण ती त्यांनी अनुभवलीही नाही. वडील देवाच्या शोधात गेले आणि नंतर परत आले. कमलताईंच्या अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या वडिलांनी खंडाळ्याच्या घाटातील (जुना रस्ता) रस्त्याचे काम केले होते. पुण्यात देवळाजवळच भाऊ फाटकांचे घर. भाऊंबरोबर कमलताईही हॅट घालून आणि सायकलवरून फिरायची. पण घरातून विवाहाला विरोध होता. सदूभाऊ गोडबोले यांनी त्यांचे लग्न लावून दिले. चणे-कुरमुरे (लेनिन मिक्श्चर) खाऊन भाऊ आणि कमलताईंनी अनेक दिवस काढले होते. कमलताईंना वैयक्तिक महत्वाकांक्षा नव्हती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी अर्धवट सोडलेले शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवले. भाऊंनी त्यांना प्रोत्साहन दिले. स्वातंत्र्य चळवळीतल्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचे दर्शन घ्यायचे आणि जमेल तितका देश-विदेश पाहायचा हेच त्यांचे ध्येय. कॉ. एस. ए. डांगे आणि त्यांच्या पत्नीचा सहवासही त्यांना लाभला होता. ८ ऑगस्ट १९४२ रोजी अरुणा आसफअल्लींच्या हस्ते झालेले ध्वजारोहणही त्यांनी पाहिले. एस. के. लिमयेंच्या वैद्यकीय उपचाराच्या निमित्ताने त्यांनी सोविएत संघराज्य पाहिले तर ‘मुलगी झाली हो’ च्या निमित्ताने ऑस्ट्रेलिया पाहिला. १९७४-७५ मध्ये त्या स्त्री मुक्ती संघटनेच्या बैठकांतून श्रवणभक्ती करीत. ‘मुलगी झाली हो’ या नाटकातील एका भूमिकेसाठी त्या स्वत:हून पुढे झाल्या. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांचा हा उत्साह तरुण कार्यकत्यांना लाजविणारा होता. बरोबरीचे सर्व सोबती, मुलगी, जावई काळाच्या पडद्याआड जात असताना वार्धक्याने थकलेल्या कमलताई शेवटपर्यंत आपले आयुष्य सर्वाच्या कारणी लागावे यासाठी धडपडत होत्या. त्यांच्या निधनाने एक सार्थक जीवन काळाच्या पडद्याआड गेले आहे.
August 5, 2017
आबा सत्तेची एक एक पायरी चढत गेले पण कुटुंबानं आबांप्रमाणेच आपला साधेपणा टिकवून ठेवला. पत्नी सुमन, मुलगा रोहित आणि मुलगी स्मिता, आई भागिरथी यांनी वागण्या बोलण्यात सत्तेचा दर्प येऊ दिला नाही. आबांचे एक भाऊ सुरेश हे गावाकडे शेती बघतात. तर दुसरे भाऊ राजाराम पोलीस दलात आहेत. आबा गृहमंत्री असतांना आबांचे भाऊ राजाराम पाटील पोलीस दलात कुठलाही बडेजाव न करता सेवा बजावत होते.
February 16, 2022
वसुंधरा साबळे या शाहीर साबळे यांच्या कन्या आहेत.
June 15, 2022
मिलन चित्रपटातलं सावन का महिना, सरस्वती चंद्र चित्रपटातलं चंदन सा बदन , कर्मा चित्रपटातलं दिल दिया है जान भी देंगे सुजाता मधलं जलते है जिस के लिये, बंदिनी मधलं मेरे साजन है उस पार आणि दिल ही तो है मधलं तुम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नही ही नूतनजीची गाणी खूप गाजली. ही गाणी. व त्यातलं नूतन यांचे ते साधं तरीही सुंदर दिसणे. त्यांचा जन्म ४ जून १९३६ रोजी झाला.
नूतन यांचे शालेय शिक्षण स्वित्झेर्लंडला झाले. नूतन यांनी अभिनयाच्या क्षेत्रात काम करावे हे शोभना समर्थ यांनीच ठरवले होते; म्हणून नूतन जेमतेम १४ वर्षांचीच असतांना त्यांच्या साठी त्यांनी हमारी बेटी या चित्रपटाची निर्मिती केली. हमारी बेटी इतका चालला नाही; पण नूतन नावाची एक नायिका चित्रपटसृष्टीत दाखल झाली आहे, हा संदेश योग्य लोकांपर्यंत गेला. त्यामुळे नूतन यांना नगिना हा रहस्यमय चित्रपट मिळाला. यात तिचा नायक होता नासिरखान. हा चित्रपट फक्त प्रौढांसाठी असल्याने खुद्द नायिका नूतन या १६-१७ वर्षांचीच असल्याने प्रीमियर शो त्यांना बघता आला नव्हता. या नंतर नूतन यांना नायिका म्हणून जिया सरहद्दी यांचा कलात्मक चित्रपट हमलोग मिळाला. बलराज सहानी, अन्वर हुसेन, सज्जन, श्यामा अशा नामवंत कलाकारांच्या यात भूमिका होत्या. रोशन यांचे स्वरेल आणि लोकप्रिय होणारे संगीत होते. टीकाकारांनी वाखाणलेल्या या चित्रपटाला आर्थिक यश मिळाले नाही. नंतर शीशम , लैला मजनू , हीर शबाब असे चित्रपट करत त्यांना १९५५ साली अमिया चक्रवर्ती यांनी त्यांच्या स्वत: दिग्दर्शित केलेल्या सीमा या चित्रपटात नायिकेची भूमिका दिली. या भूमिकेने त्यांना पहिले सर्वोत्कृष्ट अभिनयाचे फिल्म फेयर पारितोषिक मिळवून दिले. बारिश , पेईंग गेस्ट, सोने की चिडिया, अनाडी, सुजाता अशा चित्रपटांत शहीद लतीफ, हृषीकेश मुखर्जी, बिमल रॉय यांसारख्या प्रथम श्रेणीच्या दिग्दर्शकांबरोबर नूतन यांनी काम केले. याच काळात चन्दन , कभी अंधेरा कभी उजाला, आखरी दाव, लाईटहाऊस सारखे सुमार चित्रपटही त्यांनी केले. दिल्ली का ठग या चित्रपटात त्यांनी स्विमिंग कॉच्युम घालून खळबळ उडवून दिली होती. नंतरच्या काळात त्यांनी सुजाता, छाबिली, छलिया, कन्हैया, सूरत और सीरत, बंदिनी, तेरे घरके सामने, दिल ही तो है, खानदान , मिलन , सरस्वती चंद्र असे सुंदर चित्रपट केले. यांतील सुजाता, बंदिनी , मिलन या चित्रपटांनी त्यांना ३ फिल्म फेयर पारितोषिके प्राप्त करून दिली. मिलन नंतर दहा वर्षांनी ती चाळिशीत असतांना तिला परत एकदा नायिकेच्या भूमिकेसाठी मै तुलसी तेरे आंगन की या चित्रपटाने पाचवे फिल्म फेयर पारितोषिक तिच्या पदरात टाकले. त्या वेळेस मीनाकुमारीसह अन्य कुठल्याही नायिकेला अशी आणि इतकी पारितोषिके मिळवता आली नाहीत. नंतरही मेरी जंग या चित्रपटाने तिला सहाय्यक भूमिकेसाठी हे पारितोषिक मिळवून दिले. याच्या जोडीने छलिया आणि अनुराग यांतल्या भूमिकांसाठी तिने नामांकनही प्राप्त केले होते. नूतन त्या लोकप्रियतेच्या ऐन भरात असतांना त्यांनी राज कपूर, देव आनंद आणि अशोककुमार या आघाडीच्या नायकांबरोबर बरेच चित्रपट केले. पण या आघाडीतला चौथा आणि अभिनयाचा बादशहा म्हणून गणल्या गेलेल्या दिलीपकुमारबरोबर तिचा एकही चित्रपट झाला नव्हता. त्या काळात दिलीपकुमारबरोबर काम करण्यासाठी सर्वच नायिका कमालीच्या उत्सुक असत. तसा नूतनचा दिलीपकुमारबरोबर शिकवा चित्रपटाचे शुटींग सुरू झाले होते. पण तो अपूर्णच राहिला होता. अशा काळात के. असीफने तिला मुघले आजम या चित्रपटातील अनारकलीच्या भूमिकेसाठी देकार दिला होता. सलीमच्या भूमिकेत दिलीपकुमार होता. पण नूतनचा मोठेपणा असा की तिने असीफला सांगितले, की अनारकली ही सौंदर्यवती म्हणून प्रसिद्ध होती; त्यामुळे या भूमिकेसाठी मधुबालाशिवाय पर्यायच नाही. नूतन यांनी राज कपूर, देव आनंद, अशोककुमार, बलराज सहानी अशा नामवंतांबरोबर अनेक चित्रपट केले, पण त्याचबरोबर त्यांनी शम्मी कपूर, शेखर, भारत भूषण, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, मनीष, अशा त्यावेळेस नाव नसलेल्या नायकांबरोबर बर्याीच सामान्य चित्रपटांतून अनेक भूमिका केल्या. तसेच ती प्रथम श्रेणी नायिका झाल्यावरही शेवटपर्यंत तिने नवोदितांबरोबर चित्रपट स्वीकाण्यास खळखळ केली नाही. संजीव कुमार यांच्या बरोबर तिने देवी, गौरी असे चित्रपट केले. नूतन १९५१ साली मिस इंडिया या किताबाची मानकरी ठरली होत्या. नूतन यांचा सरस्वतीचंद्र हा चित्रपट बराच गाजला होता. या चित्रपटात नूतन यांनी दिलेली पोज तर त्याहूनही अधिक प्रसिद्ध झाली होती. सरस्वतीचंद्र चित्रपटात पलंगावर पहुडलेल्या नूतन यांच्या हातात पत्र आहे अशी पोज होती. गौतम राजाध्यक्षांसारखा एक मोठा फोटोग्राफर नूतन यांना जगातल्या सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक समजत असे. कमालीचा फोटोजेनिक चेहरा, सडसडीत अंगकाठी आणि उंच बांधा. सगळे असून नूतन सगळ्या चित्रपट सृष्टीसाठी नूतन ताईच राहिली. १९७४ मध्ये भारत सरकार ने नूतन यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता. नूतन यांचे २१ फेब्रुवारी १९९१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / प्रकाश चान्दे
February 21, 2018
रामभाऊंनी त्यांच्या संगीत कारकीर्दीत अनेक विद्यार्थ्यांना विनामूल्य विद्यादानाचे कार्य केले (१९६५-८९). त्यांच्या शिष्यवर्गात उल्हास कशाळकर, विश्वनाथ बागुल, योगिनी जोगळेकर, मधुवंती दांडेकर रामप्रथम, राम नेने, सुधीर देवधर, निवृत्ती चौधरी, योगिनी जोगळेकर, शशी ओक, सुरेश डेग्वेकर, प्रदीप नाटेकर, सुधीर दातार, राजेंद्र मणेरीकर इत्यादींचा समावेश होतो.
October 23, 2021
पंडित उल्हासस कशाळकर यांचे शिक्षण M.A.(L.L MUSIC). त्यांचा जन्म १४ जानेवारी १९५५ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा गावी येथे झाला. पंडित उल्हास कशाळकर यांची ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायनपद्धतींवर हुकुमत आहे. त्यांना संगीताचे सुरुवातीचे शिक्षण व्यवसायाने वकील असलेल्या व ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेल्या आपल्या वडिल नागेश दत्तात्रेय कशाळकर यांचेकडून मिळाले. नागेश कशाळकर हे उल्हास लहान असताना त्यांना ग्रामोफोनवर वेगवेगळ्या गायकांनी गायलेल्या भीमपलास, यमन, शुद्ध कल्याण या रागांच्या बंदिशी एकवत असत. त्यााचे संस्कार उल्हास कशाळकर यांच्यावर होत असत. त्यांच्या वडिलांनी वेगवेगळ्या नावाजलेल्या गायकांच्या गाण्यांशी उल्हास कशाळकर यांची ओळख करून दिली. सोबत त्या पैकी कुणाकडून कोणता गुण आत्मासात करावा याचे स्वाातंत्र्यही दिले.
उल्हास कशाळकर यांनी नागपूर विद्यापीठातून सर्वोच्च गुण मिळवून संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. त्याच दरम्यान त्यांनी राजाभाऊ कोगजे आणि पी. एन. खर्डेनवीस यांचेकडे संगीताच्या अभ्यासास सुरुवात केली. उल्हास कशाळकर यांना 'बालगंधर्व नाट्यसंगीत स्पर्धे'त भरघोस यश मिळाले. त्यामुळे त्यांचे नाव ज्याच्या त्याच्या तोंडी झाले. हा मुलगा नाट्यसंगीत क्षेत्रात भरीव कामगिरी करेल असे भाकित अनेकांनी वर्तवले. कशाळकर यांना भारत सरकारची शिष्यवृत्तील मिळाल्यानंतर त्यांची राम मराठे यांच्यावकडे आग्रा घराण्याचची तालिम सुरू झाली. राम मराठे हे उत्तम ख्ययाल गायक होते. कशाळकर यांनी त्यांच्याकडे विशेष करून ख्यााल गायकीचे धडे घेतले. त्यानंतर त्यांनी गजाननबुवा जोशींकडून ग्वाल्हेर घराण्याची तालीम मिळवली.
जयपूर गायकीतील निष्णात गवई निवृत्तीबुवा सरनाईक, दत्तात्रेय विष्णू पलुसकर तथा बापुराव पलुसकर, मास्तर कृष्णराव, कुमार गंधर्व या मंडळींचा उल्हास कशाळकरांच्या गायकीवर प्रभाव आहे. उल्हास कशाळकरांनी दूरदर्शन व आकाशवाणीवर अनेक कार्यक्रम केले असून आकाशवाणीच्या ठाणे येथील केंद्रात त्यांनी १९८३ ते १९९० च्या दरम्यान काम केले. त्यांनी १९९३ मध्ये कोलकाता येथील आय. टी. सी. संगीत संशोधन अकादमीत आचार्यपद स्वीकारले. ते तिथे ग्वाल्हेर घराण्याच्या गुरूपदावर कार्यरत आहेत. त्यांची ग्वाल्हेर घराण्याासोबत आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायनपद्धतींवर हुकूमत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्य झाले आहेत व तयार होत आहेत ही महाराष्ट्राला अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांनी राम देशपांडे, ओंकार दादरकर व शशांक मकतेदार असे शिष्य घडवले आहेत. कशाळकर यांना २०१० साली भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मािनित करण्यात आले.
उल्हास कशाळकर यांना पाच भाऊ असून सगळे गायक आहेत. त्याापैकी अरूण हे आग्रा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक आहेत, तर विकास हे संगीततज्ञ आहेत. उल्हास कशाळकरांच्या पत्नी संजीवनी कोलकाता आकाशवाणीत असिस्टंट स्टेशन डायरेक्टर पदावर कार्यरत आहेत. संमिहन कशाळकर हा मुलगा. तो वडिलांकडेच गाणे शिकत असून कोलकात्याला एस.आर.ए.मध्ये शिष्यतवृत्ती धारक आहे. उल्हास कशाळकर यांना अखिल भारतीय पातळीवरील ‘क्रिटिक असोसिएशन’च्या मानाच्या पुरस्काराने गौरवले गेले आहेत. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार २००८ साली प्राप्त झाला होता. त्यांनी आजपर्यंत भारतात व परदेशांतील अनेक मोठ्या संगीत महोत्सवांत भाग घेतला असून, ते ऑस्ट्रेलियामधील बहुसांस्कृतिक महोत्सवात २००६ मध्ये, तर अॅमस्टरडॅम - भारत महोत्सवात २००८ मध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या गायनाच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत. या वर्षीचा भारत सरकारतर्फे संगीत क्षेत्रात अत्यंत मानाचा समजला जाणारा तानसेन पुरस्कार पंडित उल्हास कशाळकर यांना मिळाला.
उल्हाास कशाळकर यांची वेबसाईट www.ulhaskashalkar.com
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट / मकरंद वैशंपायन
January 15, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti