(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • माजी केंदीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस

    त्यांनी १९७४ मध्ये रेल्वे कामगारांसाठी लढा दिला. मुंबईत कामगारांसाठी लढा देताना मुंबई बंद करून दाखवली होती. आणीबाणीच्या काळात त्यांनी सरकारविरोधात रान उठवले होते. त्यांना शोधण्यासाठी सरकारने जंग जंग पछाडले होते. मात्र जॉर्ज यांनी वेशांतरे करून लढा सुरूच ठेवला होता. २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती.

      January 29, 2022


  • ब्रूसली

    ब्रूसलीच्या वडिलांनी ब्रूसलीच्या वयाच्या १८ वर्षी हाँगकाँग सोडण्याचा निर्णय घेतला. नाइलाजाने घेतलेला हा निर्णय मात्र ब्रूस लीचं आयुष्यच बदलवणारा ठरला. युनिव्हसिर्टी ऑफ वॉशिंग्टनमध्ये ड्रामा विषयात डिग्रीचं शिक्षण घ्यायला सुरूवात केली. शिक्षणाची गाडी सुरू असतानाच त्याच्यातलं मार्शल आर्ट्स मात्र त्याला स्वस्थ बसू देईना. अमेरिकेतच त्याने मार्शल आर्ट्स शिकवायला सुरूवात केली, तेव्हा त्याचं वय होतं १८.

      July 20, 2021


  • डॉ. वा.म. कुलकर्णी

    डॉ. वा. म. कुलकर्णी त्यांनी संस्कृतचे प्राध्यापक, महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालयाचे संचालक, एशियाटिक सोसायटीच्या म. म. पां. वा. काणे इन्स्टिट्यूटचे संचालक तसेच एशियाटिक सोसायटीच्या वाषिर्क जर्नलचे प्रमुख संपादक अशी अनेक महनीय पदे भूषवली होती. तरीही त्यांच्या उपजत ऋजुतेमुळे तसेच भिडस्त स्वभावामुळे ते प्रसिद्धीच्या झोतापासून कायम दूर राहिले

      June 1, 2011


  • माधव यशवंत गोखले

    श्री माधव यशवंत गोखले हे ठाणे भारत सहकारी बॅंकेचे अध्यक्ष असून ठाणे येथील अनेक सामाजिक चळवळींशी निगडित आहेत. ते मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेचेही अध्यक्ष आहेत.

      December 3, 2013


  • मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक सावित्रीबाई फुले

    मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. १८४० साली जोतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. फुले परिवार हा मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले. सावित्रीबाईंचे पती जोतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकार्यााच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला.

    जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्यांतनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.

    १ मे १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.१ जानेवारी १८४८ रोजी भिडेवाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.(यापूर्वी मिशनर्या्नी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या.

    त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली, ती शाळा २०१६ सालीही चालू आहे. (मिशनरी नसलेले पिअरी चरण सरकार यांनी मुलींसाठी पहिली शाळा बारासात टाऊन येथे १८४७ मध्ये काढली. शाळेसाठी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र या दोन भावांनी आर्थिक मदत केली. ही शाळा कालीकृष्ण हायस्कूल या नावाने चालू आहे. मुंबईत पारशी लोकांनी १८४९ मध्ये पहिली Co-ed शाळा काढली, पण काही दिवसातच या शाळेच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा दोन शाखा झाल्या.)

    सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचेकेशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणार्याध मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.

    जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.

    केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणार्यात बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.

    सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्नींचचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही. सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत.सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला.

    हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. सावित्रीबाई फुले यांचे १० मार्च १८९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 3, 2019


  • ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका वंदना मिश्र (पूर्वाश्रमीच्या सुशीलाबाई लोटलीकर)

    ज्येष्ठ अभिनेत्री आणि ‘मी…मिठाची बाहुली’ या आत्मचरित्राने साहित्यविश्वात महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या लेखिका वंदना मिश्र म्हणजेच पूर्वाश्रमीच्या सुशीलाबाई लोटलीकर. मराठी, गुजराथी आणि मारवाडी रंगभूमीवरचे १९४० च्या सुमारास एक नावाजलेले व्यक्तिमत्व.

      February 11, 2018


  • इंदुताई गुप्ते

    इंदुताई गुप्ते ह्या ठाणे शहर महिला मंडळाच्या सक्रीय सदस्या होत्या! या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक तसंच आर्थिक क्षेत्रांमध्ये ठाणे नगरीला प्रगतीपथावर घेवून जाणासाठी अनेक कल्याणकारी कामे केली. १९६० साली त्यांनी सिव्हील हॉस्पिटलच्या महिला डॉक्टर राजे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान केले होते. १९४९-१९५० सालापासून त्यांनी हरिजन वस्तीत जावून संक्रांतीचा हळदी कुंकू समारंभ साजरा करण्याचा, कल्पक व अभिनव प्रकल्प आखून आदिवासी महिलांच्या आयुष्यात स्वयंसिध्दतेची नवी पहाट आणण्याचा वसा त्याकाळी हाती घेतला होता.

    अनेक गरजू महिलांना स्वतःच्या पायांवर उभे करण्याच्या दृष्टीने त्यांनी, त्यांच्या इतर महिला सहकार्‍यांसोबत इंग्रजीचे वर्ग सुरू केले. निधी गोळा करून शिवण मशिन्स विकत घेतल्या, मशिन ठेवायला जागा नसतानासुध्दा शक्य होईल तिथे मशिन ठेवून स्त्रियांना व मुलींना शिवण शिकवून शिवणाच्या परीक्षेला बसवलं, त्यामुळे अनेक महिलांना शिवणकामात पदविका प्राप्त करता आल्यामुळे व त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता आला .

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

      January 3, 2015


  • बॉलीवूड अभिनेत्री बिंदू

    बॉलीवूड अभिनेत्री बिंदू यांचा जन्म १७ एप्रिल १९५१ रोजी झाला. बिंदू यांचे वडील नानूभाई देसाई हे चित्रपट निर्माता होते.

    बिंदू या चारहून अधिक दशके बॉलीवूड मध्ये काम करत आहेत. बिंदू यांनी आपली करीयरची सुरवात १९६९ मध्ये आलेल्या इत्तेफाक व दो रास्ते या चित्रपटापासून केली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १६० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. कटीपतंग मधील शबनमच्या अभिनयासाठी व मेरा नाम शबनम या गाण्यासाठी अजूनही लोक बिंदू यांची आठवण काढतात.

    बिंदू यांनी आपल्या इम्हतीहान व हावस या चित्रपटातील कामाने हिंदी चित्रपट उद्योगात वेगळे नाव कमवले. त्यानी व्हॅम्प रोल करण्यास सुरवात केली. या सोबतच त्यांनी अभिमान, अर्जुन पंडित या चित्रपटातील केलेले अभिनय गाजले. जंजीर मधील त्याच्यावरील मोना डार्लिंग डायलॉग प्रसिद्ध झाला.

    बिंदू यांनी आपले बालपणीचे मित्र चंपकलाल झवेरी यांच्याशी लग्न केले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      April 17, 2017


  • गजानन तिरोडकर

    गजाननराव उर्फ दादासाहेब तिरोडकर, यांचा जन्म कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केसरी या लहान व निसर्गरम्य गावात झाला. असामान्य महत्वाकांक्षा व यशाच्या आभाळाला सहज गवसणी घालू शकणारी प्रखर बुध्दिमत्ता यांचा उत्तम संगम त्यांच्या ठायी झाला असल्या कारणाने त्यांचा ओढा हा कुणाच्या तरी हाताखाली काम करण्यापेक्षा, स्वतःचा एखादा व्यवसाय थाटून त्यात इतरांपेक्षा काही भव्य दिव्य करून दाखविण्याकडे जास्त होता. उद्योगविश्वात पाय रोवण्यासाठी आवश्यक असलेली जिद्द व मानसिक तयारी अंगी बाणविल्यानंतर त्यांनी ग्लोबल समुहाची बीजे पेरली. त्या काळात भांडवलाची फारसी उपलब्धता नसतानाही विश्वासु व होतकरू मनुष्यबळाच्या जोरावर त्यांनी उद्योगाचा श्रीगणेशा केला.

      August 18, 2011


  • साने गुरुजी यांचा `श्यामची आई’

    साने गुरुजी यांचा `श्यामची आई’ हा चित्रपट प्रथम चित्रपटगृहात चौसष्ठ वर्षापुर्वी ६ मार्च १९५२ रोजी दाखवला गेला.
    साने गुरूजींच्या अजरामर `श्यामची आई’' पुस्तकावर आधारित त्याच नावाचा व तितकाच अनमोल चित्रपट प्रदर्शित झाल्याला आज ६५ वर्षे झाली. पण या चित्रपटाची गोडी व आकर्षण आजही कायम आहे. 'श्यामची आई'चे दिग्दर्शन व निर्मिती मा.आचार्य अत्रे यांनी केले होते. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची त्यांची ही पहिलीच वेळ होती. पण तरीही त्यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मितीचा राष्ट्रीय पुरस्कार लाभला. प्रत्येकाची आई `श्यामची आई’प्रमाणेच असावी, असे हा चित्रपट पाहिल्यावर प्रत्येकालाच वाटते. दिग्दर्शक मा.आचार्य अत्रे यांचे सृजनशील दिग्दर्शन, तर वनमाला, दामूअण्णा जोशी, माधव वझे, हे सर्वच कलाकार आपल्या अभिनय कौशल्याच्या सामर्थ्यावर श्यामच्या आईच्या माध्यमातून प्रकाशझोतात आले. मराठीतील सर्वोत्कृष्ट क्लासिक चित्रपटापैकी एक असणाऱ्या श्यामची आई मराठी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरला. प्रेमळ पण योग्यवेळी कडक असणाऱ्या श्यामच्या आईची भूमिका अभिनेत्री वनमाला यांनी चपखलतेने बजावली की त्यांच्या शिवाय अन्य कोणत्याही अभिनेत्रीचा विचार करत येणार नाही. अवखळ, पण गोंडस आणि आईवर मनस्वी प्रेम करणाऱ्या श्यामची भूमिका माधव वझे यांनी लीलया साकारली. आई-मुलाचे निःस्वार्थी प्रेम, शिकवण, संस्कार, त्याग या सर्व भावना दिग्दर्शक मा. आचार्य अत्रे यांनी सुंदरतेने मांडल्या आहेत. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक मा.वसंत देसाई यांचे छडी लागे छम छम… आणि भरजरी ग पितांबर… ही गाणी आजही रसिक प्रेक्षकांच्या ओठावर असतात. श्यामची आई हा चित्रपट मराठीतच नव्हे तर अमराठी रसिकांमध्ये इतका लोकप्रिय आहे की, गेल्या वर्षी मदर्स डे ला आंध्र प्रदेशातील आंध्र ज्योती या वर्तमानपत्राने याचे तेलगु व इंग्रजी सबटायटल करून हा चित्रपट आंध्र प्रदेश येथे सर्वत्र झळकावला. तर पंजाब येथील प्रीती लाहिरी या मासिकेच्या संपादिका पूनम सिंघ यांनीही हा चित्रपट भारत पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या पंजाबच्या खेडय़ांमध्ये झळकावला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    या चित्रपटाची लिंक
    https://www.youtube.com/shared?ci=WZnZCqE5Jg8

      March 6, 2017