जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ ही मालिका आणि ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ या चित्रपटामध्ये तो मुक्ता बर्वे बरोबर प्रेक्षकांसमोर आला. ‘दुनियादारी’ मितवा ने तर त्याच्या यशात विशेष भर घातली.
October 18, 2021
मनोज कुमार यांच्या "उपकार‘ चित्रपटातलं आजही दर स्वातंत्रदिनी अन् प्रजासत्ताकदिनी आवर्जून कानांवर पडणारं गाणं "मेरे देश की धरती‘... हे गाणं कल्याणजी-आनंदजी या जोडगोळीच्या संगीताने जेवढं लोकप्रिय केलं, त्याहीपेक्षा ते देशभर नेलं ते महेंद्र कपूर यांच्या आवाजाने. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९३४ रोजी झाला.
महेंद्र कपूर यांचा जन्म व्यापारी घरात झाला. पण, त्यांना या व्यवसायात रुची नव्हती तर गीत-संगीताकडे त्यांचा वाढता कल होता. त्यांचे कुटुंब मुंबईत आले तेव्हा महेंद्र कपूर यांना एक दिशा मिळाली. या मार्गावर खूप संघर्ष करावा लागणार शालेय स्तरावरच त्यांचा गोड आवाज सर्वांचे लक्ष वेधून घेऊ लागला. प्रसिद्ध गायक मा.मोहम्मद रफी यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन घेतले. सेंट जेवियर्स कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतले. संगीत की शिक्षा उन्होंने पं. तुलसीराम शर्मा, उस्ताद नियाज अहमद, मनोहर पोतदार, फैयाज अहमद तसेच पंडित हुस्नलाल यांच्याकडून त्यांना संगीताचे धडे गिरवले. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या आवाजाची चर्चा सुरू झाली आणि शिक्षण घेतानाच त्यांना चित्रपटासाठी गाण्याची संधी मिळाली. 'मदमस्त' या चित्रपटासाठी त्यांनी सर्वप्रथम पार्श्वगायन केले.
गीत, गझल, भजन, कव्वाली सारखे सर्व प्रकार ते सहजरीत्या गात असत. त्यांच्या काळातील नौशाद, सी. रामचंद्र, शंकर-जयकिशन, रवी, कल्याणजी-आनंदजी, खय्याम अशा जवळजवळ सर्व संगीतकारांसाठी ते गायले आणि अभिनेत्यांना आवाज दिला.
रफी, किशोर, मुकेश, हेमंत कुमार यांच्यासारख्या गायकांमुळे त्यांना कमी संधी मिळाली. तरीदेखील एवढ्या स्पर्धेतही त्यांनी आपल्या आवाजाची जादू कायम राखली. बी. आर. चोपड़ा आणि मनोज कुमार यांच्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. बी. आर. चोप्रा, संगीतकार रवी आणि महेंद्र कपूर या त्रिवेणीने अनेक यादगार गीते गायली. चोप्रा यांची 'धूल का फूल', 'वक्त', 'हमराज', 'धुँध' यांच्या अनेक चित्रपटांमध्ये महेंद्र कपूर यांनी गायन केले. मनोज कुमार यांच्या 'उपकार', 'पूरब और पश्चिम', 'क्रांती' यांसारखे अनेक चित्रपट यशस्वी होण्यामध्ये महेंद्र कपूर यांचेही योगदान आहे. या चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली देशभक्तीपरगीते हिट झाली. 'मेरे देश की धरती' या गीताची लोकप्रियता अजूनही कायम आहे. हिंदीबरोबरच त्यांनी इतर भाषांमध्येही गीते गायली. मराठी चित्रपटामध्ये दादा कोंडके यांच्याबरोबर त्यांचे खूप जमले. महेंद्र कपूर यांना आपल्या कारकीर्दीत अनेक पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय पुरस्कार, तीनवेळा फिल्म फेयर पुरस्कार, सारखे अनेक पुरस्कार मिळाले. मा.महेंद्र कपूर यांचे निधन २७ सप्टेंबर २००८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 9, 2018
वयाच्या सातव्या वर्षी दिनकर कैकिणी यांनी एका संगीत सोहळ्यात उस्ताद अल्लादिया खान, उस्ताद फैय्याज खान व उस्ताद अब्दुल करीम खाँ या तीन संगीत दिग्गजांचे गाणे ऐकले. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९२७ रोजी झाला. उस्ताद फैय्याज खानांचे गाणे ऐकल्यावर ते इतके प्रभावित झाले की त्यांनी तिथेच संगीत कलेची साधना करण्याचा व फैय्याज खानांच्या गायनशैलीला आत्मसात करण्याचा निश्चय केला. त्यांचे प्रथम संगीत गुरू पतियाळा घराण्याचे पं. के. नागेश राव हे होते. त्यानंतर त्यांनी दोन वर्षे ग्वाल्हेर घराण्याच्या पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडे संगीत शिक्षण घेतले.
वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी लखनौच्या मॉरिस कॉलेजात (भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयात) प्रवेश घेतला. तिथे त्यांना पं. विष्णू नारायण भातखंडे व उस्ताद फैय्याज खान यांचे शिष्य पं. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांच्याकडून संगीताची तालीम मिळाली. ह्या अतिशय कठीण प्रशिक्षणात एस. सी. आर. भट्ट, चिदानंद नगरकर, के. जी. गिंडे यांसारख्या आपल्या अन्य सहाध्यायांबरोबर कैकिणींनी संगीताचा कसून अभ्यास केला. त्याचा परिणाम म्हणूनच की काय, इ.स. १९४३ मध्ये त्यांना संगीतातील पदवीसोबत ख्याल गायनासाठी मानाचे समजले जाणारे भातखंडे सुवर्णपदक प्राप्त झाले.
त्यांनी १९४६ साली आपले संगीत कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. एक गायक व संगीत प्रशिक्षक म्हणून त्यांनी देशोदेशींचे दौरे केले. संगीत क्षेत्रात त्यांनी अनेक मानाची पदे भूषविली. इ.स. १९५४ सालापासून त्यांनी आकाशवाणीवर सुरुवातीस रचनाकार व नंतर निर्माता म्हणून काम पाहिले. ते भारताच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या प्रबंध विभागाचे सहायक संचालक होते. त्यानंतर ते दीर्घ काळासाठी मुंबई येथील भारतीय विद्या भवन च्या संगीत व नृत्य शिक्षापीठाचे प्राचार्य पदी नियुक्त होते. अनेक वेगवेगळ्या समित्यांमध्ये त्यांचा समावेश होता, तसेच विविध परीक्षा मंडळांतही त्यांचा सहभाग होता. १९७४ साली भारत सरकारतर्फे त्यांना युगोस्लाव्हिया आणि पूर्व जर्मनी येथे पारंपरिक भारतीय संगीत या विषयाचे अभ्यासक म्हणून पाठवण्यात आले होते. तेथील विद्यापीठांमध्ये तसेच सांस्कृतिक केंद्रांमध्ये त्यांनी आपली कला सादर करण्याबरोबरच व्याख्यानेही दिली होती.
कैकिणींनी ख्याल, ध्रुपद, धमार, ठुमरी व भजन शैलींत शेकडो नवीन रचना केल्या व अनेक नवे राग बांधले. त्यांनी समूह गायनासाठीही विविध रचना बांधल्या, 'मीरा' (१९७९) या चित्रपटात पार्श्वगायन केले, तसेच पंडित रविशंकर यांच्या सहयोगाने 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' ह्या बॅले नृत्यनाटिकेला संगीत दिले. त्यांनी बंदिशींवर 'रागरंग' नावाचे पुस्तकही लिहिले आहे. स्वरचित राग आणि बंदिशींवरील त्यांच्या ध्वनिमुदिकाही प्रकाशित झाल्या आहेत. संजीवनी भेलांडे, आरती अंकलीकर-टिकेकर, उदित नारायण, निषाद बाक्रे, सुधींद भौमिक यांसारखे शिष्य त्यांनी घडवले आहेत. गायक, संगीतकार आणि गुरू अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी पार पाडल्या. कैकिणींचे सर्व कुटुंब संगीत साधनेत आहे. त्यांच्या पत्नी शशिकला ह्या नभोवाणी गायिका होत्या व भवन्स संगीत व नृत्य महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त झाल्या. त्यांचे धाकटे पुत्र योगेश साम्सी हे नामवंत तबला वादक असून त्यांच्या कन्या आदिती कैकिणी उपाध्या या शास्त्रीय संगीत गायिका आहेत. सुप्रसिध्द गायक पं. दिनकर कैकिणी यांचे सुपुत्र असलेले योगेश सम्सी यांनी उस्ताद अल्लारखॉं यांचेकडे २३ वर्षे तबल्याची तालीम घेतली आहे. आजवर अनेक ज्येष्ठ गायकांना यशस्वी साथ संगत केली आहे. तसेच अनेकवेळा स्वतंत्र तबदा वादनाचे कार्यक्रमही केले आहेत.
पं.दिनकर कैकिणी यांचे १७ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 24, 2018
ज्येष्ठ हिंदी व गुजराथी नाटकातील अभिनेत्री दिना पाठक यांचा जन्म ४ मार्च १९२२ रोजी झाला. दिना पाठक पूर्वाश्रमीच्या नी गांधी. त्या महिला अॅक्टीवेटीस्ट देखील होत्या आणि 'भारतीय महिला नॅशनल फेडरेशन' (NIFW) अध्यक्ष राहिल्या होत्या. हिंदी आणि गुजराती चित्रपटात दिना पाठक यांनी सहा दशकांत १२० चित्रपटांत अभिनय केला.
त्यांचे मीरा गुजराथी हे नाट्य भवाई लोकनाट्य शैली मध्ये अनेक वर्षे यशस्वीपणे चालू होते. त्यांच्या गोल माल आणि खूबसुरत मधील संस्मरणीय भूमिका प्रसिध्द आहे. त्यांनी कोशिश, उमराव जान, मिर्च मसाला आणि मोहन जोशी हाजीर हो चित्रपटात महत्वाच्या भूमिका केल्या. दिना पाठक यांचे ११ ऑक्टोबर २००२ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकी पिडीया
November 11, 2017
केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ लेखिका अपर्णा मोहिले यांचा जन्म ६ ऑगस्ट रोजी झाला.
अपर्णा मोहिले हे सुपरिचित नाव आहे. मॅट्रिकला बोर्डामध्ये मुलींमधून पहिल्या आलेल्या ह्या हुशार विद्यार्थीनीने पुढे बी.ए., एम.ए. परीक्षांमध्येही चांगले यश मिळवले. अपर्णा मोहिले या १९६५ बॅचच्या भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकारी बनल्या.त्यांची पहिली निवड इंडीयन पोस्टल सर्व्हीस मध्ये झाली. अशा प्रकारची निवड होणाऱ्या त्या पहिल्या मराठी महिला अधिकारी होत्या. पोष्टातील अनेक महत्वाची पदे त्यांनी भूषवली. चीफ पोस्ट मास्तर जनरल, पोस्टल सर्व्हीस डायरेक्टर, पोष्टल सर्व्हीसेस बोर्ड मेंबर अशा महत्वाच्या पदांवर काम करून त्यांनी ठसा उमटविला.
भारत स्वतंत्र झाल्यावर मात्र माहिती आणि प्रसारण मंत्र्याच्या अधिकारात १९५१ साली चित्रपट परीक्षण बोर्डाचे काम चालू झाले.कायम चर्चेत आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेले बोर्ड अशी याची ख्याती आहे. या बोर्डावर अनेक मान्यवर येवून गेले. बऱ्या वाईट प्रमाणात सर्वांच्या कारकिर्दीत काही कटू गोड घटना घडल्या. अलीकडे कलावंताची या बोर्डाच्या अध्यक्ष पदावर नेमणूक कली जाते पण पूर्वी आय ए एस श्रेणीचा अधिकारी तिथे असायचा. हे अधिकारी मग डॆप्युटेशन वर काही कालावधीसाठी तिथे जायचे. चित्रपट, नाटक, संगीत याची अपर्णा मोहिले यांना पहिलेपासूनच आवड होती. त्या संस्कृत, मराठी आणि इंग्रजी या तीनही विषयात विद्या पारंगत होते. काही काळ त्यांनी इंग्रजी या विषयाचे नागपूर च्या महाविद्यालयात अध्ययन केले होते.
साहित्यिक , सांस्कृतिक आवड होतीच. त्यामुळे त्यांनी पदाकरीता डॆप्युटेशन वर जाण्याची विनंती कली. आणि लगेच त्यांची विनंती मान्य होवून सी बी एफ सी वर रिजनल ऑफिसर म्हणून नेमणूक झाली. त्यावेळी त्यांच्या सोबत या क्षेत्रातील अनेक नामवंत होते. विजया मेहता, वंदना विटणकर,शांता शेळके होत्या. १९७८ ते १९८३ या पाच वर्षाच्या कालावधीत अपर्णा मोहिले या प्रशासकीय अधिकारी या बोर्डावर होत्या. पाच वर्ष इतका मोठा काळ इतर कोणत्याही अधिकाऱ्याला या पदावर रहाता आले नाही पण अपर्णा मोहिले मात्र तब्बल साडेपाच वर्ष या पदावर होत्या.
अपर्णा मोहिले १९८२-१९८३ या काळात त्या फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या कार्यकारी अध्यक्षा होत्या. तसेच १९९७-९८ या काळात त्या महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या चीफ पोस्ट मास्तर जनरल होत्या. ३१ ऑगस्ट २००२ ला त्या ३७ वर्षांच्या प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्या. एकदा अपर्णा मोहिले यांना प्रश्न विचारला गेला की पोस्टासारख्या रूक्ष खात्यात कशा काय रूळल्या? यावर त्यांचे उत्तर होते " पोष्ट खाते रूक्ष मुळीच नाही उलट ते भावनासंपन्न आणि रसाळ आहे!’ निवृत्तीनंतर त्या पुण्यातच रहातात.
साहित्य, संगीत याची आवड असलेल्या अपर्णा मोहिले यांनी ‘संसार आणि सेन्सॉर (ललित)’ , ‘त्रिदल (नाटिकासंग्रह)’ , ‘शब्दपुष्पांजली (कवितासंग्रह)’ आणि ‘सेन्सॉर जीवनसार आणि मी (आत्मचरित्रपर)’ ही पुस्तके लिहिली आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
August 6, 2021
कथालेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले नागनाथ लालुजीराव कोत्तापल्ले. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च १९४८ रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड या गावी झाला. १९६९ साली देगलूर येथील महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. ची पदवी मिळविली. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठातून एम. ए. आणि १९८१ साली पीएच. डी. ची पदवी ही त्यांनी मिळविली.
November 18, 2015
गुजरातच्या जुनागढमधील एका मध्यम वर्गीय मुस्लिम कुटूंबात परवीन जन्माला आली होती. त्यांचा जन्म ४ एप्रिल, १९४९ रोजी झाला. तिच्या आईवडिलांची ती एकुलती एक मुलगी होती. परवीन यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अहमदाबादेत झाले. इंग्लिश साहित्यात तिने मास्टर्स पदवी प्रथम श्रेणीतून मिळवली होती. तिचे इंग्लिश अगदी अस्खलित होते, परवीन वली मोहम्मद खान बाबी उर्फ परवीन बाबी यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती. तिच्या आरसपानी सौंदर्याने तिला बॉलीवूडने खुणावले. ती आली, तिने पाहिले अन तिने जिंकले अशी तिची अवस्था झाली. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले अन अनेक फ्लॉपही झाले. पण ती ग्लॅमरची आयडॉल बनून राहिली. ८० च्या दशकात झीनत अमानच्या बरोबरीने परवीन बाबीसुध्दा बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून नावारुपास आली होती. या दोघींमध्ये काही फरक होते.
झीनतचे विचार पूर्णत: व्यवसायिक होते. तिने आपल्या प्रत्येक यशाला आणि अपयाशाला समजून-उमजून संभाळले. परंतु परवीनने असे कधीच केले नाही. कदाचित छोट्या शहरातून आलेली परवीन ग्लॅमरस आणि श्रीमंत आयुष्य संभाळू शकली नाही. तिच्या वाट्याला आलेले बेसुमार ग्लॅमरस आयुष्य आणि यश हेच तिचे शत्रू बनले. त्यामुळे बॉलिवूडध्ये तिला प्रत्येकजण आपला शत्रुच्या रुपात दिसत होता. तिच्या या वागण्यानेच सर्वांनी तिच्या व्यवसायिक आणि खासगी आयुष्याचा फायदा घेतला. ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी परवीन १९७६ मध्ये टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली होती. या मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकणारी परवीन पहिली भारतीय अभिनेत्री होती. खासगी आयुष्यात ती बोल्ड आणि बिनधास्त होती. यश चोप्रांच्या 'दीवार' या सिनेमात तिने बोल्ड सीन्स दिले होते. सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि परवीन बाबीच्या जोडीला त्याकाळात बरेच पसंत केले गेले होते. 'अमर अकबर एंथोनी', 'दीवार', 'शान', 'ख़ुद्दार', 'काला पत्थर', 'सुहाग', 'नमक हलाल' या सिनेमांमध्ये ही जोडी झळकली. १९७३ मध्ये 'चरित्र' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात करणा-या परवीनने आपल्या करिअरमध्ये ५० सिनेमांमध्ये अभिनय केला. १९८८ मध्ये आलेला 'आकर्षण' हा तिचा शेवटचा सिनेमा होता.
१९७४ मध्येय प्रदर्शित झालेला मजबूर आणि १९७७ मध्ये अमर अकबर एंथोनी ही त्यांची करिअरमधील सर्वात हिट राहिलेली चित्रपट राहिलेली आहेत. त्या पडद्यावर जितक्या धाडसी आणि बिनधास्त होत्या, तेवढ्या खासगी जीवनात खूप एकाकी होत्या. बॉलीवूडमध्ये एकेकाळी टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळविणाऱ्या अभिनेत्री परवीन बाबी हिच्या आयुष्याचा अखेरचा काळ खूपच बिकट गेला. डॅनी, महेश भट्ट, कबीर बेदी सारख्या प्रसिध्द' कलाकरांबरोबर त्या लिव्ह इन रिलेशनशीपमध्येव राहिल्या. परवीन बाबी यांचे निधन २० जानेवारी, २००५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
January 24, 2018
जागतिक मराठी साहित्य परिषदेचे ते उपाध्यक्ष होते. संत्र्याची बाग, मनमोर, शिरवा, छळ, जमिनीवरची माणसं, अंधारवाट, सावळाच रंग तुझा, हेल्गेलंडचे चांचे, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
June 15, 2022
२० जानेवारी २०१७ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. डोनाल्ड ट्रम्प हे लोकप्रिय पण तितकंच वादग्रस्त व्यक्तिमत्व. एक उद्योगपती ते राजकारणी असा ट्रम्प यांचा प्रवास आहे. एका जमान्यात डोनाल्ड ट्रम्प एक उद्योगपती म्हणून प्रसिद्ध होते.
May 14, 2022
जी. ए. नी धारवाडच्या जे. एस. एस. महाविद्यालयामध्ये इंग्लिश भाषाचे अध्यापन केले. त्यांचा जन्म १० जुलै १९२३ रोजी झाला. ते वैयक्तिक आयुष्यात अबोल व प्रसिद्धिविन्मुख मानले जात. जी. ए. कुलकर्णींच्या काही कथा सुरुवातीस सत्यकथा नियतकालिकात प्रसिद्ध झाल्या. मराठीतील एक आघाडीचे नवकथालेखक म्हणून जी.ए. ओळखले जातात.
निरनिराळ्या प्रतीकांचा वापर करून आपल्या कथेची मांडणी करण्याचा प्रयत्न करत. त्याचप्रमाणे मानवाला अगतिक व नगण्य बनविणार्यार नियतीला आणि तिच्या असीम शक्तीला जी.एं.नी आपल्या कथामधून बरेच प्राधान्य दिले असल्याचे आपणास पाहावयास मिळते. जी.ए. कुलकर्णी यांच्या निळासावळा व रक्तचंदन या कथासंग्रहाना महाराष्ट्र शासनाचे साहित्यविषयक पुरस्कार मिळले होते.
जी.ए. कुलकर्णी यांना ’काजळमाया’ या कादंबरीसाठी मिळालेला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार, पुढे टीका झाल्यामुळे जी.एं.नी प्रवासखर्चासकट परत केला.
त्यांची ग्रंथसपदा: निळासावळा, पारवा, हिरवे रावे, काजळमाया, रक्तचंदन इत्यादी कथासंग्रह.
जी. ए. कुलकर्णी यांचे ११ डिसेंबर १९८७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 11, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti