जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
नाट्यसिने अभिनेत्री व लेखिका स्नेहप्रभा प्रधान यांचे स्नेहांकिता हे आत्मचरित्र गाजले, वादग्रस्तही ठरले
January 4, 2021
भारतातला क्रमांक एकचा उद्योग म्हणजेच चित्रपट निर्मितीचा – या चित्रपट उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली १९१३ रोजी “राजा हरिशचंद्र” या पहिल्या मुक पटापासून. खर्या अर्थानं हा भारताचा पहिला चित्रपट होय. या पहिल्या चित्रपटाचे निर्माते, आणि जनक म्हणून ओळखले जाणारे “धुंडिराज गोविंद फाळके” उर्फ दादासाहेब फाळके.
March 5, 2011
मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या यांच्या गाजलेल्या ‘फँड्री’ या चित्रपटातील सोज्वळ चेहऱ्याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात.
April 8, 2022
हेमंत करकरे हे मुंबईचे दहशतवाद विरोधी पथक मुख्याधिकारी होते.
December 15, 2010
उपहास, माझे नाव रमाकांत वालावलकर, नवऱ्याचे संगोपन, प्रेमाची देणीघेणी, मोठ्या माणसांच्या गमतीदार गोष्टी, पन्नास वर्षांत मुंबई समुद्रात बुडेल, स्वयंसूचना, आटपा रे आटपा लवकर, पोटिमा (पोटावर टिचकी मारा), हसत खेळत मनाची ओळख अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
July 5, 2022
कर्तृत्व आणि परिश्रम या गुणांच्या बळावर सामान्यातील सामान्य माणूस देखील यशस्वी होऊ शकतो हे आर. आर. पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
March 3, 2018
राम नाईक हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.
त्यांचा जन्म १६ एप्रिल १९३४ रोजी झाला. राम नाईक यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी नोकरी सोडली आणि त्यानंतर ते सक्रिय राजकारणात गेले; खासदार, केंद्रीय मंत्री झाले.
ते १९८९, १९९१, १९९६, १९९८ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते पेट्रोलियम मंत्री होते.
जुलै २०१४ पासून राम नाईक उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल आहेत.
राम नाईक यांनी 'चरैवेति! चरैवेति!!' हे आत्मचरित्र लिहिले आहे.
February 27, 2017
कल्पवृक्ष कन्येसाठी, गंगा यमुना डोळ्यात उभ्या कां?, लिंबलोण उतरता, जिथे सागरा धरणी मिळते, सप्तपदी ही रोज चालते, रिमझिम पाउस पडे सारखा, घट डोईवर, अशा एकसे एक सुंदर गाण्यांचे जनक म्हणजे नामवंत गीतकार म्हणजे कवी पी. सावळाराम. त्यांचा जन्म ४ जुलै १९१४ रोजी झाला.
पी.सावळाराम यांचे खरे नाव निवृत्ती रावजी पाटील. पी.सावळाराम यांना शालेय वयापासूनच काव्याची गोडी लागली होती. पुढे ते शिक्षणासाठी सांगलीला महाविद्यालयात दाखल झाले, तेथे त्यांना तिथे शिक्षक लाभले, ते थोर कवी माधव ज्युलियन म्हणजेच प्रोफेसर माधवराव पटवर्धन तेथेच ह्या सर्जनशील मनाच्या पी.सावळाराम यांची काव्यकळा फुलू लागली. त्यांच्या संपर्कात ते आले, तेव्हा त्यांनी ‘सौंदर्य नसते रंगात। सौंदर्य असते अंतरंगात। उघडुनि पाही।’ या ओळी असलेली ‘काळा गुलाब’ शीर्षकाची कविता लिहिली. ही कविता तेव्हा कॉलेजमधल्या वर्णाने काळी, परंतु दिसायला सुंदर असलेल्या एका मुलीवर लिहिली होती. मा.पी.सावळारामांपाशी विलक्षण प्रतिभा होती. पंढरपूरला बडव्यांचे असलेले वर्चस्व पाहिल्यावर ‘पंढरीनाथा झडकरी आता। पंढरी सोडुनि चला। विनविते रखुमाई विठ्ठला’ हे गीत त्यांनी लिहिले. महाविद्यालयीन शिक्षण झालेले निवृत्ती पाटील, ठाणे येथे रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरीसाठी रुजू झाले. काव्याची उर्मी त्यांना गप्प बसू देत नव्हती.
एच. एम.व्ही. कंपनीच्या वसंत कामेरकरांनी पाटलांना संधी दिली आणि ह्या पी.सावळाराम यांची गट्टी जमली ती संगीतकार वसंत प्रभू ह्यांच्याशी. त्यांची पहिली दोन गाणी प्रसिद्ध झाली, निवृत्ती पाटील ह्या नावाने, पण त्याचवेळी नागपूर आकाशवाणी केंद्रावर निवृत्ती पाटील नावाचेच बासरीवादक कलाकार होते, ह्या नामसाधर्म्यातुन त्यांना बाहेर यायचे होते, त्यावेळी पी. सावळाराम ह्यांचे एक मित्र उपयोगाला आले. ते मित्र होते, विधानसभेचे माजी अध्यक्ष वि. स. पागे होय. तर ह्या पागे यांना, ह. ना. आपटे ह्यांच्या त्यावेळी गाजत असलेल्या, "उषःकाल" ह्या कादंबरीमधील "सावळ्या" ह्या व्यक्तिरेखेने भारावून टाकले होते. पागे ह्यांना, आपला मित्र निवृत्ती पाटील ह्याच्या व्यक्तिरेखेत ह्या "सावळ्या"चे साधर्म्य जाणवायचे. ते निवृत्ती पाटील ह्यांना "सावळ्या" नावाने हाकारायचे. झाले. अशा रीतीने निवृत्ती पाटील ह्यांनी आपले "पी.सावळाराम" हे नाव धारण केले.
पंढरपूरला बडव्यांचे असलेले वर्चस्व पाहिल्यावर ‘पंढरीनाथा झडकरी आता। पंढरी सोडुनि चला। विनविते रखुमाई विठ्ठला’ हे गीत त्यांनी लिहिले. १९४९ साली ‘राघु बोले मैनेच्या कानात ग’ हे पहिले गीत त्यांनी लिहिले. वसंत प्रभू, माधव शिंदे व दिनकर पाटील हे त्यांचे स्नेही होते. मराठी चित्रपटांचा तो ऐन बहराचा काळ होता. जिथे चित्रपटगृहे होती, तिथे प्रदर्शित होणाऱ्या बऱ्याच चित्रपटांतून पी. सावळारामांची गाणी असायची. सर्वसामान्य लोकांपर्यंत ती अशी थेटपणे पोहोचली होती. परंतु पी. सावळाराम यांच्या गीतांचा संग्रह फार उशिरा म्हणजे १९९१ साली कुसुमाग्रजांच्या प्रस्तावनेसह प्रसिद्ध झाला. पण त्याआधी कित्येक वर्षे तुकारामांच्या अभंगांप्रमाणे सावळारामांची गीते लोकांच्या मनात आणि कंठात कायमची बसली होती. त्यांना सामाजिक कार्याची ओढ होती. १९६४-६५ साली ते ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. येऊर पाणी योजना आणि ड्रेनेज सिस्टमसंबंधी त्यांनी विशेषत्वाने लक्ष घालून त्या पूर्णत्वास नेल्या. शिक्षकांच्या पगारात त्यांच्याच काळात वाढ झाली. ६३-६४ साली ते शिक्षण समितीचे सभासदही राहिले. ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजच्या स्थापनेत इतरांबरोबर त्यांचाही सहभाग होता. त्यांच्याप्रतीच्या कृतज्ञतेने या कॉलेजने ‘पी. सावळाराम गौरवग्रंथ’ प्रकाशित केला.
पी. सावळाराम यांची गीते अशी लोकमानसात त्यांचा ठेवा म्हणून स्थिरावली आहेत. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम यांच्या अभंग व ओव्यांना हे भाग्य लाभले होते. अलीकडल्या काळात ग. दि. माडगूळकर यांच्या बरोबरीने कवी पी. सावळाराम यांना ते लाभले. या अर्थाने ते ‘जनकवी’ आहेत.
‘गंगा यमुना डोळ्यांत उभ्या का?’ या गीतातील भावना लग्न होऊन सासरी जाणाऱ्या कुणाही मुलीच्या आईच्या आहेत. आपल्याला दुरावणार म्हटल्यावर होणारे दु:ख अतिशय अल्पाक्षरी, पण अर्थपूर्ण शब्दांत त्यांनी साक्षात् उभे केले आहे. म्हणूनच त्यातली भावना कुणा एका ‘क्ष’ आईची न उरता कुणाही आईची असू शकते. त्यांच्या गीताच्या या सामर्थ्यांमुळेच ते महाराष्ट्रात अजरामर झाले आहेत.
‘ज्ञानदेव बाळ माझा’, ‘विठ्ठल तो आला आला’ व ‘सखू आली पंढरपुरा’ ही गीते. ती लोकभाषेला सहजपणे जवळ जाणारी आणि तिच्यातील नादमाधुर्य टिपणारी आहे. पण त्याचबरोबर एखादी लावणी लिहिताना ते लावणीचा म्हणून जो ठसका असतो, तिथे नायिकेची प्रेमासंबंधातली जी धिटाई असते ती ते नेमक्या शब्दांमध्ये टिपतात. उदाहरणार्थ, ‘काल रातीला सपान पडलं’ किंवा ‘तुला बघून पदर माझा पडला’ या त्यांच्या लावण्या पाहाव्यात.
सावळारामांनी जवळजवळ सातशे-आठशे गीते लिहिली. त्यांपैकी पाचशे-सहाशे रेकॉर्डवर आली. मा.पी. सावळाराम यांना ‘जनकवी’ ही उपाधी देताना कुसुमाग्रजांना नेमके काय अभिप्रेत होते, हे त्यांनी पुढील शब्दांमध्ये व्यक्त केले आहे..‘ पी. सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्या द्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत- नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरांपर्यंतही पोहोचले आहेत. खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरीबांच्या ओटी-ओसरीपर्यंत सर्वत्र या नावाचा संचार झाला आहे. नागरवस्तीच्या वेशीवरच ते थांबले नाहीत. ग्रामीण भागातील झोपडय़ांत आणि चावडी-चव्हाटय़ावरही त्यांचे स्वागत झाले आहे. सावळारामांनी गद्यलेखनही केले. आकाशवाणीच्या ‘कामगार सभे’साठी ‘सहज सुचलं म्हणून’ कार्यक्रमात त्यांनी संहितालेखन केले. ‘माणसाला पंख असतात’ या चित्रपटाचे लेखन, ‘माणसा आधी हो माणूस’ व ‘मंगल कलश’ हे लघुपट व एस. टी.वर ‘सारे प्रवासी घडीचे’ हे वार्तापत्र त्यांनी लिहिले. याशिवाय त्यांनी ‘पुत्र व्हावा ऐसा’, ‘नांदायला जाते’, ‘कन्यादान’, ‘सलामी’ आणि ‘बेरडाची अवलाद’ या चित्रपटांच्या कथाही लिहिल्या. १९८२ सालच्या ‘गदिमा’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. मा.पी. सावळाराम यांचे २१ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 21, 2017
ज्या काळात स्त्रीयांनी कलेच्या क्षेत्रात विशेषत: नाटक व चित्रपटांमध्ये म्हणजे अगदी बोलपटांमध्ये सुध्दा अर्थात १९३०च्या दशकात, पण अश्यावेळी काही महिला कलाकारांनी या क्षेत्रात कारकीर्द घडवण्याचे धाडस दाखवले त्यापैकीच एक महत्त्वाचे नाव म्हणजे अभिनेत्री लीला चिटणीस यांचे. लीला चिटणीस यांचा जन्म कर्नाटकातील धारवाड येथे ९ सप्टेंबर १९०९ झाला होता. त्यांचे मूळचे नाव लीला नगरकर. नागपूर विद्यापीठाची पदवी संपादन केल्यानंतर त्याच वर्षी “उसना नवरा” या नाट्यमन्वंतरच्या नाटकात मालतीच्या भूमिकेने त्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. त्यानंतर “आंधळ्याची शाळा” मध्येही त्यांनी बिंबाची भूमिका साकारली होती. लीला चिटणीस यांचे वडील हे पुरोगामी विचारांचे, उच्च विद्याविभूषित व ब्रम्हो समाजाचे पुरस्कर्ते होते. समाजाच्या विरोधाला व बंधनांना न जुमानता लिला नगरकर यांनी डॉ.चिटणीस या गृहस्थांसोबत प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला आणि अश्या प्रकारे लिला नगरकर या लिला चिटणीस झाल्या.
लिला चिटणीस यांच्या कारकीर्दीच्या दृष्टीने ज्यामुळे इतिहास घडला तो टप्पा म्हणजे, “लक्स”या विख्यात साबणाच्या जाहिरातीत झळकून या ब्रॅंडसाठीच्या पहिल्या भारतीय मॉडेल ठरल्या.
रुपेरी पडद्यावर लीला चिटणीस यांनी रोमॅन्टिक तर कधी बुजर्या व बावळट भूमिका साकारल्या. त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले १९३५ च्या “सत्यनारायण” या चित्रपटातून ! त्यापाठोपाठ म्हणजे १९३० च्या उत्तरार्धात लिला चिटणीस यांच्या कलाक्षेत्राची कमान १९८०च्या उत्तरार्धा पर्यंत अगदी अखंडरित्या चढती राहिली.प्रभात चित्र, “रणजीत मुव्हीटोन”, “बॉम्बे टॉकीज” सारख्या अनेक नामांकीत फिल्म कंपनीच्या निर्मिती असलेल्या चित्रपटांसाठी लिला चिटणीस यांनी अभिनेत्री म्हणुन काम केले. या काळात लिला चिटणीस यांनी अनेक चित्रपटातून नायिका, सहनानिका तर कधी चरित्र व्यक्तीरेखा साकारल्या . “धुवाँधार”, “छाया”, “वहाँ ”, “ इंसाफ ”, “राजा गोपीचंद”, “जेलर”, “छोटे सरकार”, “संत तुलसीदास”, “कंगन”, “छोटीसी दुनीया”, “घर की रानी”, “रेखा”, “बंधन”, “आज़ाद”, “अर्धांगी”, “कांचन”, “घर घर की कहानी”, “सौदामिनी”, “हरिदर्शन”, “माँ ”, “नया दौर”, “पोस्टबॉक्स ९९९”, “मैं नशेमे हूँ ”, “काला बाज़ार”, “दुल्हन एक रात की”, “हम हिंदुस्तानी”, “गंगा जमुना”, “धर्मपुत्र”, “जीवन मृत्यू”, “भाई-भाई”, “बडी दीदी”, “औरत”, “वक्त”, “सत्यम् शिवम् सुंदरम्”, “दिल तुझको दिया” हे लिला चिटणीस यांच्या कारकीर्दीतील मुख्य चित्रपट; त्या काळात, लीला चिटणीस आपल्या चित्रपटातली गाणी स्वत:च गायच्या आणि त्या गाण्यावर त्या अशा काही धमाल नृत्य करायच्या की लोक त्यांचा तो नाच पाहून अक्षरश: घायाळ व्हायचे. “झूला” चित्रपटातल्या “हिंडोले कैसे झूलू...” व “झूलो के संग...” ही दोन गाणी म्हणजे मूर्तीमंत उदहारण होय.
अशोककुमार यांचा अभिनयातील आत्मविश्वास वाढविण्यात लीला चिटणीस यांचा फार मोठा हातभार आहे. नायिकेच्या भूमिकेत यशस्वी होत असतानाच त्यांनी “शहीद” मध्ये दिलीपकुमारच्या आईची भूमिका स्वीकारत आपल्या धाडसी वृत्तीची झलक दाखविली. दिलीप-राज-देव आनंद या रुपेरी पडद्यावर सर्वात यशस्वी त्रिकुटाची लीला चिटणीस पडद्यावरची यशस्वी आई ठरली. वात्सल्यसिंधू आईचे एक उदात्त, पण प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणून लीला चिटणीस या रुपेरी पडद्यावरील एक अजरामर कलाकार म्हणून कायमच स्मरणात राहतील.
अनंत काणेकरांचे फार्स हे नाटक रंगभूमीवर आणण्याचे श्रेयही लिला चिटणीस यांना जाते. त्यांचे दुसरे पती ग्वालानी ह्यांच्या सहकार्याने एक चित्रपटसंस्था काढून “कंचन” आणि “किसीसे ना कहना” ह्या चित्रपटांच्या कथा, तसेच प्रमुख भूमिका, दिग्दर्शन आणि निर्मितीची बाजू देखील त्यांनी सांभाळली.
त्याचबरोबर “एक रात्र आणि अर्धा दिवस” या नाटकात देखील लिला चिटणीस यांनी भुमिका साकारली आहे
लीला चिटणीस यांनी “चंदेरी दुनियेत” हे आत्मचरित्र देखील लिहिले आहे.
लिला चिटणीस यांचा आयुष्यातील उत्तरार्ध अमेरिकेत त्यांचा मुलांकडे व्यतित झला होता. १४ जुलै २००३ या दिवशी वृध्दापकाळाने वयाच्या ९३व्या वर्षी त्यांचे निधन झाले
(लेखन व संशोधन - सागर मालडकर)
लिला चिटणीस यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
मराठी अभिनेत्री लीला चिटणीस (17-Jul-2017)
जेष्ठ हिंदी-मराठी अभिनेत्री लीला चिटणीस (9-Sep-2017)
जेष्ठ हिंदी-मराठी अभिनेत्री लीला चिटणीस (9-Sep-2018)
January 12, 2015
अलेक्झांडर मेलविले आणि एलिझा सायमंड्स बेल हे त्यांचे आई वडील. त्यांचा जन्म ३ मार्च १८४७ रोजी स्कॉटलंडच्या एडीनबर्गमध्ये येथे झाला. अगदी लहान असल्यापासूनच ग्रॅहम बेलनी विविध प्रकारचे शोध लावायला सुरुवात केली होती. त्यांच्या सुरुवातीच्या पहिल्या प्रकल्पांपैकी एक प्रकल्प हा गव्हापासून त्याचा भुसा वेगळा करण्यासंदर्भातील होता. पण त्यांना आवाजाबाबत विशेष प्रेम होते. तोंडातून बाहेर पडणारा आणि कानाला ऐकू येणारा आवाज याबाबत बेल यांना प्रचंड आकर्षण होते. वडीलांनी दिलेल्या प्रेरणेतून त्यांनी भाऊ मेलविले याच्यासह टॉकिंग मशीन तयार करण्याचा प्रयत्नही केला होता. यात त्यांना यश आले आणि नाही आले असेही म्हणता येईल. कारण हा प्रोजेक्ट मागे पडला. पण त्यानंतर बेल यांनी जो शोध लावला त्या जोरावर आज संपूर्ण जगाने कुठल्या कुठे मजल मारली आहे. हा शोध म्हणजे टेलिफोनचा. हेही एक टॉकिंग मशीनच म्हणायला हवे ना.
वयाच्या ११ व्या वर्षी अलेक्झांडर बेल यांनी ग्रॅहम हे नाव धारण केले. तेव्हा ते बनले अलेक्झांडर ग्रॅहम बेल.
त्यांचे वडील आणि आजोबा या दोघांचीही पहिली नावे अलेक्झांडर अशीच होती. त्यामुळे या नावाचा कंटाळा आल्याने त्यांनी हे नाव निवडले होते. त्यांच्या वडिलांच्या एका विद्यार्थ्याचे नाव अलेक्झांडर ग्रॅहम असे होते. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या नावात ग्रॅहम अॅड केले. बेल हे रिंगशी संबंधित असल्याने त्यांनी ते तसेच ठेवले असेल. पण काहीही असले तरी त्यांच्या कुटुंबासाठी मात्र कायम अॅलेस किंवा अॅलेक हेच त्यांचे नाव होते.
वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ग्रॅहम बेल यांनी एका मुलांच्या निवासी शाळेत शिकवण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या वडिलांनी व्हिजिबल स्पीच ही पद्धत तयार केली होती.
एखादा शब्द तयार होण्यासाठी आवाज कसे तयार होतात त्यासाठी ओठांच्या हालचाली कशा होतात, याचा त्यात समावेश होता. हीच पद्धत बेल यांनी कर्णबधीर मुलांना बोलायला शिकवण्यासाठी आणि त्यांचे उच्चार अधिक स्पष्ट करण्यासाठी वापरली. त्यांनी स्वतःच्या काही पद्धतीही तयार केल्या. त्यांच्या आईला कमी ऐकू येत होते. त्यामुळे ते लहानपणीपासूनच आईशी वेगळ्या प्रकारे बोलायचे. कर्णबधीर मुलांना शिकवण्यात त्यांनी अगदी प्रावीण्य मिळवले होते.
ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनच्या शोधासाठी अनेक वर्षे संशोधन केले. त्या जोरावर त्यांनी १४ फेब्रुवारी १८७६ रोजी पेटंटसाठी अर्ज दिला. त्याच दिवशी एलिशा ग्रे यांच्यासाठी काम करणाऱ्या एका वकिलानेही अशाच संशोधनासाठी अर्ज सादर केला. बेल यांनी वडिलांना लिहिलेल्या पत्रानुसार कोणीतरी आपल्या सारखाच शोध लावत असल्याचा अंदाज त्यांना आला होता. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर अर्ज केला होता. त्यामुळे काही तासांच्या फरकामुळे बेल यांना या शोधाचे क्रेडीट मिळू शकले. मार्च १८७६ मध्ये बेल यांना टेलिफोनचे पेटंट मिळाले. त्यांनी सासरे गार्डीनर ग्रीन हबर्ड यांच्या मदतीने बेल टेलिफोन कंपनीची सुरुवात केली. त्यात गुंतवणूकदारांमध्ये बेल यांचे स्पर्धक एलिशा ग्रे यांचाही समावेश होता. त्यानंतर त्यांच्यामध्ये वादही झाला होता.
बेल यांनी फोटोफोनचा शोधही लावला. त्यात प्रकाशाला आवाजामध्ये परावर्तीत करण्यात येत होते.
बेल यांच्यामते त्यांच्या महत्त्वाच्या शोधापैकी हा एक होता. त्यांना मिळालेल्या गिफ्टचा वापरही ते शोध लावण्यासाठी करायचे. आपल्या समस्या सोडवताना ते नवीन शोधाची निर्मिती करायचे. स्वतःच्या नवजात बाळाच्या मृत्यूनंतर त्यांनी मेटल व्हॅक्क्यूम जॅकेट तयार केले. त्यामुळे श्वासोछ्च्वासाला मदत होत होती. याच कल्पनेतून पुढे पोलिओच्या रुग्णांच्या उपचारात कामी येणारे उपकरण तयार केले गेले होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफिल्ड यांच्यावर १८८१ मध्ये हल्ला झाला त्यावेळी ग्रॅहम बेल यांची मदत घेण्यात आली होती. शरिरात गोळी कुठे आहे हे शोधण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेट मशिन वापरले होते. गारफिल्ड यांना वाचवण्यात यश आले नाही. मात्र याच मशीनमध्ये सुधारणा करून सध्याच्या मेटल डिटेक्टरचा शोध लावण्यात आला होता.
ग्रॅहम बेल यांनी १८९० मध्ये पंतंगांच्या मदतीने काही प्रयोग सुरू केले होते. त्यासाठी त्यांनी काही खास इमारती खरेदी केल्या होत्या. अनेक प्रयोग केल्यानतंर बऱ्याच संशोधनानंतर बेल यांनी टेट्राहेड्रोन तंत्रावर आधारित एक खास पतंगाचे डिझाइन तयार केले होते.
१९०७ मध्ये त्यांनी एरियल एक्सप्रिमेंट असोसीएशनची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी काही फ्लाइंग मशीन तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यातील सर्वात यशस्वी ठरले ते सिल्व्हर डार्ट. हेच सिल्व्हर डार्ट पुढे कॅनडामध्ये पॉवर्ड फ्लाइटमध्ये वापरले गेले.
अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचे २ ऑगस्ट १९२२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
August 2, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti