(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अरुण म्हात्रे

    अरुण म्हात्रे

    आपल्या काव्यशैलीने, साहित्यामध्ये स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे अरूण म्हात्रे यांनी कविता, कथा, ललितलेखन, संपादन, प्रकाशन अशा क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले.

      May 23, 2014


  • किशोरी शहाणे

    किशोरी शहाणे

    ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’ पासूनची त्यांची रुपेरी वाटचाल तब्बल पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळाची आहे. पण तरी त्या आजच्या पिढीच्या तारकेच्या स्पर्धेत कार्यरत आहे. त्यांचा जन्म २३ एप्रिल १९६८ रोजी झाला. किशोरी शहाणे यांचे शिक्षण मिठाबाई कॉलेज मध्ये झाले. त्यांना मिठाबाई कॉलेजमध्ये मिस मिठाबाई हा किताब मिळाला होता. किशोरी शहाणे यांचा पहिला चित्रपट माहेरची साडी.त्या स्वतः डान्सर आहेत, भारतात व परदेशात त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. किशोरी शहाणे यांची निर्मिती केलेला पहिला मराठी चित्रपट "ऐका दाजिबा' यासह मराठी चित्रपट, मराठी आणि हिंदी मालिका, रिअॅलिटी शोज इत्यादीतून त्यांनी कामे केली आहेत. ३० वर्षं त्या मराठी इंडस्ट्रीचा भाग आहे. आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या जॉनरचे आठ चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. पती दीपक बलराज वीज हे निर्माते आहेत. आता किशोरी शहाणे या ‘स्टेप अप’ या नृत्यावर आधारित हॉलीवूड चित्रपटात काम करत आहेत. किशोरी शहाणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

    ## Kishori Shahane

      June 11, 2017


  • उषा मराठे (उषाकिरण)

    उषा मराठे हे मूळ नाव असणार्‍या उषाकिरण यांचा जन्म २२ एप्रिल १९२९ रोजी वसईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. उषा किरण यांची घरची आर्थिक स्थिती बेताची होती. उषाकिरण आणि तिची मोठी बहीण लीला मराठे यांना अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांचे वडील बापूसाहेब मराठे यांनी आपल्या दोन्ही मुलींना नाटकांत काम करण्यासाठी पाठवावयाचे ठरवले.

      April 24, 2014


  • राष्ट्रपतिपदक विजेत्या तमाशा कलावंत विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर

    विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर ह्या अद्वितीय कलागुणांसह तमाम तमाशा रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या तमाशासम्राज्ञी होत्या. विठाबाईंचे वडील भाऊ खुडे आणि चुलत भाऊ बापू खुडे यांचा भाऊ-बापू (मांग) नारायणगावकर हा तमाशा अस्सल लोककलेचा नमुना तर होताच पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तमाशा हे या कलावंतांसाठी समाज सुधारणेचं एक माध्यम होतं. लहानपणापासूनच नृत्य आणि गायनाकडं विठाबाईंचा विशेष ओढा होता. घरी असताना तमाशातल्या लावण्या, गवळणी, भेदीक त्यांच्या कानावर आपसूक पडत होत्या. पण शाळेतही कवितेमध्ये विशेष रुची होती. त्यांचा हा कलेकडचा आत्यंतिक ओढा बघूनच वडिलांनी शिक्षणाची सक्ती केली नाही आणि वयाच्या चौथ्या - पाचव्या वर्षीच विठाबाईंची शाळा कायमची बंद झाली.

    आता त्या आपल्या वडिलांच्या तमाशाबरोबर भटकंती करू लागल्या. याच सुमारस मामा वरेरकर - आळतेकर आपल्या कलापथकातून एकांकिका आणि पथनाट्याच्या माध्यमातून समाजजागृती करत होते. भाऊ-बापूचा तमाशा पाहून ते खूपच प्रभावित झाले. भाऊ आणि बापू तमाशातून त्यांच्यासारखेच समाजप्रबोधन करत होते. त्यामुळे मामा वरेरकरांचा आणि भाऊ - बापूंचा विशेष स्नेह जुळला. भाऊ-बापूच्या तमाशात आता अधून-मधून विठाबाई आपल्या कलेची चुणूक दाखवून जात होत्या. ही कला मामा वरेरकरांनी नेमकी हेरली आणि विठाबाईंना आपल्या कलापथकात पाठवून द्यायची विनंती भाऊंना केली. भाऊंनी ती तात्काळ मान्य केली आणि विठाबाई मामा वरेरकरांच्या कलापथकातून काम करू लागल्या. त्यामुळे त्यांच्या अनुभवाच्या आणि शिकण्याच्या कक्षा रुंदावल्या. देशाविषयी, समाजाविषयी एक भूमिका तयार झाली. तमाशात आत्मसात केलेल्या कलेला आणखी पैलू पडले. त्यात शास्त्रशुद्धपणा आला. आपल्या कलेत त्या आणखी निपुण झाल्या.

    भाऊ खुडे यांच्या लेकीनं पुढं महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचवलं. मा.विठाबाई भाऊ नारायणगावकर या नावाने तमाशाला दिल्लीच्या तख्ता्तापर्यंत नेलं. विठाबाई नृत्यात आणि गायनात त्या खूप सरस होत्या. गवळणी, लावण्या, मराठी-हिंदी चित्रपटातली गीतं सुरेल आवाजात म्हणत असत. ढोलकीच्या तालावर नाचणार्या् विठाबाईंना पाहणं हा एक अपूर्व आनंद असे. त्यांच्यामुळे तमाशाला एक वेगळंच वलय प्राप्त होत होतं. तमाशातल्या कलावंतीणीचं आयुष्यही विठाबाईंच्या हळू-हळू अंगवळणी पडत होतं. तमाशातल्या बायकांची लग्न होत नाहीत हे त्यांना ठाऊक होतं. तमाशातल्या कलावंतांचं आयुष्यच खूप निराळं! बहुतेक पुरुष त्यांचं लग्न झालेलं असूनही त्यांच्या बायका-पोरांना गावी ठेवून तमाशातल्याच एखाद्या कलावंतीणीशी संधान बांधत. ती कलावंतीण जराशी थकली किंवा तिच्याशी बिनसलं की, ते तिला सोडून देत आणि दुसर्या कलावंतीणीबरोबर घरोबा सुरू करत. ती कलावंतीण मग दुसरा आधार शोधत असे. त्यांच्या संबंधातून जन्माला आलेली संतती फडावरच लहानाची मोठी होत असे. शाळेचं शिक्षण या मुलांपासून कोसो दूर असे. ही मुलं जरा कळती झाली की, फडावरच जुजबी कामं करत. फडावरच्या स्वैर वातावरणाचा त्यांच्यावर परिणाम होत असे. मुलींची अवस्था फारच वाईट असे. विठाबाईंनी याही परिस्थितीचा समर्थपणे सामना केला. तमाशाचा फड विठाबाईनं पुरता काबीज केला. लोक निखळ विठाबाईंचा नाच पाहायला आणि त्यांचं गाणं ऐकायला येत असत. भाऊ-बापूंचा तमाशा आता नावापुरता त्यांचा उरला होता. गण, गवळण झाली की विठाबाई बोर्डावर यायच्या. त्यांनी बोर्डावर पाय ठेवला की, शिट्‌ट्या आणि टाळ्यांचा कल्लोळ व्हायचा. मग रसिकांकडून फर्माईशी सुरू व्हायच्या. विठाबाईंच्या पायातल्या घुंगरांनी, अंगातल्या चैतन्यानं, प्रत्येक अदेनं रसिकांना घायाळ केलं होतं. भाऊ-बापूच्या तमाशातली गवळण, बतावणी, वगाचं सादरीकरण सगळंच अलातून असे. या वगांचे विषयही ‘शिवप्रतापासारखे’ ऐतिहासिक, ‘सत्यवान सावित्री’ सारखे धार्मिक तर कधी ‘चंद्र-मोहन’ किंवा ‘मेवाडचा कोळी’ सारखे सामाजिक असत. त्यामुळे तमाशाला येणारा प्रेक्षकवर्ग अगदी शहरातल्या बुद्धिजीवीपासून खेड्यातील अडाणी माणसापर्यंत सर्व थरातला असे. साहित्याची आणि लोककलेची आवड असणार्याा बहुतेकांनी भाऊ-बापूंचा तमाशा पाहिला होता. संगीत नाटक अकादमीच्या समितीवर असणार्याे काही ज्येष्ठ कलावंतांनीही हा तमाशा पाहिला होता.

    त्यांनी भाऊ-बापूंच्या तमाशाची समितीकडे शिफारस केली. हा तमाशा कलेच्या माध्यमातून लोकशिक्षणाचा कसा प्रचार करतो याची माहिती दिली. त्यांच्या या शिफारसीमुळेच भाऊ-बापूंच्या तमाशाला तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्यासमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. या वेळीही विठाबाई कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण ठरल्या. दिल्लीकरांकडून शाबसकी मिळवूनच त्या घरी परतल्या. लवकरच नाटक अकादमीच्या परीक्षक मंडळानं पुरस्कारासाठी भाऊ-बापूंच्या तमाशाची निवड केली आणि तमाशा क्षेत्रात राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारा तो पहिला तमाशा ठरला. सरकार दरबारी असं कौतुक झाल्यावर मग विठाबाईंनी मागं वळून पाहिलं नाही. तमाशातले त्यांचे स्पर्धक आता खूप मागं पडले होते. तमाशा म्हणजे विठाबाई असं समीकरण रूढ झालं होतं. आपला जन्म केवळ कलेची सेवा करण्यासाठी झालाय अशीच त्यांची धारणा होती. विठाबाईंची आपल्या कलेवरची निष्ठा ही अशी होती. त्यांच्या या स्वभावामुळेच त्यांनी अनेक माणसं जोडली. काही त्यांच्या वडिलांच्या काळापासून होती. त्यांच्या मदतीनं त्यांनी अनेक ठिकाणी आपली कला नेली. १९६२ मध्ये विठाबाईंच्या आयुष्यात आणखी एक महत्त्वपूर्ण घटना घडली. विठाबाई आणि त्यांच्या सहकार्यां२ना लष्करातील जवानांची करमणूक करण्यासाठी नेफा सीमेवर जाण्याचं आमंत्रण मिळालं. विठाबाईंच्या कलेचा हा एक प्रकारे सन्मान होता. खरं तर त्या वेळी विठाबाईंची लेक मालती अवघी तीन महिन्यांची होती. पण आपलं कर्तव्य श्रेष्ठ मानून त्यांनी मुलांना घरच्यांच्या हवाली केलं आणि आपल्या फडाबरोबर नेफा सीमेवर गेल्या. सीमेवरच्या बर्फाळ आणि जंगलाच्या प्रदेशात त्या आनंदानं राहिल्या. रोज एका छावणीवरून दुसर्याा छावणीवर जाणं, तिथे कला सादर करणं हे कष्टप्रद होतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काळात त्यांना विश्रांतीची गरज होती, त्याच काळात ही दगदग त्या सोशीत होत्या. कालांतराने विठाबाईंच्या वडिलांचं-भाऊ खुडेंचं-आणि चुलत भाऊ बापू खुडेंचं निधन झाल्यावर तमाशाची सगळी सूत्रं त्यांचा दुसरा चुलत भाऊ सावळाराम यानं हाती घेतली. पण त्याच्या काळात फडात हेवेदावे सुरू झाले. आर्थिक स्थितीही ढासळली.

    विठाबाई आणि सावळाराम यांच्यात वितुष्ट आलं. याचा परिणाम एवढाच झाला की, विठाबाई आपल्या मुलींसोबत भाऊ-बापूंच्या तमाशातून बाहेर पडल्या आणि त्यांनी विठा-भाऊ (मांग) नारायणगावकर असा स्वतंत्र फड सुरू केला. त्यांच्या तमाशाचा लौकिकही आता दिवसेंदिवस वाढत होता. त्यांच्या संपर्कात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि कला क्षेत्रातली मोठ-मोठी मंडळी येत होती. अशा रीतीने नारायणगावच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या रसिकांच्या कानात विठाबाईंच्या पायातल्या चाळाचे बोल, गळ्यातले लावणीचे सूर निनादू लागले. विठाबाईंची आर्थिक बाजूही भरभक्कम झाली होती. रसिकांनी त्यांच्यावर मुक्तहस्ते उधळलेल्या पैशामुळे नावलौकिकाबरोबरच चांगला पैसाही त्या गाठीला बांधत होत्या. पण जवळच्याच लोकांनी त्यांचा विश्वासघात केला. पण विठाबाईंनी पुन्हा मुंबईचे जुने ठेकेदार प्रभाकर कामेरकर यांच्या मदतीनं नव्यानं फड सुरू केला. नव्यानं माणसं बांधली. या वेळी त्यांची मुलगी मालतीही त्यांच्या मदतीला होती. पण विठाबाई आयुष्यातल्या अनेक चढ-उतारांनी खचल्या होत्या. अधून-मधून त्यांना गोत्यात आणणार्याई नातेवाईकांच्या कारवाया, थोरली मुलगी मंगला बनसोडे हिचं विभक्त होणं, खुद्द विठाबाईंच्या तमाशाच्या बसला झालेला अपघात या सर्व घटनांनी त्यांचं मनोधैर्य खचत होतंच पण त्या कर्जातही आणखी रुतत होत्या. तसं त्यांच्या कलेनंही त्यांना भरभरून दिलं. त्यांनी केलेली रसिकसेवा आणि कलेची सेवा सर्वपरिचित होती. त्यामुळे त्यांच्या पडत्या काळातही केवळ त्यांच नाव ऐकून त्यांना मदत करणारे अनेक जण होते. यात महत्त्वपूर्ण उल्लेख करावा लागेल तो लोकसत्ताचे तत्कालीन संपादक माधव गडकरी, वृत्तनिवेदक प्रदीप भिडे आणि तमाशाचे अभ्यासक प्रकाश खांडगे यांचा. या तिघांनी वृत्तपत्रातून, दूरदर्शनवरून विठाबाईंची परिस्थिती लोकांसमोर मांडली आणि त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरू झाला. दुर्गाबाई भागवतांनी १०,००० रु. ची मदत केली. यातूनच या तमाशा सम्राज्ञीचा सत्कार करण्याची कल्पना पुढे आली.

    आणि मुंबईच्या एशियाटिक सोसायटीच्या सभागृहात विठाबाईंचा हा सत्कार सोहळा दुर्गाबाई भागवतांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमामुळे विठाबाईंचे कलेवरील प्रेम आणि निष्ठा पुन्हा एकदा रसिकांपुढे आली. विठाबाईंनी या पैशातून आपली जुनी देणी चुकती केली, गहाण पडलेल्या गाड्या सोडविल्या. इथून पुढे स्वत:च्या जिवावर फड चालवण्याची उमेद त्यांच्यात आता राहिली नव्हती. म्हणून आपला फड तिनं मुलीच्या फडात विलीन केला आणि स्वत: आपल्या वतनाच्या गावी म्हणजे नारायणगावला निघून गेल्या. पण माध्यमांच्या प्रसिद्धीमुळे त्यांचे नाव आता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात आदराने घेतले जात होते. त्यामुळे तमाशातून पूर्ण अंग काढून घेऊनही त्यांचे सत्कार समारंभ चालूच होते. याच काळात संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारासाठी विठाबाईंच्या तमाशाची दुसर्यांेदा निवड झाली. त्यांना आपल्या आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान वाटले. विठाबाईंना त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत पुरस्कार मिळत होते. विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर यांचे निधन १५ जानेवारी २००२ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 15, 2018


  • राजा बढे

    राजा बढे हे नावाप्रमाणंच राजा-माणूस होते. राजा बढे हे नामवंत गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे कवी… रुबाबदार,प्रसन्न व्यक्तिमत्त्व, राजस छबी, कुसुमकोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमलवृत्तीचा हा प्रतिभासंपन्न कवी, पण मनात देशभक्तीचा स्फुलिग सांभाळणारा राष्ट्रप्रेमी म्हणजे राजा बढे.

      July 25, 2022


  • हुतात्मा भाई कोतवाल

    ९ ऑगस्ट १९४२ च्या महात्मा गांधीजींनी सुरु केलेल्या चले जाव चळवळीत ही ते सहभागी होते. ब्रिटिशांनी सदर चळवळीत सामील झालेल्या मोठ्या नेत्यांना अटक केली होती. त्यात भाई कोतवाल हि होते.त्यानंतर ते भूमिगत झाले. भूमिगत होऊन त्यांनी “कोतवाल दस्ता”नावाची संघटना स्थापन केली.

      January 2, 2022


  • पंडित दत्तात्रय विष्णू पलुस्कर

    पंडित दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातले पलुस. त्यांचा जन्म २८ मे १९२१ रोजी झाला. प्रसिद्ध गायक पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर ह्यांचे ते चिरंजीव होत. त्यांच्या आईचे नाव रमाबाई, आणि पत्नी्चे उषाताई. दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांचा जन्म मे १९२१ रोजी नाशिक मध्ये झाला . दहा वर्षाचे असताना त्यांच्या पित्याचे निधन झाले.बी पटवर्धन आणि पंडित जवाहरलाल,विनायकराव पटवर्धन, नारायण व्यास हि मंडळी तेव्हा पलुस्करांच्या वडिलांना ओळखत होती. पलुस्कर त्यांच्या वडील कडून संगीताचे बाळकडू घेत होते परंतु त्यांच्या निधनानंतर या थोर व्यक्ती कडून संगीताचे धडे गिरवले . म्हणजे त्यांच्या वडिलांनंतर हेच पलुस्करांचे गुरु होते. पलुस्कर १४ वर्षाचे असताना पंजाब मध्ये संगीत परिषद भरली होती.

    संगीताचा वारसा लाभलेले ग्वालेर येथील गंधर्व महाविद्यालयातून पदार्पण करण्याची जबाबदारी पलुस्करांना प्रथम मिळाली. यानंतर त्यांची संगीत कारकिर्दीची सुरवात हि ग्वाल्हेर घराण्यातच झाली. तसेच ग्वालेर घराण्यातूनच त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आत्मसात केले. अभिजात हिंदुस्तानी संगीतामधील ग्वाल्हेर घराण्याचे पंडित दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुस्कर हे गायकांचे मुकुटमणी आहेत. अल्पायुषी ठरलेला हा मधुरकंठी गायक आपल्या अद्भुत गानकलेचा वारसा मागे ठेवून गेला. छोट्या अवधीमध्ये एखादा राग उत्कृष्ट प्रकारे सादर करण्यामध्ये त्यांची विलक्षण हातोटी होती. दुर्दैवाने केवळ ३४ वर्षांचे अल्पायुष्य त्यांना लाभले. पण याही छोट्या आयुष्यात पलुस्करांनी पुणे, नाशिक, कुरुंदवाड, कलकत्ता, लखनौ, बनारस, पतियाळा, जालंधर, अमृतसर अशा भारतभरांतील शहरांत शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले. त्यांची गायकी देशभर लोकप्रिय होती.

    पंडित दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांचे निधन २५ ऑक्टोबर १९५५ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

      May 28, 2017


  • चरीत्र अभिनेते इफ्तिखार

    सय्यादिना इफ्तिखार अहमद शरीफ उर्फ इफ्तिखार यांचा जन्म जालंदरचा. त्यांचा जन्म २२ फेब्रुवारी १९२० रोजी झाला.मॅट्रिकची परीक्षा पूर्ण केल्यानंतर इफ्तिखार यांनी कला लखनौ कॉलेज पासून चित्रकला डिप्लोमा कोर्स केला. इफ्तिखार यांना गाण्याची आवड होती आणि प्रसिद्ध गायक कुंदनला सेहगल यांच्या गायनावर ते प्रभावित होते. १९४४ साली तकरार" या चित्रपटाने त्यांनी बॉलीवुड मध्ये पदार्पण केले.
    चित्रपट समीक्षक श्री.इसाक मुजावर यांनी एका ठिकाणी लिहीले आहे.
    गायिका तथा अभिनेत्री सुरैय्या यांनी आपल्या बरोबर लग्न करावे म्हणून इफ्तिखार हे सुरैय्या यांच्या कृष्णकुंज समोर उपोषणाला बसले होते आणि त्यांना साथ देण्यासाठी दिलीप कुमार देखील सोबत होते .
    इफ्तिखार हे १९४० ते ५० च्या काळात बॉलिवूडचे अतिशय बिझी अभिनेता होते. जसे कडक पोलीस अधिकारी या भूमिकांसाठी ते प्रसिध्द होते. तसेच नंतर च्या काळात वडील, काका, मोठा काका, आजोबा, पोलीस आयुक्त न्यायाधीश आणि डॉक्टर या भुमीकेत ते दिसून आले. बंदिनी, खेल खेल में, एजंट विनोद या चित्रपटात त्यांनी नकारात्मक भूमिका केल्या होत्या.
    इफ्तिखार यांचे निधन ४ मार्च १९९५ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.

      March 4, 2017


  • दत्तमहाराज कवीश्वर

    प.पू. श्रीदत्तमहाराज कवीश्वर यांचे आजोबा प.पू. श्रीवक्रतुंड महाराज आणि वडील प.पू. श्रीधुंडिराज महाराज दोघेही अधिकारी सत्पुरुष होते. प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजाचे कृपाछत्र कवीश्वर घराण्यावर होते. प.पू. श्रीदत्तमहाराज यांचा जन्म झाल्यावर त्यांना मांडीवर घेवून स्वामी महाराजांनी सांगितले की या ‘बालकाच्या रुपात आजोबांनीच म्हणजे प.पू. श्रीवक्रतुंड महाराजांनी पुन्हा जन्म घेतला आहे

      March 1, 2024


  • पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ डॉ. कमलाबाई सोहोनी

    भारताच्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ डॉक्टर मा.कमलाबाई सोहोनी (जैवरसायनशास्त्रज्ञ व आहारशास्त्रातील तज्ज्ञ) यांची आज पुण्यतिथी

    त्यांचा जन्म १८ जुलै १९११ रोजी झाला.

    दुर्गाबाई भागवत आणि कमलाबाई सोहोनी. दोघी सख्या बहिणी. मोठया दुर्गाबाईने साहित्यविश्व व्यापले तर धाकटया कमळाबाईने अवघे विज्ञानविश्व आपलेसे केले. या दोघी बहिणी अहमदनगरला आत्या सीताबाई भागवत यांच्याबरोबर राहून शिकत असताना, पंचक्रोशीतल्या मुली खेळायला त्यांना हाक मारीत ती 'दुर्गाकमळा' या जोडनावाने. मग त्यांतील एखादीला जरी बोलवायचे झाले तरीही 'दुर्गाकमळा' अशी दुपेडी हाकच येई. त्यांचा उल्लेखही 'दुर्गाकमळा' असाच केला जाई. बहिणींचे हे अद्वैत अखेरपर्यंत टिकले. त्यांनी निरेवर पण संशोधन केले होते.

    इंग्रजांच्या अंकित राष्ट्रातली एक हिंदुस्थानी मुलगी म्हणून त्यांना आपल्या शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला. इसवी सन १९३३ मध्ये रसायनशास्त्र हा विषय घेऊन त्या पहिल्या वर्गात बी.एस्‌सी.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांनी वर्तमानपत्रातीत जाहिरातीनुसार शास्त्रीय संशोधनासाठी बंगलोर येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ़ सायन्स'मध्ये अर्ज केला. टाटांनी १९११ मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेत प्रवेश मिळणे अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाई.
    प्रवेशासाठी कमलाबाई पूर्णपणे पात्र होत्या, परंतु संस्थेचे प्रमुख, नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांनी 'मुलगी असल्याने प्रवेश देता येत नाही' असे कमलाबाईंना कळविले. कमलाबाई श्री. रामन यांना प्रत्यक्ष भेटल्या व 'मुलगी म्हणून माझ्यावर होणारा अन्याय मी कदापि सहन करणार नाही,आणि इथे राहून मी संशोधन करून एम.एस्‌सी. होणारच.' असे ठामपणे सांगितले. श्री. रामन यांनी कमलाबाईंच्या हट्टास्तव त्यांना एका वर्षासाठी प्रवेश दिला. मग वर्षभर कमलाबाईंनी बायोकेमिस्ट्री या विषयाचा झपाटून अभ्यास केला. वर्ष‍अखेर रामन त्यांना म्हणाले. तुमची निष्ठा आणि चिकाटी पाहून असे वाटते की, यापुढे संस्थेत फक्त मुलींनाच प्रवेश द्यावा.

    १९३७ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या 'स्प्रिंगर रिसर्च' आणि 'सर मंगलदास नथूभाई' या शिष्यवृत्त्या मिळवून कमला सोहोनी इंग्लंडला गेल्या. तिथे केंब्रिजमधील जगप्रसिद्ध सर विल्यम डन लॅबॉरेटरीचे डायरेक्टर, नोबेल पारितोषिकविजेते सर फ़्रेड्रिक गॉलन्ड हॉपकिन्स यांना भेटून, संस्थेत प्रवेश देण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी 'माझ्या प्रयोगशाळेतील सर्व जागा भरल्या आहेत, तुलाच जागा मोकळी दिसली तर सांग' असे सांगितले. कुणाचीच ओळख नसल्याने बाई हताश झाल्या, तेव्हाच तेथील एक शास्त्रज्ञ डॉक्टर रिक्टर यांनी त्यांना आपली जागा देऊ केली. दिवसा त्या जागेवर, सकाळी आठ ते संध्याकाळी पाचपर्यंत, बाई काम करीत, आणि रात्री डो. रिक्टर. पहिले सत्र संपायला केवळ दोन-तीन दिवस बाकी असताना कमलाबाईंनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला आणि 'प्राणिमात्रांप्रमाणे सर्व वनस्पतीतीलही साऱ्या जीवनक्रिया 'सायटोक्रोन-सी'च्या मध्यस्थीने एन्झाइम्समुळे होतात, हे मूलभूत महत्त्वाचे संशोधन सादर करून १९३९ साली केंब्रिज विद्यापीठाची विद्यावाचस्पती(पीएच्‌.डी.)ही पदवी संपादन केली. इतरांचे प्रबंध हजार-पंधराशे पानांचे असताना, कमलाबाईंचा प्रबंध अवघ्या ४० पानांचा होता आणि तो त्यांनी त्यावेळी एका व्याख्यानाद्वारे सभागृहापुढे ठेवला.

    त्यानंतर अनेक शास्त्रज्ञाच्या आग्रहाला बळी पडून पुढील संशोधनासाठी इंग्लंडमध्ये न राहाता, डॉ कमलाबाई मायभूमीच्या प्रेमाने भारतात परत आल्या. दिल्लीच्या 'लेडी हार्डिंग्ज कॉलेज' व पुढे मुंबईच्या (रॉयल) इन्स्टिट्यूट ऑफ़ सायन्स' या संस्थेत त्यांनी काम केले. मुंबईच्या याच संस्थेच्या निदेशक म्हणून त्या निवृत्त झाल्या. 'लेडी हार्डिंग्ज कॉइलेजमधली जीवरसायनशास्त्राच्या प्राध्यापकाची त्यांची नोकरी, डॉ. हॉपकिन्स यांच्या सूचनेनुसार १९३८ सालापासून कमलाबाईंकरिता राखून ठेवण्यात आली होती. इंग्लंडहून आल्यावर १९३९ मध्ये, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात त्या आपल्या नोकरीवर रूजू झाल्या. सर्वोत्कृष्ट संशोधनाचे पदक राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते २९ एप्रिल १९६० रोजी मिळालं आणि विज्ञान क्षेत्रामध्ये उत्कृष्टता आणि त्यांच्या योगदानासाठीचा शेवटचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना १९९७ मध्ये मिळाला. दरम्यान, त्यांनी परदेशात आणि देशातही संशोधनाचं महत्त्वाचं काम केलं. त्यांच्या संशोधनात्मक प्रसिद्ध लेखांची संख्या १५५ इतकी आहे. निवृत्तीनंतरही त्यांनी आपलं सारं आयुष्य अन्नभेसळी विरोधातच काम करण्यात व्यतीत केलं. मा.कमलाबाईंनी प्रत्येक ठिकाणी आपला प्रथम क्रमांक कायम राखला. कसलीही प्रसिद्धीची हाव नाही. आयुष्यभर ज्ञानार्जन आणि विद्यार्थ्यांना प्रेमाने ज्ञान देणं यात त्या रमल्या. सरकारी नोकरीतही त्यांनी देशहित पाहिलं. कुणाचाही दबाव सहन न करता उत्तम काम केलं.

    मा.कमलाबाई सोहोनी यांचे ८ सप्टेंबर १९९७ रोजी निधन झाले. मा.कमलाबाई सोहोनी यांना आदरांजली.

    -- संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३

    संदर्भ:- वसुमती धुरू/ Wikepedia

      September 8, 2016