(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सखाराम विनायक आपटे

    सखाराम विनायक आपटे यांनी यंत्रशास्त्राच्या मूलतत्वांवरील पुस्तक, तसेच “वाहती वीज़” हे पुस्तक लिहून शास्त्रीय परिभाषेचा पाया रुंदावण्याचे काम केले.

    १८ जुलै १९७४ रोजी त्यांचे निधन झाले.

    Sakharam Vinayak Apte

      November 7, 2017


  • जतीन्द्र कराडकर

    त्यांचे निश्चित वय कोणालाच माहित नव्हते. असेल ७२ किंवा ७५ वा ७८-असेच त्यांना जवळून ओळखणारेही म्हणत. त्यांचे शिक्षण? विज्ञानातील पदवीधर असावेत! पण कोणत्या महाविद्यालयात, कुठले विषय घेऊन, कधी आणि कोणत्या ‘क्लास’मध्ये पास झाले हेही त्यांचे बहुतेक निकटवर्ती सांगू शकत नसत. घरचा पत्ता होता; पण ते राहात होते त्याला लौकिक अर्थाने ‘घर’ म्हणणे कठीण! कॉटवर, खुर्चीवर, टेबलवर, सर्वत्र पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रांमधली कात्रणे.

    त्या सर्व अस्ताव्यस्त पसाऱ्यातून त्यांना पाहिजे तो संदर्भ ते शोधू शकत असत. नाहीतरी त्यांच्या स्मृतीत तो पक्का असायचाच..‘घरा’त कुठेतरी कपडे-धुतलेले, न धुतलेले, वाळत टाकलेले. इस्त्रीचा शर्ट त्यांनी कधी घातल्याचे कुणी पाहिलेले नाही. शर्टला बटण असण्याचे कोणते बंधन नाही. दाढी केली-न केली, भांग पाडला न पाडला, स्नान केले वा न केले तरी बघणाऱ्याला फरक कळणार नाही. (सवयीने बोलताना आंघोळ केली असे ते म्हणत), चष्माही बेंगरुळ. घरात रेडियो होता. लहान टीव्हीसुध्दा, पण त्याच्या वायर्स, केबल्स अशाच इकडे-तिकडे..भेटलेल्या माणसाशी चर्चा, वाद, भांडण अनेक मुद्दय़ांवरून. जशी पुस्तके, नियतकालिके, कात्रणे अनेक विषयांसंबंधात.

    कार्ल मार्क्‍स ते किशोरी आमोणकर, हेन्री किसिंजर ते कथाकार ओ हेन्री, आइनस्टाईन ते पंडित नेहरू, डॉ. आंबेडकर ते अब्राहम लिंकन असे सर्वजण त्यांचे ‘कुटुंबिय’ पुस्तकरुपाने त्यांच्या घरात व मनात नांदत असत. त्यांना नाव अर्थातच होते. जतीन्द्र कराडकर. आई-वडिल दोघेही स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही कम्युनिस्ट. म्हणजे वारसा जरी मीनाक्षी साने, कॉम्रेड कराडकर, कॉम्रेड डांगे, कॉम्रेड सरदेसाई अशांचा आणि सदस्यत्वही (बहुधा!) कम्युनिस्ट पक्षाचे, तरी कोणत्याही चौकटीत मावू शकणारा हा माणूस नव्हता. ‘मार्क्‍स की मॅथेमॅटिक्स’ यापैकी एकच निवडायचा प्रसंग आला तर बहुधा त्यांनी गणिताचीच निवड केली असती ! गणित हा विषय किती आनंदाचा आहे हे ते सांगत आणि आपण कोणत्याही मुलाच्या मनातील गणिताविषयीची अढी काढून टाकू शकतो असे म्हणत. कोणतेही लौकीक वा प्रतिष्ठेचे गणित वा विज्ञान शिक्षण न घेतलेल्या जतीनने आयआयटीतर्फे होणाऱ्या खुल्या गणित स्पर्धामध्ये आठ वेळा पुरस्कार प्राप्त केले होते. फिजिक्स (अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, न्यूक्लिअर फिजिक्स इ.) या विषयाचे त्यांचे ज्ञान विलक्षण होते. जगाच्या पाठीवर कुठेही या दोन विषयांत जे संशोधन होत असे त्याची पूर्ण माहिती त्यांच्याकडे असे आणि त्या शोधांचे स्वरूप कितीही गुंतागुंतीचे असले तरी ते उत्तमपणे समजावून सांगू शकत असत. त्यांच्या ज्ञानभांडारात या विषयांप्रमाणेच साहित्य-संस्कृती आणि राजकारणही असे.

    अनेक कविता मुखोद्गत आणि एखाद्या राजकीय घटनेचे, व्यक्तीचे वा एखाद्या वैज्ञानिक संकल्पनेचे निरुपण करताना ते नेमकी कविता म्हणून तो मुद्दा स्पष्ट करत असत. कराडकर कधीही परदेशी गेले नाहीत. पण त्यांना रशिया, अमेरिका, आफ्रिका इत्यादी प्रदेशांबद्दल इतकी भौगोलिक, राजकीय, सांस्कृतिक माहिती असे आणि कोणत्याही घटनेचे विश्लेषण करताना ते इतक्या वेधक पद्धतीने हे घटक विशद करून सांगत की खरे म्हणजे ते ‘आंतरराष्ट्रीय राजकारण’ विषयाचे प्राध्यापकही होऊ शकले असते.

    इतिहास- मग तो मराठय़ांचा असो वा इंग्रजांचा- माहीत असल्याखेरीज राजकारणातील गुंतागुंत कळत नाही असे त्यांचे मत होते. साहजिकच त्यांचा इतिहास- युद्धशास्त्रसुद्धा- हाही चिंतनाचा व अभ्यासाचा विषय होता. लौकीक अर्थाने त्यांना कुणीही विद्वान म्हणणार नाही. त्यांना ते आवडलेही नसते. त्यांना कुणीही कोणतेही पुरस्कार दिले नाहीत. त्याचे तर त्यांना अप्रूपही नव्हते. ते ज्या कम्युनिस्ट पक्षात-चळवळीत- वाढले त्यांनीही त्यांची फार कदर केली नाही. ज्याला इंग्रजीत ‘मॅवेरिक’ म्हणतात असा हा ‘मॅवेरिक कॉम्रेड’ होता. सर्वसाधारणपणे कम्युनिस्ट पक्षात संघटनेच्या शिस्तीला, पक्षाच्या ‘लाईन’ला आणि विविध प्रसंगांमधील धोरणांना खूप महत्त्व असते. ती शिस्त वा लाईन तोडून चालत नाही.

    कराडकरांना पक्षातून काढून टाकले नाही हा पक्षाचा मोठेपणा की कराडकरांचा मोठेपणा पक्षात कळू शकणाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे त्यांचा व्यासंगी विक्षिप्तपणा खपून गेला हे सांगणे कठीण आहे. जतीनची मूळ मार्क्‍सवादी विचारसरणी आणि कम्युनिस्ट आदर्शावर निष्ठा होती- तितकीच त्यांची ज्ञाननिष्ठाही होती. ते इतके नि:स्पृह होते की, आपण नि:स्पृह आहोत हेही त्यांना माहीत नव्हते- जसे इतका व्यासंग असून त्यांना कुणी ‘स्कॉलर’ म्हणून संबोधले नाही हे तर त्यांच्या गावीही नव्हते! असे लोकच निखळ बौद्धिक-वैचारिक जीवनाला अर्थ आणि आशय प्राप्त करून देतात.

      August 5, 2017


  • कोलगेटचा निर्माता विल्यम कोलगेट

    लहानपणापासून अनेक पिढय़ांनी पांढरा आणि लाल अशा टिनमधील टुथपेस्ट पावडर ते त्याच रंगाच्या टय़ूबमधील टुथपेस्ट असा प्रवास अनुभवलेला असतो. खूप सारे पर्याय उपलब्ध नसताना टुथपेस्ट म्हणजे कोलगेट हे गणित डोक्यात पक्कं होतं.

      January 25, 2022


  • माणिक वर्मा

    क्षणभर उघड नयन देवा — तुझा नि माझा एक पणा — निघाले आज तिकडच्या घरी — झुलवू नको हिंदोळा — अश्या अनेक गोड गीतांना गोड आवाज देणाऱ्या जेष्ठ गायिका माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच.

      July 15, 2022


  • गझलविश्व समृद्ध करणारे प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार

    इलाही जमादार यांनी १९६४ सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. कविवर्य सुरेश भटांनंतर मराठी गझलेला उत्तुंगतेवर नेणारे गझलकार अशी त्यांची ओळख होती. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी व गझलकार होते. विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाहींच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या आहेत.

      March 1, 2022


  • डॉ. अनिल भास्कर तांबे

    आपलं हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा घटक असतो आणि त्याचीच आपण योग्यरितीनं काळजी घेत नाही; अशावेळी काही विपरित घडलं तर डॉ. हाच देव ठरतो!

      May 23, 2014


  • गोट्या, चिंगी, दाजी अशा व्यक्तिरेखांचे जनक ना. धों. ताम्हनकर

    आधुनिक मुलांच्या गोष्टींव्यतिरिक्त ताम्हनकरांनी अंकुश, अविक्षित, नारो महादेव, नीलांगी अशा ऐतिहासिक धाटणीच्या कथाही लिहिल्या होत्या.

      January 5, 2022


  • किशोर कुमार – सुसंकृत अवलिया

    किशोर कुमार यांच्या गायनाचे विश्लेषण करण्याअगोदर या गाण्याच्या निमित्ताने त्यांच्यावरील “यॉडलिंग” करणारा गायक असा लागलेला शिक्का किती चुकीचा आहे, हेच दर्शवायचे आहे. आपण किती सहजपणे कुठल्याही कलाकाराला झापडबंद अशा लेबलात अडकवतो यायचे उत्तम उदाहरण म्हणजे किशोर कुमार.

      August 23, 2018


  • भारताचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू नाडकर्णी

    आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कंजुष गोलंदाज अशी बापूंची ओळख होती. कसोटीत सलग २१ षटके निर्धाव टाकण्याचा विश्वविक्रम बापूंनी १४ जानेवारी १९६४ रोजी इग्लंडविरुद्ध रचला होता. चेन्नईच्या मैदानावर हा सामना झाला होता. बापू डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करायचे. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात त्यांनी ३२ षटके टाकली. त्यातील तब्बल २७ षटके निर्धाव होती. ३२ षटकांत त्यांनी १.६७च्या सरासरीने केवळ ५ धावा दिल्या होत्या. बापूंचा हा विश्वविक्रम अबाधित राहिला.

      April 4, 2022


  • अमेरिकी गायक, अभिनेता व हास्य अभिनेता डीन मार्टिन

    डीन मार्टिन हे एक प्रसिद्ध अमेरिकी गायक, अभिनेता व हास्य अभिनेता होते. डीन मार्टिन यांना “द किंग ऑफ कूल” असेही म्हणत असत.

      June 7, 2021