जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
जंगल आमच्या हक्काचे, जंगल आमच्या मालकीचे आणि इंग्रजांचा त्याच्यावर कोणताही अधिकार नाही हे वर्तमान पनवेल जिल्ह्यातील चिरनेर येथे अक्कादेवीच्या टेकडीवर झालेल्या 1930 च्या जंगल सत्याग्रहाच्या संघर्षात केवळ 19 वर्षाच्या नाग्या कातकरीने आपल्या शरीरावर गोळी झेलून सिद्ध केले.
November 3, 2024
प्राध्यापक भालचंद्र वामन केळकर ऊर्फ मा.भालबा केळकर हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन केले
May 25, 2019
नाशिक येथे जन्मलेल्या मधुसूदन पांडुरंग भावे हे बेस्टमध्ये रूजू होऊन त्यांनी अनेक वर्षे प्रवाशांची निरपेक्ष सेवा केली. साहित्याची निस्सीम ओढ त्यांना, केवळ नोकरी व कुटुंबाच्या चक्रामध्ये फसू देत नसल्यामुळे त्यांनी ही लिखाणाची आंतरिक उर्मी कागदावर नियमितपणे उतरविण्यास सुरूवात केली. पुढे प्रकृती स्वास्थ्य बिघडल्यामुळे त्यांनी बेस्टची नोकरी सोडली, व प्राणापणाने जोपासलेली, वाङ्मय प्रतिज्ञा ह्याच क्षणाला उफाळून वर आल्यामुळे या क्षेत्रात येण्यासाठी आपली बौध्दीक क्षमतापणाला लावली. मितभाषी, मृदु स्वभाव, तरीही आतून मिश्कील असलेले भावे आकाशवाणीची मान्यता मिळविण्यास सफल झाले, आणि तेथूनच गीतकार म्हणून त्यांच्या प्रवास सुरु झाला. ठाणे म्हटले, की काही नामांकित व्यक्तींचा आवर्जून उल्लेख होतो. त्या नावांचा यादित मधुसूदन भावेंच्या नावाचा सामावेश झाला आहे.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
अस्सल महाराष्ट्रीय वडापाव आणि भारतीय खवय्येगिरीची आठवण देणारी कुल्फी, बर्फाचा गोळा या गोष्टींनी लंडनमध्येही धडक मारली. स्वस्त दरांच्या स्पर्धेला तोंड देत आपल्या गुगली रेस्तरॉंद्वारे नाशिकच्या सचिन मुळाणे या मराठी तरुणाने लंडनवासियांना अस्सल भारतीय लज्जतीने भुरळ पाडली आहे.
सचिन मुळाणे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला मराठी तडका हा लेख पुढील पानावर वाचा.
सचिन मुळाणे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला मराठी तडका हा लेख वाचा.
September 7, 2015
अशा अनेक व्यक्ती आहेत की, अगदी सामान्य स्थित असून, अतिशय कष्ट व प्रयत्न करून स्वतःचा उत्कर्ष केला. अशा व्यक्ती प्रसिद्ध पराङगमुख असतात. अशाच व्यक्तीची गाथा लिहिली आहे, वाचून प्रेरणा मिळेल याची खात्री आहे.
July 11, 2019
सतरंजी विक्रेत्यांपासून सुरूवात करणा-या सिप्पी यांनी १९५५ मध्ये चित्रपट कारर्कीदीला सुरूवात केली. शोले, सीता और गीता, सागर, शान या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती सिप्पी यांनी केली. शोले या अजरामर चित्रपटाच्या माध्यमातून ज्यांचे नाव चिरंतन रसिकांच्या लक्षात राहिल.
September 14, 2017
फिरोजशा मेहता यांच्यानंतर राष्ट्रीय स्थान प्राप्त करणारे दुसरे नेते म्हणजे स. का. पाटील. भारतीय महापौरपदाला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवून देणारे ते एकमेव महापौर अशी इतिहासात नोंद आहे.
June 27, 2022
लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार अशी ख्याती असलेल्या व.पु. काळे हे पेशाने वास्तुविशारद होते.त्यांचा जन्म २५ मार्च १९३३ रोजी झाला.
कथा,ललित लिखाण, नाटक अशा सर्व लेखनप्रकारात उत्तम लिखाण करणारा हा लेखक व पुं चे विशेष म्हणजे कथेला एकदम शेवटी कलाटणी देण्याची ताकद ...
आणि जाता जाता जिवन विषयक तत्वज्ञान थोडक्यात सांगुन जायची त्यांची हातोटी .पण सर्वसामान्य जनमानसात प्रसिद्धी मिळवणार्या काही मोजक्या लेखकांमध्ये वपुंचा समावेश होतो हे नक्की "वपुर्झा" हे असाच उदात्त पुस्तक.. कधीही, कुठलाही पण काढून वाचा.. काही घरात अत्तराच्या बाटल्या टेबलावर मांडून ठेवलेल्या असतात.. ज्याच्या त्याच्या मूड प्रमाणे जो तो अत्तर काढून लावत असतो. तसंच काहीस या पुस्तकाचं आहे.. आणि म्हणूनच त्याला अनुक्रमणिका, संदर्भ, क्रमांक अस काहीही नाही!
वपुंनी कादंबरी लिहिली, नाटक लिहिले, आत्मवृत्तपर व चरित्रात्मक लेखनही केले. पण त्यांचा खरा पिंड कथाकाराचा, याहीपेक्षा कथाकथनकाराचा आहे. साहित्याच्या या प्रकारात त्यांच्या शक्ती रसरसून येतात. त्यांच्या कथा अर्थवाही व भावनाप्रधान आहेत पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चैतन्यदायी आहे. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्हाळ्याने, कधी आद्रतेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातली माणसेही कोणी असामान्य नाहीत. अवतीभोवती असणार्यान लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौदर्य आहे, तोरा आहे.. म्हणूनच हे लेखन कागदांपेक्षा मनात जास्त वेळ जतन करून ठेवलं जात आहे.
“आपण सारे अर्जुन”, “गुलमोहर”, “गोष्ट हातातली होती!“, “घर हलवलेली माणसे”, “दोस्त”, “माझं माझ्यापाशी?”, “मी माणूस शोधतोय”, “वन फॉर द रोड”, “रंग मनाचे”, “माणसं”,“प्लेझर बाँक्स भाग १ आणि २”, “वपुर्वाई”, “वपुर्झा़”, “ हुंकार” असे पत्रसंग्रह, व्यक्तीचित्रे, ललितप्रकार खुपच प्रसिध्द आहेत. तसंच “तप्तपदी”, “ठिकरी”, “पार्टनर”, “ही वाट एकटीची” यासारख्या कादंबरी खुपच गाजल्या; व.पु काळेंना "महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान", "पु.भा.भावे पुरस्कार", "फाय फाउंडेशनाचा पुरस्कार" आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले. व. पु काळे यांचे २६ जून २००१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकीपीडीया
June 27, 2017
मुंबईतील बालनाट्यनिर्मिती करणाऱ्या ’वंदना थिएटर्स’च्या त्या संचालिका होत्या. त्यांनी बालरंगभूमीसाठी लिहिलेली रॉबिनहूड, टिमटिम टिंबू बमबम बगडम, बजरबट्टू इत्यादी बालनाट्ये गाजली. त्यांच्या रॉबिनहूड या नाटकातून शिवाजी साटम, विलास गुर्जर, मेधा जांबोटकर, विजय गोखले, विनय येडेकर अशा अनेक कलाकारांनी रंगभूमीवर पर्दापण केले.
वंदना विटणकर यांनी प्रेमगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते अशी ७०० हून अधिक गाणी व सुमारे १५०० कविता लिहिल्या आहेत. अरूण पौडवाल, अनिल मोहिले, सुधीर फडके, श्रीकांत ठाकरे, श्रीनिवास खळे अशा संगीतकारांनी त्यांच्या गीतांना चाली दिल्या असून सुलोचना चव्हाण, प्रभा अत्रे, शोभा गुर्टू, जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर, मोहम्मद रफी, हेमंतकुमार, आशा भोसले अशा नामवंत गायकांनी गायली आहेत. मा.वंदना विटणकर यांचा पहिला विवाह चित्रकार चंद्रकांत विटणकर यांच्याशी झाला होता. मा.चंद्रकांत विटणकरांच्या निधनानंतर १९८६ साली त्यांनी किशोर पनवेलकर यांच्याशी पुनर्विवाह केला होता. मा. वंदना विटणकर यांचे ३१ डिसेंबर २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
वंदना विटणकर यांची लोकप्रिय गीते
खेळ कुणाला दैवाचा कळला
नाते जुळले मनाशी
मी प्रेम नगरचा राजा
परिकथेतील राजकुमारा
राणी तुझ्या नजरेने नजरबंदी केली गं
आज तुजसाठी या पावलांना
अधिर याद तुझी जाळीतसे रे दिलवरा
हा रुसवा सोड सखे
हे मना आज कोणी
अगं पोरी संबाल दर्याला
तुझे सर्वरंगी रूप
शोधिसी मानवा राऊळी मंदिरी
खेळ तुझा न्यारा
वंदना विटणकर यांची गाणी.
https://www.youtube.com/playlist?list=PLaCDrs1IYilKCKh6uyiYOpD8YNSoGomFo
December 31, 2017
प्रशांत दामले यांना मराठी रंगभूमीवरचा विक्रमादित्य अभिनेता म्हणले जाते. त्यांचा जन्म ५ एप्रिल १९६१ रोजी झाला. त्याच्या अभिनय कारककिर्दीला एकोणचाळीसहून अधिक वर्षे पूर्ण झाली. या काळात त्याने जवळपास आठ हजार नाटकांचे प्रयोग केले आहेत. मराठी चित्रपटातील आणि रंगभूमीवरील प्रशांत दामले यांची कारकीर्द १९७८ मध्ये सुरू झाली. 'टूरटूर' या मराठी नाटकापासून प्रशांत दामले दामले सर्वप्रथम विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. यात एका मद्रासी माणसाची त्यांनी भूमिका केली होती. त्यानंतर 'मोरूची मावशी' या नाटकापासून त्यांची व्यावसायिक रंगभूमीकडे वाटचाल सुरू झाली. दरम्यानच्या काळात त्याला चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या, त्यांनी अनेक चित्रपटही केले. मात्र तेथे त्याचे मन रमले नाही. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ३७ चित्रपटांत आणि २६ नाटकांत अभिनय केला आहे. यातील "चार दिवस प्रेमाचे", "जादू तेरी नजर", "गेला माधव कुणीकडे", "एका लग्नाची गोष्ट", "ओळख ना पाळख", "प्रियतमा", "मोरूची मावशी", "लग्नाची बेडी", "लेकुरे उदंड झाली", "शूss कुठं बोलायवं नाही", "नकळत दिसले सारे" आणि "कार्टी काळजात घुसली" प्रमुख आहेत. त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांमध्ये “अक्का”, “आई पाहिजे”, “आत्मविश्वास”, “आनंदाचे झाड’, “आम्ही दोघे राजा राणी”, “इना मिना डिका”, “एक रात्र मंतरलेली”, “एकदा पहावं करुन”, “खुळ्यांचा बाजार”, “घरंदाज”, “चल गंमत करु”, “चार दिवस सासूचे”, “तू तिथं मी”, “पसंत आहे मुलगी”, “पुढचं पाऊल”, “फटफजिती”, “बंडलबाज”, “बाप रे बाप”, “मधुचंद्राची रात्र”, “माझा छकुला”, “रेशीमगाठी”, “वाजवा रे वाजवा”, “विधिलिखित”, “सगळीकडे बोंबाबोंब”, “सगळे सारखेच” आणि “सवत माझी लाडकी” हे प्रमुख आहेत. दूरचित्रवाणीवरही त्यांनी २४ मराठी मालिकांत काम केले आहे. यातील काय पाहिलंस माझ्यात, घरकुल, बे दुणे तीन या मालिका मालिका फार लोकप्रिय झाली. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये मा.प्रशांत दामले यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्ड्स नोंदली गेली आहेत. त्यांमध्ये २४ डिसेंबर १९९५ रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे चार प्रयोग १९९५ साली ३६५ दिवसांत ४५२ प्रयोग १९९६ साली ३६५ दिवसात ४६९ प्रयोग, १८ जानेवारी २००१ ला मा.प्रशांत दामले यांनी एकाच दिवशी ५ प्रयोग करायचे ठरवलं अर्थात त्याचं नियोजनहि केलं होतं. सकाळी ७ वाजता पहिला प्रयोग सुरु झाला तो रात्री ११.५५ ला पाचव्या प्रयोगाचा पडदा पडला.हा प्रशांत दामले यांचे लिम्का बुक वर्ल्ड रेकॉर्ड झाले. यात गेला माधवचे २ प्रयोग, एका लग्नाची गोष्ट १ आणि चार दिवस प्रेमाचे २ प्रयोगांचा समावेश होता. प्रशांत दामले यांना सुंदर आवाजाची दैवी देणगी लाभली आहे. गायक-नट म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत. 'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं' सारखं सुंदर नाट्यगीत गाणाऱ्या मा.प्रशांत दामलेंनी झी मराठीवरील सारेगमप स्पर्धासुद्धा जिंकली होती. प्रशांत दामले हे उत्तम निवेदक आहेत. अनेक गाण्यांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांनी केले आहे, मुळातच खाण्याची आवड असलेले प्रशांत दामले गेली काही वर्ष झी मराठीवरील 'आम्ही सारे खवय्ये' कार्यक्रमाचे खमंग सूत्रसंचालन करतात.
प्रशांत दामले यांची वेबसाइट
www.prashantdamle.com
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मला सांगा सुख म्हणजे
https://www.youtube.com/watch?v=mvf0L3x0LzA
प्रशांत दामले यांची नाटके
https://www.youtube.com/watch?v=JZl_zwm_IPI
https://www.youtube.com/watch?v=PD-mBpCvTAw
April 5, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti