(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सुशीलकुमार शिंदे

    आपल्या कर्तृत्वाने देशपातळीवर स्थिरावलेले महाराष्ट्रातील प्रतिभाशाली नेतृत्व. सत्ता हे समाज परिवर्तनाचे साधन आहे, असे मानून सदैव क्रियाशील राहणारा नेता.

      September 3, 2010


  • नामवंत हिंदी लेखक व पत्रकार धर्मवीर भारती

    धर्मवीर भारतीं यांचे आडनाव वर्मा. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९२६ रोजी अलाहाबाद येथे झाला. १९४७ मध्ये हिंदी साहित्याची पदवी संपादन केलेले भारती विद्यार्थीदशेपासूनच स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभागी होते. स्वातंत्र्योत्तर काळात काही काळ त्यांनी हिंदी साहित्याचे अध्यापन केले.नंतर ‘अभ्युदय’ या हिंदी साप्ताहिकेतून आपल्या पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली.

    अलाहाबाद विद्यापीठात काही काळ हिंदीचे अध्यापन करून १९६० मध्ये टाईम्स समूहाच्या ‘धर्मयुद्ध’ मध्ये त्यांनी प्रवेश केला. १९८७ पर्यंत ‘धर्मयुग’चे ते संपादक होते. डॉ. धर्मवीर भारतींना आधुनिक हिंदी साहित्याचे अध्वर्यू मानले जाते. त्यांनी ऑस्कर वाईल्डच्या कथांचे हिंदी अनुवादही केले. त्यांचा ‘कनुप्रिया’ हा काव्यसंग्रह हिंदी साहित्यातील एक नवा टप्पा मानला जातो.

    ‘सूरजको सातवाँ घोडा’, ‘गुनाहोंका देवता’ या त्यांच्या साहित्यकृतींवर चित्रपट झाले. सुमारे ५० वर्षे हिंदी साहित्य आणि पत्रकारिता ही क्षेत्रे गाजविणा-या धर्मवीर भारतींची ‘अंधा युग’ ही कलाकृती अजरामर ठरली. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना अनेक साहित्य पुरस्कार दिले. भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ देऊन गौरव केला. धर्मवीर भारती यांचे ४ सप्टेंबर १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३.
    संदर्भ.इंटरनेट

    ‘सूरजको सातवाँ घोडा’, ‘गुनाहोंका देवता’ चित्रपट
    https://youtu.be/adP9erjnDQo
    https://youtu.be/JS00ybwPZtw

      September 4, 2017


  • अच्युत पालव

    १९८३ साली अच्युत पालव यांनी उल्का शिष्यवृत्तीसाठी मोडी लिपीचा पंधराव्या ते सतराव्या शतकांतील इतिहास, तसेच मोडी लिपीची विविध वळणे व अक्षररुपे यांवर कलात्मक दृष्ट्या संशोधन करुन प्रबंध लिहिला. मोडी व आजची देवनागरी यांच्या दृश्य समन्वयातून ‘धृतनागरी’ तयार केली. तिला ‘मुक्त लिपी’ असे नाव दिले. या लिपीचा त्यांनी सुलेखनातून कलात्मक आविष्कार घडवून ह्या प्रयोगाची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख करुन दिली.

      June 17, 2022


  • संदीप कराजनगी

    बोस्टोन येथील हार्वर्ड मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये सर्जरी विभागात इन्स्ट्रक्टर म्हणून काम करणार्‍या संदीप कराजनगीने पोस्ट डॉक्टरेट अभ्यासादरम्यान एमआयटीमधील तज्ज्ञांसोबत व्होकल कॉर्डच्या आजारांवर उपयुक्त अशा जेलची निमिर्ती केली आहे. आवाजाच्या आजारांवर मात करून आवाजाला पुर्नजन्म देण्यासाठी तो झटत आहे.

    जिद्द, सचोटी आणि महत्त्वाकांक्षा ज्याच्याकडे असेल, त्याला यश हमखास मिळणारच. याच त्रिसूत्रीचा वापर करून डोंबिवलीच्या संदीप कराजनगी या तरुणाने आज जगातील तमाम वैद्यक क्षेत्राचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. गायक, शिक्षक अशा गाण्याच्या किंवा बोलण्याच्या व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना अनेकदा व्होकल कॉर्डचा आजार उद्भवतो. या आजारावर तोडगा काढण्यासाठी २०व्या शतकाच्या अखेरच्या दशकात अमेरिकेत संशोधनाला सुरुवात झाली. त्यानंतर सुमारे १५वर्षांनी अमेरिकेतील मॅसेस्टस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात एमआयटीमधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक रॉबर्ट लँगर यांच्या लॅबमध्ये एका टीमने या संशोधनाला मूर्त स्वरूप देऊन व्होकल कॉर्डसारखं काम करणारं जेल तयार केलं आहे. या टीममध्ये संदीपची भूमिका महत्त्वाची ठरली.

    संदीप लहानपणापासूनच हुशार. डोंबिवलीतील ग्रीन्स इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी असलेला संदीप दहावीत ९१.२८ टक्के गूण मिळवून शाळेतून पहिला आला होता. इंजिनीअरिंग करायचं हे ठरलेलं असल्यामुळे त्याने रुपारेल कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. अभ्यासातील कामगिरी कायम ठेवत संदीपने बारावीत ९८ टक्के मिळवले. केमिकल इंजिनीअरिंग करायचं असल्यामुळे अर्थात पहिलं प्राधान्य त्याने युडीसीटीला दिलं होतं. मात्र तेथे प्रवेश मिळू शकला नाही म्हणून त्यानं विलेपार्ले येथील डी.जे. संघवी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. विद्यापीठ पातळीवरही आपली अव्वल क्रमवारी कायम ठेवत संदीपने इंजिनीअरिंग पूर्ण केलं. हे करत असतानाच त्यानं जीआरई, टोफेल यासारख्या परीक्षा दिल्या. या परीक्षांमधील चांगल्या गुणांमुळे त्याला सुमारे आठ ते दहा परदेशी विद्यापीठांनी पूर्ण स्कॉलरशिप देऊ केली. यातील न्यूयॉर्कमधील ट्रॉय येथे असलेल्या 'रेन्सलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट'मध्ये त्याने प्रवेश घेतला. या सर्वात विशेष नमूद करायची बाब म्हणजे संदीपने कोणतंही शिक्षण घेण्यासाठी कधी कोचिंग क्लासेसची मदत घेतली नाही. शाळेतील अभ्यास आणि स्व-अभ्यास यावरच त्यानं यशाची शिखरं गाठण्यास सुरुवात केली. याचा त्याला भविष्यातही फायदा झाला.

    २००१मध्ये संदीप केमिकल आणि बायोलॉजिकल इंजिनीअरिंगच्या अॅडव्हान्स अभ्यासासाठी ट्रॉय येथील शैक्षणिक संस्थेत दाखल झाला. तेथे घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेतही तो पहिला आला. यामुळे त्याच्या आवडीचा विषय निवडण्याची संधी त्याला मिळाली. पाच विषयांतून नॅनोटेक्नॉलॉजी हा विषय त्याने निवडला. २००६मध्ये त्याने रेन्सलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून आपली डॉक्टरेट पदवी मिळवली. हा अभ्यास करताना तो जैवशास्त्रातील नॅनोमटेरिअल्सची नवलाई शोधण्यात गुंतला होता. याबाबतीतील त्याची निरीक्षणं त्याने ११ संशोधन प्रबंधांच्या माध्यमातून विज्ञान जगतासमोर मांडली. यानंतर २००६मध्ये प्रतिष्ठीत अशा एमआयटीमधील प्राध्यापक रॉबर्ट लँगर यांच्या लॅबमध्ये त्याला पोस्ट डॉक्टरेटल संशोधनाचं काम करण्याची संधी मिळाली. एमआयटी आणि मॅसेस्टस जनरल हॉस्पिटल अर्थात एमजीएच या दोन प्रतिष्ठीत संस्थांचा मिळून बायोमटेरिअल आणि टिश्यू इंजिनीअरिंगचा हा अभ्यास होता. यामध्ये व्होकल कॉर्डमध्ये होणार्‍या आजारांवर उपाय म्हणून इंजेक्टेबल बायोमटेरिअल तयार करण्याचं त्याच्यासमोर आव्हान होतं. त्याच्यासोबत तेथील काही तज्ज्ञ डॉक्टरांची टीमही काम करत होती. हे आव्हान स्वीकारून संदीप कामाला लागला आणि त्याने त्यात यशही मिळवलं. संदीप आणि त्याच्या टीमला व्होकल कॉर्डच्या आजाराने त्रस्त असलेल्यांवर उपचार करण्यासाठी व्होकल कॉर्डसारखं काम करणारं काहीतरी कृत्रिम मटेरिअल तयार करायचं होतं. त्यासाठी त्यांनी पूवीर्ची सर्व गृहितकं मागे ठेवून ही समस्या केवळ एक यांत्रिक समस्या आहे, असं समजून त्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यांनी आवाजाचा दर्जा सुधारण्यासाठी अथवा त्या आजारांवर मात करण्यासाठी उतींचा वापर करणं टाळण्याचा निर्णय घेतला. याला पर्याय काय असू शकेल यावर विचार करत असताना त्यांनी पॉलिथिलीन ग्याकोल अर्थात पीईजीची निवड केली. याचं मुख्य कारण म्हणजे पीईजी हे एफडीएने मान्यता दिलेल्या विविध औषधांमध्ये वापरण्यात येतं. यानंतर संशोधकांनी व्होकल कॉर्डच्या हालचालींसारखी पीईजीची हालचाल कशी करता येईल यावर भर देण्यास सुरुवात केली. यासाठी पीईजीच्या सूक्ष्म कणांचा त्यांनी अभ्यास करण्यास सुरुवात केली. आपली व्होकल कॉर्ड ही फुप्फुसातून येणार्‍या हवेमुळे व्हायब्रेट होत असते. अशाप्रकारेच पीईजीला व्हायब्रेट करण्याची गरज होती. यासाठी व्होकल कॉर्डच्या व्हायब्रेशनचं प्रमाण लक्षात घेणंही गरजेचं होतं. अखेर संशोधकांना एका ठिकाणी पीईजी आणि व्होकल कॉर्डचं व्हायब्रेशन समान जाणवलं. या स्थितीला त्यांनी पीईजी ३० असं नाव दिलं. नव्याने तयार झालेलं हे जेल प्राण्यांमध्ये इंजेक्ट करून चाचण्या यशस्वी करण्यात आल्या. आता मानवावर याची चाचणी करण्यात येणार असून हा प्रयोग यशस्वी झाला तर जगातील अनेक पेशंट्सना दिलासा मिळेल.

    या संदर्भातील रिसर्च पेपर्स प्रसिद्घ करून संदीपचं पोस्ट डॉक्टरेट पूर्ण झालं. त्याच्या या संशोधनाची दखल तेथील प्रसिद्घ वृत्त वाहिनी सीएनएनने घेऊन संदीपची खास मुलाखतही घेण्यात आली. संदीप सध्या हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये सर्जरी विभागात इंस्ट्रक्टर म्हणून काम करत आहे. तो अमेरिकन केमिकल सोसायटी आणि अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनीअर्सचा सभासदही आहे. त्याचं संशोधनाचं काम सुरू असून आवाजाचा हा किमयागार भविष्यात मायदेशी परतणार आहे, हे मात्र निश्चित!

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


      August 8, 2017


  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंतराव टिळक

    जयंतराव टिळक हे स्वातंत्र्योत्तर काळात तत्कालीन इंडियन नॅशनल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार झाले होते. महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सोळा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीसाठी अध्यक्ष होते.

      April 23, 2022


  • ज्येष्ठ गायिका धोंडुताई कुलकर्णी

    वयाच्या आठव्या वर्षां आकाशवाणीवर सादर केलेल्या गायनाच्या मैफिलीमुळे त्यांचे नाव संगीत क्षेत्रात पसरले. शिक्षणकाळातील कठोर आणि खडतर साधनेमुळे धोंडुताईंना अल्पावधीतच अनेक नामवंत गायकांच्या मैफिलीत आपली गानकला सादर करण्याची संधी मिळाली.

      July 23, 2017


  • आकाशवाणी या नावाचे जनक पं. नरेंद्र शर्मा

    आज जे आपण ‘आकाशवाणी’ नाव ऐकतो ते १९५७ मध्ये नरेंद्र शर्मा यांनी ‘आकाशवाणी’ हे नवे आकर्षक नाव ऑल इंडिया रेडीओला सुचविले. या नावामुळे भारतीय जनता, रसिक श्रोत्यांमध्ये एक आपुलकीची भावना निर्माण झाली, व लोक रेडिओ ऐकू लागले.

      February 28, 2024


  • ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे

    भालजी पेंढारकर यांच्या आकाशगंगा या चित्रपटातील छोट्या सीतेच्या भूमिकेपासून त्यांच्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात झाली. थोरातांची कमळा या चित्रपटात त्यांनी प्रथमच नायिकेची भूमिका केली. त्यानंतर नायिका म्हणून त्यांनी सुमारे १५ वर्षे काम केले. मधुचंद्र, आम्ही जातो आमुच्या गावा, अंगाई, काका मला वाचवा, शेवटचा मालुसरा, मल्हारी मार्तंड, स्वयंवर झाले सीतेचे, भालू असे ८० हून अधिक चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. अभिनेते-दिग्दर्शक प्रकाश भेंडे हे त्यांचे पती. लग्नानंतर प्रकाश भेंडे यांनी सुरू केलेल्या श्री प्रसाद चित्र या संस्थेच्या माध्यमातून भालू, चटक चांदणी, आपण यांना पाहिलंत का, प्रेमासाठी वाट्टेल ते, आई थोर तुझे उपकार या चित्रपटांची त्यांनी निर्मिती व चित्रपटांमधून त्यांनी काम केले.

      May 31, 2022


  • प्रतिभावंत कवी जगदीश खेबूडकर

    वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी गांधी हत्याकांडात त्यांचे घर जळाले अन् त्या ज्वाळा पाहून घरासमोरील झाडाखाली बसून त्यांना आयुष्यातली पहिली कविता ‘मानवते तु विधवा झालीस’ सुचली. त्यांचा जन्म १० मे १९३२ रोजी झाला.

      May 10, 2019


  • वसंत रामजी खानोलकर

      December 15, 2010