जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
विनोदाचे बादशहा, विनोदकार, विनोदी कथाकार ज्यांचे विनोदी साहित्य आजही ताजेतवाने वाटते असे विनोदी साहित्याचे जनक म्हणजे चि.वि.जोशी. त्यांचा जन्म १९ जानेवारी १८९२ रोजी झाला. पुण्याच्या नूतन मराठी शाळेतून ते मॅट्रिकची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर फर्ग्यूसन कॉलेजमधून १९११ मध्ये बी. ए. आणि १९१६ मध्ये त्यांनी एम.ए. ची पदवी मिळविली. तसेच चि.वि.जोशी हे पाली भाषेचे पंडित होते, पाली भाषेवर त्यांचे चांगलेच प्रभुत्व होते. पदवी मिळविल्यानंतर काही वर्षे त्यांनी मुंबई येथे शिक्षण खात्यात नाकरी केली. १९२० सालापासून बडोदा येथे पाली, मराठी आणि इंग्रजीचे अध्यापन करु लागले. १९२८ पासून निवृत्त होईपर्यंत बडोदा संस्थानात ते रेकॉर्ड ऑफिसर म्हणून सेवेत होते. इतर भाषांप्रमाणेच बडोद्यातील वास्तव्यामुळे त्यांनी गुजराती भाषेवरसुध्दा प्रभूत्व मिळविले होते. पाली भाषेवरील प्राविण्यामुळे त्यांनी जातक कथांचा अनुवाद केला होता. शाक्यमुनी गौतम, बुध्द संप्रदाय व शिकवण हे पालीभाषेतील ग्रंथ त्यांनी मराठीत अनुवादित केले. अनुवादित साहित्याबरोबरच त्यांचे विनोदी लेखन प्रसिध्द आणि लोकप्रिय आहे.
एरंडाचे गुऱहाळ, चिमणरावांचे चऱहाट, वायफळाचा मळा, आणखी चिमणराव, ओसाडवाडीचे देव , गुंडयाभाऊ, द्वादशी, गुदगुल्या, रहाटगाडगे, हास्य चिंतामणी, बोरीबाभळी, इत्यादी अनेक विनोदी कथासंग्रह प्रकाशित आहेत. अत्यंत दर्जेदार आणि कोटीबाज विनोद हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय होते. मानवी स्वभावांतील विसंगती सुक्ष्मपणे हेरुन त्या विसंगतीतून भावनिक आणि शाब्दिक विनोद उभा करणे ही चि.वीं.ची खासियत होती, साधी, सोपी, सरळ भाषा, सर्वसामान्यांच्या आयुष्यात घडणारे छोटे छोटे प्रसंग त्यातून निर्मित विनोद, त्यामुळे त्यांचे लेखन आणि विनोदी भाव सर्वसामान्य माणसांपर्यंत चटकन पोहोचत असत. या त्यांच्या हातोटीमुळे त्यांना लोकप्रियता लाभली. मागील पिढीतील आणि सद्य काळातील लेखकांनी स्वतची अशी काही व्यक्तिचित्रे उभी केली, त्याचप्रमाणे चि.वी. नी उभे केलेले हास्यव्यक्तिमत्व म्हणजे चिमणराव` चिमणरावांचं व्यक्तिमत्व त्यांच्या लेखणीतून इतकं जीवंत झालं होतं की चिमणराव म्हणजे चि. वि. चा मानसपुत्र असे मानले जात असे. अनेकांच्या अनेक विनोदी पात्रांमधला एकमेव असे चिमणरावांचे वर्णन केले जात असे. भोळसट, हास्यकारक वर्तन करणारा असा हा चि.वि. चा चिमणराव मराठी साहित्यात अजरामर झाला आहे. त्या काळातील साहित्यिकांच्या लेखनावर पाश्चात्य लेखकांचा बहुतेक प्रभाव असे. इंग्रजी विनोदी पाश्चात्य लेखकांच्या बाबतीतही असेच म्हणता आले असते. परंतु या बाबतीत मात्र चि.विं. नी आपल्या व्यक्तीरेखेवर पाश्चात्य छाप पडू न देता चिमणरावांचे व्यक्तीत्व हे संपूर्ण ब्राम्हणी असे रंगविलेले आहे. ही त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचीच एक प्रतिमा आहे. मा.चि.वि.जोशी यांचे २१ नोव्हेंबर १९६३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 19, 2018
तोंडात पटकन रुळतील आणि गुणगुणता येतील, अशा चाली देणे ही रवि शंकर शर्मा ऊर्फ मा.रवी यांची खासियत होती. आपल्या सोप्या आणि गोडवा राखणाऱ्या संगीताने मा.रवी यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती.
रवी यांनी संगीताचे शास्त्रशुध्द शिक्षण घेतले नव्हते, तरीही त्यांना संगीताचा कान निश्चितच होता. लहानपणापासून आपल्या वडलांकडून ऐकलेली भजने आणि आजुबाजूला ऐकू येणार्या संगीताचे संस्कार त्यांच्या मनावर झाले होते. आपल्या कारकीर्दीत त्यांनी त्यावरच स्वरसाज चढविला. विशेष म्हणजे रवी यांच्यावर अमुक पध्दतीने संगीत देणारा संगीतकार असा कोणताच ठसा उमटविता येत नाही. कव्वाली (ऐ मेरी जोहराजबीं), बालगीत (चंदामामा दूर के, टिमटिम करते तारे), गझल (दिल के अरमां आँसूओं में बह गए), क्लब संगीत (बार बार देखो), भजन (तोरा मन दर्पन कहलाए, तुम्ही मेरे मंदिर तुम्ही मेरी पूजा), भावगीत यासारख्या अनेक प्रकारच्या चालींमध्ये त्यांनी गुंफलेली गाणी आजही रसिकांच्या तोंडी आहेत. पियानोवरील गाणी देण्यात त्यांचा हातखंडा होता. गुरुदत्त यांच्या `चौदहवी का चाँद’ चित्रपटातील गाण्यांनी रवी प्रसिध्दीच्या शिखरावर चढले. या चित्रपटाच्या शीर्षकगीताची चाल पाहिली तर उत्तररात्रीची शांतता आणि चंद्राची शीतलताच मनावर पांघरली जावी, असे वाटते. त्यानंतर आलेल्या `वक्त’मधील बहुतेक सर्वच गाणी लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झाली. बलराज साहनीच्या तोंडची `ऐ मेरी जोहराजबीं, तुझे मालूम नहीं’ ही कव्वाली आजही मनात घर करून राहते, तर `आगे भी जाने ना तू’ हे गाणे ऐकणाऱ्याला स्वप्नसृष्टीत नेऊन सोडते. `धुंद’सारख्या थरारपटाचे शीर्षकगीतही लक्षात राहावे अशी त्यांची चाल आहे. यावरूनही त्यांच्या वैविध्य लक्षात येते.
अर्थात बदलत्या संगीत अभिरुचीमुळे १९८० च्या दशकानंतर रवी काहीसे मागे पडले. पण तेव्हाही `निकाह’ चित्रपटातील `दिल के अरमां’ या गाण्याने त्यांची शेवटची चमक दिसली.
रवी यांचा जन्म ३ मार्च १९२६ रोजी झाला. त्यांच निधन ७ मार्च २०१२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
March 3, 2017
रायगड जिल्ह्यातील चौल येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गजानन पिळणकर यांना लहानपाणापासून शिक्षणाची आवड असल्यामुळे ते मुंबईत दाखल झाले व स्वकष्टाने स्वत:चं पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि मुंबई महापालिकेत नोकरी मिळवली.
March 14, 2014
क्रिकेट मधील एक चमत्कार म्हणून सचिन तेंडुलकरकडे पाहिलं जातं कारण फलंदाजीतलं कौशल्य, चिकाटी, खेळताना वापरलेलं तंत्र आणि सातत्य यांच्या सहाय्याने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसह वीस हजाराच्या वरती धावा करताना सचिनने अनेक विक्रम प्रस्थापित केले. सचिन तेंडुलकर याचा जन्म २४ एप्रिल, १९७३ रोजी मुंबई येथे झाला.
February 4, 2010
उदगीरच्या लढाईनंतर भाऊसाहेब पानिपतावर निघाले. भाउसाहेबांनीं दिल्ली शहर आगस्ट १७६० त हस्तगत केलें त्यावेळीं दरबार भरवून त्यांनीं सर्वांकडून विश्वासरावास नजरा करविल्या यावेळी विश्वासरावानें लष्करी दृष्टीनें किल्ल्याची पहाणी केली.
March 2, 2025
एका मैफलीमध्ये त्यांचे गायन ऐकून ‘तुम तो सुन्नी शागीर्द हो’ अशा शब्दांत तबलानवाज उस्ताद आमीर हुसेन खाँ यांनी गौरव केला होता. उस्ताद अमीर खाँ साहेब, गुलाम अली खाँ आणि ओंकारनाथ ठाकूर यांचे गाणे त्यांना खूप आवडायचे.
August 17, 2021
गेली जवळपास पन्नास वर्षे त्या व्रतस्थपणे कविता लिहितायत. या पन्नास वर्षांत त्यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशित झाले आहे. ‘दिगंत’ (१९८१), ‘तरीही’(१९८५), ‘दिवसेंदिवस’(१९९२), ‘वाळूच्या पात्रांत मांडलेला खेळ’(२००५) आणि ‘कदाचित अजूनही’(२०१७). या संग्रहांतून प्रामुख्याने आत्मपर कविता आलेली आहे. या कवितेचा केंद्रबिंदू विशेषत्वाने स्त्रीच राहिलेली आहे.
April 5, 2022
रति अग्निहोत्रीने अनेक हिंदी चित्रपटात काम केले असून तिचा"एक दुजे के लिए'हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यांचा जन्म १० डिसेंबर १९६० रोजी मुंबई मध्ये झाला.
रतीने बॉलिवूडमध्ये या चित्रपटाने पाऊल ठेवले. या पहिल्याच चित्रपटाने रतीला रातोरात स्टार बनवले. हा चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटामुळे तिला ३ वर्षात ३२ तेलगु चित्रपटात काम करायाची संधी मिळाली. रतीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्रीची भूमिका केलीय. लग्नानंतर रतीने एक मोठ्ठा ब्रेक घेतला. यानंतर तब्बल सोळा वर्षांनी ‘कुछ खट्टी, कुछ मीठी’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.
या चित्रपटात तिने काजोलच्या ग्लॅमरस आईची भूमिका साकारली होती. अलीकडच्या काळात ‘शादी के साइड इफेक्ट्स’,‘सिंह इज ब्लिंग’ यासारख्या सिनेमात रती अलीकडे दिसली होती. रतीला तनूज नावाचा एक मुलगा आहे. ‘लव्ह यू सोनीयों’ या चित्रपटातून तनूजने बॉलिवूड डेब्यू केला.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 10, 2017
रासायनिक खतांच्या वापराविना म्हणजे म्हणजे सेंद्रीय शेतीमध्ये चांदवडच्या संजय पवार या तरुणाने केलेले प्रयोग म्हणजे शेतीचे विद्यापीठच ठरले आहे. आशियातून युरोपात ऑरगॅनिक द्राक्षांचा पहिला कंटेनर निर्यात करण्याचे श्रेय त्याने मिळवले. त्याचबरोबर दशपर्णांक या सेंद्रीय कीटकनाशकाचा शोधही लावला. सेंद्रीय शेती करणार्यांसाठी त्याने मुंबईत सुरु केलेल्या फार्मर्स मार्केटला आता बॉलिवुडची पसंती मिळाली आहे...
सूखशेतीचा मळा ...
July 14, 2017
बांबूची तिरडी वापरण्याऐवजी अॅल्युमिनिअमची तिरडी वापरली तर? मृत्युनंतर सरसकट नदीत रक्षाविसर्जन करण्याऐवजी त्यासाठी स्वतंत्र कुंड तयार केले तर? धार्मिक क्रियाकर्मांबाबत अशी क्रियाशीलता दाखविणे भावनिक प्रश्नामुळे अवघड वाटते. पर्यावरणाचा प्रश्न अशावेळी थोडा मागे पडतो. कोल्हापूरचे दीपक पोलादे यांनी मात्र शेकडो वर्षे चालत असलेल्या आर्थिक चालीरीती, क्रियाकर्मे याबाबत पर्यावरणरक्षणाची एकखांबी चळवळच उभारली आहे.
दीपक पोलादे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला कर्म-क्रियाशील हा लेख पुढील पानावर वाचा.
दीपक पोलादे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला कर्म-क्रियाशील हा लेख वाचा.
September 8, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti