(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बाळकृष्ण प्रधान

    बाळकृष्ण प्रधान आणि दादर येथील इंडियन एज्युकेशन सोसायटी यांचे नाते अतूट असे होते. इतके की प्रधान सर म्हणजे इंडियन एज्युकेशन सोसायटीचा चालता बोलता इतिहासच होते.

    २९ मार्च १९१८ रोजी जन्मलेल्या प्रधानांचे प्राथमिक शिक्षण जुन्या जंजिरा संस्थानातील बोरली पंचायतन इथे, तर माध्यमिक शिक्षण ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. वयाच्या १९ व्या वर्षी ते मॅट्रिक, तर १९४१ सालात राम नारायण लोहिया कॉलेजातून बी.एससी. झाले.

    सुरुवातीचा काही काळ त्यांनी इंडिया युनायटेड मिल आणि दिल्ली केमिकल क्लॉथमध्ये केमिस्ट म्हणून काम केले. परंतु त्यांचा स्वाभाविक ओढा शिक्षणक्षेत्राकडे होता. त्यामुळे १९४८ सालापासून त्यांनी अध्यापनाचे काम केले.
    विज्ञान आणि गणित हे विषय ते अतिशय तळमळीने शिकवित असत. वांद्रे येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या वाशी येथील न्यू बॉम्बे हायस्कूलमध्ये त्यांनी प्राचार्य म्हणून काम केले. बहुआयामी व्यकिमत्त्व असलेले प्रधान सर हाडाचे शिक्षक होते. तळमळीने आपला विषय शिकविणे हा त्यांचा सहजस्वभाव होता. विज्ञान आणि गणित यांबाबत आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होण्यासाठी धडपडणार्‍या प्रधान सरांनी अखिल भारतीय शिक्षण परिषदांमध्ये एक तपाहून अधिक काळ सक्रिय सहभाग घेतला. तर १९५० ते १९६५ या काळात त्यांनी 'एज्युकेशन फॉर इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग' या विषयावरील चर्चासत्रांमध्ये सातत्याने भाग घेतला.
    एस.एस.सी. मंडळाच्या विभागीय आणि राज्यस्तरावरील अभ्यासक्रम समितीतही त्यांनी काम केले. १९७२ सालाच्या सुमारास महाराष्ट्रात विज्ञान व गणित या विषायांच्या अभ्यासक्रमात क्रांतिकारक बदल सुचविण्यात आले. त्यावेळेस गणिताच्या अभ्यासक्रमातील बदलांच्या संकल्पना प्रधान सरांनी उचलून धरल्या आणि त्याबाबतच्या चर्चांमध्येही त्यांनी भाग घेतला. शालेय पातळीवरील विज्ञान-गणित या विषयांतील बदल हे बदलत्या काळानुरूप होत आहेत आणि त्याच्या तपशिलाबाबत मतभेद असले तरी तत्त्व म्हणून आपण ते बदल स्वीकारले पाहिजेत, असे प्रधान सरांचे म्हणणे होते. आपली ही मते त्यांनी १९७६ साली झालेल्या 'नॅशनल फोरम ऑफ टिचर सेमिनार ऑन प्रॉब्लेम्स ऑफ एज्युकेशन' या विषयावरील सेमिनारमध्ये मांडली.

    त्यांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. त्यांच्या शिक्षणसेवेचे कौतुक करण्यात आले. 'निर्मळ बुद्धीत ओलावा असतो आणि निर्मळ हृदयात बुद्धीचा प्रकाश असतो' असे आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणार्‍या प्रधान सरांनी तत्त्वनिष्ठ आणि शाश्वत मूल्यांची आयुष्यभर जोपासना केली. असा हा शिक्षणव्रती १९ जानेवारीला काळाच्या पडद्याआड गेला आणि शिक्षणक्षेत्रातले एक नामवंत व्यक्तिमत्व हरपले.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


      August 9, 2017


  • खंडेराव रांगणेकर

    प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या झंझावाती व नैसर्गिक खेळाने विरूध्द गोलंदाजाला चकित करणार्‍या, रांगणेकरांना त्यांच्या तमाम भारतीय चाहत्यांकडून, व मुंबई आकाशवाणीचे कॉमेंटेटर होमी तल्यार खान यांजकडून क्रिकेटचा बाजीराव ही मानाची उपाधी मिळाली होती.

      June 25, 2022


  • कृष्णाजी केशव (कवी केशवसूत) दामले

    (7 ऑक्टोबर 1866-7 नोव्हेंबर 1905)

    आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी. पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले. काव्यरत्नावली हया मासिकाचे संपादक. नारायण नरसिंह फडणीस यांच्या सूचनेवरून `केशवसुत` या टोपण-नावाचा स्वीकार केला. जन्म रत्नागिरी जिल्हयातील मालगुंड हया गावी. शिक्षण खेड, बडोदे, वर्धा, नागपूर व पुणे या ठाकणी, शिक्षण कालातच 1880 मध्ये त्यांचा विवाह झाला. मॅट्रिकनंतर (1889) मुंबईला 1897 पर्यंत निरनिराळया हंगामी नोकऱया केल्या. पुढे प्लेगमुळे मुंबई सोडून ते खानदेशात गेले. आरंभी भडगावच्या नगर पालिकेच्या शाळेत दुय्यम शिक्षकाची नोकरी केली. 1901 पासून फैजपूरला मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली. 1904 मध्ये धारवाडच्या सरकारी शाळेत मराठीचे शिक्षक म्हणून बदली झाली. 1905 साली हुबळीला गेले असताना प्लेगने त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागून आठच दिवसांनी त्यांची पत्नीही मरण पावली.

    केशवसुतांनी विद्यार्थिदशेतच काव्यलेखनास आरंभ केला असला, तरी त्यांचा मुख्य काव्यरनाकाल 1885 ते 1905 हाच होय. या काळातील त्यांच्या सु. 135 कविता आज उपलब्ध आहेत. नागपुरास असताना रेव्ह. टिळक व कवी वसंत यांचा सहवास त्यांना लाभला होता. काव्य हे त्यांचे जीवनध्येय असल्याने स्वाभाविकपणेच त्यांनी काव्यरचनेच्या नव्या वाटा चोखाळल्या. या प्रयत्नात प्रारंभीच्या संस्कृत काव्याचा आदर्श अल्पकालीन ठरला व पूर्वकालीन मराठी काव्य प्रभावशून्य ठरले. परंतु इंग्रजीतील स्वच्छंदतावादी मनोवृत्तीच्या वर्ड्स्वर्थ, शेली आणि कीट्स यांसारख्या कवींचे काव्य मात्र त्यांना प्रेरक व अनुकरणीय वाटले. इंग्रजी अभ्यासक्रमातून व वि. मो. महाजनींनी विविधज्ञान विस्तारातून प्रकाशित केलेल्या भाषांतरांवरून इंग्रजी स्वच्छंदतावादी काव्य त्यांस काहीसे परिचित झाले होते. त्या काव्याचा चिंतनमननातून केशवसुतांनी आत्मलेखनात्क स्फुट भावकविता लिहिली व मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आतविष्काराचे नवे व क्रांतिकारक वळण दिले. त्यांच्या काव्यात व्यक्तिगत स्नेहसंबंध, कवी व कवित्व स्त्रीपुरूषांतील प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी व गूट (साक्षात्कारी) अनुभूती अशा विविध विषयांवरील भावानुभवांचा आविष्कार आढळतो. एका दृष्टीने स्वच्छंदतावादी मनोवृतीचा आविष्कार मराठी काव्यक्षेत्रात निश्चित क्रांतीकारक ठरला, म्हणूनच केशवसुतांच्या, संख्येने अल्प असलेल्या प्रत्येक प्रकारच्या काव्यरचनेला नंतरच्या काळात स्वतंत्र परंपरा लाभू शकली.

      March 11, 2015


  • रघुनाथ जीवन राऊत उर्फ रामानंद स्वामी

    जगातील केवळ चारच लोकांना १११ वर्षे वयाचे जीवनभाग्य लाभलेले आहे. पालघर (माकूणसार) येथील रघुनाथ जीवन राऊत हे त्यापैकी एक होऊ शकले असते. मात्र वयाचे १११ वे वर्ष पूर्ण होण्यास केवळ सहा दिवस बाकी असताना त्यांचे निधन झाले.

      May 8, 2014


  • अरविंद गंगाधर मंगरूळकर

    मराठीतील थोर वाचस्पती, अध्यापक तसंच संगीत विषयाचे जाणकार अशी ख्याती असलेले अरविंद मंगरूळकर हे “कालिदासाचे मेघदूत”, “नीतिशतक” , “मराठी घटना रचना आणि परंपरा” अशा अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचे संपादक देखील होते. “सातवाहन राज्याच्या शेफालिका” चा गद्यानुवादाचे श्रेय अरविंद मंगरूळकराना जाते.

    सवाई गंधर्व पुण्यतिथी महोत्सवातील संगीतकारांची पर्वणी हा विषय त्यांच्या जिव्हाळ्याचा व अभ्यासाचा होता. नेमक्या व चपखल भाषातील वृत्तपत्रांतलं त्यांचं विवेचन आणि समालोचन खुपच गाजलं .

    मराठी विश्वकोशात संस्कृत व संगीत या विषयांना मध्यवर्ती ठेवून अरविंद मंगरूळकरांनी विपुल प्रमाणात लेखन केले आहे.

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

      January 3, 2015


  • कृष्णराज महाडिक

    वयाच्या दहाव्या काररेसिंगच्या खेळात उतरलेला कोल्हापूरचा कृष्णराज महाडिक आता अमेरिकेतील मोटार रेसिंग स्पर्धेत ६० देशांच्या स्पर्धकांशी स्पर्धा करणार आहे. आतापर्यंत ज्युनिअर गटात राष्ट्रीय स्तरावरील दहा मानाच्या ट्रॉफीज त्याने मिळवल्या आहेतच.

    कृष्णराज महाडिक यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला वेगाचा फॉर्म्युला हा लेख पुढील पानावर वाचा.

    कृष्णराज महाडिक यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला वेगाचा फॉर्म्युला हा लेख वाचा.

    mahadik-krushnaraj-modified

      September 7, 2015


  • कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

    कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

    कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे ख्यातनाम मराठी नाटककार, पत्रकार होते.

      December 15, 2010


  • संत महिपति

      December 15, 2010


  • शांताराम काशिनाथ राऊत

    चित्रकलेच्या क्षेत्रात ठाण्याचे नाव उज्वल करणारे प्रसिद्ध चित्रकार व नामवंत संस्थांच्या बोधचिन्हांचे निर्माते श्री. शांताराम काशिनाथ राऊत.

      May 16, 2014


  • भालचंद्र पांडुरंग कदम उर्फ भाऊ कदम

    मराठी मध्ये होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमांत भाऊ असायलाच पाहिजे तर कॉमेडी पूर्णत्वाला गेल्यासारखी वाटतें आणि म्हणून होणाऱ्या प्रत्येक अवार्ड शो मध्ये भाऊ च्या बतावण्या ऐकुन प्रेक्षक ही पोट धरून हसताना आपल्याला दिसतात.

      July 13, 2022