(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • काशिनाथ सखाराम (बंडोपंत देवल)

    काशिनाथ सखाराम ऊर्फ बंडोपंत देवल हे या सर्कसचे एक मालक भारतातील सर्वोत्कृष्ट विदूषक म्हणून ख्यातकीर्त होते. ‘द बेस्ट क्लाउन इन इंडियन सर्कस’ म्हणून त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवली.

      June 22, 2022


  • हरिश्चंद्र बिराजदार

    बिराजदार, हरिश्चंद्र

    जीवनभर कुस्ती व खेळाडूंचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवीत ‘रुस्तुम-ए-हिंदू’ हरिश्चंद्र बिराजदार यांनी कुस्ती कारकीर्द परिपूर्ण केली. खेळाडू, संघटक व मार्गदर्शक म्हणून त्यांनी सतत आपल्या तालमीचा नावलौकिक उंचावेल हेच ध्येय ठेवले होते. स्वत: त्यांनी अनेक मैदाने गाजविली, पण त्याचबरोबर आपले मल्ल आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी चांगली कामगिरी करतील हा उद्देश साध्य करण्यासाठी ते अहोरात्र झगडले.

    त्यामुळेच त्यांच्या गोकुळ वस्ताद तालमीने महाराष्ट्रास अनेक आंतरराष्ट्रीय पदकविजेते मल्ल दिले. गोकुळ वस्ताद तालमीचे ज्येष्ठ प्रशिक्षक व ‘रुस्तुम-ए-हिंद’ हरिश्चंद्र माधवराव बिराजदार हे मूळचे निलंगा तालुक्यातील रामलिंगमुथ्थगड येथील रहिवासी. लहानपणापासूनच कुस्ती हाच ध्यास घेतलेल्या या कुस्तिगीराने वयाच्या १४व्या वर्षी १९६४ मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पदार्पण केले. या स्पर्धेत त्यांनी १९६७ मध्ये सुवर्णपदक मिळविले. १९६८ मध्ये त्यांनी अखिल भारतीय स्तरावरील हिंदकेसरी स्पर्धेत रुपेरी यश मिळविले. पाठोपाठ पुढच्या वर्षी त्यांनी याच स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. १९७० मध्ये त्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले व याच वर्षी त्यांनी जागतिक स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी १९७२ मध्ये म्युनिच ऑलिम्पिक स्पर्धेतील ८२ किलो विभागात भारताचे प्रतिनिधित्व केले. याच वर्षी त्यांना ‘रुस्तुम-ए-हिंदू’ हा कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान देण्यात आला.बिराजदार यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले ते १९७७ मध्ये महान भारत केसरी सतपाल याला अस्मान दाखवून. सतपाल यांच्यावर मात करणारा पहिला महाराष्ट्रीय कुस्तिगीर होण्याचा त्यांनी मान मिळविला. कुस्ती कारकीर्दीत त्यांनी अनेक राष्ट्रीय दर्जाच्या मल्लांवर मात केली.स्पर्धात्मक कुस्तीमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी १९८२ मध्ये पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीत उदयोन्मुख व नवोदित मल्लांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. राज्य क्रीडा संचालनालयाच्या कुस्ती प्रशिक्षण योजनेंतर्गत त्यांनी या तालमीत गेली १९ वर्षे ‘वस्ताद’ म्हणून काम केले. अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार विजेते काका पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते गोविंद पवार, राहुल काळभोर, रवींद्र पाटील, दत्ता गायकवाड, रमेश माने, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, तानाजी बनकर, दत्ता गायकवाड, चंद्रहास निमगिरे, विकी बनकर, राष्ट्रकुल पदकविजेते रणजित नलावडे, राहुल आवारे यांच्यासह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्ल बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले. केवळ प्रशिक्षक म्हणून नव्हे तर मल्लांना वडिलकीच्या नात्यानेच त्यांनी मार्गदर्शन केले. बिराजदार यांना राज्य शासनाने १९७१ मध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले, तर १९९८-९९ मध्ये त्यांना दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळाला. २००६ मध्ये केंद्रीय क्रीडा खात्याने त्यांच्या कार्याची दखल घेत ‘ध्यानचंद’ हा राष्ट्रीय पुरस्कार देत त्यांचा सन्मान केला. त्याखेरीजही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.

      August 5, 2017


  • अनिल यादवराव निमगाडे

    अनिल यदाओराव निमगाडे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात 24 जानेवारी, 1972 रोजी झाला. अतिशय धार्मिक वृत्तीचे व आहाराने शुध्द शाकाहारी असलेले निमगाडे एक प्रतिष्ठीत क्रीडा अधिकारी आहेत.

      August 29, 2011


  • मिलिंद सोमण

    ४ नोव्हेंबर १९६५ रोजी मिलिंद सोमण हा भारतीय मॉडेल आणि अभिनेता आहे गायिका आलिशा चिनाई हिच्या मेड इन इंडिया या संगीत व्हिडीओत केलेल्या भूमिकेपासून मिलींद प्रकाशझोत आला. त्याने मराठी ,हिंदी आणि तमिळ चित्रपटातुन अभिनय केला आहे.

      December 15, 2010


  • रवींद्र पिंगे

    कथा,कदंबरी,प्रवासवर्णन,ललित असे विविध साहित्य प्रकार हाता़ळणारे,विविधांगी लेखन करुन आपल्या प्रतिभेचा साक्षात्कार करुन देणारे प्रख्यात शैलीदार ललित लेखक रवींद्र पिंगे यांनी ‘प्राजक्ताची फांदी’,’मोकळ आकाश’,’मुंबईचं फुलपाखरु’,’आनंदपर्व’, ‘आनंदाच्या दाही दिशा’ देवाघरचा पाऊस’ असे ३२ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते.

      July 20, 2022


  • उदयनराजे भोसले

    उदयनराजे भोसले

    खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९६६ रोजी झाला.

    उदयनराजे भोसले यांचे शिक्षण पाचगणी येथे झाले. त्यांनी प्रॉडक्शन मेकॅनिकल इंजिनियरिंग पदवी घेतली आहे. १९९० पासून राजकारणात सक्रीय असलेल्या उदयनराजे यांनी सर्वप्रथम १९९१ मध्ये उगवता सूर्य या चिन्हावर रयत पॅनेलवर सातारा नपा निवडणूक लढवली होती. तत्कालिन १४ क्रमांकाच्या प्रभातून ते विजयी झाले. १९९६-९७ मध्ये विधानसभेची जागा त्यांनी भाजपच्या चिन्हावर लढवली. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ही निवडणूक त्यांनी मोठ्या मताधिक्याने जिंकली होती. भाजप-सेना युतीच्या सरकारच्या काळात त्यांना कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपद देण्यात आले. त्याचवेळी त्यांना महसूल राज्यमंत्रीपदही देण्यात आले.

    http://en.wikipedia.org/wiki/Udayanraje_Bhonsle

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

    ## Udayanraje Bhosale

      April 15, 2010


  • रोहन कोकणे

    कोकणे, रोहन
    रोहन अजित कोकणे हा बेळगावचा मुलगा म्हणजे लिंबो स्केटिंगमधला चमत्कार आहे असे म्हणायला हरकत नाही, पण हा चमत्कार त्याने अथक परिश्रमानंतर केला आहे. हाँगकाँग येथे एका मॉलमध्ये सर्वाच्या समक्ष तो आपले शरीर जमिनीला समांतर करीत ६.७५ इंच इतक्या रुंदीच्या जागेतून रोलर स्केट्सने एका बाजूने दुसरीकडे गेला. यावरून त्याच्या शरीराच्या लवचिकतेची दाद द्यावी तितकी थोडी आहे. त्याचा हा जागतिक विक्रम आहे. तरुणांमध्ये व्यायामाची गोडी निर्माण व्हावी यासाठी आयोजित कार्यक्रमात त्याने ही करामत केली.
    विक्रम मोडणे ही त्याच्यासाठी नवी गोष्ट नाही. कारच्या खालून तो सहज पलीकडे जातो. त्याच्या विक्रमाची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. त्याने २० मोटारींच्या खालून १२६ फूट ११ इंच इतके अंतर पार केले आहे. एवढे अंतर लिंबो स्केटिंग करीत कापणारा तो पहिलाच मुलगा आहे. गेल्या वर्षी मुंबईत त्याने जुहू एरोड्रोम येथे हा विक्रम सर्वासमक्ष केला होता. रोहन हा अकरा वर्षांचा आहे. लहानपणापासून त्याने या खेळात तपश्चर्याच केली आहे. अमेरिकेच्या झोए बेडा या मुलीच्या बरोबरीने स्केटिंगमध्ये त्याची कामगिरी आहे. बेडा ही ‘रोलर लिंबो प्रिन्सेस’ म्हणून ओळखली जाते. रोहन हा ‘रोलर लिंबो प्रिन्स’ आहे असे म्हणायला हरकत नाही. अनेक सामाजिक उपक्रमांतर्गत त्याने स्केटिंगची प्रात्यक्षिके दाखवली आहेत. त्याचे वडील अजित कोकणे यांचा विद्युत उपकरणांचा छोटा व्यवसाय आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती फार भक्कम नसतानाही काही प्रायोजकांच्या मदतीने रोहनने घोडदौड कायम ठेवली आहे. बेळगावच्या रोलर स्केटिंग अकादमीचे सूर्यकांत हिंदूळगेकर, शशिधर पोळ व उमेश कलघटगी यांनी त्याला प्रशिक्षण दिले. बेळगाव येथील सेंट झेवियर स्कूलचा तो विद्यार्थी आहे. तो विक्रमवीर असला तरी आई अनुपमा, वडील अजित तसेच प्रशिक्षकांना तो त्याच्या यशाचे श्रेय देतो, यातून त्याची विनम्रता दिसून येते. त्याने जिल्हा व राज्य पातळीवरील लिंबो स्केटिंग स्पर्धा प्रत्येकी दोनदा जिंकल्या आहेत. प्रत्येक वेळी आता तुला कसे वाटते यावर तो ‘अच्छा लगता हैं’ असे त्याच्या बालसुलभ शैलीत सांगतो.

      August 5, 2017


  • पद्मीनी कोल्हापुरे

    पद्मिनी कोल्हापूरे… हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री. ‘प्रेम रोग’,’आहिस्ता आहिस्ता’,’वो सात दिन’,’विधाता’ अशा विविध सिनेमातील भूमिकांनी पद्मिनी कोल्हापूरे यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यांच्या चेह-यावरील निरागसपणा, आकर्षक आणि घायाळ करणारं सौंदर्य यामुळे ८०च्या दशकात पद्मिनी कोल्हापूरे यांची वेगळीच जादू होती.

      July 5, 2022


  • कॅ. संजय कर्वे

    युद्धनौकांवर दिवसा आणि रात्री हेलिकॉप्टरचे लॅंडिंग आणि टेक ऑफ पाहतानाच त्यांच्या मनाने नक्की केले की, हे हेलिकॉप्टरच आपल्या करिअरच्या पंखात हवा भरेल. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीद्वारे नौदलात दाखल झालेले कॅप्टन संजय कर्वे यांच्या गाठीशी ३३ वर्षे आणि साडेपाच हजार तास इतका उड्डाणाचा अनुभव आहे. गेल्या सात वर्षांपासून ते राज्याचे नागरी हवाई उड्डाण संचालक आहेत...

    महाराष्ट्राची हवाई धुरा

      July 24, 2015


  • डॉ. तुकाराम मोरे

    भाजीपाल्याच्या भडकत्या भावांची, जनुकीय बदल केलेल्या कृषिमालाबाबतच्या वादाची चर्चा होण्याच्या या काळात भाजीपाला-फळे यांबाबत विशेष संशोधन केलेल्या डॉ. तुकाराम मोरे यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती होणे, हा योग महत्त्वपूर्ण मानला जायला हवा.

    ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञ म्हणून डॉ. मोरे यांनी केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाडलेल्या लक्षणीय प्रभावाची माहिती असणारे कोणीही या नियुक्तीमुळे कृषी क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्याचीच अपेक्षा करतील. कोल्हापूरच्या ज्या कृषी महाविद्यालयातून डॉ. मोरे यांनी कृषी विषयाची पदवी घेतली, त्याच महाविद्यालयात ते व्याखाता या पदावर रुजू झाले. अर्थातच त्यांचा अभ्यासाचा मुख्य विषय फळबागा हा होता. त्यानंतरच्या काळात त्यांनी नवी दिल्लीच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले तसेच आपली डॉक्टरेटही संपादन केली. या परिषदेशी त्यांचा नातेसंबंध दीर्घकाळ टिकला. प्रथम शिक्षणासाठी आणि नंतर शिकवण्यासाठी! या संस्थेत त्यांनी तब्बल सतरा वर्षे अध्यापन केले तसेच संशोधनही केले. फळे आणि भाजीपाल्याचे नवे वाण विकसित करण्याच्या त्यांच्या संशोधनाला खूपच चांगले यश मिळाले. त्यांनी विकसित केलेल्या नव्या जातींची संख्या तब्बल एकतीस एवढी आहे, तर त्यातील नऊ जाती या संकरित आहेत. हेमांगी काकडी, प्राची घेवडा या जाती पुढे लोकप्रिय झाल्या, त्याचे सर्व श्रेय हे डॉ. मोरे यांच्याकडेच जाते. देशाच्या चौथ्या पंचवार्षिक योजनेपर्यंत सरकारी पातळीवरील सर्व लक्ष हे अन्नधान्याच्या उपलब्धतेकडे होते. देशातील १९७२च्या भीषण दुष्काळामुळे तर अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्याकडे सरकारचा भर होता. अर्थात, अन्नधान्याची गरज मान्य करूनही फळफळावळे-भाजीपाला यांच्याकडेही लक्ष देण्याची गरज डॉ. मोरे यांनी व्यक्त केली. दिल्लीसारख्या केंद्रस्थानी ते असल्याने आणि त्यांचा त्या क्षेत्रातील अधिकार मोठा असल्याने त्यांच्या विचारांची दखल केंद्रीय नेत्यांना घ्यावी लागली. चौथ्या योजनेपासून फळे-भाजीपाल्याकडे लक्ष दिले जाऊ लागले होते आणि डॉ. मोरे यांनी केलेल्या प्रयत्नांचे फळ त्यानंतर मिळू लागले. उद्यानविद्या, समुद्रतीरावरील पिके, सेंद्रिय शेती या तीन विषयांसाठी दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेल्या तरतुदीमध्ये वाढ करावी, यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यशस्वी झाले आणि या विषयांसाठीची तरतूद चार ते पाच पटींनी वाढविण्यात आली. केंद्रीय शुष्क बागवानी संस्थेत काम करतानाही डॉ. मोरे यांनी देशाच्या दीर्घकालीन गरजेकडे लक्ष दिले आणि अनेक मूलगामी परिणाम करणाऱ्या योजना सुरू केल्या. गोधरा हे ठिकाण जातीय विद्वेषातून रेल्वे जाळण्यात आल्याच्या आरोपामुळे देशामध्ये काही वर्षांपूर्वी चर्चेत आले होते. मात्र कृषी क्षेत्रातील जाणकारांमध्ये या ठिकाणाची ओळख शेतीसंशोधनाच्या दृष्टीने मोठी आहे. डाळिंब, चिकू आदी फळांच्या संशोधनाचे मोलाचे काम या ठिकाणी चालते. तेथे जांभळाच्या नव्या जाती विकसित करण्यात आल्या. केंद्रीय संस्थेत काम करताना डॉ. मोरे यांनी महाराष्ट्राला न विसरता आपल्या राज्यालाही लाभ करून दिला. पुण्याजवळील जाधववाडी येथे अंजीर-सीताफळ या फळांच्या संशोधनासाठी केंद्र उभारले. त्या केंद्रासाठी एक कोटी नव्वद लाख रुपये मंजूर करण्यात आले. केवळ आर्थिक मदत मंजूर करून ते थांबले नाहीत, तर सहा संशोधकांचे पथकही तेथे नेमण्यात आले. अंबाजोगाई येथे सीताफळ संशोधन केंद्र उभारण्यात आले, तर अकोल्यामध्ये संत्री संशोधन केंद्र उभारण्यात आले. प्राध्यापक म्हणून डॉ. मोरे यांनी केलेल्या कामगिरीचे मोठेपण काही आकडय़ांवरून दिसून येते. त्यांच्या बत्तीस विद्यार्थ्यांनी पीएच. डी. केली असून तब्बल तेवीस पुस्तके लिहिली आहेत. एकूण ६६६ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिसंवादांत त्यांनी भाग घेतला आहे. अमेरिकेतील विख्यात कार्नेल विद्यापीठात पीएच.डी.नंतरच्या शिक्षणासाठी ते अडीच वर्षे होते. त्याखेरीज इस्त्रायलसारख्या देशातील शेतीचा अभ्यासही त्यांनी केला आहे. शेती क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाबाबत तसेच निर्माण होणाऱ्या वादांबाबत त्यांनी वेळोवेळी ठाम भूमिका घेतली आहे. हरितगृह म्हणजेच ग्रीन हाऊस तंत्रज्ञान नव्याने जेव्हा आले, तेव्हा ते तंत्रज्ञान किती उपयोगी आहे, याबाबत त्यांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती केली. यासाठी आवश्यक असलेले देशी तंत्रज्ञान त्यांना पुरविले. जनुकीय बदल केलेल्या (जेनेटिकली मोडिफाईड) शेतीमालाबाबतचा वाद चांगलाच रंगला. हा शेतीमाल आरोग्यास हानिकारक असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. त्याबाबत दोन्ही बाजूंनी मते व्यक्त होऊ लागली. त्यावरून अशा जनुकीय बदल केलेल्या शेतीमालावर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र अशा वेळी डॉ. मोरे यांनी ठाम भूमिका घेतली. ‘याबाबत देशपातळीवर संशोधन होऊ द्या, ते संशोधन पूर्ण झाल्यावर मगच त्यावर काय कृती करायची ते ठरवा,’ असे मत ते मांडू लागले. अर्धवट अवस्थेत संशोधन थांबविणे चुकीचे ठरेल, हे त्यांचे मत सर्वानाच मान्य करावे लागले. राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्रे हाती आल्यावर त्याचा लाभ ते शेतीला निश्चितच करून देतील, असा विश्वास म्हणूनच सर्वाना वाटतो आहे. फळे-भाजीपाल्याच्या उत्पादनात आपला देश जगात दुसऱ्या क्रमांकावर असला तरी त्यात प्रचंड सुधारणेस वाव आहे. आपल्या देशातील फळे-भाजीपाल्याच्या उत्पादनाचे क्षेत्र अधिक असले तरी एकरी उत्पादन फारच कमी आहे. तसेच निर्यातीतही या उत्पादनांचा वाटा फारसा नाही. आपल्या देशातील अन्नधान्याचे उत्पादन २३ कोटी टनांचे असून भाजीपाल्याचे २२.६ कोटी, तर फळांचे उत्पादन १२.६ कोटी टन एवढे आहे. एवढे उत्पादन असले तरी त्याची योग्य किंमत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. ती पोहोचण्यासाठीही काहीतरी करणे आवश्यक असून, त्यासाठी या काळात भरीव काहीतरी होणे अपेक्षित आहे.

      August 5, 2017