वाई तालुक्यात भुईंजमधली शिकण्याची व जगण्याची लढाई पुढे सूक्ष्मजीवशास्त्रातील संशोधनाच्या संधीसाठी झगडण्यात परावर्तित होईल, असे मेघाला वाटले नव्हते. स्पेनमध्ये पीएचडी केल्यानंतर मेघा लोखंडे हेपटायटिसमधील संशोधन पुढे नेत स्वित्झर्लंडच्या बर्न्स विद्यापीठात रुजू होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत...
चिकाटीची झेप... भुईंज ते बर्न्स
July 24, 2015
ठाणे शहरात फार थोडी अशी व्यक्तिमत्व आहेत जी अष्टपैलू म्हणून गणली जातात. त्यापैकीच एक म्हणजे सुभाष परशुराम रासम हे होय! बी.ए. पदवीधर, इंटिरीयर डिझायनर, वास्तुशास्त्र पदविका, ज्योतिशास्त्र विशारद अशा विविध क्षेत्रांतील पदव्या आणि पदविका रासम यांनी प्राप्त केल्या आहेत आणि या सर्वच क्षेत्रात ते कार्यरतही आहेत.
May 23, 2014
वयाच्या ३६ व्या वर्षी निधन झालेल्या बर्व्यांनी नक्षलवादी चळवळीसंबंधी “रोखलेल्या बंदुका, उठलेली जनता” हे पुस्तक लिहिले. तसेच त्यांनी “स्टडफार्म” (कादंबरी) थॅंक्यू मि. ग्लाड, पुत्रकामोष्टी, आकाश पेलताना आदी नाटके आणि “मा निषाद”, “फाशीगेट” हे कथासंग्रह लिहिले.
July 31, 2017
December 15, 2010
दिग्दर्शक मंगेश कदम यांचे नाटक ‘अधांतर’. जयंत पवार यांचे ‘माझं घर’, प्रशांत दळवी यांचं ‘सेलिब्रेशन’ हे नाटक ‘लग्नाची बेडी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘ढोलताशे’ अशी अनेक नाटके त्यांनी केली आहेत. अभिनय व नेपथ्य या बरोबरच सध्या अखिल भारतीय नाट्य परिषदेचे काम राजन भिसे बघत आहेत.
July 25, 2022
बासू चतर्जींनी तिला ‘रजनी’ या दैनंदिन जीवनातील अन्यायाविरूध्द लढणा-या सामान्य गृहिणीची मालिका दूरदर्शनसाठी करायला लावली आणि या मालिकेने प्रिया तेंडूलकर या नावाला ख-या अर्थाने वलय मिळवून दिले.
July 9, 2022
१९९५ साली धुंडीराजशास्त्रींचे निधन झाल्यानंतर ‘दाते पंचांग’ चालविण्याची जबाबदारी मोहनराव दाते यांच्यावर पडली. तेव्हापासून आतापर्यंत मोहनराव ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत हे दाते पंचांगाच्या लोकप्रियतेवरून दिसून येतच आहे.
July 19, 2022
संपदा भोंडसे, या यशवंतराव मुक्त विद्यापीठ नाशिक येथील जनसंपर्क अधिकारी या हुद्यावर काम करीत असून इच्छुक विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत, व त्यांच्या पुढील शैक्षणीक भविष्याचा आराखडा बनविण्यासंबंधीची हवी ती माहिती व प्रत्यक्ष मदत पुरवित आहेत. विद्यार्थी व त्यांचे पालक यांना विद्यापीठाची, समस्त शिक्षकवर्गाची, विद्यापीठाकडुन घेतल्या जाणार्या कोर्सेसची, कार्यक्रमांची, उपक्रमांची, व अतिरीक्त स्पर्धांची सांगोपांग माहिती पुरविणे, पालक व शिक्षक यांच्यामधील नात्यामध्ये सुसुत्रता आणणे, व व्यवस्थापन व विद्यार्थीगण यांच्यामधील एकमेव दुव्याचे काम करणे अशा स्वरूपाचे, व्यापक असे कार्य त्या गेली अनेक वर्षे इमानदारीने करीत आहेत.
August 18, 2011
बल्लाळ, नरेंद्र
नरेंद्र बल्लाळ यांनी ऐन आणीबाणीच्या काळामध्ये, “ठाणे वैभव“ नावाचे दैनिक काढण्याचा जो निर्णय घेतला होता, तो त्या काळातील एकंदर राजकीय “घडामोडी पाहता अत्यंत धाडसाचा होता. ठाण्याच्या सार्वजनिक जीवनावर वेगळा ठसा उमटवित, ह्या दैनिकाने घेतलेली प्रगतीची गरूडभरारी नक्कीच वाखाण्यासारखी आहे. ठाण्यातील विविध क्षेत्रांमधील अचूक नोंद करणारे विश्वासार्ह दैनिक अशी या दैनिकाची किर्ती आहे. जिल्हा दैनिक सुरू करण्यासाठी नरेंद्र बल्लाळांनी महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रातील नोकरी सोडून , हे वृत्तपत्र सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता.
सध्या त्यांचे चिरंजीव मिलिंद बल्लाळ व नातू निखील बल्लाळ हे नव्या संकल्पना आणिव्यावसायिक गणितांची आखणी करुन नरेंद्र बल्लाळ यांचा वारसा पुढे चालवीत आहेत.
January 12, 2015
सीकेपी समाजातील अनेक महिला आज जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये अग्रणी राहून आपल्या समाजाला गौरवीत करत आहेत. खासगी संस्था ते मल्टिनॅशनल कोर्पोरेट्स, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पाककला, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रांत सुद्धा आपल्या महिलांचा वावर वाखाणण्याजोगा आहे. तलवार आणि लेखणीचा वारसा सांगणाऱ्या आपल्या या समाजात लेखणीचा उत्तम वापर करत साहित्य निर्मिती करणाऱ्या अनेक महिला आजही विविध माध्यमांतून आपले साहित्यिक योगदान देत असतात. योगायोगाने या वर्षी २२ मे रोजी पुणे येथे दुसरे सीकेपी साहित्य संमेलन आयोजित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर सीकेपी समाजातील शंभराहून अधिक लेखिका कवयित्रींना आणि अगदी पाकशास्त्रावरील पुस्तके लिहिणाऱ्या सुगरणींना तुमच्यासमोर आणायचा हा एक छोटासा प्रयत्न.
March 22, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti