रोग निदानाच्या क्षेत्रात गेली ३० वर्षे व्यावसायिक यश मिळवून स्वत:च्या नावानेच ब्रॅन्डनेम तयार करणार्या डॉ. अविनाश फडके यांच्या पॅथॉलॉजी लॅबोरेटरीजची उलाढाल आज शंभर कोटींच्या घरात पोहोचली आहे. १९ प्रयोगशाळा आणि साडेनऊशे कर्मचारी यांचे बळ आज त्यांच्या पाठीशी आहे आणि रोगनिदानातील अचूकतेबाबत ते काटेकोर आहेत.
डॉ. अविनाश फडके यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला यशाचे अचूक निदान हा लेख पुढील पानावर वाचा.
डॉ. अविनाश फडके यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला यशाचे अचूक निदान हा लेख वाचा.
September 8, 2015
बरकत आलेल्या व्यवसायात स्थिरावले की, शारीरिक चपळाई कमी होण्याचा धोका असतो. कोल्हापूरच्या आकाश कोरगावकर ने एमबीए झाल्यावर पेट्रोल पंपाच्या व्यवसायावर पकड मिळवलीच, पण त्याचवेळी स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतराजीतल्या साहसस्पर्धेत महाराष्ट्राचे नाव नेले. चार किलोमीटर पोहणे, ४२ किलोमीटर धावणे आणि १८० किलोमीटर सायकलिंग असा तिहेरी प्रवास त्याने १० तास ६ मिनिटांत पार केला...
त्याचे 'आकाश' च वेगळे
July 14, 2017
मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.
December 15, 2010
दिनकर केशव बेडेकर हे एक महान साहित्यिक, विचारवंत, तत्वचिंतक व समिक्षक होते. महाराष्ट्रामध्ये वाहणार्या हजारो सामाजिक, राजकीय, साहित्यीक, तार्किक, धार्मिक, व तात्वज्ञानिक विचारप्रवाहांना व मतधारांना जोडणारा पुल त्यांनी आपल्या सिध्दहस्त लेखणीच्या माध्यमातून साकारण्याची अनोखी कसरत केल्यामुळे त्यांच्या नावाभोवती प्रसिध्दीचे एक वेगळे वलय निर्माण झाले. “किर्लोस्कर”, “स्त्री”, “नवभारत” अश्या विविध नियतकालिकांमधून त्यांनी अनेक वर्षे विपूल लेखन करत, विविध संवेदनशील विचारांना स्पर्श केला. निर्भीड व पारदर्शी लेखांप्रमाणेच त्यांनी केलेली साहित्य समिक्षा देखील आज त्या विषयांसाठी मार्गदर्शक मानली जाते.
"नवकाव्य","नवकथा","सौंदर्यमीमांसा","अस्तित्ववाद","चित्रकलेतील नवप्रवाह" अशा वेगवेगळ्या विचारप्रणालींचे उत्खनन करून त्यात आपल्या बुध्दीचा व तात्विक निकषांचा अर्क टाकून त्याचा अर्थ सुध्दा रसिकां पर्यंत पोहोचविला. दिनकर बेडेकरांच्या लेखणीने त्यांच्या नियमित वाचकांच्या मनातील प्रगल्भ विचारांची दालने उघडण्याचा सदैव प्रयत्न केला, असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही.
भारताच्या राजकीय, सामाजिक व तार्किक सक्षमीकरणाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून, बेडेकरांनी तब्बल ६०० च्या वर लेख लिहिले. “आधुनिक मराठी काव्यः उदय, विकास, आणि भवितव्य” तसेच “अस्तित्ववादाची ओळख” ही स्वतंत्र पुस्तकेदेखील दिनकर बेडेकरांनी लिहिली आहेत.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
रामनगरी’ या विनोदी अंगाने समाजदर्शन घडवणार्या अजरामर आत्मपर पुस्तकाचे लेखक राम विठोबा नगरकर हे एक उत्कृष्ट विनोदी अभिनेते होते.
November 10, 2016
(जन्म - 1864 ) ( मृत्यू 1917 )
शिवकर बापूजी तळपदे या मराठी शास्त्रज्ञाचा जन्म 1864 साली झाला. त्यावेळी भारत पारतंत्र्यात होता आणि आधुनिक शिक्षणाचा प्रसारही फारसा झालेला नव्हता. आपले शालेय शिक्षण झाल्यावर ते मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट या संस्थेत अध्यापक म्हणून नोकरी करू लागले. त्यांच्या संस्कृत विद्या आणि वेद वाड्गमय यांचा मोठाच व्यासंग होता. प्राचीन काळी झालेल्या शास्त्रीय प्रगतीची पुसट ओळख त्यांना या संस्कृत वाडमयातुन झाली आणि तिकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. त्यातील यंत्रे आणि तंत्रे यांचा अधिक अभ्यास करून त्यावर सखोल चिंतन ते करू लागले. यातुनच त्यांचे त्याविषयीचे संशोधन सुरू झाले. नोकरी करता करताच ते हे संशोधनकार्य फावल्या वेळात करीत असत.
अशा प्रकारे आपले संशोधनास स्वतंत्रपणे आणि मिळेल त्या तुटपुंज्या सामग्रीवर मोठया चिकाटीने ते करीत होते आणि एक दिवस त्यांनी विमान बनविले वेदातील मंत्राच्या आधाराने त्यानी संशोधन करुन हे विमान बनविले होते. त्या विमानाचे नाव त्यांनी मरुत्सखा असे ठेवले होते पारा आणि सूर्याचे किरण यांच्या प्रक्रियेतून जी शक्ती निर्माण होईल त्या शक्तीवर त्यांचे हे विमान चालत असे 1895 साली यांनी या विमानाचे उड्डाण मुंबईच्या चौपाटीवर यशस्वीपणे करून दाखविले होते बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड, लालजी नारायण, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या थोर व्यक्तीनी तेथे उपस्थित राहून हे विमानोड्डाण प्रत्यक्षपणे पाहिले आणि त्यांचे कौतूक केले.
परंतू परतंत्र असलेल्या भारतातील या संशोधकाकडे परकिय राज्यकर्ते आपूलकिने लक्ष देणे अन त्याला पूढे सहाय्य करणे कसे शक्य होते म्हणून त्यांचा तो शोध तेवढयावरच राहिला आणि पुढे 1903 साली राईट बंधूंनी अमेरिकेत विमान तयार करुन पहिले विमान उड्डाण करण्याचा मान मिळविला. ते 1917 साली कैलासवासी झाले.
March 11, 2015
महाराष्ट्रातील नामांकित महिला समाजसेविकांपैकी एक तसंच कुष्ठरोगी, आदिवासी यांच्यासाठी निरपेक्ष मनाने काम करणार्या साधनाताई आमटे यांचा जन्म नागपूर येथे ५ मे १९२७ साली झाला.
कुष्ठरोग्यांसाठी काम करणार्या मुरलीधर देवीदास आमटे अर्थात बाबा आमटे यांच्यासोबत १९४६ साली त्या विवाहबध्द झाल्या. डॉ. बाबा आमटे यांच्या जीवनपटलावरती धावती नजर फिरवणारे, व त्यांच्या गुण दोषांवर प्रकाश टाकणारे निर्भीड असे “समिधा” हे आत्मचरित्र लिहिले. हे आत्मचरित्र तमाम मराठी साहित्यप्रेमींकडून नावाजले गेले. याशिवाय अनेक दर्जेदार पुस्तके व कादंबर्या लिहून त्यांनी आपली एक अत्यंत चौकस व प्रतिभावंत लेखिका ही ओळख मिळविली.
बाबा आमटे यांच्या जीवनकार्याला व त्यांच्या प्रत्येक निर्णयाला व अभिनव उपक्रमांना, त्यांनी खंबीर व सक्रिय अशी साथ सोबत दिली होती. त्यासोबतच कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातल्या आनंदवन आश्रमाच्या उभारणीत सुध्दा त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. चतुरंग प्रतिष्ठानच्या २००७ सालच्या चतुरंग जीवनगौरव पुरस्काराने साधना आमटे यांना सन्मानित करण्यात आले होते.
डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. विकास आमटे हे त्यांचे पुत्र त्यांचा आणि बाबा आमटे यांचा वारसा चालवित आहेत.
९ जुलै २०११ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील आनंदवन येथे साधनाताईंचे निधन झाले.
January 9, 2015
छत्रपती शिवाजी महाराज यांचे एक सेनापती. शिवाजीराजांचा राज्याभिषेक झाला असता, हंबीरराव मोहित्यांना हिंदवी स्वराज्याचा सेनापती घोषित करण्यात आले. महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या.
March 12, 2015
आर्या ही मराठी गायिका आहे. झी मराठी वाहिनीच्या सारेगमप लिटिल चँप्स या संगीत विषयक कार्यक्रमात ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
November 9, 2010
मराठी मध्ये होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमांत भाऊ असायलाच पाहिजे तर कॉमेडी पूर्णत्वाला गेल्यासारखी वाटतें आणि म्हणून होणाऱ्या प्रत्येक अवार्ड शो मध्ये भाऊ च्या बतावण्या ऐकुन प्रेक्षक ही पोट धरून हसताना आपल्याला दिसतात.
July 13, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti