श्यामला वनारसे मूळ पेशाने मानसशास्त्रज्ञ. मानव संसाधन विषयातल्या तज्ज्ञ. अनेक कंपन्या व संस्थांमधून प्रशिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक. शाळा, महाविद्यालये, कंपन्या, सामाजिक संस्था, चळवळी, महिला संघटना, अशा सर्वत्र त्यांनी चित्रपट या माध्यमाचा कल्पक वापर करून त्या त्या विषयांची मांडणी केली. मुले आणि महिला हे त्यांचे विशेष आस्थेचे समूह. तिथेही त्यांनी आवर्जून चित्रपट या माध्यमाचा शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संदर्भात वापर केला. इतर कलामाध्यमाविषयीही त्यांना आस्था आहे. संगीताचे मानसशास्त्र, घाशीराम कोतवाल- एक अभ्यास ही त्यांची पुस्तके याची साक्ष आहेत. सत्यजित राय आणि भारतीय मन्वंतर या पुस्तकातून त्यांनी सत्यजित राय यांच्या चित्रपटांतून उभ्या राहणार्या भारतीय समूहमनाचे विस्तृत विश्लेषण केले आहे.
कलेचा वारसा श्यामलाताईंना बालपणापासूनच लाभला. वडील फोटोग्राफर होते. दृश्यकलांकडे पाहण्याची दृष्टी तिथून मिळाली, पण निमित्त घडले पुण्यातल्या एका चर्चासत्रातल्या व्याख्यानाचे. फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्युटचे तत्कालीन संचालक प्रा. सतीश बहादूर यांचे एक व्याख्यान श्यामलाताईंनी ऐकले आणि चित्रपटांकडे पाहण्याची त्यांची दृष्टीच बदलून गेली. चित्रपटांचा कलामाध्यम म्हणून विचार, सूक्ष्म विश्लेषण, मौलिक लेखन, भाषांतरे करून त्यांनी चित्रपट अध्यापनाची एक पद्धती विकसित केली. विविध समूह व शैक्षणिक संस्थांसाठी चित्रपटविषयक अभ्यासक्रम आखण्यात पुढाकार घेऊन विलक्षण झपाटलेपणाने त्यांनी चित्रपटसंस्कृतीचा प्रसार करण्याचे काम केले. बहादुरांचे लेखन संग्रहित करणे, प्रसिद्धीपरान्मुख असणार्या बहादुरांच्या लेखनाला उचित व्यासपीठ मिळवून देणे, त्यांच्या लेखनाची मराठीतून भाषांतरे करणे ही कामेही त्यांनी गुरूनिष्ठेतून केली. आज प्रा. सतीश बहादूर हयात नाहीत, परंतु बहादुरांनी घातलेला चित्रपट विश्लेषण, लेखन, अध्यापनाचा हा पाया विस्तृत करण्याचे कार्य त्या आज वयाची सत्तरी ओलांडल्यावरही करीत आहेत. चित्रपट संस्कृतीतील बहादूर स्कूलच्या त्या एकमेव प्रसारक आहेत.
मुंबईत झालेल्या दहाव्या आशियायी चित्रपट महोत्सवात श्यामला वनारसे यांना सत्यजित राय स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपटसंस्कृतीचा व्रतस्थपणे प्रसार करणार्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार आजवर प्रा. सतीश बहादूर, अरुणा वासुदेव, बासू चटर्जी, एच. एन. नरहरी राव यांना देण्यात आला आहे. डॉ. श्यामला वनारसे हेदेखील याच गौरवशाली परंपरेतले एक नाव.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
August 9, 2017
महाराष्ट्राची तरुण पिढी १९२० ते १९५०-५५ पर्यंत ज्यांनी वैचारिकदृष्ट्या घडविली, बुद्धिवादाचे आणि त्याचबरोबर नैतिकतेचे संस्कार ज्यांनी तिच्यावर केले, आणि तिला ध्येयप्रवण बनविले अशा विचारवंतांमध्ये आचार्य शं.द. जावडेकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. महाराष्ट्रातील बहुतेक सर्वसमाजवादी नेते, कार्यकर्ते त्याचप्रमाणे राष्ट्रसेवा दलाचे हजारो सैनिक जावडेकर यांच्या वैचारिक शिदोरीवर पोसले गेले.
August 22, 2017
विख्यात शिल्पकार व अजिंठा लेण्यांचा इतिहास शब्दबध्द करणारे लेखक राम अनंत थत्ते यांचा जन्म २७ जानेवारी १९३४ सालचा. राम थत्ते यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून “जी.डी.आर्ट”ची पदवी संपादन केली होती. थत्ते यांनी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात सातत्याने सहा वर्षे पारितोषिके मिळविली.तसंच, मुंबई राज्यकला प्रदर्शनाचे सहा वेळा परीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. महाराष्ट्र कला संचालनालयातर्फे पुतळा समितीवर त्यांची निरीक्षक म्हणून निवड झाली होती. विविध संस्था, चित्रकला महाविद्यालयांमध्ये अधिव्याख्याता म्हणून देखील थत्ते कार्यरत होते. कलाविषयावर विपूल प्रमाणावर लेखन करण्याचं काम राम थत्ते यांनी केले असून त्यांच्या "अजंठा"या २००४ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाला वाचकांसह समीक्षकांकडून कौतुकाची दाद मिळाली होती.
आयुष्याच्या उत्तरार्धात पोटाच्या विकारामुळे राम थत्ते त्रस्त होते. मृत्यूच्या आठ दिवस आधी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; पण उपचार सुरू असतानाच २९ सप्टेंबर २०१४ या दिवशी राम थत्ते यांचे वयाच्या ८०व्या वर्षी मुंबईत निधन झाले.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’, ‘मानापमान’, ‘शारदा’, ‘स्वयंवर’, ‘विद्याहरण’, ‘कान्होपात्रा’ या संगीत रंगभूमीवरील सर्व महत्त्वाच्या नाटकांत अरविंद पिळगांवकरांनी भूमिका केल्या. ‘सौभद्रा’त त्यांनी सर्व प्रमुख भूमिका केल्या. ‘मानापमाना’त ते धैर्यधरही झाले आणि लक्ष्मीधरही झाले. ‘कान्होपात्रा’त चोखोबा आणि राजा अशा दोन्ही भूमिका त्यांनी केल्या.
June 20, 2022
झोपेचा अभ्यास करणारे वेगळे शास्त्र असू शकते व त्यावरून आपल्या आरोग्याबद्दल महत्त्वाचे निष्कर्ष हाती येऊ शकतात, हे तसे आपल्याकडे अलीकडेच रुजले आहे. डॉ. प्राजक्ता देशपांडे यांनी आपल्या पतीसह अमेरिकेत स्लीप मेडिसीनविषयी संशोधन सुरु केले आणि याच क्षेत्रातील संशोधनाचा लाभ आपल्या समाजास देण्यासाठी हे दांपत्य भारतात परतले. भिन्नगती मुलांच्या झोपेचे गणित त्यांच्या मानसिक स्वास्थ्यात बदल घडवू शकते, असे महत्वपूर्ण संशोधन त्यांनी आता केले आहे.
निद्रादेवी नमो:स्तुते
July 24, 2015
जीवतंत्रज्ञानासारख्या आधुनिक विषयातील संशोधनात स्वत:चे आगळे स्थान निर्माण करणार्या पुणे विद्यापीठाच्या प्राणीसास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दीप्ती देवबागकर विज्ञान प्रसारकही आहेत. विज्ञान लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. जनुकाचे कामकाज बदलल्यामुळे कॅन्सरच्या पेशंटांवर होणारे परिणाम कसे कमी करता येतील, यावर त्या महत्वपूर्ण संशोधन सध्या करीत आहेत.
डॉ. दीप्ती देवबागकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला विज्ञानप्रसाराचा डीएनए हा लेख पुढील पानावर वाचा.
डॉ. दीप्ती देवबागकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला विज्ञानप्रसाराचा डीएनए हा लेख वाचा.
September 9, 2015
पंडितजींनी ‘कटयार काळजात घुसली’ व ‘अमृत मोहिनी’ या दोन नाटकांच्या पदानां चाली दिल्या. नाटयसंगीत भक्तीगीत अभंग भावगीत हिन्दी भजन यांना लावलेल्या चालींची संख्या १०० ते १५०च्या दरम्यान जाईल. ‘मत्स्यगंधा’ हे पंडितजीनी संगीत दिग्दर्शन केलेले ना टक १ मे १९६४ रोजी रंगभूमीवर आले आणि खूप गाजलं.
October 24, 2016
संगीत कार्यक्रमात (कॉन्सर्ट) धवनियंत्रणेचे तांत्रिक नियमन करणे म्हणजे मोठे आव्हान. कारण या साऊन्ड इंजिनीअरिंगवर कार्यक्रमाचा दर्जा ठरतो. या तंत्रज्ञानावर असलेल्या हुकमतीमुळे नितीन जोशी यांनी स्वत:चे स्थान निर्माण जेके. म्हणूनच शिवमणी, शुभा मृदुल यांच्यासारख्या कलाकारांना सोबत तेच हवे असतात...
मेरी आवाज सुनो
July 24, 2015
आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून पाटील यांनी गावरान विषय, सामाजिक प्रश्न तसंच वास्तवता मांडली. ‘सावरखेड-एक गाव’ , ‘जोगवा’, ‘७२ मैल एक प्रवास’, ‘पांगिरा’, ‘सनई चौघडे’, ‘ऑक्सिजन’, ‘ब्लाईंड गेम’; असे वैविध्यपूर्ण विषय दिग्दर्शित करुन प्रेषकाचं पुरेपूर मनोरंजन होईल याची खात्री घेतली.
March 13, 2014
वत्सला देशमुख या मराठी रंगभूमी तसंच चित्रपटातील अभिनेत्री असून हिंदी-मराठी चित्रपटांमधुन विविधांगी व चारित्र्य संपन्न अभिनेत्री तसंच सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत.
June 4, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti