(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रामदास कामत

    ‘मत्स्यगंधा’ नाटकातील ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’ हे कामत यांचे ध्वनिमुद्रित झालेले पहिले गाणे. त्यांनी गायलेली ‘आकाशी फुलला चांदण्यांचा मळा’, ‘देवा तुझा मी सोनार’, ‘निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे’, ‘पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव’, ‘वाटे भल्या पहाटे यावे’, ‘हे आदिमा हे अंतिमा’, ‘विनायका हो सिद्ध गणेशा’, ‘हे गणनायक सिद्धिविनायक’, ‘हे शिवशंकर गिरिजा तनया’ आदी भावगीते, चित्रपट गीतेही लोकप्रिय आहेत. तसेच रावणकृत शिवतांडव स्तोत्र हे रामदास कामत यांनी खड्या आवाजात गायलेले आहे.

      August 2, 2022


  • अनिल सदाशिव बर्वे

    वयाच्या ३६ व्या वर्षी निधन झालेल्या बर्व्यांनी नक्षलवादी चळवळीसंबंधी “रोखलेल्या बंदुका, उठलेली जनता” हे पुस्तक लिहिले. तसेच त्यांनी “स्टडफार्म” (कादंबरी) थॅंक्यू मि. ग्लाड, पुत्रकामोष्टी, आकाश पेलताना आदी नाटके आणि “मा निषाद”, “फाशीगेट” हे कथासंग्रह लिहिले.

      July 31, 2017


  • त्र्यंबक विनायक सरदेशमुख

    साहित्यिक, कादंबरीकार, समीक्षक आणि कवी असलेल्या त्र्यंबक विनायक सरदेशमुख यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे २२ नोव्हेंबर १९२२ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अक्कलकोट येथे झाले.

      January 22, 2010


  • अनंत माधव क्षीरसागर

    अनंत माधव क्षीरसागर हे मिशीगनमध्ये आपल्या कर्तुत्वाचा झेंडा मानाने फडकविणारे व मराठी पाण्याची गोडी आणि खोली यांची जाणीव सातासमुद्रापार पोहोचविणारे एक अत्यंत बुधिमान व विचारशील व्यक्तिमत्व आहे. त्यांचा जन्म 16 ऑगस्ट, 1931 रोजी झाला. स्वातंत्र्यपुर्व काळात जन्मलेल्या अनंत यांनी भारताचा तो स्वातंत्र्यसंग्राम अगदी जवळून पाहिला आहे.

      August 29, 2011


  • हर्षवर्धन नवाथे

    ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात `केबीसी’चा पहिला विजेता कोण होता हे आज फार क्वचित लोकांना माहित असेल. १९ वर्षांपूर्वी केबीसीमध्ये भाग घेतलेले मराठमोळे हर्षवर्धन नवाथे हे त्यावेळी विद्यार्थी होते. या शोमध्ये करोडपती बनल्यानंतर रातोरात ते स्टार झाले.

      August 25, 2019


  • पुष्कर श्रोत्री

    रेगे या चित्रपटातून त्याने रंगवलेला इन्स्पेक्टर त्याच्या अभिनयाची दुसरी गंभीर बाजूही दाखवून जातो. ह्या भूमिकेसाठी त्याला महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? चा सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे.

      April 22, 2010


  • डॉ.अमोल दिघे

    विश्वाच्या निर्मितीचे गूढ उकलण्याचा प्रयोग जिनिव्हाच्या सर्न प्रयोगशाळेत सुरु झाला, या घटनेचे डॉ. अमोल दिघे साक्षीदार ठरले. मूलकणांवरील संशोधन हा या प्रयोगाचा पाया आणि अमोल यांनी त्यांचे संशोधनाचे करिअर याच विषयातले. देशोदेशीच्या नामवंत विद्यापीठांमध्ये मूलकणांवरील संशोधन केल्यानंतर ते पुन्हा भारतात टीआयएफआर या मूलभूत संशोधनाच्या पंढरीत परतले आहेत...

    विश्वाचे आर्त ...

      July 24, 2015


  • कमलाकर विश्वनाथ सातपुते

    अभिनेता म्हणून गेली १४ वर्षे या क्षेत्रात आहे. मामा वरेरकर पुरस्कार (सर्वोत्कृष्ट अभिनेता), हास्यसन्मान पुरस्कार, दोन वेळा अल्फा गौरव साठी नॉमीनेशन. एकदा कला संस्कृतीसाठी नामांकित.<

      May 23, 2014


  • सोपानदेव नथूजी चौधरी

    एक साहित्यप्रेमी कवी म्हणून सोपानदेव नथूजी चौधरी यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1907 साली जळगाव येथे झाला. बालपणीच वडिलांचे छत्र हरपले. त्यांच्या आई बहिणाबाईं चौधरी यांना अक्षर ओळख नव्हती त्यामुळे शेतात काम करुन त्यांनी घर संसार चालवला. त्यातही कौटुंबिक परिस्थिती अतिशय बेताची, येणार्‍या आपत्तींना सतत तोंड द्यावे लागल्यामुळे त्यांचे म्हणावे तसे शिक्षण झाले नाही. परंतु योगायोगाने विष्णू दिगंबर पलुस्कर यांची आणि सोपानदेवाची एकदा भेट झाली. भेटीचं रुपांतर स्नेहात झालं आणि त्यातूनच पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या गांधर्व महाविद्यालयात सोपानदेव संगीताचे अध्ययन करु लागले. संगीताची आवड, मातोश्रींचा काव्य लेखनाचा वारसा या स्फूर्तीतून सोपानदेव 1920 च्या सुमारास काव्य रचना करु लागले. प्रतापी प्रतापसिंह आणि पुण्यश्लोक महात्मा हा महात्मा गांधींच्या जीवनावरील पोवाडा हे काव्यलेखन त्यांनी सुरुवातीच्या काळात केले. त्याच काळात नाशिकच्या गांधर्व महाविद्यालयात ते शिक्षक म्हणून रुजू झाले. 1932 `काव्यकेतकी` हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.

    त्यानंतर 1949 मध्ये अनुपमा हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. सोपान देवांच्या मातोश्री बहिणाबाई चौधरी या एक प्रसिध्द कवयित्री होत्या. अक्षरओळख नसलेल्या बहिणाबाई काम करता करता काव्यरचना करीत. जेव्हा शक्य असेल त्यावेळेस सोपानदेव त्या म्हणत असलेल्या कविता लिहून ठेवत असत. बहिणाबाईंच्या नंतर `बहिणाबाईंची गाणी` या नावाने सोपानदेवांनी त्या पुस्तक रुपाने प्रकाशित केल्या आणि महाराष्ट्रभर त्यांचे हे काव्य अतिशय गाजले. सोपानदेवांनी साहित्यातील विविध विषय हाताळले. त्यांनी नवकाव्याची विडंबने लिहिली. महाराष्ट्र संबंधीच्या प्रासंगिक रचना त्यांनी केल्या. खान्देशी भाषेतून `जानपद` गीतेही लिहिली. या शिवाय सोपानदेवांचे कोटिबाज विनोदी काव्यसुध्दा प्रसिध्द आहे. 1962 साली त्यांच्या समग्र कवितांचे संकलन असलेला सोपानदेव हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता.

      March 11, 2015


  • चंद्रकांत वर्तक

    वाड्मयीन चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता, साहित्य विश्वाचा अचूक संदर्भग्रंथ, परखड समीक्षक, व्यवहारात पारदर्शक, लिखाणासोबत स्वभावातही नितळपण..अशा अनेक वैशिष्टय़ांनी व्यक्तिमत्व सजलेले असल्याने ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. चंद्रकांत रामचंद्र वर्तक यांच्या निधनाचा धक्का अवघ्या मराठी साहित्य विश्वाला बसणे साहजिकच. रायगड जिल्ह्य़ातील महाड या गावी २७ जुलै १९३० रोजी प्रा. डॉ. चंद्रकांत वर्तक यांचा जन्म झाला.

    प्राथमिक शिक्षण मुंबईतील छबिलदास शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण रुईया महाविद्यालयात झाले. विद्यार्थीदशेतच त्यांची लेखनकलाही बहरत होती. वर्धा येथील गोविंददास सक्सेरिया महाविद्यालयात प्राध्यापकी स्वीकारल्यानंतर हा पेशा व प्रवासाच्या आवडीमुळे त्यांच्या लेखनकलेस खतपाणी मिळाले. पुणे विद्यापीठातून ‘सन १८०० ते १९५० हा दीडशे वर्षांचा प्रवास’ या विषयावर त्यांनी पी.एचडी केली. नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे हं.प्रा.ठा., बिटको आदी महाविद्यालयांमधून त्यांनी प्राध्यापक, विभागप्रमुख म्हणून काम पाहिले. पी.एचडी आणि एम.फिलसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. १९९० मध्ये नाथीबाई ठाकरसी महिला महाविद्यालयातून ते निवृत्त झाले. कथाकार, समीक्षक, उत्कृष्ट वक्ता म्हणून असलेली त्यांची कामगिरी नवोदितांसाठी आदर्शवत अशीच. नाशिकमध्ये कविवर्य कुसुमाग्रज, वसंत कानेटकर या ज्येष्ठ साहित्यिकांच्या सान्निध्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व साहित्यिकदृष्टय़ा अधिकच बहरले. आपल्या साहित्यामधून त्यांनी वाचकाला जगाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली. ‘वळणावरचे साकव’ या व्यक्तिचित्रणसंग्रहातून ते सहजपणे वाचकाला अंतर्मुख करून जातात, तर ‘माळंदे’ या ललित लेखसंग्रहातून त्यांच्या खेळकर लेखनशैलीचा सहज सुंदर आविष्कार पहायला मिळतो. प्रवास करताना केवळ ‘पाहाणे’ नव्हे, तर ‘अभ्यासणे’ या त्यांच्या वृत्तीचे दर्शन ‘लू यू चीन,’ ‘देशादेशांतून’ या प्रवासवर्णनसंग्रहांमधून दिसते. ‘मराठी ललित गद्य’, ‘सफर बहुरंगी रसिकतेची’, ‘संशोधनाची लेखनशैली’ ही त्यांची समीक्षा व संशोधनपर पुस्तके. मुक्त विद्यापीठासाठी १६ पुस्तकांचे लेखन करणाऱ्या प्रा. वर्तक यांचे ‘पारंब्या’, ‘फुलपंखी दिवस’, ‘अंकुर’, ‘मनमोर’, ‘धून’, ‘केटलिक वार्ताओ’ (गुजराती) हे कथासंग्रहही प्रसिध्द आहेत. ‘कॉन्व्हर्सेशन विथ स्टॅलिन-एक शर्थीची झुंज’ या समीक्षात्मक व संशोधनात्मक ग्रंथाचीही साहित्यवर्तुळाने विशेष दखल घेतली. याशिवाय त्यांच्या नावावर ‘मराठी नियतकालिकांचा इतिहास खंड २, २४,’ ‘प्रभाकर पाध्ये-समग्र वाड:मयदर्शन’, ‘सर्वोत्कृष्ट मराठी कथा खंड १३’ आदी ग्रंथ आहेत. लघुकथा, प्रवासवर्णन, व्यक्तिचरित्रे, ललित गद्य या प्रकारांमध्ये स्वैर मुशाफिरी करणारे वर्तक समीक्षक म्हणून अधिक ओळखले गेले. नवीन लेखकांचे तर ते गुरूच. आपल्या पुस्तकासाठी वर्तक यांनी दिलेला अभिप्राय नवलेखकांना बहुमोलाचा वाटे. संस्कृतवरही त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्या कार्याची दखल घेत पुणे विद्यापीठाने साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार त्यांना प्रदान केला. याशिवाय डॉ. य. वा. परांजपे, किलरेस्कर, मराठी साहित्य परिषदेचा विद्याधर पुंडलिक पुरस्कार, यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला. नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाचा मु. ब. यंदे पुरस्कार त्यांना अधिक भावत असे. महाराष्ट्र राज्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या संशोधन समितीचे सदस्य, कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणाऱ्या साहित्यभूषण परीक्षा समितीचे अध्यक्ष, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी लीलया पेलल्या. येत्या २७ जुलै रोजी ८१ व्या वर्षांत ते पदार्पण करणार होते. वाढदिवस कशा पध्दतीने साजरा करावयाचा, या नियोजनात पत्नी, दोन मुले यांसह मित्रांना मग्न ठेवत ते स्वत: परलोकीच्या प्रवासाला निघून गेले.

      August 5, 2017