(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ऋषी राजेंद्र दर्डा

    ऋषी राजेंद्र दर्डा

    लोकमत मिडिया समूहाचे सह-व्यवस्थापकीय संचालक. (Joint Managing Director)

      July 19, 2011


  • मारुती माने

    १९६४ ला मेहेरदीन याला पराभूत करून ‘हिंदकेसरी’ किताब पटकावलेल्या मारुती माने यांनी त्यानंतरच्या दशकात अनेक दिग्गजांशी कुस्त्या केल्या. त्यात मास्टर चंदगीराम, सादिक पंजाबी, विष्णुपंत सावर्डेकर-पाटील आणि बसलिंग करजगी आदींचा समावेश होता.

      August 4, 2017


  • वसंत रामकृष्ण वैद्य

    वसंत वैद्य प्रकाशझोतात आले ते त्यांच्या खुमासदार लेखनशैलीमुळे. प्रयोगशील लेखकाप्रमाणे एक अत्यंत हळव्या मनाचे व सृजनशील कवी म्हणूनही ते रसिकांच्या आठवणींमध्ये मिसळून गेले.

      January 22, 2015


  • गा‌यिका आशा खाडिलकर

    गा‌यिका आशा खाडिलकर

    ज्येष्ठ गा‌यिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, शास्त्रीय संगीत किंवा नाट्यसंगीत, भक्तिसंगीत किंवा अगदी भावगीत… त्यांचे प्रत्येक गाणं प्रचंड ऊर्जेनं भारलेलं असतं.

      June 9, 2017


  • डॉ. वसुधा सहस्त्रबुध्दे

    भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागातर्फे बिगरहिंदी भाषक हिंदी लेखक पुरस्कार योजनेचा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार ठाण्याच्या डॉ. वसुधा सहस्रबुद्धे यांना मिळाला आहे.

    स्वातंत्र्य संग्रामात पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून सर्वसामान्य महिलांनीदेखील शौर्य गाजवले. या पराक्रमाची गाथा देशाच्या कानाकोपर्‍यात पोहचवायची असेल तर ती हिंदीत अनुवादित करायला हवी, हे डॉ. सहस्रबुद्धे यांनी ओळखले होते. त्यांचे माहेर कोकणातले. घरात संस्कृत भाषेचा दरवळ कायमच. विवाहानंतर कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडताना शिकण्याच्या उर्मीने त्यांनी एम. ए. केले. एम. ए. साठी हिंदीची निवड केली. त्याहीपुढे जात ' डॉ. शंकरशेष का नाट्य साहित्य ' या विषयात त्यांनी चाळीसाव्या वर्षी डॉक्टरेट मिळवली. त्याच दरम्यान त्यांनी त्रिपुरारी शर्मा यांच्या ' दहलिज ' या मालिकेचा व भीष्म सहानींच्या ' माधवी ' या नाटकाचा रेडिओसाठी मराठीत अनुवाद केला. यानंतर मात्र त्यांना अनुवादाची गोडी लागली व ' स्वातंत्र्योत्तर कालीन मुंबई का हिंदी रंगमंच ' आणि ' प्रयोगशील रंगमंचीय आंदोलन में आविष्कार का योगदान ' या शोधप्रबंधांतून त्यांनी आपल्यातील अनुवादकाच्या प्रगल्भतेची चुणूक दाखवली. या शोधप्रबंधांसाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न त्यांना पु. ल. देशपांडे यांची शाबासकी देऊन गेले.

    मुंबईतील एसएनडीटी महाविद्यालयात अध्यापनाचे काम करताना त्यांचा परिचय राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. रोहिणी गवाणकर यांच्याशी झाला. आझाद हिंद सेनेच्या महिला पलटणीचे नेतृत्व करणाऱ्या कॅप्टन लक्ष्मी व मानवती पांडेय, जानकी दावर, पी. नारायण कुट्टी, शकुंतला गांधी, बेला मुखर्जी, प्रतिभा पाल यांच्यासारख्या वीर महिला सैनिकांनी गाजवलेला पराक्रम व त्यांच्यात ओतप्रोत भरलेल्या कर्तव्यभावनेची ओळख देशभरातील जनतेला व्हावी, यासाठी गवाणकर यांच्या पुस्तकाचा त्यांनी हिंदीत अनुवाद केला. कोणताही मोबदला न घेता अनुवादाची जबाबदारी स्वीकारण्याचे एका अर्थाने धाडस डॉ. सहस्रबुद्धे यांनी त्यावेळी केले. संहितेच्या अनुवादातून मिळणारा पैसा हे एकमेव उद्दिष्ट न मानता सृजनाचा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहस्रबुद्धे यांनी हे आव्हान पेलवून दाखवले. पुढे महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीने दिलेल्या अनुदानातून ते २००३ मध्ये कोलकात्यात प्रसिद्ध झाले.

    डॉ. वीणा गवाणकर यांनी लिहिलेल्या ' कॅप्टन लक्ष्मी व झाशी रेजिमेंट - एक अकथित कथा ' या पुस्तकाच्या हिंदी अनुवादासाठी या राष्ट्रीय गौरवाला त्या पात्र ठरल्या आहेत. भाषेची चौकट व मोबदल्याच्या चौकटीत जखडून न राहता उगवत्या पिढीला देशाच्या स्वातंत्र्यसमरातील महिलांच्या योगदानाची माहिती देणार्‍या या अनुवादाबद्दल त्यांचा झालेला हा गौरव सार्थ म्हणायला हवा.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


      August 9, 2017


  • किसन तुळपुळे

    विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कामगार चळवळ ज्या प्रामाणिक आणि निस्वार्थी पुढाऱ्यांच्या जीवावर फोफावली त्या पुढाऱ्यांमध्ये किसन तुळपुळे यांचा समावेश अपरिहार्यपणे करावा लागेल. किंबहुना त्यांच्या समावेशाशिवाय या पुढाऱ्यांच्या यादीला कुठेतरी अपूर्णपणा येईल. महात्मा गांधींनी १९४५ मध्ये अहमदाबादला जाऊन ‘मजदूर महाजन’ या कामगार संघटनेचे काम करण्याचा दिलेला सल्ला धुडकावणाऱ्या तुळपुळेंनी नंतर अहमदाबादमधील सूत गिरणी कामगारांसाठी ‘मिल मजदूर सभा’ स्थापन केली.

    अर्थात कामगार हा त्यांचा प्राण होता आणि ‘मिल मजदूर सभा’ हा श्वास होता. पुण्यामध्ये १९२१ मध्ये जन्म झालेल्या किसन तुळपुळ्यांची मुंबई ही कर्मभूमी होती. १९४१ मध्ये मुंबई विद्यापीठाची रसायनशास्त्रातील पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेण्याची त्यांनी तयारी केली. त्याचबरोबर खडकीच्या दारूगोळा कारखान्यात त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली.

    जयप्रकाश नारायण, एसेम जोशी, साने गुरूजी, राम मनोहर लोहिया आदी स्वातंत्र्य चळवळीतील भूमिगत नेते त्याकाळातील तरूणांचे आदर्श होते. तुळपुळेही त्याला अपवाद नव्हतेच. या नेत्यांच्या ते संपर्कात आले. चळवळीसाठी काम करीत असतानाच त्यांना १९४३ मध्ये अटक होऊन दोन वर्षांची शिक्षा झाली. या दोन वर्षांचा अनुभव त्यांनी आपल्या ‘माझी जेलयात्रा’ या पुस्तिकेत नोंदवला आहे. तुरूंगातून सुटल्यावर ते मुंबईला कामगारांच्या चळवळीकडे आकर्षित झाले. साम्यवाद्यांच्या ‘गिरणी कामगार युनियन’मध्ये अनुभव घेतल्यावर ते ‘राष्ट्रीय मिल मजदूर संघा’त गेले.

    राजकीय मुद्दय़ांवर संघ फुटल्यावर ते साथी अशोक मेहतांबरोबर बाहेर पडले आणि ‘मिल मजदूर सभे’त गेले. या संघटनेचे ते पहिले खजिनदार होते. पण नंतर त्यांनी तब्बल २७ वर्षे या संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. ही संघटना म्हणजे त्यांचा खरोखरच श्वास होता. दर बुधवारी या संघटनेच्या दादर येथील कार्यालयात जाऊन सहकाऱ्यांशी गप्पा मारल्याखेरीज त्यांना चैन पडत नसे. हा त्यांचा नेम शेवटपर्यंत होता. १९५८ मध्ये त्यांची निवड वेतन मंडळावर झाली. त्याचवर्षी अमेरिकेत झालेल्या ‘लीडर एक्स्चेंज’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली.

    राष्ट्राध्यक्ष जॉन. एफ. केनेडी यांच्याशी त्यांनी कामगारांच्या प्रश्नावर चर्चा केली. १९६८ मध्ये तुळपुळ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘मिल मजदूर को-ऑप. क्रेडीट सोसायटी’ स्थापन करण्यात आली. कामगारांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यामध्ये या सोसायटीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. भविष्य निर्वाह निधीच्या मध्यवर्ती मंडळावर नियुक्ती होताच त्यांनी कामगारांना निवृत्ती वेतन देण्याची व्यवस्था केली. आणीबाणीच्या काळात त्यांना या मंडळावरून दूर करण्यात आले पण १९७७ नंतर पुन्हा त्याची नियुक्ती करण्यात आली. केवळ कामगारांच्या संघटनांमध्ये त्यांनी काम केले नाही तर मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवरही त्यांनी आपला ठसा उमटविला आहे.

    कामगार आणि मालक यांच्यात नेहमी सौहार्दाचे वातावरण असले पाहिजे, न्याय्य मागण्यांसाठी मिल बंद करायची नाही तर ती सुरू ठेवून आपल्या मागण्यांसाठी लढा द्यायचा, यावर त्यांचा नेहमी भर असे. रेशम उद्योगातील कामगारांचा लढा लढताना ‘अशोक सिल्क मिल’ आणि एल्डी व्हेल्वेट अ‍ॅण्ड सिल्क मिल’ या दोन बंद गिरण्यांचा प्रश्न त्यांनी याच पद्धतीने लढवला. पाच वर्षे लढा दिल्यावर त्यांनी त्या पुन्हा सुरू केल्याच पण कामगारांची थकीत देणीही मिळवून दिली.

    ५५ वर्षे कामगार संघटनेत काम केल्यावर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि सल्लागाराची भूमिका स्वीकारली. किसन तुळपुळे यांनी कामगार चळवळीवर काही पुस्तकेही लिहिली आहेत. कोणत्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता आपले काम करीत राहणाऱ्या तुळपुळ्यांची श्रीमंती ही त्यांच्या सहकाऱ्यांच्या संख्येत होती. त्यांचा साधेपणा सर्वानाच भावणारा होता.

    सच्छिल, निस्वार्थी आणि प्रामाणिक असे दुर्मिळ गुण त्यांच्यात होते. कामगारांप्रती असलेली त्यांची तळमळ त्यांच्या सहकाऱ्यांना कायम लक्षात ठेवणारी आहे. मरगळलेल्या कामगार चळवळीला संजीवनी देण्यासाठी सुरू असलेली त्यांची धडपड अखेर ५ सप्टेंबर रोजी विसावली.

      August 5, 2017


  • उर्मिला भूतकर

    शिक्षण, वाचन याची उपजत गोडी असणार्‍या उर्मिला भूतकरांना साहित्याची विशेष आवड आहे, त्या कवयित्री म्हणून प्रसिद्ध असून, कोणत्याही प्रसंगावर, व्यक्तीवर घटनेवर केवळ ३-४ मिनिटांमध्ये काव्यरचना करतात. “उर्मी” हा त्यांचा एकपात्री प्रयोग महाराष्ट्रासोबतच महाराष्ट्राबाहेर लोकप्रिय ठरला.

      June 18, 2013


  • नंदिनी बेडेकर

    शेवटी संगीत हे मृगजळ आहे. म्हणूनच संगीताच्या या अथांग सागरात डुबकी मारून कोणकोणती रत्नं हाताला लागतील काहीच सांगू शकत नाही. मग काही वेळा या प्रवासात गटांगळ्या सुद्धा खाव्या लागतील मात्र डगमगून नं जाता एकेका स्वराचा आधार घेऊन ही नाव तरून न्यावीच लागते. तेव्हा आणि तेव्हाच हे मृगजळ पार करणं शक्य आहे हे नंदिनी बेडेकर यांच्या या सांगीतिक प्रवासातून दिसून येईल.

      June 30, 2022


  • अरूण साधू

    अरूण साधू

    अरूण साधू हे मराठी भाषेतील प्रख्यात लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरिक्षक व समीक्षक आहेत.

      December 15, 2010


  • डॉ. आनंद नाडकर्णी

    मन नेहमीच सर्वच क्षेत्रातील लोकांसाठी अभ्यासाचा कुतूहलाचा विषय झालेला आहे. जगातील सर्वंत वेगवान आणि आवरायला कठीण गोष्ट कोणती; तर ते आहे आपलं मन ! पण काही व्यक्ती अशा आहेत ज्या मनावर अधिराज्य करतात. असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. आनंद नाडकर्णी! व्यवसायानं डॉ. नाडकर्णी हे मानसोपचारतज्ञ आहेत.

      May 23, 2014