लेखक, समीक्षक आणि संतसाहित्याचे अभ्यासक म्हणून निर्मलकुमार जिनदास फडकुले हे प्रसिद्ध आहेत. २० स्वलिखित, तर ७ संपादित पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
December 20, 2015
वनस्पतींवर अपार प्रेम करणारा बंडखोर वैज्ञानिक हे वाक्य आले तर पुढील नाव हे आघारकरांचे आले पाहिजे इतकी या जंगलवेड्या निसर्गमित्राला, आजुबाजूच्या झाडा झुडूपांची, पाना फुलांची, पाखरा प्राण्यांची व वनस्पती वेलींची विलक्षण आवड होती.
July 29, 2011
(जन्म १९४२)
जागतिक कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ. मुंबईच्या विज्ञान संस्थेमधून १९६५ मध्ये एम.एस्सी. आणि हार्वर्ड विद्यापीठाची १९६९ मध्ये पीएच.डी. पश्चिम घाट, राजस्थान, हिमालय, पनामा, पूर्व आफ्रिका, अमेरिका इथल्या पर्यावरणाचा प्रत्यक्ष अभ्यास. भारतांतील बायोस्फिअर रिझर्व्ह यांच्या कक्षा ठरवून त्यांचे नियम करण्यासाठी व निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्हच्या घाटीत प्रत्यक्ष फिरून धोरण आखण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. सस्तन प्राण्यांची वागणूक पद्धती, आदिवासी जमातींच्या पर्यावरणाला अनुकूल जीवनपद्धती आणि वा. द. वर्तक यांचेबरोबर अभ्यासलेले देवरायांचे महत्त्व, हे त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. माधव गाडगीळ यांना भटनागर पुरस्कार, भारतातील वैज्ञानिक संस्थांचे सदस्यत्व, भारत सरकारची पद्मश्री इत्यादी सन्मानप्राप्त झालेले आहेत. बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून निवृत्त झाल्यावर ते पुण्यात स्थायिक झाले आहेत. १९८३ साली लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे भरलेल्या मराठी विज्ञान संमेलनाचे ते अध्यक्ष हते.
माहितीस्त्रोत - (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष
December 15, 2010
अभिनयातलं कर्तृत्व आणि सार्वजनिक जीवनातलं दातृत्व अशा दोन्ही आघाड्यांवर श्रेष्ठ ठरलेले अभिनेते म्हणजे चंद्रकांत गोखले. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२१ रोजी मिरज येथे झाला. त्यांचे बालपण मिरज इथेच गेले. अभिनयाचं बाळकडू त्यांना मिळालं ते आपली आजी दुर्गाबाई आणि आई कमलाबाई यांच्याकडून. "चित्ताकर्ष' ही त्यांची घरची नाटक मंडळी होती. वडिलांच्या अकाली निधनामुळे कमलाबाई आपल्या मुलांना बरोबर घेऊन विविध नाटक कंपन्यांमधून भूमिका साकारीत संसार चालवीत होत्या. घरची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे छोट्या चंद्रकांतला शालेय शिक्षण काही घेता आलं नाही, परंतु त्यानं त्याचा विपरीत परिणाम आपल्या जडणघडणीवर होऊ दिला नाही. कमलाबाईंनीच त्याला घरी राहूनच लिहायला-वाचायला शिकविलं. विशेष म्हणजे कधीही शाळेत न गेलेल्या चंद्रकांतनी कालांतरानं मिरजेच्या ब्राह्मणपुरीतील प्राथमिक शाळा क्रमांक एकचे मुख्याध्यापकपद भूषविलं.
वयाच्या सातव्या वर्षीपासून चंद्रकांतनी नाटकात काम करण्यास सुरवात केली.त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी ’पुन्हा हिंदू’ या नावाच्या मराठी नाटकाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ७ दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत यांनी साठाहून अधिक मराठी नाटकांतून व साठाहून अधिक मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे. चंद्रकांत यांच्या कारकिर्दीला वळण मिळण्याचा योग आला तो दीनानाथ मंगेशकर यांच्यामुळे. १९३७-३८च्या सुमारास चंद्रकांतना खुद्द दीनानाथांकडून तब्बल ७० ते ८० बंदिशी शिकण्याची संधी मिळाली. मा. दीनानाथांना गोखले पितृस्थानी मानत. या वेळी त्यांनी काही संगीत नाटकांमधूनही भूमिका केल्या. इथून पुढं त्यांनी रंगभूमी गाजवली. सुरवातीच्या काळात "बेबंदशाही' आणि "पद्मिनी' यांसारख्या नाटकांमधून स्त्री-भूमिकाही त्यांनी केल्या. "नटसम्राट', "पुण्यप्रभाव', "भावबंधन', "राजसंन्यास', "बॅरिस्टर', "पुरुष', "पर्याय' ही त्यांची काही गाजलेली नाटकं. "बॅरिस्टर' हे त्यांचं आवडतं नाटक होतं. "पुरुष' या नाटकावर नाना पाटेकर, रीमा लागू यांच्याएवढाच चंद्रकांत गोखले यांचाही प्रभाव होता. "रायगडचा राजबंदी' या चित्रपटात चंद्रकांत गोखले यांनी शिवाजी महाराजांची, तर चित्तरंजन कोल्हटकर यांनी संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली होती. याच नाटकात दुर्गा खोटे सोयराबाईंच्या भूमिकेत झळकल्या होत्या. या तिघांची रुपेरी पडद्यावरील जुगलबंदी प्रेक्षकांसाठी अक्षरशः पर्वणी ठरली होती. त्यांनी भूमिका केलेल्या नाटकांपैकी भावबंधन, राजसंन्यास, पुण्यप्रभाव, बेबंदशाही, राजे मास्तर, बॅरिस्टर, पुरुष ही प्रमुख नाटके होत. मराठीशिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांमधूनदेखील भूमिका रंगवल्या.
कृश शरीरयष्टी, उत्कृष्ट वक्तृत्वशैली आणि भावनेला भेदणारी संवादफेक हे चंद्रकांत गोखले यांच्या अभिनयाचं वैशिष्ट्य. सच्चेपणा आणि साधेपणा हे त्यांचे मोठे गुणवैशिष्ट्य होते. सात दशकांची आपली कारकीर्द चंद्रकांत रघुनाथ गोखले यांनी विविधांगी भूमिकांनी गाजवली. प्रत्येक भूमिकेवर ते आपला ठसा उमटविण्यात यशस्वी ठरले.मा. चंद्रकांत गोखले हे गायकही होते. त्यानी ख्याल गायकीचे शिक्षण घेतले होते. गदिमा लिखीत, सुधीर फडके यांनी संगीत दिलेल्या गीतरामायण या गीत काव्यातील १० व्या गीताचे (चला राघवा चला'चे) गायन चंद्रकांत गोखले यांनी केले होते. मा. चंद्रकांत गोखले यांना विष्णुदास भावे पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार यांसारखे मानसन्मानही मिळाले. चंद्रकांत रघुनाथ गोखले यांचे २० जुन २००८ रोजी निधन झाले.
अधिक माहितीसाठी हा लेख वाचा. (22-Jun-2018)
चंद्रकांत रघुनाथ गोखले (7-Jan-2017)
चंद्रकांत रघुनाथ गोखले (7-Jan-2018)
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
April 29, 2022
पंडित, (डॉ.) अनला
कोणत्याही खासगी अथवा सार्वजनिक कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या यंत्रणेने आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माहिती साठय़ाचा योग्य उपयोग करून घेतल्यास त्याचा कंपनीच्या विकासासाठी मोठा फायदा होऊ शकतो; पण त्यासाठी कंपनी कर्मचाऱ्यांना आपल्याच कंपनीमध्ये उपलब्ध असलेल्या या माहितीचा कसा शोध घ्यायचा याचे प्रशिक्षण दिले जाणे आवश्यक असते. किंबहुना ही माहिती कशी जमा करावी, त्याचा उपयोग कसा करावा याबाबतचा खास अभ्यासक्रम असेल तर त्याचा मोठाच फायदा होऊ शकतो.
‘वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिटय़ूट’च्या (व्हीजेटीआय) सहाय्यक प्राध्यापिका अनला पंडित यांनी ‘आयबीएम’ या जगविख्यात संगणक कंपनीला अशा माहितीचा उपयोग करून घेणारा ‘कॉम्पिटिटिव्ह इंटलिजन्स यूजिंग बिझनेस अॅनॅलिसिस’ हा प्रोजेक्ट सादर केला. पंडित यांचा हाच प्रोजेक्ट ‘आयबीएम’च्या दहा हजार डॉलर्सच्या (सुमारे साडेचार लाख रुपये) ‘सर्जनशील शिक्षक पुरस्काराचा’ मानकरी ठरला आहे. जगभरातून २०४ तर भारतातून अवघ्या सहा जणांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती, त्यात पंडित एक होत्या. ‘आयबीएम’ने दिलेल्या या रकमेतून आता पंडित ‘व्हीजेटीआय’मध्ये हा प्रोजेक्ट प्रत्यक्ष राबविणार आहेत. कोणत्याही प्रोजेक्टसाठी, संशोधन कार्यासाठी एखाद्या कंपनीकडून अशा प्रकारचा पुरस्कार मिळणे ही त्या शिक्षकासाठी व संबंधित महाविद्यालयासाठी अभिमानास्पद बाब असते. सायन येथील ‘एसआयईएस’ महाविद्यालयातून त्यांनी १९८१ मध्ये बीएस्सी तर १९८३ साली मुंबई विद्यापीठातून एमएस्सी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी अमेरिकेत ‘युनिव्हर्सिटी ऑफ लुईविल’मध्ये दोन वर्षांचा एमएस इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग हा (एमटेक समकक्ष) अभ्यासक्रम पूर्ण केला. पंडित यांच्या आई शिक्षिका तर वडील महापालिकेमध्ये नोकरी करणारे. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे उच्चशिक्षण शक्य झाले. ८५ साली शिक्षण पूर्ण करून त्या मुंबईस परतल्या आणि वाटुमल अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्यात्या म्हणून रुजू झाल्या. विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरचे शिक्षण द्यायचे, त्यांना संशोधनासाठी प्रवृत्त करायचे, पुस्तकी शिक्षणाबरोबरच समाजासोबत जोडून घ्यायला प्रवृत्त करायचे या हेतूने त्यांनी विविध उपक्रम महाविद्यालयात सुरू केले. पती अनिरूद्ध हे ‘आयसीटी’मध्ये (यूआयसीटी) प्राध्यापक, तर सासरे भालचंद्र पंडित हेसुद्धा शिक्षकच. त्या दोघांचे अनेक बाबतींत मार्गदर्शन आणि सहकार्य त्यांना लाभले. सुमारे साडेतीन वर्षांच्या सेवेनंतर काही कारणास्तव त्यांनी वाटूमल महाविद्यालयातील नोकरीचा राजीनामा दिला आणि क्रॉम्प्टन या खासगी कंपनीत त्या ‘कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह’ पदावर रूजू झाल्या. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन वरिष्ठांनी प्रोबेशन काळातच त्यांना बढती दिली. मात्र तीन-चार वर्षे हे काम केल्यानंतर पुन्हा शिक्षकी पेशात यायचा निर्णय त्यांनी घेतला. १९९४ ते ९९ या काळात त्यांनी रिझवी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, व्हीजेटीआय, एमईटी या महाविद्यालयांमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम केले. २००० मध्ये त्यांना व्हीजेटीआयमध्येच पूर्णवेळ व्याख्याता होण्याची संधी मिळाली. त्यांच्या कामाचा व्याप आता रेडिफ, आयबीएम, सिटी बँक अशा विविध कंपन्याच्या कर्मचाऱ्यापर्यंत जाऊन पोचला आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या काही पुरस्कारांच्या मानकरीही त्या ठरल्या आहेत. त्यांना पीएच.डी.साठी अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ लुईविल’ येथे पाठविण्याचा निर्णय व्हीजेटीआयने घेतला आहे. ऑगस्टमध्ये त्या अमेरिकेला जाणार आहेत, त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा.
August 5, 2017
प्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल हे इंग्रजीचे प्राध्यापक होते. तोरडमल यांना ‘मामा’ या नावाने संबोधले जायचे.
कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘ज्योतिबाचा नवस’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर ‘सिंहासन’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘आपली माणसं’, ‘आत्मविश्वास’, ‘शाब्बास सूनबाई’ हे मराठी चित्रपटही त्यांनी केले.
प्रा. मधुकर तोरडमल यांनी ‘ऋणानुबंध’, ‘किनार’, ‘गगनभेदी’, ‘गाठ आहे माझ्याशी’, ‘गुलमोहोर’, ‘झुंज’, ‘भोवरा’, ‘मगरमिठी’, ‘म्हातारे अर्क बाईत गर्क’, ‘लव्ह बर्ड्स’, ‘विकत घेतला न्याय’ या नाटकांतूनही अभिनय केला होता.
तब्बल पाच दशकांहून अधिक काळ रंगभूमीच्या माध्यमातूनप्रेक्षकांना सतत हसवत ठेवणा-या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या त्यांच्या व्यावसायिक नाटकाने ५००० प्रयोगांची यशस्वी घौडदौड केली. तोरडमल स्वतः या नाटकात प्रोफेसर बारटक्क्यांची भूमिका करत. या नाटकाविषयी एका समीक्षकाने ठळकपणे म्हटले होते की, ‘सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विशेषत: पांढरपेशा स्त्रियांनी हे नाटक अजिबात बघू नये’. पण झाले उलटेच. त्यानंतर रसिकांची उत्सुकता वाढली आणि सुशिक्षित महिला, मुली यांनी अक्षरश: रांगा लावून बुकिंगमध्येच नाटक हाऊसफुल्ल केले.
दि. २ जुलै २०१७ रोजी त्यांचे दिर्घ आजारपणामुळे मुंबईत निधन झाले. मुत्यूसमयी ते ८५ वर्षांचे होते.
## Toradmal, Madhukar
## Madhukar Toradmal
तोरडमल, मधुकर - First published on 15 Dec 2010. updated on 2 July 2017
प्रा. मधुकर तोरडमल यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल (20-Jul-2017)
रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल (24-Jul-2017)
ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल (24-Jul-2021)
ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचा स्मृतिदिन (2-Jul-2021)
July 2, 2017
१९१५ साली त्यांनी काढलेल्या “संदेश” ने मराठी वृत्तपत्रांना आधुनिक रुप दिले. चरित्रपर नाटके (स्वामी विवेकानंद, ताई तेलीण, मस्तानी, चांदबीबी) हा नवा प्रकार त्यांनी हाताळला.
August 23, 2017
पंडित पुरुषोत्तम वालावलकर यांचा जन्म ११ जून रोजी झाला. बालगंधर्वांच्या नाटक मंडळींमध्ये बालपण व्यतीत केलेल्या वालावलकरांनी बालगंधर्वांपासून ते पंडित भीमसेन जोशी, पं.जितेंद्र अभिषेकी, पं. सी. आर. व्यास, शोभा गुर्टू अशा दिग्गज कलाकारांना संवादिनीची साथ केली होती.
March 14, 2014
त्यांचे वडील दशग्रंथी असल्यामुळे संहिता, शिक्षा, ज्योतिष, छंद इ. विषयांचे ज्ञान त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच प्राप्त झाले. याशिवाय कराड येथे त्यांचे थोडेसे इंग्रजी शिक्षण झाले. त्यानंतर पुण्याच्या ट्रेनिंग कॉलेजात राहून त्यांनी तेथील अभ्यासक्रम पूर्ण केलाद व शिक्षकाचा पेशा पतकरला.
June 24, 2022
‘सिंहासन’ या सिनेमात अरूण सरनाईक, श्रीराम लागू, निळू फुले, मधुकर तोरडमल, मोहन आगाशे, दत्ता भट, सतीष दुभाषी, रिमा लागू, लालन सारंग, जयराम हर्डीकर, नाना पाटेकर या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका होत्या. मराठी सिनेसृष्टीतला ‘मास्टरपीस’ म्हणून या सिनेमाकडे आजही पाहिले जाते. ३० वर्ष त्यांनी पत्रकारिता केली.
June 18, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti