(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मधुकर दरेकर

    भारतात काही विशिष्ट खेळांनाच पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता मिळते, अशी खंत आपण नेहमी व्यक्त करतो. त्यामुळेच मुख्य प्रवाहांबाहेरचे क्रीडाप्रकार समाजात रुजविण्यात ज्यांनी योगदान दिले. त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद ठरतात. महाराष्ट्राला पॉवरलिफ्टींग या क्रीडाप्रकाराची ओळख करुन देणारे मधुकर दरेकर यांनी नऊ वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेच, पण हा खेळ राज्यभरात रुजविण्यात गेली ४५ वर्षे आपले जीवन वाहून घेतले.

    पॉवरलिफ्टिंगची शक्ती

      July 24, 2015


  • प्रमिला दातार

    प्रमिला दातार यांनी ज्येष्ठ गायक तलत महमूद यांच्याबरोबर परदेशात वेस्ट इंडिज, जमेका आणि शेवटी लंडन अनेक यशस्वी दौरे केले. हे सर्व चालू असतानाच रफी साब… किशोर कुमार जी…मन्ना डे यांच्या सारख्या महान गायकांबरोबर त्यांनी भरपूर परदेश दौरे केले.

      July 8, 2022


  • पंढरीदादा जूकर

    जूकर, पंढरीदादा

    चित्रपटसृष्टीची फार ढोबळ ओळख सर्वसामान्य प्रेक्षकाला असते. चित्रपटाच्या तांत्रिक बाजूंपैकी छायाचित्रण, संकलन या विभागाची कामे काय असतात याचे थोडेफार तरी ज्ञान अनेकांना असते; परंतु ‘मेकअप’विषयी साधारणत: फारच कमी आणि त्रोटक माहिती चित्रपटसृष्टीच्या बाहेरील लोकांना असते. ‘मेकअप’ म्हणजे ‘तोंड रंगविणे’ असा एक सर्वसाधारण ठोकताळा असतो. मात्र असे ‘तोंड रंगविणाऱ्याला’ व्यक्तिरेखांचा अभ्यास असेल, अभिनेत्याच्या चेहऱ्यात नेमके काय कमी आहे आणि काय अधिक आहे याचा अंदाज असेल आणि या ज्ञानाचा उपयोग तो ‘मेकअप’ करताना जाणतेपणी करीत असेल तर ‘मेकअप’ हा ‘मेकअप’ राहत नाही, त्याची कला बनते.

    पंढरीदादा जूकर यांनी ‘मेकअप’ला असे महत्त्वाचे स्थान प्राप्त करून देता देता स्वत:ही एक कलावंत म्हणून स्थान मिळविले. गेली जवळपास ५० वर्षे पंढरीदादा आपली या क्षेत्रातली ‘दादगिरी’ टिकवून आहेत. आज या क्षेत्रात काम करणारे जवळपास सर्वच तंत्रज्ञ कधीतरी पंढरीदादांच्या ‘हाताखालून’ गेलेले आहेत. मेकअपचे तंत्र जेव्हा पुरेसे विकसितही झाले नव्हते तेव्हापासून दादांचा परिसस्पर्श हजारो चेहऱ्यांना झालेला आहे. चित्रपटसृष्टी ‘कृष्णधवल’कडून रंगांच्या युगात आली तेव्हा छायाचित्रण, वेशभूषा, रंगभूषा या सर्वच गोष्टींकडे नव्या दृष्टीने पाहण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे ‘कृष्णधवल’च्या युगात ज्यांची चलती होती, असे अनेकजण ‘रंगांशी’ जुळवून घेण्यात अपयशी ठरले किंवा कमीतरी पडले. पंढरीदादा जूकर यांनी मात्र हे आव्हान सहजगत्या स्वीकारले .‘मधुबाला’पासून ‘मीनाकुमारी’पर्यंत आणि तेथून माधुरी दीक्षित, जुही चावलापर्यंतचा एक मोठा टप्पा गाठला. माधुरीचं नाव या ठिकाणी प्रामुख्यानं घ्यावं लागलं कारण पंढरीदादांच्या मते माधुरी दीक्षितचा चेहरा हा हिंदी चित्रपटसृष्टीतील अलीकडल्या काळातला सर्वाधिक वेधक चेहरा होता. माधुरीनंतर त्यांना थोडेफार आकर्षक, आव्हानात्मक वाटले ते मनिषा कोइराला आणि सुश्मिता सेन हे दोनच चेहरे. आजही प्रत्येक मोठी नायिका आणि हिंदी-मराठी मालिकांमधील छोटय़ा-मोठय़ा अभिनेत्रीही आपल्या चेहऱ्याला पंढरीदादांच्या मेकअपचा स्पर्श व्हावा म्हणून उत्सुक असतात. कारण त्या त्या चेहऱ्याची सौंदर्यस्थळे काय आहेत, पडद्यावर चेहर दिसतो तेव्हा नेमका तो कोणत्या बाजूने अधिक आकर्षक दिसतो याबाबतचे नेमके मार्गदर्शन पंढरीदादा करतात. १९६१ साली सुरू झालेला त्यांचा चित्रपटसृष्टीतला प्रवास, मीनाकुमारी, माला सिन्हा, मधुबाला, वहिदा रेहमान, हेमामालिनी, श्रीदेवी, स्मिता पाटील असा आजच्या काळापर्यंत येऊन ठेपला आहे. त्या काळात मेकअपसाठी केवळ ‘व्हाइट जेली’ उपलब्ध असे, भूवया कोरण्यासाठी काजळाचा वापर होत असे आणि व्यक्तिरेखा ‘म्हातारी’ करताना केस पांढरे करण्यासाठी अंडय़ाचा बलक हा एकमेव पर्याय असे. एवढय़ा मर्यादित साधनांचा वापर करूनही नायिकांचे सौंदर्य पडद्यावर उठून दिसत असे कारण दादांच्या मते त्या चेहऱ्यांमध्येच नैसर्गिक गोडवा होता. पंढरीदादा जर ‘मेकअप’साठी उपलब्ध नसतील तर मीनाकुमारी चित्रिकरणासाठी येतच नसे. ‘त्यांच्या चेहऱ्यांवर फार कमी मेहनत घ्यावी लागत असे,’ असे दादा आवर्जुन सांगतात; परंतु सुंदर चेहरेही अधिक सुंदर करण्यात दादांचा हात कोणी धरू शकत नाही. ‘चांदणी’ किंवा ‘लम्हे’मधली श्रीदेवी आणि ‘हम आपके है कौन’मधील माधुरी नेहमीपेक्षा वेगळी भासते कारण पंढरीदादांनी त्यांना ‘मेकअप’मधून काही वेगळी वैशिष्टय़े बहाल केली होती. ‘डर’च्या वेळी जुही चावला आणि पंढरीदादांची प्रथमच गाठ पडली. हा चित्रपट पाहून जुही चावला म्हणाली ‘मी यापूर्वी कधीही एवढी सुंदर दिसले नव्हते.’ गेली पााच दशके ‘ग्लॅमर’ला ग्लॅमरस करण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या पंढरीदादा जूकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कर देण्यात येत आहे. चित्रपटसृष्टीतील अभिनय, दिग्दर्शनाव्यतिरिक्त इतर अंगांना क्वचितच असे पुरस्कार दिले जातात. पंढरीदादांच्या निमित्ताने पुरस्कार देणाऱ्यांचे लक्ष अशा उपेक्षित विभागांकडे गेले तर खुद्द पंढरीदादांनाही त्याचा अधिक आनंद होईल. आज आथुनिक साधने हाताशी असताना अनेक गोष्टी सहजसाध्य झालेल्या आहेत, परंतु हे सर्व नसतानाही आजच्यापेक्षा अधिक उत्तम परिणाम साधला जात होता याचे रहस्य आहे कलांच्या जाणिवांमध्ये आणि निष्ठेमध्ये!

      August 5, 2017


  • रोहिणी भाटे

    रोहिणी भाटे यांचा शिष्यपरिवार जगभर विखुरला आहे. १९४७ मध्ये त्यांनी नृत्यभारती कथक नृत्य अकादमी स्थान केली. तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांच्या अनेक शिष्यांना गुरु रोहिणीताईंच्या अखंड मार्गदर्शनाचा प्रत्यक्ष लाभ मिळाला.

      August 2, 2022


  • पुरुषोत्तम गजानन बेर्डे

    पुरुषोत्तम बेर्डे ह्यांनी १९७५ साली सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टमधून डी.जी. आर्ट हि पदविका घेतली. मग पुढे ८ वर्षं ते जाहिरात क्षेत्रात काम करत होते. १९७८ साली “या मंडळी सादर करु या” या नाट्य संस्थेतर्फे “अलवार डाकू” नाटकाचे लेखन, दिग्दर्शन व संगीत केले.

      May 23, 2014


  • चिंतामण विनायक वैद्य

    चिंतामण विनायक वैद्य हे संस्कृत भाषेतील विद्वान होत.

      December 15, 2010


  • डॉ. श्यामला वनारसे

    श्यामला वनारसे मूळ पेशाने मानसशास्त्रज्ञ. मानव संसाधन विषयातल्या तज्ज्ञ. अनेक कंपन्या व संस्थांमधून प्रशिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक. शाळा, महाविद्यालये, कंपन्या, सामाजिक संस्था, चळवळी, महिला संघटना, अशा सर्वत्र त्यांनी चित्रपट या माध्यमाचा कल्पक वापर करून त्या त्या विषयांची मांडणी केली. मुले आणि महिला हे त्यांचे विशेष आस्थेचे समूह. तिथेही त्यांनी आवर्जून चित्रपट या माध्यमाचा शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संदर्भात वापर केला. इतर कलामाध्यमाविषयीही त्यांना आस्था आहे. संगीताचे मानसशास्त्र, घाशीराम कोतवाल- एक अभ्यास ही त्यांची पुस्तके याची साक्ष आहेत. सत्यजित राय आणि भारतीय मन्वंतर या पुस्तकातून त्यांनी सत्यजित राय यांच्या चित्रपटांतून उभ्या राहणार्‍या भारतीय समूहमनाचे विस्तृत विश्लेषण केले आहे.

    कलेचा वारसा श्यामलाताईंना बालपणापासूनच लाभला. वडील फोटोग्राफर होते. दृश्यकलांकडे पाहण्याची दृष्टी तिथून मिळाली, पण निमित्त घडले पुण्यातल्या एका चर्चासत्रातल्या व्याख्यानाचे. फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्युटचे तत्कालीन संचालक प्रा. सतीश बहादूर यांचे एक व्याख्यान श्यामलाताईंनी ऐकले आणि चित्रपटांकडे पाहण्याची त्यांची दृष्टीच बदलून गेली. चित्रपटांचा कलामाध्यम म्हणून विचार, सूक्ष्म विश्लेषण, मौलिक लेखन, भाषांतरे करून त्यांनी चित्रपट अध्यापनाची एक पद्धती विकसित केली. विविध समूह व शैक्षणिक संस्थांसाठी चित्रपटविषयक अभ्यासक्रम आखण्यात पुढाकार घेऊन विलक्षण झपाटलेपणाने त्यांनी चित्रपटसंस्कृतीचा प्रसार करण्याचे काम केले. बहादुरांचे लेखन संग्रहित करणे, प्रसिद्धीपरान्मुख असणार्‍या बहादुरांच्या लेखनाला उचित व्यासपीठ मिळवून देणे, त्यांच्या लेखनाची मराठीतून भाषांतरे करणे ही कामेही त्यांनी गुरूनिष्ठेतून केली. आज प्रा. सतीश बहादूर हयात नाहीत, परंतु बहादुरांनी घातलेला चित्रपट विश्लेषण, लेखन, अध्यापनाचा हा पाया विस्तृत करण्याचे कार्य त्या आज वयाची सत्तरी ओलांडल्यावरही करीत आहेत. चित्रपट संस्कृतीतील बहादूर स्कूलच्या त्या एकमेव प्रसारक आहेत.

    मुंबईत झालेल्या दहाव्या आशियायी चित्रपट महोत्सवात श्यामला वनारसे यांना सत्यजित राय स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपटसंस्कृतीचा व्रतस्थपणे प्रसार करणार्‍या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार आजवर प्रा. सतीश बहादूर, अरुणा वासुदेव, बासू चटर्जी, एच. एन. नरहरी राव यांना देण्यात आला आहे. डॉ. श्यामला वनारसे हेदेखील याच गौरवशाली परंपरेतले एक नाव.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


      August 9, 2017


  • नाना साहेब पेशवे

    शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला १६३६ ते १७५७ दरम्यान स्वराज्यात नव्हता. नानासाहेब पेशव्यांनी मुत्सद्दीपणाने कोणत्याही लढाई शिवाय शिवनेरी स्वराज्यात घेतला. तसेच, लष्करी कारवाई करून निजामाच्या ताब्यातील खानदेश, जुन्नर, अहमदनगर, नाशिक, सोलापूर हे जिल्हे देखील स्वराज्यात आणले.

      July 1, 2022


  • नितीन ढेपे

    नितीन ढेपे यांना ह्या संकल्पनेचे पेटंट देखील १४ जानेवारी २०१६ रोजी भारत सरकारकडून मिळाले असून ही वास्तू सर्वा्थाने लोकांच्या पसंतीस उतरली आहे. भारतीय पारंपरिक खेळ, खाद्यपदार्थ, पेहराव तसेच विविध कला आणि संस्कृती जोपासण्याचे काम करणाऱ्या ‘ढेपे वाडा’ या वास्तूला भारत सरकारकडून २०१९ मध्ये बौद्धिक स्वामीत्व हक्क मिळाले आहेत.

      July 1, 2022


  • रामचंद्र शंकर वाळिंबे

    डॉ. रामचंद्र शंकर उर्फ रा. शं. वाळिंबे हे थोर समीक्षक म्हणून ओळखले जातात. ते व्यासंगी विद्वान आणि आपल्या ओघवत्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकणारे ख्यातनाम वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते.

      August 2, 2022