१९५० साली ‘आंबटषौक’ हा त्यांचा प्रौढ वाचकांसाठी पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला, पण त्यानंतर ते प्रामुख्याने वळले बालकुमार साहित्याकडे. बालवाङ्मयाची जवळजवळ सत्तर उत्तमोत्तम पुस्तके लिहून त्यांनी बालसाहित्यकार म्हणून चांगले नाव मिळवले आणि बालसाहित्यात मोलाची भर घातली.
July 8, 2022
देशपांडे, (डॉ.) श्री. आ.
विद्वानाने विद्येचा वापर व आदर कसा करावा, याचा वस्तुपाठ ठरणारे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्री. आ. देशपांडे आता आपल्यात नाहीत. विदर्भासह महाराष्ट्राच्या प्रादेशिक असमतोलाची सातत्याने अभ्यासपूर्ण मांडणी करणाऱ्या डॉ. देशपांडे यांनी नागपूरच्या मॉरिस कॉलेजातून पदव्युत्तर शिक्षण (एम.ए.) पूर्ण केल्यावर १९५२ पासून प्रथम धनवटे मग बिंझाणी महाविद्यालयांत प्राध्यापकी केली. अर्थशास्त्र हा त्यांचा आवडता विषय होता.
सुमारे ३५ वर्षे अध्यापन करून ३१ ऑक्टोबर १९८४ ला नागपूर विद्यापीठातून अर्थशास्त्र विभागप्रमुख म्हणून ते सेवानिवृत्त झाले. फेब्रुवारी १९७६ ते ऑक्टोबर १९७८ पर्यंत ते समाजविज्ञान शाखेचे अधिष्ठाता होते. औरंगाबादेत ऑक्टोबर १९७९ मध्ये झालेल्या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या तिसऱ्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. भारतीय समाजविज्ञान संशोधन मंडळाच्या पश्चिम विभागाच्या सल्लागार मंडळावर सुमारे नऊ वर्षे त्यांनी काम केले. संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी), विभागीय असमतोलविषयक दांडेकर समिती, जलसिंचन आयोग, तसेच राज्यपालांनी नेमलेल्या विदर्भ वैधानिक विकास मंडळाचेही ते सदस्य होते. १९९५मध्ये अनुशेष निर्देशांक समितीतही ते होते. विदर्भ वैधानिक विकास मंडळावर सदस्य म्हणून काम करताना त्यांनी विदर्भाच्या अनुशेषासंदर्भात अनेक निर्णय घेतले. विदर्भ विकास मंडळ स्थापन व्हावे, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले, मात्र त्या वेळी विरोध झाल्यावरही यासाठी सरकारकडे त्यांनी भिन्नमत पत्रिका (नोट ऑफ डिसेंट) सादर केली. १९९६ मध्ये बॅकलॉग अॅण्ड इंडिकेटर समितीचेही ते सदस्य होते. सुबोध अर्थशास्त्र, अधिकोष आणि नाणे बाजार, भारताचे आर्थिक प्रश्न, मुद्रासिद्धान्त आणि मौद्रिक व्यवहार, अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक, समग्र अर्थशास्त्र, भारतीय अर्थव्यवस्था संक्रमण आणि विकास इत्यादी पुस्तके त्यांच्या नावावर असली तरी मुद्रासिद्धान्त आणि धोरण, भारतीय नियोजन आणि आर्थिक विकास, मुद्रासिद्धान्त आणि राजस्व नीती, ही पुस्तके विशेष लोकमान्य झाली. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या मातीचा गाढा अभ्यासक हरपला आहे.
August 5, 2017
श्री. उमेश इनामदार यांचा जन्म १९६० साली मुंबई येथे झाला. शालेय शिक्षण मुंबई येथील पोद्दार हायस्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील बृहन् महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये पूर्ण केले.
December 7, 2011
December 15, 2010
दिग्दर्शक मंगेश कदम यांचे नाटक ‘अधांतर’. जयंत पवार यांचे ‘माझं घर’, प्रशांत दळवी यांचं ‘सेलिब्रेशन’ हे नाटक ‘लग्नाची बेडी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘ढोलताशे’ अशी अनेक नाटके त्यांनी केली आहेत. अभिनय व नेपथ्य या बरोबरच सध्या अखिल भारतीय नाट्य परिषदेचे काम राजन भिसे बघत आहेत.
July 25, 2022
सुरेश काशिनाथ टावरे हे भिवंडी नगरीचे प्रथम महापौर व याच लोकसभा मतदारसंघामधून २००९ मध्ये खासदार म्हणुन निवडून आले होते. सामान्य जनतेपासून ते उच्चभ्रू लोकवस्तीमध्ये राहणार्या मतदारांना भेडसावणार्या समस्या मुळापासून सोडवणे हा त्यांच्या व्यक्तित्वामधील असाधारण असा गुण आहे. २०१० ते २०११ या आर्थिक वर्षामध्ये आपल्या स्थानिक विकास निधीतून सुचविलेल्या ३२ विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली असून सुमारे १ कोटी ९९ लाख रूपये खर्चाची कामे मतदारसंघात पूर्ण केली आहेत. यामध्ये शाळांचे वर्ग बांधणे, स्मशान भूमी रोड विंधन विहीर व गटारे बांधणी, पाऊल वाट, रस्ते दुरूस्ती, आणि काँक्रिटीकरण चा समावेश आहे. आपल्या मतदारसंघातील नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य चिकीत्सा शिबीर मोठ्या प्रमाणावर आयोजित केले होते. यामध्ये काही रूग्णांना मोफत औषधे व काही रूग्णांना चष्मे वाटण्यात आले होते.
त्यांच्या मतदारसंघातील ज्या ज्या गरीब लोकांना मोठया व महागडया आजारांनी ग्रासले होते, त्यांना या शिबीरानंतर निराश न होण्याचा संदेश दिला गेला, इतकेच नाही तर त्यांच्या उपचारांसाठी पंतप्रधान सहायता निधीमधून ४४ रूपयांना ३२ लाख रूपयांचे अर्थसाहाय्य त्यांनी मिळवून दिले. त्याचप्रमाणे ग्रामीण पाणी टंचाई दूर करण्यासाठी बोअरवेल अधिक खोल करण्याचे अनोखे अभियान त्यांनी सुरू केले ज्यासाठी लागणारा संपुर्ण खर्च हा शेतकर्यांच्या खिशातून एक पायलीही न काढता, खासदार निधीमधून भागवण्यात आला.
भारत निर्माण अभियानाअंतर्गत शासनांच्या विविध योजनांची माहिती तमाम शेतकरी वर्गापर्यंत पोहोचविण्याचे त्यांनी केलेले प्रयत्न व त्यांना आलेले यश आजही वाखाणले जाते.
January 12, 2015
वसंत तांबे हे रा.स्व. संघाचे सक्रिय कार्यकर्ते आणि अर्थात जुनेजाणते आधारस्तंभ. १९८७ ते १९९७ अशी १० वर्षे त्यांनी सांभाळलेली मुंबई महानगर कार्यवाहपदाची जबाबदारी, कोकण प्रांताचे प्रचार विभागप्रमुख म्हणून केलेले काम, विश्व संवाद केंद्र, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीसारख्या संस्थांच्या उभारणीतला सहभाग अशा कामांतून संघाला त्यांनी दिलेले योगदान मोलाचे होते.
तांबे यांचे लहानपण पुण्यात गेले. तेव्हापासून ते संघाचे सक्रिय कार्यकर्ते बनले. व्यवसायाने सिव्हिल इंजिनीअर असलेल्या तांबे यांनी मुंबईत आल्यानंतरही आपले कार्य सुरूच ठेवले. नायगाव नगराचे संघचालक म्हणून, मुंबई महानगर कार्यवाह म्हणून त्यांनी इथे कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली. सगळ्यांचे ऐकून घेऊन, सगळ्यांना एकत्र घेऊन संघटना उभी करण्याचे कसब, उत्तम वक्ता आणि संवादक असलेल्या तांबे यांच्या ठायी होते.
वनवासी कल्याण आश्रमाच्या कामाला आकार देण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्या काळात मुंबईच्या नायगावातील त्यांचे घर कार्यकर्त्यांसाठी केंद्रच बनले होते. आदिवासी मुलांना मुंबईत आणणे, त्यांना शिकवणे, मुंबई फिरवणे वगैरे कामे ते करत. महाराष्ट्रभरातील कार्यकर्त्यांना त्यांचा मोठा आधार होता. १९९५च्या सुमारास उभ्या राहिलेल्या विश्व संवाद केंद्राच्या कामात, तसेच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या उभारणीतही त्यांनी आपल्या विचारांचे योगदान दिले होते.
महिलांच्या राजकीय कामांमध्ये सहभागी करून घेण्याबाबतच्या त्यांच्या सकारात्मक विचारांची दखल संघाकडून अखिल भारतीय स्तरावरही घेतली गेली. १९९३ साली किल्लारीच्या भूकंपामधील नुकसान त्यांनी आपल्या परीने भरून काढण्याचा प्रयत्न केला. जनकल्याण समितीच्या वतीने तेथील भूकंपग्रस्तांसाठी बांधलेल्या घरांची डिझाइन्स त्यांनी तयार केली. त्यांचे अलीकडचे महत्त्वाचे काम म्हणजे, त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली 'फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी' ही संस्था. तिचे काम आज राष्ट्रीय स्तरावर सुरू असून अनेक निवृत्त लष्करी अधिकारी त्यात कार्यरत आहेत.
वसंतरावांचे वैयक्तिक आयुष्य साहित्य, संगीत यांनी समृद्ध होते. ते उत्तम तबलावादक होते. शास्त्रीय संगीताचे दर्दी होते. 'विचार करण्यासारखे काही', 'ज्येष्ठपर्व', 'प्रश्न प्रश्न प्रश्न', 'दक्षिण दिग्दर्शन' ही पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांचे लेखनकार्यही अखेरपर्यंत सुरू होते.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
August 9, 2017
भारतीय शास्त्रीय संगीतातील एक विख्यात गायक.
September 28, 2010
November 14, 2011
चित्रपटनिर्मती, लेखन, दिग्दर्शनात तिचा हातखंडा आहे. चित्रपट आणि संस्कृती हा तिचा अभ्यासाचा विषय आणि त्यासाठीच इराणच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ती विशेष निमंत्रित होती. ती एका राष्ट्रीय चॅनेलच्या उपाध्यक्षपदापर्यंतही पोहोचली आहे. इंग्रजी विषयात जेएनयू मधून एमए केलेली मानसी सप्रे हिने हैदराबादच्या रामोजी राव समुहात मराठी विभागाचे प्रमुखपदही भूषविले आहे. अशा अष्टावधानी चित्रकर्मीच्या कामाची ओळख...
अष्टावधानी चित्रकर्मी
July 14, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti