शिवपुत्र संभाजी या ग्रंथाच्या कर्त्या . सत्यकथा मासिकातून पुस्तक परीक्षणे, कथा, व्यक्तिचित्रे तसेच तात्कालिक वाङमयीन घडामोडींवर त्यांनी लेखन केले.
August 22, 2017
नितीन गडकरी हे उद्योजक, राजकीय नेते आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
April 21, 2011
सुभाष देशमुख हे सोलापूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेत निवडून आलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. सध्या ते महाराष्ट्राचे सहकारमंत्री आहेत.
ते १४ व्या लोकसभेचे सदस्यही होते.
लोकमंगल समुहाचे ते संस्थापक व अध्यक्ष आहेत.
## Subhash Deshmukh
April 16, 2010
श्री शैलेश पालकर हे पत्रकार असून रायगड आणि सिंधूदुर्ग या जिल्ह्यांमधील विविध विषयांवर लिखाण करत असतात.
September 13, 2011
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात त्यांनी लिहिलेला ‘संयुक्त महाराष्ट्र — महागुजरात’ हा ग्रंथ त्या दोन राज्यांच्या जडण-घडणीचा अद्ययावत ज्ञानकोश समजावयास हरकत नाही. ‘अहल्या आणि इतर कथा’ हा त्यांचा लघुकथा संग्रह आहे.
August 2, 2017
आपल्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार्या शास्त्रीय गायकांमध्ये किशोरी अमोणकरांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं….
January 15, 2013
१९१५ साली त्यांनी काढलेल्या “संदेश” ने मराठी वृत्तपत्रांना आधुनिक रुप दिले. चरित्रपर नाटके (स्वामी विवेकानंद, ताई तेलीण, मस्तानी, चांदबीबी) हा नवा प्रकार त्यांनी हाताळला.
August 23, 2017
June 20, 2014
सुधीर फडके हे ख्यातनाम गायक व संगीतकार होते. चित्रपटसंगीत, भावगीते, अभंग यासाठी ते खास प्रसिद्ध आहेत. बाबूजी या टोपणनावाने ते परिचित होते. त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. महाकवी गदिमांच्या गीतरामायण या महाकाव्याचे संगीत आणि सादरीकरण अजूनही मराठी संगीतरसिकांच्या मनात घर करुन आहे.
April 20, 2011
पेठे, अतुल
नाटक ही केवळ करमणूक आणि मनोरंजन करणारी कला नसून ती प्रत्येकाला आत्मभान देणारी, विचारप्रवृत्त करणारी एक गंभीर कला आहे, हे लक्षात येत असतानाच अतुल पेठे रंगभूमीवर अवतीर्ण झाले आणि त्यांनी आपले सारे आयुष्य याच कलेसाठी वेचायचे ठरवले. कोलकात्याच्या ‘ब्रात्तोजान’ नाटय़संस्थेचा ‘विष्णु बासू स्मृती पुरस्कार’ अतुल पेठे यांना मिळणे, म्हणजे त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीवर कौतुकाची मोहोरच. वेगळ्या वाटेने जाणारी नाटके सादर करणे, हे पेठे यांचे वैशिष्टय़. महाविद्यालयीन जीवनात पुण्यातील पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत यशाचा पहिला जरीपटका मिळवल्यानंतर पेठे यांनी विविध प्रकारच्या अनुभवांना सामोरे जाण्याचे ठरवले.
‘शीतयुद्ध सदानंद’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’, ‘गोळायुग’, ‘दलपतसिंग येती गावा’ यांसारख्या नाटकांनंतर त्यांनी नुकतेच सादर केलेले ‘सत्यशोधक’ हे गो. पु. देशपांडे यांचे महात्मा फुले यांच्यावरील नाटक रंगमचीय क्षेत्रात चर्चेत राहिले आहे. ते अभिनय करतात, तरी दिग्दर्शन हे त्यांचे खरे क्षेत्र. नव्या पिढीशी सतत संपर्कात राहून त्यांच्यात रंगभूमीची जाण निर्माण करण्यासाठी पेठे राज्यभर नाटय़कार्यशाळा घेत असतात. वैचारिक रंगभूमीवर सतत काही घडत राहिले पाहिजे, या जाणिवेतून त्यांनी अशा उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिले. एकांकिका लेखन हा त्यांचा जसा प्रांत आहे, तसेच नाटय़रूपांतराच्या मार्गानेही त्यांनी नाटय़लेखनात रस घेतला आहे. विजय तेंडुलकर यांच्यावर त्यांनी तयार केलेला ‘तेंडुलकर आणि हिंसा - काल आणि आज’ हा माहितीपट विशेष गाजला. ‘नाटककार सतीश आळेकर’, ‘बहिणाई’, ‘अशोक केळकर’ यांसारख्या माहितीपटांमध्ये त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. मात्र ‘कचरा कोंडी’ या कचऱ्याच्या समस्येवर आणि त्यामध्ये काम करणाऱ्यांच्या जगण्याबद्दल समाजाचे डोळे उघडणाऱ्या माहितीपटाने पेठे यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले. आकाशवाणीवर ‘कोसला’ कादंबरीचे वाचन असो, की अरुण कोलटकरांच्या कवितांचे वाचन; पेठे ‘तयार’ असतात. महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार आणि विविध नाटकांसाठी अनेक पुरस्कार मिळालेल्या पेठे यांना प्रयोगशील रंगभूमीवरील कामाबद्दल कोलकात्यात मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या कलाजीवनातील एक महत्त्वाचा पुरस्कार म्हटला पाहिजे.
ब्रजेश मिश्रा यांच्याविषयीच्या ‘’मध्ये (१ ऑक्टो.) पोखरण-२ अणुचाचणी १९९९ मध्ये झाल्याचा चुकीचा उल्लेख आहे. तो १९९८ असा हवा होता.
August 5, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti