बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात, त्या तरुतळी विसरले गीत, सखी शेजारिणी.. अशी एकाहून एक सर्वांच्या ओठी असलेली गाणी लिहिणारे ’वा. रा.’ कांत तथा वामन रामराव कांत.
वामन रामराव कांत यांचा जन्म नांदेड येथे ६ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. वा.रा. कांत हे या नावाने लेखन करत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेड येथे झाले. इंटरपर्यंतचे शिक्षण १९३१ साली हैदराबाद येथे झाले. त्यानंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांचा विवाह सौ. लक्ष्मीबाई - पूर्वाश्रमीच्या गंगूबाई कुर्डूकर यांच्याशी १९३० मध्ये झाला.
'विहंगमाला' या नियतकालिकाचे संपादक (१९२८) तसेच विहंग प्रेसचे व्यवस्थापन.
निजाम सरकारच्या शेतकी खात्यात लिपिक म्हणून नोकरी (१९३३-१९४५)
निजाम सरकारच्याच आकाशवाणी हैदराबाद व औरंगाबाद केंद्रांत मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले (१९४५- १९६०)
भारतीय आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले (१९६०-१९७०)
आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सेवानिवृत्त (१९७०)
त्यांनी एकूण १० काव्यसंग्रह लिहिले.
'दोनुली'
’पहाटतारा’
’बगळ्यांची माळ’
'मरणगंध' (नाट्यकाव्य)'
मावळते शब्द'
'रुद्रवीणा'
'वाजली विजेची टाळी'
'वेलांटी'’शततारका’ (१९५०)
’सहज लिहिता लिहिता’
वा.रा. कांत यांचे एक छोटेखानी चरित्र - कविवर्य वा.रा.कांत - हे श्री कृ.मु. उजळंबकर यांनी लिहिले असून कालिंदी प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे.
वा रा कांत यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान...
१९६२-६३ वेलांटी या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
१९७७-७८ मरणगंध या नाट्यकाव्यास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
१९७९-८० दोनुली या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा 'केशवसुत ' पुरस्कार
१९८९-९० मावळते शब्द या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा 'केशवसुत' पुरस्कार
१९८८ महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान
१९८९ महाराष्ट्र साहित्य परिषद, हैदराबाद यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान
१९८९ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रदीर्घ वाङ्मयसेवेसाठी गौरववृत्ती देऊन सन्मान
या व्यक्तिचित्राच्या निमित्ताने इंटरनेटवर वा रा कांत यांचे छायाचित्र शोधण्याचा प्रयत्न केला. केवळ एकच छायाचित्र मिळाले..
`वा रा कांत' यांच्या गाण्यांनी अनेकांना पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली असेल.. पण हा कवी महाराष्ट्राच्या साहित्यपटावर प्रसिद्धीपरांगमुखच राहिला.
# Kant, Waman Ramrao
# कांत, वामन रामराव
# Kavivarya Va Ra Kant
September 9, 2016
वनस्पतींवर अपार प्रेम करणारा बंडखोर वैज्ञानिक हे वाक्य आले तर पुढील नाव हे आघारकरांचे आले पाहिजे इतकी या जंगलवेड्या निसर्गमित्राला, आजुबाजूच्या झाडा झुडूपांची, पाना फुलांची, पाखरा प्राण्यांची व वनस्पती वेलींची विलक्षण आवड होती.
July 29, 2011
दशरथ पुजारी यांनी आपल्या संगीतिक कारकीर्दीत मंगेश पाडगावकर, रमेश आणावकर, शांताराम नांदगावकर, कवि सुधांशु, योगेश्वर अभ्यंकर, मधुकर जोशी अश्या नामवंत गीतकारांच्या गाण्यांना चाली बांधल्या. यापैकी काही लोकप्रिय ठरलेली गाणी म्हणजे ‘झिमझिम झरती श्रावणधारा’,’अशीच अमुची आई असती’,’देव माझा विठू सावळा’,’केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा’,’नकळत सारे घडले’,’मुरलीधर घनश्याम’,’मृदुल करांनी छेडित तारा’,’सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले’.
May 15, 2014
नाट्यनिर्माता संघाचा अध्यक्ष, नाटकांच्या तारखा आणि तिकीविक्री या विषयावर स्वतःची मते ठामपणे मांडणारा निर्माता म्हणून सुधीर भट यांची विशेष ओळख होती व राहील. त्यांनी गोपाळ अलगेरी यांच्या साथीने सुयोग या नाट्यसंस्थेची १ जानेवारी १९८५ मध्ये स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत ८० पेक्षा जास्त नाटके, १६ हजाराहून अधिक प्रयोग आणि एकहजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणार्या आठ नाटकांची निर्मिती त्यांनी केली.
March 14, 2014
नवनाथ काशिनाथ वहाळ हे शिक्षक, समाजसेवक, विचारवंत व महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले गाढे अभ्यासक अशा विविध भुमिकांमध्ये सारख्याच तन्मयतेने व तज्ञपणे वावरणारे, एक चार चौघांपेक्षा वेगळे वाटणारे व्यक्तिमत्व आहे. इतिहास हा अगदी लहानपणापासुन त्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय होता व या इतिहासाला गौरवशाली पराक्रमांची व अंगावर रोमांच उभे करणार्या लढायांची झालर प्राप्त करून देणार्या सुभेदार मल्हारराव, अहिल्याबाई व वीरभैरवी होळकर आदी सेनानिंशी त्यांच्या मनाच्या तारा केव्हाच जोडल्या गेल्या होत्या.
August 29, 2011
पं.तुळशीदास बोरकर उर्फ बोरकर गुरुजी संवादिनी (हार्मोनियम) वादन क्षेत्रातील ऋषितुल्य नाव. आज घडीला संवादिनी अर्थात पेटीवर प्रभुत्व असणारी जी काही मान्यवर मंडळी आहेत त्यातील हे अग्रगण्य नाव होते.
November 27, 2021
मुंबई शहराच्या विकासाचा पाया रचणार्या त्याचबरोबर मुंबई शहराच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय व्यवस्थापनाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणार्या जगन्नाथ नाना शंकरशेठ यांना आधुनिक मुंबईचा शिल्पकार मानण्यात आले आहे.
May 15, 2014
ठाणे शहरात फार थोडी अशी व्यक्तिमत्व आहेत जी अष्टपैलू म्हणून गणली जातात. त्यापैकीच एक म्हणजे सुभाष परशुराम रासम हे होय! बी.ए. पदवीधर, इंटिरीयर डिझायनर, वास्तुशास्त्र पदविका, ज्योतिशास्त्र विशारद अशा विविध क्षेत्रांतील पदव्या आणि पदविका रासम यांनी प्राप्त केल्या आहेत आणि या सर्वच क्षेत्रात ते कार्यरतही आहेत.
May 23, 2014
विख्यात नट, वृत्तपत्रलेखक, आत्मचरित्रलेखक आणि म्हणून प्रसिद्ध असलेले मागील पिढीतले एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व चितामणराव कोल्हटकर. यांचे मूळ घराणे नेवरे या रत्नागिरी जिल्ह्यातील गावचे. १२ मार्च १८९१ रोजी त्यांचा जन्म झाला.
February 4, 2010
ज्योतिर्गणितज्ज्ञ गोविंद सदाशिव आपटे यांचा जन्म २६ जुलै १८७० रोजी झाला.
त्यांच्या “पंचांग-चिंतामणी” या सूक्ष्म-सारणी ग्रंथामुळे पुढील अनेक वर्षांचे पंचांग तयार करता येते. “सर्वानंद लाघव” हाही त्यांचाच गणित-ग्रंथ.
Govind Sadashiv Apte
November 7, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti