(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नम्रता शशांक पुणेकर

    त्वचारोगतज्ज्ञ असतानाही वेगळे काही करण्याची जिद्द बाळगून नम्रता शशांक पुणेकर यांनी अलंकारविक्री क्षेत्रात प्रवेश केला. पहिल्या सरकारी परवानाधारक महिला सुवर्णपारखी म्हणून लौकिक मिळविलेल्या नम्रता आता आयटी कंपनीच्या मालक आहेत. जळगावकन्येचा औरंगाबादेत आल्यानंतरचा हा प्रवास थक्क करणारा आहे.

    नम्रता शशांक पुणेकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला सुवर्णपारखी हा लेख पुढील पानावर वाचा.

    नम्रता शशांक पुणेकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला सुवर्णपारखी हा लेख वाचा.

    punekar-namrata-shashank-modified

      July 24, 2015


  • शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश)

    बाल-गीत, कांचनगंगा, फलभार, चंद्रलेखा, सोनेरी चांदणे हे काव्यसंग्रह, चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या इनॉक आर्डेनचा ‘अनिकेत’ हा काव्यानुवाद ही त्यांची काव्यसंपदा. स्वप्नभूमी हे माधव जूलियनांचे चरित्र त्यांनी लिहिले.

      November 8, 2017


  • जनार्दन वासुदेव आगासकर

    जनार्दन वासुदेव आगासकर हे कायद्यांचे भाषांतरकार आणि मुंबई हायकोर्टाचे पहिले नेटिव्ह न्यायाधीश होते.

    “दर्पण या वृत्तपत्रात ते काही काळ होते.

    १८ जुलै १८९४ रोजी त्यांचे निधन झाले.

    Janardan Vasudeo Agaskar

      November 7, 2017


  • (डॉ.) अनला पंडित

    पंडित, (डॉ.) अनला

    कोणत्याही खासगी अथवा सार्वजनिक कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या यंत्रणेने आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माहिती साठय़ाचा योग्य उपयोग करून घेतल्यास त्याचा कंपनीच्या विकासासाठी मोठा फायदा होऊ शकतो; पण त्यासाठी कंपनी कर्मचाऱ्यांना आपल्याच कंपनीमध्ये उपलब्ध असलेल्या या माहितीचा कसा शोध घ्यायचा याचे प्रशिक्षण दिले जाणे आवश्यक असते. किंबहुना ही माहिती कशी जमा करावी, त्याचा उपयोग कसा करावा याबाबतचा खास अभ्यासक्रम असेल तर त्याचा मोठाच फायदा होऊ शकतो.

    ‘वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिटय़ूट’च्या (व्हीजेटीआय) सहाय्यक प्राध्यापिका अनला पंडित यांनी ‘आयबीएम’ या जगविख्यात संगणक कंपनीला अशा माहितीचा उपयोग करून घेणारा ‘कॉम्पिटिटिव्ह इंटलिजन्स यूजिंग बिझनेस अ‍ॅनॅलिसिस’ हा प्रोजेक्ट सादर केला. पंडित यांचा हाच प्रोजेक्ट ‘आयबीएम’च्या दहा हजार डॉलर्सच्या (सुमारे साडेचार लाख रुपये) ‘सर्जनशील शिक्षक पुरस्काराचा’ मानकरी ठरला आहे. जगभरातून २०४ तर भारतातून अवघ्या सहा जणांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती, त्यात पंडित एक होत्या. ‘आयबीएम’ने दिलेल्या या रकमेतून आता पंडित ‘व्हीजेटीआय’मध्ये हा प्रोजेक्ट प्रत्यक्ष राबविणार आहेत. कोणत्याही प्रोजेक्टसाठी, संशोधन कार्यासाठी एखाद्या कंपनीकडून अशा प्रकारचा पुरस्कार मिळणे ही त्या शिक्षकासाठी व संबंधित महाविद्यालयासाठी अभिमानास्पद बाब असते. सायन येथील ‘एसआयईएस’ महाविद्यालयातून त्यांनी १९८१ मध्ये बीएस्सी तर १९८३ साली मुंबई विद्यापीठातून एमएस्सी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी अमेरिकेत ‘युनिव्हर्सिटी ऑफ लुईविल’मध्ये दोन वर्षांचा एमएस इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग हा (एमटेक समकक्ष) अभ्यासक्रम पूर्ण केला. पंडित यांच्या आई शिक्षिका तर वडील महापालिकेमध्ये नोकरी करणारे. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे उच्चशिक्षण शक्य झाले. ८५ साली शिक्षण पूर्ण करून त्या मुंबईस परतल्या आणि वाटुमल अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्यात्या म्हणून रुजू झाल्या. विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरचे शिक्षण द्यायचे, त्यांना संशोधनासाठी प्रवृत्त करायचे, पुस्तकी शिक्षणाबरोबरच समाजासोबत जोडून घ्यायला प्रवृत्त करायचे या हेतूने त्यांनी विविध उपक्रम महाविद्यालयात सुरू केले. पती अनिरूद्ध हे ‘आयसीटी’मध्ये (यूआयसीटी) प्राध्यापक, तर सासरे भालचंद्र पंडित हेसुद्धा शिक्षकच. त्या दोघांचे अनेक बाबतींत मार्गदर्शन आणि सहकार्य त्यांना लाभले. सुमारे साडेतीन वर्षांच्या सेवेनंतर काही कारणास्तव त्यांनी वाटूमल महाविद्यालयातील नोकरीचा राजीनामा दिला आणि क्रॉम्प्टन या खासगी कंपनीत त्या ‘कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह’ पदावर रूजू झाल्या. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन वरिष्ठांनी प्रोबेशन काळातच त्यांना बढती दिली. मात्र तीन-चार वर्षे हे काम केल्यानंतर पुन्हा शिक्षकी पेशात यायचा निर्णय त्यांनी घेतला. १९९४ ते ९९ या काळात त्यांनी रिझवी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, व्हीजेटीआय, एमईटी या महाविद्यालयांमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम केले. २००० मध्ये त्यांना व्हीजेटीआयमध्येच पूर्णवेळ व्याख्याता होण्याची संधी मिळाली. त्यांच्या कामाचा व्याप आता रेडिफ, आयबीएम, सिटी बँक अशा विविध कंपन्याच्या कर्मचाऱ्यापर्यंत जाऊन पोचला आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या काही पुरस्कारांच्या मानकरीही त्या ठरल्या आहेत. त्यांना पीएच.डी.साठी अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ लुईविल’ येथे पाठविण्याचा निर्णय व्हीजेटीआयने घेतला आहे. ऑगस्टमध्ये त्या अमेरिकेला जाणार आहेत, त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा.

      August 5, 2017


  • नूतन पेंढारकर म्हणजेच अनंत दामले

    अनंत दामले यांनी सत्तेचे गुलाम, कृष्णार्जुन युद्ध, संगीत सौभद्र, संगीत शारदा संगीत संशयकल्लोळ संगीत पंढरपूर रीती अशी प्रीतीची, संगीत मृच्छकटिक, सुवर्णतुला, शारदा अशा अनेक नाटकात कामे केली.

      July 1, 2022


  • डॉ. अनुप देव

    डॉ. अनुप देव हे ठाणे येथील दंतचिकित्सक (Dentist) असून त्यांचा गेली तीस वर्षे कोपरी येथे दवाखाना आहे. त्यांचा आभामंडळ (Aura) या विषयावर गेली ७-८ वर्षे अभ्यास झाल्यामुळे दोन वर्षापूर्वी त्यांनी बायोपिल्ड इव्हॅल्युएशन या नावाचे सेंटर सुरु केले. या सेंटरमध्ये आतापर्यंत ५५० पेक्षा जास्त लोकांनी Aura काढून त्यांच्या शारिरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक समस्यांसाठी मार्गदर्शन घेतले आहे.

      November 26, 2015


  • आशा बगे

    आशा बगे या मराठी कादंबरीकार, लेखिका आहेत. त्यांना २००६ मध्ये भूमी या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

    त्यांचे प्रकाशित झालेलं साहित्य -

    भूमी (कादंबरी, मौज प्रकाशन गृह)
    दर्पण (कथासंग्रह, मौज प्रकाशन गृह)
    निसटलेले (कथासंग्रह, मेहता पब्लिशिंग हाऊस)
    मारवा (कथासंग्रह, मौज प्रकाशन गृह)
    त्रिदल (कादंबरी, मौज प्रकाशन गृह)
    अनंत (ललित, विजय प्रकाशन)
    चंदन (ललित, विजय प्रकाशन)
    धर्मक्षेत्रे कुरूक्षेत्रे (ललित, विजय प्रकाशन)
    श्रावणसरी (निसर्ग)

      December 15, 2010


  • ना. धों. ताम्हनकर

    आधुनिक मुलांच्या गोष्टींव्यतिरिक्त ताम्हनकरांनी अंकुश, अविक्षित, नारो महादेव, नीलांगी अशा ऐतिहासिक धाटणीच्या कथाही लिहिल्या होत्या.

      July 1, 2022


  • संजय पवार

    रासायनिक खतांच्या वापराविना म्हणजे म्हणजे सेंद्रीय शेतीमध्ये चांदवडच्या संजय पवार या तरुणाने केलेले प्रयोग म्हणजे शेतीचे विद्यापीठच ठरले आहे. आशियातून युरोपात ऑरगॅनिक द्राक्षांचा पहिला कंटेनर निर्यात करण्याचे श्रेय त्याने मिळवले. त्याचबरोबर दशपर्णांक या सेंद्रीय कीटकनाशकाचा शोधही लावला. सेंद्रीय शेती करणार्‍यांसाठी त्याने मुंबईत सुरु केलेल्या फार्मर्स मार्केटला आता बॉलिवुडची पसंती मिळाली आहे...

    सूखशेतीचा मळा ...

      July 14, 2017


  • श्रीकृष्ण केशव क्षीरसागर

    “टीकाविवेक”, “उमर खय्यामची कैफियत” आदी समीक्षापुस्तके, आधुनिक विवाहपद्धतील दोष टिपणारी राक्षस विवाह ही कादंबरी, तसेच “आधुनिक राष्ट्रवादी रवींद्रनाथ ठाकुर” सारखे चरित्रपुस्तक याचे लेखन त्यांनी केले.

      August 2, 2017