(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नीलेश चव्हाण

    नाशिकच्या राजकीय क्षितीजावर ज्या झपाट्याने नीलेश चव्हाण हे नाव उदयास आले तितक्यात वेगाने हा उमदा तरुण जीवनपटावरून अस्तंगत होईल, याची कुणी कल्पनाही केली नसावी.

      July 26, 2011


  • अभिजीत फाळके

    तुकडोजी महाराजांचा वारसा घरात असल्याने त्या संस्काराने मार्ग दाखविला आणि 'आपुलकी' चा जन्म झाला. कम्पयुटर क्षेत्रात करिअर असतानाही वर्धा जिल्ह्यातील अभिजीत फाळके यांनी शेतकर्‍यांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धार केला. केवळ आर्थिक मदत नव्हे, तर त्यांना अवजारे पुरविणारी 'अॅग्रो टुल बॅंक' सारखी कल्पना राबविली. हे काम सचिन तेंडुलकरलाही थक्क करुन गेलं...

    अभिजीत फाळके यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'आपुलकी' चे उड्डाण हा लेख पुढील पानावर वाचा.

    अभिजीत फाळके यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'आपुलकी' चे उड्डाण हा लेख वाचा.

    phalke-abhijit-modified

      September 7, 2015


  • विठ्ठल वेंकटेश कामत

    एक जाणकार लेखक, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरण तसच पक्षीविद्यातज्ज्ञ,आणि पुरातन वस्तुंचे अभ्यासक, असणारे चतुर्रस्त्र व्यक्तिमत्व म्हणजे विठ्ठल व्यंकटेश कामत.

      July 3, 2010


  • भालजी पेंढारकर

    भालचंद्र गोपाल पेंढारकर म्हणजेच भालजी पेंढारकर यांचे काही प्रमुख व उल्लेखनीय चित्रपट म्हणजे “थोरातांची कमळा”, “तांबडी माती”, “साधी माणसं”, “मराठा तितुका मेळवावा”, “छत्रपती शिवाजी’, “मोहित्यांची मंजुळा”, “घरची राणी’, “स्वराज्याचा शिलेदार”, “कांचनगंगा” ,”महाराणी येसुबाई” ,”बाल शिवाजी”, “प्रीत तुझी माझी” आणि “शिलंगणाचे सोने’

      November 25, 2013


  • सुधीर माईणकर

    माईणकर, सुधीर

    ‘तबला वादन : कला और शास्त्र’ हे हिंदी पुस्तक आज देशभरच्या हिंदुस्थानी संगीत विद्यालयांत क्रमिक पुस्तकाच्या दर्जाचे ठरले आहे. त्याचे लेखक म्हणजे पं. सुधीर माईणकर. पंच्याहत्तरीनिमित्त उद्याच्या शनिवारी त्यांचा होणारा सत्कार, हा त्यांना ‘प्रसिद्धी’ देणारा अपवादात्मकच सोहळा ठरेल. एरवी, प्रसिद्धी आणि ‘कीर्ती’ या किती निरनिराळय़ा गोष्टी आहेत, हे पाहायचे असेल तर सुधीर माईणकर यांच्या कारकीर्दीकडे पाहावे! तबलावादक म्हणून नाव कमावण्याची संधी असूनही सांगीतिक विद्वत्ता वाढवण्याची अवघड वाट माईणकर यांनी स्वीकारली.

    ‘अनेकांना ऐकता आले, त्यांनी संगीतात शोधलेली सौंदर्यस्थळे तबल्यात शोधून पाहाता आली,’ याचेच समाधान पं. माईणकर यांना अधिक आहे.. असे समाधान मिळवणारा गुरू विद्यार्थ्यांना थोडक्या काळातही किती भरभरून देऊ शकतो, याचा प्रत्यय मुंबईच्या राष्ट्रीय संगीत नाटय़ केंद्रात (एनसीपीए) माईणकर यांच्या तबला कार्यशाळांमध्ये सहभागी झालेल्या अनेक तरुण वादकांना तसेच देशभरच्या विद्यापीठांत संगीताचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या अनेकांना आला आहे. ‘तबल्याचे व्याकरण, भाषा आणि सौंदर्यशास्त्र यांचा सखोल अभ्यासक’ ही माईणकर यांची प्रसिद्धी नव्हे, तर सिद्धीतून आलेली कीर्ती आहे. ‘..कला और शास्त्र’च्या इंग्रजी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळय़ाला झाकीर हुसेन मुद्दामहून आले, ते त्यांना ही कीर्ती जवळून माहीत होती, म्हणूनच. वडील विष्णुपंत यांचा तबल्याचा नाद शालेय वयातच अंगी मुरलेल्या सुधीर यांनी बडम्े गुलाम अली, डी. व्ही. पलुस्कर, ॐकारनाथ ठाकुर, केशरबाई केरकर आणि आमीर हुसेनखाँ यांसारख्या दिग्गजांना ऐकले. तरुणपणी तबल्याची ‘गत’ हा त्यांचा खास अभ्यासविषय झाला, तो तबल्यातील दिल्ली घराण्याचे खलीफा इनाम अली खान यांची शागिर्दी केल्यानंतर. अजराडा, बनारस आदी घराण्यांचा बाजही त्यांनी अभ्यासला, पण ‘दाया’वर केवळ तर्जनी व शेजारचे बोट ठेवून तालाचे चापल्य आणि शुद्धता राखणारा दिल्ली घराण्याचा ‘चटिका बाज’ ही माईणकरांची खास शैली. गुरू म्हणून त्यांचे इनेगिने शागिद आहेत. परंतु अनेक विद्यार्थी आणि अभ्यासक यांनाही पं. माईणकर गुरुस्थानीच आहेत व राहतील.

      August 5, 2017


  • माधव गडकरी

    पत्रकार

      April 21, 2010


  • संदीप अवचट

    संदीप अवचट

    संदीप अवचट हे नामांकित व विश्वासार्ह मानले जाणारे प्रसिध्द ज्योतिषी, व प्राचीन ज्योतिर्विद्या तसेच अर्वाचीन अंकशास्त्राचे गाढे आभ्यासक व चिकीत्सक आहेत.

      August 16, 2011


  • नवनाथ काशिनाथ वहाळ

    नवनाथ काशिनाथ वहाळ हे शिक्षक, समाजसेवक, विचारवंत व महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले गाढे अभ्यासक अशा विविध भुमिकांमध्ये सारख्याच तन्मयतेने व तज्ञपणे वावरणारे, एक चार चौघांपेक्षा वेगळे वाटणारे व्यक्तिमत्व आहे. इतिहास हा अगदी लहानपणापासुन त्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय होता व या इतिहासाला गौरवशाली पराक्रमांची व अंगावर रोमांच उभे करणार्‍या लढायांची झालर प्राप्त करून देणार्‍या सुभेदार मल्हारराव, अहिल्याबाई व वीरभैरवी होळकर आदी सेनानिंशी त्यांच्या मनाच्या तारा केव्हाच जोडल्या गेल्या होत्या.

      August 29, 2011


  • प्रसाद वनारसे

    चित्रपट क्षेत्रातील ग्लॅमर सोडून सर्जशील नाट्यकलावंत घडवण्याचा वसा रंगकर्मी प्रसाद वनारसे यांनी घेतला आहे. देशविदेशातील नाट्यप्रशिक्षणांमुळे नाट्यगुरू अशी त्यांची ओळखही निर्माण झाली आहे.

    प्रसाद वनारसे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला हाडाचा नाट्यशिक्षक हा लेख पुढील पानावर वाचा.

    प्रसाद वनारसे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला हाडाचा नाट्यशिक्षक हा लेख वाचा.

    vanarase-prasad-modified

      September 7, 2015


  • मधुरा कामत

    तिच्या बोटात चित्रांची जादू आहे, समोरच्या माणसाला ती आपल्या चित्रांतून व्यक्त करते. शिवाय लहान मुलांसाठी चित्रकलेचे क्लासही चालवते. आपल्या या कलेबद्दल सांगतेय मधुरा कामत.

    मधुराच्या चित्रकलेची सुरूवात इतर मुलांप्रमाणेच घराच्या भिंतीपासून झाली. पण तिची ही गिरबिट थोडी निराळी आहे, हे तिच्या पालकांना कळत होतं. म्हणूनच त्यांनी तिला चित्रकलेच्या वर्गात घातलं. लहानपणीची ही आवड मधुरा कामतचं मोठेपणीचं तिचं पॅशन ठरलीय. ज्युनिअर कॉलेजनंतर तिने जे. जे. स्कूल ऑफ आर्ट आणि रचना संसद या दोनही विद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया दिल्या. त्यामधून तिला रचना संसदच्या अप्लाइड आर्ट अँड क्राफ्टसाठी प्रवेश मिळाला. वेगवेगळ्या असाइनमेंटसोबत तिचं पेंटींगही कायम सुरूच असतं. तिला फाइन आर्टमध्ये जास्तं रस आहे. आणि सरावाचे तिच्या पद्धतीही वेगवेगळया आहेत. कल्याणला तिचं घर आहे. कल्याण ते दादर, किंवा सीएसटी या लोकलप्रवासात ती चक्क समोरच्या सहप्रवाशांची चित्रं रेखाटते. यामुळे अभ्यासही होतो, वेग वाढतो आणि गंमतही येते हा तिचा फंडा. शिवाय आपलं चित्रं काढल्याने बायका खुश होतात ते वेगळंच. रेल्वे स्टेशन, बसस्टॉप, कॉलेज कॅम्पस असो किवा तिच्या वडिलांचे दुकान कुठेही गेली तरी मधुराची हात आणि पेन्सीलची गाठ काही सुटत नाही.

    तिचे वडील वेशभूषा पुरवण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळे या कामातही आपली कला आणि कल्पकता मधुरा वापरत असतेच. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्टं म्हणजे, तिला मिळालेलं कलाज्ञान, इतरानाही मिळावं यासाठी ती परिसरातील छोट्या मुलांसाठी चित्रकलेचा क्लासही घेते. मधुराच्या शिकवण्याच्या हातोटीमुळे तिच्या क्लासना मुलांची आणि पालकांचीही पसंती असते. भविष्यात तिला भारताबाहेर जाऊन पारंपरिक भारतीय कला प्रकार जगासमोर मांडण्याचा तिचा मानस आहे.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


      August 8, 2017