शिखरे, दामोदर नरहर - 0426
२२ नोव्हेंबर १९०३
१९०३> चरित्रकार, पत्रकार दामोदर नरहर शिखरे यांचा जन्म. गांधीवादाच्या पुरस्कारासाठी त्यांनी “अग्रणी” हे साप्ताहिक सुरु केले. गांधी जीवनकथा, गांधी-रणगीता, म. गांधी व त्यांचे सहकार्य, तसेच “मराठीचे पंचप्राण” ही - संतसाहित्यापासून १९५० पर्यंतच्या साहित्याची ओळख करुन देणारी ग्रंथमाला त्यांनी लिहिली होती.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शिखरे, दा. न. - 0470
९ सप्टेंबर १९८०
१९८०> चरित्रकार व गांधीवादविषयक पुस्तके लिहिणारे दा.न. शिखरे यांचे निधन. “मराठीचे पंचप्राण” या १९५० पर्यंतच्या साहित्याचा परिचय त्यांनी करुन दिला होता. गांधीचरित्राखेरीज आगरकर, बजाज, नेहरू यांची चरित्रपुस्तके त्यांनी लिहिली.
mss
August 2, 2017
सुरेल व अवीट गाणी देणारे रमेश अणावकर ह्यांची गाणी लताजी, आशाजी, अशा अनेक गायक, गायकानी गायली, व महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहचली.
July 20, 2022
वयाची ऐंशी गाठलेले ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि गानगुरू पंडित शरद साठे यांच्यासाठी शनिवारी, २४ रोजी मुंबईत होणारा सोहळा केवळ सहस्रचंद्रदर्शनाचा वा त्यानिमित्त होणाऱ्या सत्काराचा नाही.. त्यांच्या तीन सीडींचे प्रकाशन आणि मग सतारनवाज्म अब्दुल हलीम ज्माफर खान आणि सारंगीसम्राट रामनारायण यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार,
त्यानिमित्ताने साठे यांना गुरू मानण्याचा ‘टप्पा’ गाठलेल्या अनेक गायक-शिष्यांचीही उपस्थिती, असे हे स्वरमय वातावरण असेल. ग्लॅमरची मातबरी- ज्यापुढे आजचे अनेक गायक शरण जातात- तशी साठे यांना कधी वाटली नव्हती आणि याही सोहळय़ात, प्रसिद्धीपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची मानणाऱ्यांची मांदियाळी असेल. ही गुणवत्तेची बैठक साठेंना वयाच्या १७व्या वर्षी मिळाली, ती थेट पं. द. वि. ऊर्फ बापूराव पलुस्कारांकडून!
अगदी १९५५ पर्यंत, पलुस्करांच्या अकाली निधनापर्यंत ही तालीम सुरू होती. त्यानंतर साठे मुंबईत, बी. आर. देवधरांच्या विद्यालयात शास्त्रशुद्ध बैठक पक्की करत गेले.. पण फर्गसनमध्ये असताना ऐकलेले काही काहीशा नकलेचा दोष पत्करून गळय़ात घटवलेले फय्याजखाँ, मास्टर कृष्णराव, हिराबाई बडोदेकर अशांच्या गायकीत अंगभूत असलेले मोकळेपणही त्यांना भावत होते. त्याची स्वत:शी गाठभेट करून घेण्याचा क्षण साठेंना बहुधा, पं. शरश्चंद्र आरोलकरांच्या मठीत गवसला असावा.
ग्वाल्हेर गायकीतील ‘टप्पा’ हा गानप्रकार शिकायला आरोलकरांकडे साठे गेले आणि तिथे रमले. पुढे विद्यापीठीय स्तरावर टप्पा गायकीचे प्राध्यापक परीक्षक म्हणून काम करणारे पं. साठे यांची ‘यमनकल्याणा’सारख्या रागांवरही इतकी घरंदाज हुकमत आहे की, या गायनाचे जतन अव्वल देशी संस्थांखेरीज वॉशिंग्टन विद्यापीठानेही केले. आयटीसी- संगीत संशोधन संस्थेचा पुरस्कार (२००६), काशी संगीत समितीतर्फे ‘संगीतरत्न’ (२००७) हे सत्तरीनंतर मिळालेले सन्मान वगळता, ‘आकाशवाणीचे ए ग्रेड आर्टिस्ट’ ही साठे यांची ओळख होती, पण त्याबद्दल खंतखेद बाळगणाऱ्यांपैकी साठे नव्हेत. ‘डीव्ही पलुस्करांवरील लघुपटासाठी आवाज वापरला गेला’ या समाधानाचे मोल मात्र साठेंकडून जाणावे!
August 5, 2017
इंदुताई गुप्ते ह्या ठाणे शहर महिला मंडळाच्या सक्रीय सदस्या होत्या! या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक तसंच आर्थिक क्षेत्रांमध्ये ठाणे नगरीला प्रगतीपथावर घेवून जाणासाठी अनेक कल्याणकारी कामे केली. १९६० साली त्यांनी सिव्हील हॉस्पिटलच्या महिला डॉक्टर राजे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान केले होते. १९४९-१९५० सालापासून त्यांनी हरिजन वस्तीत जावून संक्रांतीचा हळदी कुंकू समारंभ साजरा करण्याचा, कल्पक व अभिनव प्रकल्प आखून आदिवासी महिलांच्या आयुष्यात स्वयंसिध्दतेची नवी पहाट आणण्याचा वसा त्याकाळी हाती घेतला होता.
अनेक गरजू महिलांना स्वतःच्या पायांवर उभे करण्याच्या दृष्टीने त्यांनी, त्यांच्या इतर महिला सहकार्यांसोबत इंग्रजीचे वर्ग सुरू केले. निधी गोळा करून शिवण मशिन्स विकत घेतल्या, मशिन ठेवायला जागा नसतानासुध्दा शक्य होईल तिथे मशिन ठेवून स्त्रियांना व मुलींना शिवण शिकवून शिवणाच्या परीक्षेला बसवलं, त्यामुळे अनेक महिलांना शिवणकामात पदविका प्राप्त करता आल्यामुळे व त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता आला .
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
गणितशास्त्र या विषयातील केंब्रिज विद्यापिठातील रँग्लर ही सर्वोच्च पदवी मिळवलेले कुशाग्रबुध्दीचे अभ्यासक.
March 11, 2015
मराठी नाट्यसृष्टीतील एक अत्यंत वलयांकित व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रभाकर पणशीकर. नाट्य वर्तुळात प्रभाकर पणशीकरांना “पंत या नावाने ओळखले जात असे. त्यांनी `नाट्यसंपदा’ या त्यांच्या नाट्यनिर्मितीसंस्थेच्या माध्यमातून उत्तमोत्तम नाटकांची मेजवानी मराठी रसिकांना दिली.
May 7, 2014
दोन वर्षांपूर्वी लक्ष्मीकांत देशमुख यांची कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून ज्यावेळी नेमणूक झाली, त्यावेळी जिल्ह्यातल्या
स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण कमालीचं वाढलं होतं. साहित्याची जाण असलेला, संवेदनशील प्रशासकीय अधिकारी जिल्ह्याला लाभल्याने सामाजिक विषयांमध्ये त्यांना रस असणार हे स्पष्ट होतं. कारभार हाती आल्यावर देशमुखांनी कामही जोरकसपणे सुरू केलं. त्यांनी निग्रह केला तो जिल्ह्यातली स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याचा. त्यावेळी कोल्हापूरची स्त्री-पुरुष सरासरी होती हजारांला अवघी ८३९. त्यासाठी देशमुखांनी पहिलं कॅम्पेन जाहीर केलं ते ‘सेव्ह द बेबी गर्ल’ अर्थात ‘लेक लाडकी’. त्यासाठी त्यांनी खास वेबसाइट सुरू केली. पुढच्या दीड महिन्यांत जिल्ह्यातली सर्व सोनोग्राफी सेंटर्स ऑनलाइन जोडली गेली. पहिल्यांदा अनेक डॉक्टरांनी याला विरोध केला. परंतु अनेक बैठका घेतल्यानंतर हा विरोध मावळला. सर्व सेंटर्सना त्यांनी केलेल्या सोनोग्राफींची माहिती नोंदीच्या स्वरूपात साठवण बंधनकारक करण्यात आलं. त्यामुळे सोनोग्राफीचा संपूर्ण जिल्ह्यातला दोन हजारांचा आकडा वाढून ११ हजारांवर गेला. कोणतं सेंटर सोनोग्राफी करतं, का करतं हे थेट प्रशासनाला कळू लागलं.
July 26, 2011
वसंतराव नाईक यांचा वारसा लाभलेले सुधाकरराव नाईक हे मीतभाषी पण करारी बाणा असलेले व्यक्तिमत्व. पाणलोट क्षेत्राचा विकास हे नवे सूत्र सुधाकररावांनी प्रभावीपणे वापरले.
September 3, 2010
संजय गायकवाड हे फिल्मी रिळांऐवजी देशभरातील सिनेमागृहात थेट सॅटेलाईटद्वारे प्रक्षेपण दाखविण्याच्या पद्धतीची सुरुवात करणाऱ्या यूएफओ या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत.
व्हॅल्युएबल ग्रुपच्या माद्यमातून त्यांनी ऑनलाईन शिक्षण क्षेत्रातही मोठी क्रांती घडवून आणली आहे.
## Sanjay Shankar Gaikwad
November 4, 2016
अभिनयातलं कर्तृत्व आणि सार्वजनिक जीवनातलं दातृत्व अशा दोन्ही आघाड्यांवर श्रेष्ठ ठरलेले अभिनेते म्हणजे चंद्रकांत गोखले. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२१ रोजी मिरज येथे झाला. त्यांचे बालपण मिरज इथेच गेले. अभिनयाचं बाळकडू त्यांना मिळालं ते आपली आजी दुर्गाबाई आणि आई कमलाबाई यांच्याकडून. "चित्ताकर्ष' ही त्यांची घरची नाटक मंडळी होती. वडिलांच्या अकाली निधनामुळे कमलाबाई आपल्या मुलांना बरोबर घेऊन विविध नाटक कंपन्यांमधून भूमिका साकारीत संसार चालवीत होत्या. घरची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे छोट्या चंद्रकांतला शालेय शिक्षण काही घेता आलं नाही, परंतु त्यानं त्याचा विपरीत परिणाम आपल्या जडणघडणीवर होऊ दिला नाही. कमलाबाईंनीच त्याला घरी राहूनच लिहायला-वाचायला शिकविलं. विशेष म्हणजे कधीही शाळेत न गेलेल्या चंद्रकांतनी कालांतरानं मिरजेच्या ब्राह्मणपुरीतील प्राथमिक शाळा क्रमांक एकचे मुख्याध्यापकपद भूषविलं.
वयाच्या सातव्या वर्षीपासून चंद्रकांतनी नाटकात काम करण्यास सुरवात केली.त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी ’पुन्हा हिंदू’ या नावाच्या मराठी नाटकाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ७ दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत यांनी साठाहून अधिक मराठी नाटकांतून व साठाहून अधिक मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे. चंद्रकांत यांच्या कारकिर्दीला वळण मिळण्याचा योग आला तो दीनानाथ मंगेशकर यांच्यामुळे. १९३७-३८च्या सुमारास चंद्रकांतना खुद्द दीनानाथांकडून तब्बल ७० ते ८० बंदिशी शिकण्याची संधी मिळाली. मा. दीनानाथांना गोखले पितृस्थानी मानत. या वेळी त्यांनी काही संगीत नाटकांमधूनही भूमिका केल्या. इथून पुढं त्यांनी रंगभूमी गाजवली. सुरवातीच्या काळात "बेबंदशाही' आणि "पद्मिनी' यांसारख्या नाटकांमधून स्त्री-भूमिकाही त्यांनी केल्या. "नटसम्राट', "पुण्यप्रभाव', "भावबंधन', "राजसंन्यास', "बॅरिस्टर', "पुरुष', "पर्याय' ही त्यांची काही गाजलेली नाटकं. "बॅरिस्टर' हे त्यांचं आवडतं नाटक होतं. "पुरुष' या नाटकावर नाना पाटेकर, रीमा लागू यांच्याएवढाच चंद्रकांत गोखले यांचाही प्रभाव होता. "रायगडचा राजबंदी' या चित्रपटात चंद्रकांत गोखले यांनी शिवाजी महाराजांची, तर चित्तरंजन कोल्हटकर यांनी संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली होती. याच नाटकात दुर्गा खोटे सोयराबाईंच्या भूमिकेत झळकल्या होत्या. या तिघांची रुपेरी पडद्यावरील जुगलबंदी प्रेक्षकांसाठी अक्षरशः पर्वणी ठरली होती. त्यांनी भूमिका केलेल्या नाटकांपैकी भावबंधन, राजसंन्यास, पुण्यप्रभाव, बेबंदशाही, राजे मास्तर, बॅरिस्टर, पुरुष ही प्रमुख नाटके होत. मराठीशिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांमधूनदेखील भूमिका रंगवल्या.
कृश शरीरयष्टी, उत्कृष्ट वक्तृत्वशैली आणि भावनेला भेदणारी संवादफेक हे चंद्रकांत गोखले यांच्या अभिनयाचं वैशिष्ट्य. सच्चेपणा आणि साधेपणा हे त्यांचे मोठे गुणवैशिष्ट्य होते. सात दशकांची आपली कारकीर्द चंद्रकांत रघुनाथ गोखले यांनी विविधांगी भूमिकांनी गाजवली. प्रत्येक भूमिकेवर ते आपला ठसा उमटविण्यात यशस्वी ठरले.मा. चंद्रकांत गोखले हे गायकही होते. त्यानी ख्याल गायकीचे शिक्षण घेतले होते. गदिमा लिखीत, सुधीर फडके यांनी संगीत दिलेल्या गीतरामायण या गीत काव्यातील १० व्या गीताचे (चला राघवा चला'चे) गायन चंद्रकांत गोखले यांनी केले होते. मा. चंद्रकांत गोखले यांना विष्णुदास भावे पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार यांसारखे मानसन्मानही मिळाले. चंद्रकांत रघुनाथ गोखले यांचे २० जुन २००८ रोजी निधन झाले.
अधिक माहितीसाठी हा लेख वाचा. (22-Jun-2018)
चंद्रकांत रघुनाथ गोखले (7-Jan-2017)
चंद्रकांत रघुनाथ गोखले (7-Jan-2018)
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
April 29, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti