सार्वजनिक जीवनात किंवा अगदी व्यक्तिगत आयुष्यातही, अनेकदा अनेक समस्या समोर उभ्या ठाकतात. त्याची उत्तरे शोधताना किंवा समस्येतून बाहेर पडताना एकटे मन पुरे पडत नाही. मनात संभ्रम माजतो, निर्णयशक्ती कुंठित होते. अशा वेळी, मानसिक आधाराची गरज तीव्रपणे भासू लागते. राजकारणात वावरणाऱ्यांना अनेकवार अशा मन:स्थितीला सामोरे जावे लागते. पण त्यांना हा संभ्रम व्यक्त करता येत नाही, आणि मनात दाबूनही ठेवता येत नाही. एखादा विश्वासू सुहृद सोबत असावा असे अशाच वेळी तीव्रतेने वाटू लागते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील लहानथोर कार्यकर्त्यांना असा सुहृद लाभला होता, भाजपचे ज्येष्ठ नेते, संघाचे कट्टर कार्यकर्ते आणि संघ परिवाराच्या ‘थिंक टँक’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे अॅडव्होकेट प्रा. बाळ आपटे यांच्या रुपाने.
संघ, भाजप, विश्व हिंदू परिषद, विद्यार्थी परिषद किंवा वनवासी कल्याण आश्रम, बाळ आपटे यांचा या सर्वानाच एक आगळा आधार होता. कारण बाळ आपटे हा आपला, व्यक्तिगत ‘फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड’ आहे, असा अनुभव त्या प्रत्येकालाच समस्यांचा सामना करतानाच्या काळात कधी ना कधी आलेला असे.
राष्ट्रउभारणीच्या कामात असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आचरणाला आवश्यक असलेली शिस्त बाळासाहेबांनी स्वत:च्या अंगी प्रयत्नपूर्वक बाणवलीच, पण तशीच शिस्त दुसऱ्या प्रत्येकाच्या अंगी असावी यासाठीही ते ठाम आग्रही राहिले. म्हणूनच बाळ आपटे यांचा संघ परिवारात विलक्षण आदरयुक्त दबदबा होता. विशुद्ध राष्ट्रप्रेम हाच जीवनाचा मूलमंत्र आहे, त्याच्यासाठीच जगायचे, आणि त्यासाठीच मरण पत्करायलाही सिद्ध राहायचे, ही वैचारिक बैठक असलेले एक समर्पित जीवन म्हणून संघ परिवारातच नव्हे, तर त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येकालाच बाळासाहेबांच्या नसण्याची उणीव सतत भासत राहील. परिवाराच्या कामासाठी आणि हिंदू समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित असलेले एक जीवन काळाआड गेले, अशी संघ परिवारातील प्रत्येकाच्याच मनातील भावना सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांच्या निधनानंतर व्यक्त केली.
## Apte, Balwant
April 15, 2010
मा.लालन सारंग या तेंडुलकरांच्या नायिका म्हणून ओळखल्या जात. सखाराम बाईंडर, घरटे आमचे छान, बेबी, कमला अशा तेंडुलकारांच्या नाटकांनी लालन सारंग यांना बरच काही मिळवून दिलं.
July 23, 2017
मराठी साहित्यक्षेत्रात आपल्या कवितांनी एक वेगळा ठसा उमटवलेले कवी डॉ. महेश वासुदेव केळूसकर हे ही ठाण्याचेच रहिवासी आहेत. मुळचे सिंधुदुर्गचे असणारे केळूसकर ठाण्यातील साहित्य – सांस्कृतिक क्षेत्रात ग्रंथालय चळवळीसाठी भरीव योगदान देत आहेत.
May 23, 2014
स्वामी विवेकानंद आणि संत परंपरेतून पुढे आलेले विचार विद्यार्थ्यांमध्ये पोहोचविण्यासाठी त्यांनी एमआयटी ही संस्था सुरू केली. ही त्यांची संस्था पुण्यात खासगी शिक्षण उपलब्ध करुन देत असून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम त्यांनी केले आहे.
July 9, 2022
प्राच्यविद्यापंडित, आंतरराष्ट्रीय विचारवंत आणि कृतीशील सामाजिक कार्यकर्ते म्हणुन ख्याती असलेल्या शरद पाटील हे सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक होते.१९४५ मध्ये जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथील शिक्षण अर्धवट सोडून कम्युनिस्ट चळवळीत त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला.
April 18, 2014
पंडिती काव्याचे एक श्रेष्ठ प्रतिनिधी, गंभीर, बोधपर आणि प्रौढ कविता करणारे कवी म्हणून चंद्रशेखर प्रसिद्ध होते.
January 30, 2010
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे दूरशिक्षणाच्या क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळ मोलाचे योगदान आहे. सध्याच्या ‘डिजिटल’ युगामध्ये बहुमाध्यम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दूरशिक्षणाची व्याप्ती आणखी वाढविणे शक्य आहे आणि याच आव्हानाला सामोरे जात डॉ. आर. कृष्णकुमार मुक्त विद्यापीठाचे कुलगुरुपद स्वीकारतील. डॉ. कृष्णकुमार हे मूळचे नागपूरचे. पदार्थविज्ञान क्षेत्रात उच्चशिक्षण व पीएच.डी. दर्जाचे संशोधन केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते रुजू झाले. नागपूर विद्यापीठातील महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालकपद सांभाळत त्यांनी विद्यापीठीय प्रशासन-व्यवस्थापनाचा अनुभव घेतला. उच्चशिक्षण क्षेत्रात पंचवीसहून अधिक वर्षांच्या कारकीर्दीनंतर त्यांची केरळच्या राज्यपालांचे विशेष सचिव म्हणून नियुक्ती झाली. आता मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून कौशल्याधारित प्रशिक्षणाची चळवळ ते उभारणार आहेत. ‘भारताकडे जागतिक महासत्ता म्हणून पाहिले जात आहे. मात्र उपलब्ध मनुष्यबळाला कौशल्याधारित प्रशिक्षण मिळाले नाही, तर लोकसंख्येतील ही लाभजन्य स्थिती अल्पावधीतच देशासाठी मोठी डोकेदुखी ठरेल. सध्याच्या बहुतांश पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्यांचा अभाव आहे. सामाजिक, आर्थिक गरजांमुळे रोजगारप्राप्तीच्या मार्गाने गेलेल्या फक्त दहा टक्के मनुष्यबळाला कौशल्याधारित प्रशिक्षण मिळाले आहे. या पाश्र्वभूमीवर प्रत्यक्ष कंपनीच्या आवारामध्येच जाऊन कौशल्याभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रकल्प राबविण्याचा त्यांचा मानस आहे. ‘उच्चशिक्षणाच्या विस्ताराबरोबरच ज्ञानाधारित समाजात कालानुरूप कौशल्यांचा दर्जा वाढविण्याचे आव्हानही मुक्त विद्यापीठाला पेलायचे आहे. त्यासाठी अभ्यासक्रम पुनर्रचना करण्याची मोहीम मी हाती घेणार आहे,’ असे कृष्णकुमार सांगतात."
August 5, 2017
समीक्षक, कथालेखिका, लघुनिबंधकार, कवयित्री असे साहित्यातील विविध प्रकार ज्यांनी हाताळले त्या कुसुमावती देशपांडे. १० नोव्हेंबर १९०४ साली विदर्भात त्यांचा जन्म झाला. विदर्भातील प्रसिद्ध वकील रा. ब. रामकृष्ण रावजी जयवंत ह्यांच्या त्या कन्या. त्यांचे शालेय शिक्षण अमरावती येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले.
January 22, 2010
मराठी वाङ्मयविश्वात कवी, कादंबरीकार, नाटककार, समीक्षक व संपादक अशी ओळख असलेल्या पु.शी.रेगे उर्फ पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्म २ ऑगस्ट १९१० रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मिठबाब येथे झाला. त्यांचे शिक्षण मुंबई व लंडन येथे बी.ए. पर्यंत झाले होते. लंडनच्या “स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स“ मधून त्यांनी बी.एस्सी. ची पदवी संपादन केली होती. अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून विविध महाविद्यालयांतून त्यांनी काम केले. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते निवृत्त झाले.
रेगे पाश्चात्य काव्याच्या काही लकबी मराठीत आणण्याचा प्रयत्न करीत होते. इटालियन कवींच्या प्रेमकवितांनी व त्यातून वाहणार्या उत्कट अशा मनोहर भावनांनी त्यांच्या कवीमनावर भुरळ पाडली होती. म्हणून त्यांच्या कवितांमधून स्त्री शक्ती आणि तिचे स्त्री देहधारी स्वरूप हेच वेगवेगळ्या स्वप्निल रूपांमध्ये प्रकट होताना दिसते.
संस्कृतप्रचुर शब्दकळांची सतत होणारी मधुर पखरण हेदेखील त्यांच्या कवितांचे अनोखे वैशिष्टय होते. रेगे यांचे जीवनविषयक विचार ऐकले की साहित्याप्रती त्यांनी बाळगलेली निष्ठा व निरपेक्ष प्रेम लगेच कळून येते. “जीवन जगले तर साहित्य जगेल असे नसून साहित्य जगले तरच जगण्यासारखे काही उरणार आहे“; अशी त्यांची श्रध्दा व धारणा होती.
“फुलोरा“, “दोला“, “गंधरेखा“, “पुष्कळा“ , “दुसरा पक्षी“, “आणि प्रियाळ“ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत; “रूपकथ्थक“, “मानवा“ यांतील काही कथा गुजराती, फ्रेंच, जर्मन, स्वीडिश, स्पॅनिश ,रशियन आणि चिनी या भाषांत भाषांतरित झाल्या आहेत. तसेच “सावित्री“, “अवलोकिता“, “रेणू“ , आणि “मातृका“ या कादंबर्या दर्जेदार व अर्थपूर्ण आहेत. “छांदसी“ हा रेगेंच्या समीक्षालेखांचा संग्रह असून १९६८ मध्ये त्याची सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली आहे.
रंगपांचालिक आणि दोन नाटके या त्यांच्या संग्रहामध्ये “माधवी: एक देणे“ ,’रंगपांचालिक“ आणि “कालयवन’ अशी तीन छोटी नाटके समाविष्ट झाली आहेत. रेगे यांच्या या नाटकालाही काव्यामयता लाभलेली असून, या नाटकांची त्यांनीच हिंदीत भाषांतरे केली आहेत. त्याचबरोबर “पालक“ , “मध्यतंर“ व “चित्रकामारव्यम्“ ही नाटुकली नियतकालिकांतून प्रसिद्ध झाली आहेत.
पु.शि.रेगे यांनी १९६५ मध्ये रशियाचा येथे मॉस्को लघुकथा या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात एक भारतीय प्रतिनिधी म्हणून त्यांनी सहभाग घेतला होता. १९६५ मध्ये केरळ येथे झालेल्या अखिल भारतीय लेखक परिषदेचे ते उद्घघाटक होते. वर्धा येथे १९६७ साली आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
१७ फेब्रुवारी १९७८ रोजी पु.शि.रेगे यांचे मुंबईत निधन झाले.
January 14, 2015
पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि आपलं घर या संस्थेचे संचालक श्री विजय गजानन फळणीकर…
June 4, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti