पनवेल मधील स्वातंत्र्यलढ्यामध्ये भाग घेतलेले श्री. गजानन नीळकंठ गुप्ते हे त्या वेळच्या प्रसिद्ध व नावाजलेल्या कै. नीळकंठ गुप्ते यांचे चिरंजीव.
June 1, 2010
ठाण्यातील केबल वाहिनीसाठी एका स्थानिक जाहिरातीचे संगीत संयोजन करुन २००१ साली आपल्या संगीत क्षेत्रातील कारकीर्दीची सुरुवात करणार्या खअरकर यांनी आपल्या यशाचा चढता आलेख कायम ठेवलेला आहे.
May 29, 2014
नीलम प्रभू या अनेक वर्षे आकाशवाणीत कार्यरत होत्या. १९६० च्या दशकात रेडिओ हे मनोरंजनाचे एकमेव साधन असताना त्यांनी आकाशवाणीवर नभोनाट्यातून आपले संवादकौशल्य सादर करायला सुरुवात केली.त्यांचा सहभाग असलेली ‘प्रपंच’ ही कौटुंबिक श्रुतिका महाराष्ट्रात चांगलीच गाजली होती. त्यात त्यांनी मीना वहिनी अर्थात टेकाडे वहिनींची भूमिका केली होती. लहान मुलीची भूमिका असो की मध्यमवयीन गृहिणीची भूमिका असो, की वृद्ध महिलेची असो प्रत्येक भूमिकेला देव या त्या पट्टीचा आवाज देत. ‘आम्ही तिघी’ या नाट्यात त्यांनी आपल्या आवाजाचा करीश्मा दाखवला होता.
July 1, 2022
नाना पाटेकर लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत
December 15, 2010
फडके, (डॉ.) अनंत
प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ डॉ. अनंत फडके यांचे नुकतेच निधन झाले आणि त्यांच्या रूपाने देशातील भूशास्त्रीय वैशिष्टय़ांची जगाला ओळख करून देणारा एक अवलिया आपल्याला सोडून गेला. भारतात अनेक वैशिष्टय़पूर्ण नैसर्गिक, भौगोलिक गोष्टी असल्या तरी त्यांची जागतिक पातळीवर ओळख असतेच असे नाही. कारण आपल्यालासुद्धा त्यांची नेमकेपणाने माहिती नसते, मग जगाची गोष्ट तर लांबचीच! पण काही माणसांच्या प्रयत्नांमुळे ही माहिती जनसामान्यांपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचविणे शक्य झाले.
भूशास्त्राबाबत हे महत्त्वाचे काम डॉ. फडके यांनी शेवटपर्यंत सुरू ठेवले होते. महाराष्ट्रातील काळय़ा पाषाणाची (बेसॉल्ट) एक ओळख म्हणजे त्यातील पोकळय़ांमध्ये आढळणारी वैशिष्टय़पूर्ण खनिजे! त्यापैकी सर्वात महत्त्वाचा गट म्हणजे ‘झिओलाईट्स’ खनिजांचा! रंगाने, आकाराने आणि एकमेकांमध्ये गुंतलेल्या वैशिष्टय़पूर्ण रचनेने ही खनिजे अतिशय आकर्षक दिसतात. त्यांचे हे आकर्षक स्वरूप जगापर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्यांमध्ये डॉ. फडके यांचा समावेश होता. पण तेवढय़ावरच न थांबता त्यांनी या खनिजांचे संशोधन करून त्याचे गुणधर्म शोधण्याचे आणि वर्गवारी करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यांचे हे कार्य जगभरातील भूशास्त्रज्ञांचे या खनिजांकडे लक्ष वेधण्यास उपयुक्त ठरले. काही दशकांपर्यंत ब्राझीलमधील अशा खनिजांना जगभरातून मागणी होती, पण आता त्यांच्या तोडीस तोड अशी महाराष्ट्रातील अशा खनिजांची गणना केली जाते. त्यांच्या अशा प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी दोन खनिजे नव्याने जगाला माहिती करून दिली. त्याबाबतकाही तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत, पण त्यांची काही वैशिष्टय़े त्यांनी वेगळेपणाने दाखवून दिली. त्यातील एक म्हणजे- केळकराईट! आपले गुरू डॉ. के. व्ही. केळकर यांच्या विषयी आदर व्यक्त करण्यासाठीच त्यांच्या नावावरून या नव्या खनिजाला त्यांनी हे नाव दिले. पुण्यातील वाघोली येथे आढळणारे निळय़ा रंगाचे आकर्षक ‘कॅव्हेन्झाईट’ हे खनिज भारतात आढळत असल्याची पहिली नोंदही त्यांनी केली. नागपूरजवळील ‘सौसर’ नावाच्या रूपांतरित खडकांच्या सखोल अभ्यासाचे श्रेय, तसेच गुजरातमधील राजपिपळा, गरुडेश्वर येथे आढळणाऱ्या माशांचे ठसे शोधून काढण्याचे श्रेयसुद्धा त्यांच्याच नावावर आहे. आपल्याकडील गोष्टींना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इग्लंड अशा अनेक देशांमधील भूशास्त्राच्या परिषदांमध्ये भाग घेतला आणि तिथे अनेक संशोधन प्रबंध वाचले. याच प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय नियतकालिकांसाठी संशोधनपर लेखनही केले. विविध देशांमधील प्रसिद्ध भूशास्त्रांसोबत एकत्रितपणे काम करूनही त्यांनी आपला हा उद्देश साध्य केला. महाराष्ट्रात आढळणाऱ्या खनिजांचा औद्योगिक वापर करता येईल का, यासाठीसुद्धा डॉ. फडके यांनी संशोधन केले. शीतीकरणाच्या (रेफ्रिजरेशन) प्रक्रियेत ‘क्लिनोप्टोलाईट’चा वापर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अशा प्रकारच्या संशोधनात मोठे यश मिळाले नसले, तरी खनिजांच्या या बाजूकडे लक्ष वेधण्यास त्यांचे कार्य निश्चितपणे उपयुक्त ठरले. भूशास्त्रातील खनिजशास्त्र, भूरचनाशास्त्र आणि ज्वालामुखीविज्ञान यांसारख्या विषयांतही त्यांचे योगदान मोठे आहे. १९५०च्या दशकात या विषयांमध्ये संशोधनाला विशेष वाव नसताना त्यांनी धडपड करून हे काम केले. संस्थात्मक पातळीवरही त्यांनी योगदान दिले. पुणे विद्यापीठात भूशास्त्र विभाग वाढविण्यात त्यांचा वाटा होताच, त्याचबरोबर अनेक विद्यार्थी घडविण्यातही त्यांनी हातभार लावला. निवृत्तीनंतरही आयुष्याच्या अगदी शेवटच्या आठवडय़ापर्यंत (वयाच्या ७४व्या वर्षांपर्यंत) ते सक्रिय होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी ‘डेक्कन व्होल्कॅनोलॉजिकल सोसायटी’ची स्थापना केली. त्याद्वारे भूशास्त्र हा विषय सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ते करत होते. त्या दृष्टीने लोणारच्या विवरासंबंधी विस्तृत परिषद भरवून त्यांनी त्याच्या सर्व पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. परदेशात तेथील छोटी छोटी भूशास्त्रीय वैशिष्टय़े जपली जातात आणि त्यांची उत्तम प्रकारे नोंद केली जाते. याबाबत आपल्याकडे असलेली उणीव दूर करण्याच्या कामाला डॉ. फडके यांनी सुरुवात केली होती. त्यांच्या निधनामुळे हे कार्य अपूर्ण राहिले आहे. भूशास्त्रातील संशोधक व विद्यार्थ्यांनी हे कार्य पुढे सुरू ठेवले तर तीच खऱ्या अर्थाने डॉ. फडके यांना श्रद्धांजली ठरेल.
August 5, 2017
बालसाहित्यकार, कवी, गीतकार आणि नाटककार गंगाधर मनमोहन महांबरे यांचा जन्म कोकणातील मालवण येथे ३१ जानेवारी १९३१ रोजी झाला.
January 30, 2010
महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाने कार्य करणाऱ्या शिवसेनेच्या समाजकारणाची दखल गिनीज बुकने घेतली आहे.
November 22, 2021
विजयाराजे शिंदे आधी कॉंग्रेसमध्ये होत्या, पण इंदिरा गांधी यांनी राजघराणे नष्ट करण्यासाठी पाऊले उचलल्याने त्या नाराज झाल्या. १९६७ मध्ये कॉंग्रेसचा त्याग करून त्यांनी त्या वेळच्या जनसंघात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाच्या संस्थापकांपैकी त्या एक होत्या. मध्य प्रदेशच्या राजकारणात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
July 25, 2022
अनंत गणेश गाडगीळ ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांचा जन्म ११ सप्टेंबर १९१५ ला सांगलीत झाला. वडिलोपार्जीत पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सची जबाबदारी दाजीकाकांनी गेल्या ७५ वर्षांपेक्षा अधिक वर्षे समर्थरित्या पेलली. पु. ना. गाडगीळ आणि कंपनी (पीएनजी) या सराफी पेढीचे आधारस्तंभ, तरुणाईला लाजवेल असा उत्साह अंगी असणार्या दाजीकाका गाडगीळ यांचे १० जानेवारी २०१४ या दिवशी वृद्धापकाळाने वयाच्या ९९ व्या वर्षी पुण्यातील प्रयाग रुग्णालयात निधन झाले.
January 10, 2014
अभिनय बेर्डे – मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन फळीतील हे एक नाव. अभिनय सुप्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे ह्यांचा मुलगा आहे.
August 12, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti