ठाणे येथे सुरुवात करुन गेली ४५ वर्षे योगप्रसारासाठी सर्वस्व अर्पण करणारे ज्येष्ठ योगाचार्य श्रीकृष्ण उर्फ अण्णा व्यवहारे हे ठाणे शहराचे एक भूषण होते. २६ जानेवारी १९६५ रोजी त्यांनी घंटाळी मित्र मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसह अण्णांनी योगसाधनेची चळवळ ठाणे शहरात उभी केली.
August 25, 2019
कवी बी हे नामाभिधान धारण करून नारायण मुरलीधर गुप्ते यांनी आपल्या अमृतमधुर गुंजारवाने मराठीचिये नगरी मधील विचाराचे व कल्पनेचे कुंज काही काळ निनादवून सोडले व तेथील रसिक रहिवाशांवर आपल्या गीतमाधुर्याची जबरदस्त मोहिनी घातली.
त्यांचा जन्म १ जून १८७२ रोजी झाला.
दीर्घकविता हे कवी ‘बीं’च्या लेखन शैलीचे वैशिष्ठ्य. त्यांच्या प्रणयपत्रिका, बकुल, माझी कन्या, चाफा, वेडगाणे या काही विशेष उल्लेख कराव्या अश्या कविता!
नारायण मुरलीधर गुप्ते यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
मराठी कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते (1-Jun-2017)
मराठी कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते (31-Aug-2017)
# Gupte, Narayan Murlidhar (Kavi Bee)
June 10, 2017
त्यांनी लिहिलेले ‘पंडिता रमाबाईंचे चरित्र’ हे चरित्र लिखाणाचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांचे लिखाण स्त्रीवादी आणि वास्तववादी होते. ज्योत्स्ना देवधर यांच्या कथांतून आपल्याला स्त्रीच्या वाट्याला येणारी दु:खे, वेदना, तिच्या जीवनातील कारुण्य यांचे चित्रण पहायला मिळते.
June 28, 2022
काव्यसंग्राहक – संपादक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुराणवस्तू संग्राहक असलेले दिनकर गंगाधर केळकर हे नाव ‘राजा दिनकर केळकर म्युझियम’ या संस्थेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असेच. त्यांचा जन्म १० जानेवारी, १८९६ रोजी झाला.
February 2, 2010
ग्रामीण पार्श्वभूमीमुळे एका नामांकित संस्थेने त्यांना पदवीनंतर मार्केटिंगच्या अभ्यासक्रमात प्रवेश नाकारला होता. आज मात्र मॅनेजमेन्टचे धडे गिरविण्यासाठी ख्यातनाम संस्थाही त्यांना व्याख्यानांना बोलावतात. प्रदीप लोखंडे यांनी मॅनेजमेन्टचे सूत्र वापरूनच ग्रामविकासाचा डोंगर उभा केला.
ग्रामविकासाचा नवा फंडा
July 14, 2017
मराठी संतवाङ्मयाचे अभ्यासक रेव्ह. जस्टिन एडवर्ड अॅबट यांनी “पोएट सेंट्स ऑफ महाराष्ट्र” अशी ग्रंथमाला तयार केली. या मालेतून त्यांनी एकनाथी भागवत, तुकारामांची गाथा, दासोपंत, रामदास, संत बहिणाबाई अशी १२ पुस्तके इंग्रजीतून लिहिली.
“स्टोरीज ऑफ इंडियन सेंट्स” हा महिपतीकृत “भक्तविजया़” चा अनुवादही अॅबट यांनी, पं. नरहर रा. गोडबोले यांच्या सहकार्याने केला होता.
संतवाङ्मयाप्रमाणेच पुरातत्वीय शिलालेखांचे वाचन, अभ्यास व भाषांतर यांतही त्यांना रस होता.
१९ जून १९३२ रोजी त्यांचे निधन झाले.
# Rev. Justin Abbot Edward
# अॅबट, रेव्ह. जस्टिन एडवर्ड
October 25, 2016
बल्लाळ, नरेंद्र
नरेंद्र बल्लाळ यांनी ऐन आणीबाणीच्या काळामध्ये, “ठाणे वैभव“ नावाचे दैनिक काढण्याचा जो निर्णय घेतला होता, तो त्या काळातील एकंदर राजकीय “घडामोडी पाहता अत्यंत धाडसाचा होता. ठाण्याच्या सार्वजनिक जीवनावर वेगळा ठसा उमटवित, ह्या दैनिकाने घेतलेली प्रगतीची गरूडभरारी नक्कीच वाखाण्यासारखी आहे. ठाण्यातील विविध क्षेत्रांमधील अचूक नोंद करणारे विश्वासार्ह दैनिक अशी या दैनिकाची किर्ती आहे. जिल्हा दैनिक सुरू करण्यासाठी नरेंद्र बल्लाळांनी महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रातील नोकरी सोडून , हे वृत्तपत्र सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता.
सध्या त्यांचे चिरंजीव मिलिंद बल्लाळ व नातू निखील बल्लाळ हे नव्या संकल्पना आणिव्यावसायिक गणितांची आखणी करुन नरेंद्र बल्लाळ यांचा वारसा पुढे चालवीत आहेत.
January 12, 2015
राजाभाऊ या नावाने परिचित असेलेले प्रा. राजेंद्र विठ्ठल शिरगुप्पे यांची नाटककार, कवी, साहित्यिक म्हणूनही ओळख आहे. कोल्हापूर. सावंतवाडी, गडहिंग्लज येथे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.
निपाणी येथील महिला बिडी कामगार व शेतकर्यांच्या तंबाखू आंदोलनापासून ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले. शिरगुप्पे यांचे “सडक” हे नाटक व त्यातील कविता आजही आंदोलकांच्या तोंडी आहेत.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीशी ते गेली दहा वर्षे जोडले गेले आहेत. धरणग्रस्त, देवदासी प्रथा निर्मूलनाच्या लढ्यातही ते सहभागी झाले होते. त्यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांत भाग घेतला आहे. नाट्यलेखन व दिग्दर्शन म्हणून त्यांची अनेक नाटके गाजली आहेत.
तुकोबांच्या पत्नीच्या जीवनावरील “तिच्या नवर्याचे वैकुंठगमन”, “कपान”, “होते कुरुप वेडे”, “उंटावरचा शहाणा”, “आम्ही क्रांतिसिंह आहोत”, “हा आणि बारावा” अशी नाटकांचे लेखनही त्यांनी केले.
किशोर, मासिक ऋग्वेद, लोकमत वगैरेंमध्येही त्यानी विपुल लेखन केले आहे. हिंदू-मुस्लिम समस्येवर आधारित “षड्यंत्र” या माहितीपटाची निर्मितीही त्यांनी केली होती. बसवाण्णांच्या तत्वज्ञानाचे ते गाढे अभ्यासक आहेत.
सांगली येथे झालेल्या दहाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद राजाभाऊ शिरगुप्पे यांनी भुषविले आहे.
## Shirguppe, Rajendra Vitthal (Rajabhau Shirguppe)
## Shirguppe, (Prof) Rajendra Vitthal
January 14, 2016
शिक्षण व बाल मानसशास्त्र या विषयांवर मराठीत लिहिणारे भास्कर धोंडो कर्वे यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९०३ रोजी झाला.
बालपणाचे रहस्य, बाल अवलोक, भाषा व्यवसाय, अध्यापन व मानसशास्त्र, शिक्षणविषयक नवे विचार ही त्यांची पुस्तके होत.
महर्षी अण्णासाहेब कर्व्यांचे ते द्वितीय पुत्र.
## Bhaskar Dhondo Karve
July 27, 2017
मराठी मालिका आणि सन्मान सोहळ्यात दिसणारा एक चेहरा आपणा सर्वांच्याच ओळखीचा आहे. आपल्या निवेदनाने आणि अभिनयाने तसंच सर्वात महत्वाचं म्हणजे संस्कृत भाषेतील प्रभुत्वामुळे सर्व श्रोत्यांना भुरळ घालणारी समीरा गुजर-जोशी ही देखील ठाण्यातलं एक रत्नच!
May 23, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti