(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • राजीव तांबे

    युनिसेफ आणि इतर काही सामाजिक संस्थांसोबत काम करताना त्यांनी राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील अनेक शाळांना भेट दिली आहे.

      July 26, 2022


  • व्ही. ए. माळी

    माळी, व्ही. ए.

    महाराष्ट्राच्या कला परंपरेमध्ये कोल्हापूरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या कोल्हापूराने राज्याला एक श्रेष्ठ कलापरंपरा दिली. चित्रकार व्ही. ए. माळी, नव्हे माळीसर हे या कलापरंपरेतील शिरोमणी. या माळी सरांनी रविवारी शंभराव्या वर्षांत पदार्पण केले. त्या दिवशी सरांच्या अभिष्टचिंतनासाठी आलेल्या अध्र्याहून अधिक चित्रकारात सध्याच्या प्रख्यात चित्रकारांचा समावेश होता. ते सारे माळी सरांचे विद्यार्थी. सरांनी चितारलेली लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, सेठ लालचंद हिराचंद, न्या. एम. सी. छागला, महात्मा फुले आदींची व्यक्तिचित्रे आदर्श मानली जाणारी.

    त्या कलाकृतींनी केवळ नामवंतांच्याच संग्रहात नव्हे, तर कोलकात्याच्या व्हिक्टोरिया म्युझियमपासून ते मुंबई-बडोद्यातील म्युझियमपर्यंत अनेक महत्त्वाच्या संग्रहालयांमध्ये स्थान पटकावले आहे. त्यांच्या कलाकृती लंडनमधील इंडिया हाऊसमध्येही आहेत. माळी सरांचे वडील अनंत माळी हेही चित्रकारच. मात्र त्यांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. मुंबईमध्ये नशिब अजमावण्यासाठी आलेल्या अनंत माळी यांचे निधन झाले, त्यावेळेस सर अवघे १० वर्षांंचे होते. शालेय शिक्षणानंतर केतकरांच्या कला संस्थेत दोन वर्षे प्रशिक्षण घेतलेल्या माळी सरांनी जे. जे.मध्ये प्रवेश घेतला. १९३२ साली जी. डी. आर्ट झाल्यानंतर माळी सरांनी कोळवणकरांच्या स्टुडिओमध्ये काम सुरू केले. कोळवणकर हे माळी सरांच्या वडिलांचे जिगरी दोस्त. किंबहुना मुंबईत नशिब अजमावण्यासाठी येण्याचा निर्णय अनंत माळी व कोळवणकर यांनी एकत्रितरीत्या घेतलेला होता. माळी सर व्यक्तिचित्रण करीत ते फोटोवरून किंवा प्रत्यक्षात व्यक्तीला समोर बसवून. इथेच त्यांना व्यक्तिचित्रणाची प्रमुख गोडी लागली. हातातले काम संपल्यानंतर सर स्वत बाहेर पडत आणि आजूबाजूला दिसणाऱ्या सामान्यांना स्डुडिओमध्ये आणून बसवून त्यांची व्यक्तिचित्रे चितारत. व्यक्तिचित्रण हा रईसांचा शौक मानला गेल्याच्या कालखंडात त्याकाळी माळीसरांनी मात्र माकडवाला, गोंधळी, पोतराज, भिल्ल स्त्रिया यांना स्थान दिले. व्यक्तिचित्रण म्हणजे केवळ सुंदर किंवा दिमाखदार दिसणाऱ्या व्यक्तीचे चित्रण या समजाला त्यांनी यशस्वीरित्या छेद दिला. माळी सरांच्या व्यक्तिचित्रणात म्हणूनच कृष्णवर्णाच्या व्यक्तींचे चित्रण पाहायला मिळते. माळी सरांच्या चित्रणशैलीचे वेगळे वैशिष्टय़ म्हणजे, या गडद रंग छटांचे चित्रण त्यांच्या चित्रांमध्ये प्रभावी पद्धतीने येते. त्यात त्यांचा शैलीदार जोरकसपणाही आहे आणि रंगांची केलेली वेगळी हाताळणीही आहे. रूढार्थाने आपण ज्याला यश म्हणतो असे यशही माळी सरांना दीर्घकाळ लाभले. १९४० साली त्यांना कलकत्ता अ‍ॅकॅडमी ऑफ फाईन आर्टचे सुवर्णपदक मिळाले. त्यानंतर माळीसरांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. १९४४ साली आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचा रौप्यचषक तर ४५ साली मोर विकणाऱ्या तरुणीच्या चित्रास बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक. या चित्राचे प्रचंड कौतुक आणि माळी सरांचे नाव सर्वतोमुखी झाले. गेल्या पंधरा- वीस वर्षांंत आणखी काही महत्त्वाचे बहुमान माळी सरांच्या दिशेने चालत आले. त्यात बॉम्बे आर्ट सोसायटीच्या रूपधर पुरस्काराचाही समावेश आहे. शरीराच्या थोडय़ा कुरबुरी सुरू झालेल्या असल्या तरी आजही चित्रकलेचा विषय निघाला की, सर तरतरीत होतात. कुणी चित्र दाखवायला गेले की, आजही मार्गदर्शन करतात, प्रसंगी सुनावतातही. त्यांच्या सुनावण्यात आशीर्वाद असतोच, पण मोलाचे मार्गदर्शनही असते. ते टीकाही करतात आणि तेवढय़ाच अधिकाराने चूक सुधारण्याचा मार्गही सांगतात. राज्याच्या स्थापनेचा सुवर्णमहोत्सव साजरा होत असताना वयाची शंभरी साजरी करणाऱ्या या दिग्गज चित्रकाराचा राज्य सरकारने यथोचित गौरव केला तर तो राज्याचाच मोठा सन्मान ठरेल. माळी सरांना शताब्दी वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा.

      August 5, 2017


  • पं. विजय कोपरकर

    त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तीन वर्षे तू आता फक्त रियाज कर, असे सांगणारी माझी आई ग्रेट आहे, असे आपल्या आईबद्दल सांगतात.

      July 2, 2022


  • मोनिका आयरे

    मोनिका आयरे

    आंतरराष्ट्रीय धावपटू सावरपाड़ा एक्सप्रेस कविता राऊतचा वारसा चालविणारी नाशिकची 'लिटिल गर्ल' मोनिका आयरे हिने १३ च्या वर्षीच उदयोन्मुख धावपटू म्हणून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आतापर्यंत १६ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये २० सुवर्ण, १२ रौप्य आणि १० कांस्य पदके पटकावून तिने केलेली कामगिरी लक्षवेधी ठरली आहे.

    मोनिका आयरे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला विक्रमी दौड हा लेख पुढील पानावर वाचा.

    मोनिका आयरे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला विक्रमी दौड हा लेख वाचा.

    ayre-monika-modified

      September 11, 2015


  • आविष्कार दारव्हेकर

    आविष्कार दारव्हेकर

    आविष्कार दारव्हेकर! मराठी मालिका , नाटक आणि चित्रपट क्षेत्रात नावाजलेलं नाव.

      August 6, 2020


  • आशा बगे

    आशा बगे या मराठी कादंबरीकार, लेखिका आहेत. त्यांना २००६ मध्ये भूमी या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

    त्यांचे प्रकाशित झालेलं साहित्य -

    भूमी (कादंबरी, मौज प्रकाशन गृह)
    दर्पण (कथासंग्रह, मौज प्रकाशन गृह)
    निसटलेले (कथासंग्रह, मेहता पब्लिशिंग हाऊस)
    मारवा (कथासंग्रह, मौज प्रकाशन गृह)
    त्रिदल (कादंबरी, मौज प्रकाशन गृह)
    अनंत (ललित, विजय प्रकाशन)
    चंदन (ललित, विजय प्रकाशन)
    धर्मक्षेत्रे कुरूक्षेत्रे (ललित, विजय प्रकाशन)
    श्रावणसरी (निसर्ग)

      December 15, 2010


  • प्रतिक पारखी

    प्रतिक पारखी हा तरूण पुण्याचा रहिवासी असून कला, तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारा व्यावसायिक आहे. ‘ओव्हेशन क्रिएशन’ ह्या सर्वा प्रकारच्या व आशयांवरच्या दृष्यफितींना सराईतपणे कात्री लावून त्यांच व्यावसायिक एडिटींग करून देणार्‍या लोकप्रिय स्टुडिओचा, समान भागीदार आहे. ऑगस्ट 2009 पासून सुरू झालेला हा स्टुडियो आजवरच्या त्याच्या सर्वात यशस्वी व फायदेशीर जागेवर उभा आहे, व याचं सारं श्रेय जातं ते उत्तुंग प्रतिभेचं व कल्पनाशक्तीचं, अत्यावश्यक भांडवल या स्टुडियोला एकहाती पुरविणार्‍या प्रतिकला.

      August 18, 2011


  • दिनकर कांबळे

    अपघात असो, महापूर असो वा आगीचा लोळ, कोणत्याही आपत्तीत माणसांचे जीव वाचविण्यासाठी धावून जाण्याचे व्रत कोल्हापूरच्या दिनकर कांबळे यांनी गेली २१ वर्षे निभावले आहे. आता ते जीवरक्षकांची नवी पिढीही घडवत आहेत.

    जीवरक्षक

      July 24, 2015


  • मधुरा कामत

    तिच्या बोटात चित्रांची जादू आहे, समोरच्या माणसाला ती आपल्या चित्रांतून व्यक्त करते. शिवाय लहान मुलांसाठी चित्रकलेचे क्लासही चालवते. आपल्या या कलेबद्दल सांगतेय मधुरा कामत.

    मधुराच्या चित्रकलेची सुरूवात इतर मुलांप्रमाणेच घराच्या भिंतीपासून झाली. पण तिची ही गिरबिट थोडी निराळी आहे, हे तिच्या पालकांना कळत होतं. म्हणूनच त्यांनी तिला चित्रकलेच्या वर्गात घातलं. लहानपणीची ही आवड मधुरा कामतचं मोठेपणीचं तिचं पॅशन ठरलीय. ज्युनिअर कॉलेजनंतर तिने जे. जे. स्कूल ऑफ आर्ट आणि रचना संसद या दोनही विद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया दिल्या. त्यामधून तिला रचना संसदच्या अप्लाइड आर्ट अँड क्राफ्टसाठी प्रवेश मिळाला. वेगवेगळ्या असाइनमेंटसोबत तिचं पेंटींगही कायम सुरूच असतं. तिला फाइन आर्टमध्ये जास्तं रस आहे. आणि सरावाचे तिच्या पद्धतीही वेगवेगळया आहेत. कल्याणला तिचं घर आहे. कल्याण ते दादर, किंवा सीएसटी या लोकलप्रवासात ती चक्क समोरच्या सहप्रवाशांची चित्रं रेखाटते. यामुळे अभ्यासही होतो, वेग वाढतो आणि गंमतही येते हा तिचा फंडा. शिवाय आपलं चित्रं काढल्याने बायका खुश होतात ते वेगळंच. रेल्वे स्टेशन, बसस्टॉप, कॉलेज कॅम्पस असो किवा तिच्या वडिलांचे दुकान कुठेही गेली तरी मधुराची हात आणि पेन्सीलची गाठ काही सुटत नाही.

    तिचे वडील वेशभूषा पुरवण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळे या कामातही आपली कला आणि कल्पकता मधुरा वापरत असतेच. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्टं म्हणजे, तिला मिळालेलं कलाज्ञान, इतरानाही मिळावं यासाठी ती परिसरातील छोट्या मुलांसाठी चित्रकलेचा क्लासही घेते. मधुराच्या शिकवण्याच्या हातोटीमुळे तिच्या क्लासना मुलांची आणि पालकांचीही पसंती असते. भविष्यात तिला भारताबाहेर जाऊन पारंपरिक भारतीय कला प्रकार जगासमोर मांडण्याचा तिचा मानस आहे.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


      August 8, 2017


  • दादासाहेब तोरणे

    श्री पुंडलिक’चे काही प्रयोग झाल्यानंतर ‘श्रीपाद नाटक मंडळी’ने दुसरे नाटक करण्याचे ठरवले. ‘श्री पुंडलिक’ हे आपल्या नाट्यसंस्थेचे हुकमी नाटक चलचित्रित करावे असा ध्यास दादासाहेवांनी घेतला.

      July 23, 2017