(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • डॉ. भगवान नागापुरकर

    डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.

      July 16, 2017


  • मुकुंद जयकर

    वयाच्या चोविसाव्या वर्षी इंग्लंडला जाऊन ते बॅरिस्टर झाले आणि मुंबई उच्च न्यायालयात कायदेपटू म्हणून प्रसिद्धीस आले. १९१९ साली पंजाबमध्ये झालेल्या हत्याकांडाची चौकशी करण्याकरता काँग्रेसने जी एक समिती नेमली होती, तिचे ते सदस्य होते.

      July 16, 2022


  • प्रतिभाताई पवार

    शरद पवार ६१ वर्षाचे झाले तेव्हा त्यांचा एकसष्टीचा वाढदिवस त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत साजरा केला होता. त्यावेळी भाषण करताना वाजपेयींनी पवार यांच्या अनेक गुणांचे वर्णन केले होते आणि शेवटचे वाक्य ते असे म्हणाले की, ‘सबसे बडी और महत्त्वपूर्ण बात यह है की, अनेक गुणों से मंडित पवारसाब ‘प्रतिभा’संपन्न भी है।’

      July 6, 2022


  • (कॉ.) गंगाधर चिटणीस

    सरंजामशाही आणि जमीनदारशाहीच्या विरोधात बंडाचा झेंडा उभारून या दोन्ही शाह्या समूळ संपविण्याचा विडा उचलेल्या सर्वहारा वर्गाचे ते एकनिष्ठ पाईक असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या घरातच दोन पिढय़ा अगोदपर्यंत या दोनही शाह्या सुखनैव नांदत होत्या. वडील राजनिष्ठ सेवक होते आणि विद्यार्थीदशेत अत्यंत आज्ञाधारक असलेला गंगाधर चिटणीस एकदम दुसऱ्या टोकाच्या विचारांचा गिरणी कामगारांच्या सुखदु:खाशी समरस होत गेला. हे अतक्र्य घडविले साने गुरूजींनी.

    ‘समाजासाठी आणि देशासाठी जगा’ हा साने गुरूजींचा संदेश त्यांनी आत्मसात केला आणि एका क्षणात सुखाची सरकारी नोकरी सोडून त्यांनी कामगारांशी आपले नाते जुळवले ते अखेपर्यंत! अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथे १९२७ मध्ये जन्म झालेल्या कॉ. गंगाधर चिटणीस यांचे शिक्षण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाले आहे.

    सावंतवाडी, पुणे, मुंबई येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर ते पुण्याला गेले. गंगाधरचे वडील राजापेक्षा राजनिष्ठ असे होते. त्यांना आपल्या मुलानेही तसेच व्हावे असे वाटत होते. विद्रोही वातावरणापासून त्यांनी मुलांना कटाक्षाने दूर ठेवले असले तरी इंग्रजी पाचवीपर्यंत मुंबईत शिक्षण घेत असताना गंगाधरच्या एका शिक्षकामुळे त्याचा रा. स्व. संघाच्या शिवाजी पार्कच्या शाखेशी संबंध आला होता. पण संघाच्या शिकवणुकीविषयी त्यांचा भ्रमनिरास झाला आणि नंतर वडिलांच्या बदलीमुळे त्यांचा संघाशी असलेला संबंध कायमचा तुटला. पुन्हा ते मुंबईत आले पण तेव्हा त्यांच्या विचारांवर मार्क्‍सवाद आणि साने गुरूजी यांच्या विचारांचा पगडा होता. त्यांनी मुंबईच्या पोदार महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. वाणिज्य शाखेमध्ये अ‍ॅडव्हान्स बँकींगमध्ये ते विद्यापीठात सर्वप्रथम आले. त्यांना सरकारी नोकरी मिळाली तीही निर्वासितांचे अश्रू पुसणारी.

    स्वातंत्र मिळाल्यावर देशातल्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये जाऊन त्यांना मदत करताना आपल्या समाजातील विषमता त्यांना सतत डाचत होती आणि त्याचवेळी साने गुरूजींच्या साहित्याचा प्रभाव त्यांच्या मनावर होत होता. एका क्षणी त्यांनी ठाम निर्णय घेतला आणि नोकरी सोडून कम्युनिस्ट पक्षात ते दाखल झाले. मार्क्‍सवादी साहित्य संपूर्णपणे वाचून पूर्ण विचारांती कम्युनिस्ट पक्षात दाखल झालेल्या चिटणीसांची नाळ गिरणी कामगारांच्या प्रत्येक लढयाबरोबर अधिक घट्ट होत गेली. १९५२ मध्ये पक्षात आल्यावर त्यांनी कॉ. डांगे यांच्या बरोबर आयटकच्या कामात स्वत:ला झोकून दिले आणि कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी स्वत:हून स्वीकारली.

    गिरणी कामगारांच्या संपामध्ये गिरणगावातील अनेक गिरण्यांच्या दरवाजावर संपफोडय़ांचे हल्ले झेलत, कामगारांना आपली भूमिका पटवून देण्यात चिटणीसांचा हातखंडा होता. शिवसेनेच्या उदयानंतर त्यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी गिरणी कामगार युनियन आणि कम्युनिस्ट पक्षातर्फे काढण्यात आलेल्या ‘लाल बावटा’ या मुखपत्राचे संपादन चिटणीस यांनी केले होते. गिरणी कामगारांचे बोनसचे लढे असोत किंवा क्षणिक एखाद्या मुद्यावरून एखाद्या गिरणीत अचानक आंदोलन झालेले असो, चिटणीस तेथील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करीत असत.

    कमला मिल असो वा मधुसूदन मिल तेथील कामगारांना आजही पोलिसांबरोबर झालेल्या संघर्षांत चिटणीसांनी बजावलेली समन्वयाची भूमिका लक्षात आहे. अनेकदा हल्ले झाल्यावरही त्याच नेटाने आपली ‘गेट मिटींग’ पूर्ण करणारे चिटणीस पंक्षातर्गत वादामध्ये कधी पडले नाहीत. पक्षाचा आदेश कायम मानणारे आणि प्रसंगी आपल्या मनाला मुरड घालून तो आदेश शेवटपर्यंत पाळणारे, असे ते एकनिष्ठ पदाधिकारी होते. गिरणी कामगार युनियनच्या स्थापनेपासून किंबहुना त्या अगोदरपासून त्यांनी गिरणी कामगारांची लढाई पाहिली होती.

    १९७१ ते २००० पर्यंत तब्बल २९ वर्षे ते मुंबई गिरणी कामगार युनियनचे कार्यवाह होते. पक्षांतर्गत मतभेद असले तरीही त्यांनी भावनिक आणि वैचारिक पातळीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाबरोबर असलेली नाळ कधीही तोडली नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणही जवळून अभ्यासलेल्या साम्यवादी नेते आणि कार्यकर्त्यांच्या पठडीतले ते होते. कामगारांच्या सर्व संघटना एकत्र करून पुन्हा एक मोठी लढाई उभारण्याची त्यांची मनीषा होती, पण ती त्यांची मंझिल दूरच राहिली.

    आठ वर्षे प्रकृती साथ देत नसतानाही त्यांनी आपला अभ्यास सुरू ठेवला. काही दिवसांपूर्वी त्यांना इस्पितळात दाखल केले तेव्हाही ते आपल्या मंझिलबाबत आशावादी होते. इतक्या सरळ मनाचा, इतका नि:स्पृह आणि इतक्या निस्वार्थीपणे आपले जीवन, ध्येयासाठी पूर्णपणे वाहून टाकणारा असा हा कॉम्रेड होता. त्यामुळेच जेव्हा कम्युनिस्ट पक्षात फूट पडली तेव्हा आणि कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांना पक्षातच टीकेचे लक्ष्य केले गेले, तेव्हा त्यांना खूप वेदना झाल्या. परंतु ते वैचारिक आणि धोरणात्मक वादामध्ये सहसा पडत नसत आणि आपला लाल ध्रुव तारा कधीतरी अवघ्या जगावरती त्याची प्रभा पसरवेल असा आत्मविश्वास त्यांना अखेपर्यंत होता. त्यामुळेच अनेकदा जागतिक पातळीवरती साम्यवादी देशांना व विचारांना पीछेहाट सहन करावी लागली तरी ते खचून गेले नाहीत.

    भविष्य कामगार आणि कष्टकरी वर्गाच्याच हातात आहे अशी खात्री त्यांना होती आणि ती मनात ठेऊनच ते चिरंतनात विलिन झाले.

      August 5, 2017


  • विराज लोमटे

    अवघे १५०० रुपये घेऊन १९९१ साली नाशिकमध्ये आलेले विराज लोमटे यांनी यशश्री ग्रुप या बांधकाम कंपनीची सुरुवात करून २० वर्षांत कोटीच्या कोटी उड्डाणे घेत मराठी पाऊल पडते पुढे हे दाखवून दिले आहे.

    सांगली येथील मध्यमवर्गीय कुटूंबातील विराजने आई - वडिलांच्या आग्रहाखातर बी. ई. सिव्हीलचे शिक्षण घेतले. सांगलीसारख्या छोट्या शहरात कर्तृत्वाला संधी नाही म्हणून नोकरीच्या शोधात नाशिक गाठले. आर्किटेक्ट जयंत देशमुख यांच्या कंपनीत दोन वर्षे नोकरी करून १९९४ साली स्वत:चा व्यवसाय सुरू केला.

    पीडब्ल्यूडीमधील बांधकाम ठेकेदार म्हणून करिअरला सुरुवात केली. त्याचबरोबर अनेक औद्योगिक इमारती, खासगी बंगलो व अनेक संस्थांच्या इमारती बांधल्या. स्वत:ची आवड म्हणून प्लॅनिंग करीत आर्किटेक्चरल फर्मही काढली. या फर्मला पहिल्याच वर्षी सांगली येथे वसंतदादा स्मारकाच्या डिझाइनसाठी पारितोषिकही मिळाले.

    सांगली, नाशिक, शिर्डी, कोपरगांव, देवळाली, सटाणा, त्र्यंबकेश्वर नगरपालिका, राहुरी कृषी विद्यापीठ, यशवंतराव मुक्त विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, विविध बँका आदींच्या आर्किटेक्चरल पॅनलवर त्यांची संस्था काम करते आहे. शिर्डी येथील हॉटेल, नाशिक येथील बंगल्यांसाठी त्यांची डिझाइन्स वापरली जात आहेत. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेसाठी सिटी डेव्हलपमेंट प्लॅनही त्यांच्या संस्थेने बनविला आहे.

    बांधकाम व्यवसायात सचोटी, प्रामाणिकपणा, गुणवत्ता व पारदर्शकता यामुळे यशश्री, भाग्यश्री, धनश्री, विजयश्री, श्रीगणेश, अपूर्वाई, गझल, धन्वंतरी, श्रीयोगेश्वर, श्रीसूर्यमाला हे प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. उदघाटनापूर्वीच पूर्ण बुक होणारा त्र्यंबकचा श्रीवरद व पुण्याच्या डी. एस. के. समूहाबरोबर साकारण्यात येत असलेला सुवास्तू प्रकल्प हे त्यांच्या व्यवसायाच्या मानांकनाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.

    व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधीलकी जपताना पर्यावरण रक्षणासाठी ३०० वृक्षांचे रोपण व संगोपन, मोदक स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. लघुउद्योग भारती या राष्ट्रीय संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व मानद सचिवपदही त्यांनी भूषविले आहे. नुकत्याच पार पडलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ६० टक्के इतके मतदान घडविण्यासाठी नाशिक सिटीझन फोरमने राबविलेल्या मतदार जागृती अभियानात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


      August 9, 2017


  • मिलिंद तुळाणकर

    जलतरंग हे प्राचीन भारतीय वाद्य असून ते वाजविणाऱ्या व्यक्ती दुर्मीळ आहेत. ‘ही ६४ कलांमधील एक कला आहे. या वाद्याला जलवाद्य किंवा ‘जलतंत्री वीणा’ असेही म्हणतात. यात कमीतकमी १२, तर जास्तीत जास्त २६ भांडी असतात. भांड्यांची रचना मोठ्यापासून छोट्यापर्यंत, अर्धवर्तुळाकार स्वरूपात केली जाते. बांबूच्या किंवा प्लास्टिकच्या काठ्यांनी ते वाजवितात.

      July 16, 2022


  • केशवराव जेधे

    जेधे कुटुंब महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे पाठीराखे होते. त्यांनी तरुण मराठा पक्ष स्थापन केला आणि वर्ष १९२३ मध्ये त्याच्या प्रचारार्थ ‘शिवस्मारक’ हे साप्ताहिक काढले. वर्ष १९२७ मध्ये ‘कैवारी’ या साप्ताहिकाचे ते सहसंपादक झाले. तर मजूर हे वृत्तपत्र त्यांनी चालविले.

      August 2, 2017


  • शुभा टोळे

    श्रीमती शुभा टोळे यांनी कॅलिफोर्निया प्रांतात कलटेक विद्यापीठात पी. एच. डी. केले.

      October 4, 2010


  • (पं.) शरद गोखले

    गोखले, शरद

    सरळ नाकाचा, डोक्यावरचे छप्पर जवळजवळ उडालेले, बोलताना जरासा अनुनासिक उच्चार, लाघवी वागणे अशी व्यक्ती बाजारात सहज भेटली तरीही तुमच्या लक्षात येणार नाही, की आदल्या रात्री रंगमंचावर आपल्या गायनाने मंत्रमुग्ध करणारे ते हेच शरद गोखले. वयाच्या पस्तिशीत संगीत रंगभूमीवर पदार्पण करणाऱ्या शरद गोखले यांना आयुष्यभर संगीताने स्वरमय साथ दिली.

    जयराम आणि जयमाला शिलेदारांच्या संगीत रंगभूमीवर मनापासून सेवा करणारा हा व्रतस्थ कलावंत आयुष्यभर सहजपणे जगू शकला, याचे कारण त्याचे आयुष्य केवळ संगीतावरच अवलंबून होते. संगीत सौभद्र, शाकुंतल, संशयकल्लोळ, स्वरसम्राज्ञी अशा अनेक नाटकांमधून विविधरंगी भूमिका करताना शरदरावांनी आपल्या गायनावर नेहमी लक्ष केंद्रित केले. पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे ग्वाल्हेर गायकीची पक्की तामील मिळाल्यामुळे अभिजात संगीताची उत्तम जाण होतीच. ग्वाल्हेर गायकावर लालित्याचे संस्कार करण्याचे कसबही विनायकबुवांनीच शिकवले असणे शक्य होते. कारण स्वत: विनायकबुवा हेही संगीत रंगभूमीचे पाईक होते. त्यांच्या काळात ही रंगभूमी ऐन भरात होती. शरद गोखले यांच्या बाबतीत मात्र तसे घडले नाही. संगीत रंगभूमी जवळजवळ अस्तंगत होण्याच्या मार्गावर असताना छोटा गंधर्व आणि शिलेदार कुटुंबाने केलेल्या प्रयत्नांमुळे ही संगीत रंगभूमी पुन्हा कात टाकू लागली होती. विनायकबुवांकडे गाणे शिकत असतानाच त्यांचे पुत्र रामचंद्र पटवर्धन यांच्याकडून तबला वादनाचे शास्त्रोक्त ज्ञान मिळवण्यासाठीही गोखले यांनी कष्ट घेतले. लयतालावरील हुकमत आणि रागज्ञानाची शिदोरी यांच्या जोरावर संगीत रंगभूमीवरील पदार्पण करणे त्यांना शक्य झाले. ग. श्री. खैर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात सुरू झालेल्या ‘अनाथ विद्यार्थीगृह’ या एका अनोख्या सामाजिक चळवळीचा भाग होण्यासाठी शरद गोखले या संस्थेत अध्यापक म्हणून काम करू लागले. पण अध्यापनाबरोबरच संगीत स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे बऱ्याच विचाराअंती त्यांनी रंगभूमीवर जाण्याचा निर्णय घेतला आणि तो त्यांच्या जगण्यात खरा आनंद निर्माण करणारा ठरला. उत्तम मैफली गवई होण्याची क्षमता असतानाही गोखले यांनी रंगभूमीला आपलेसे केले. रंग लावून रंगमंचावर जाताना त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या गळ्यातील गाणे त्यांना सतत साद घालत होते. त्यामुळे शिलेदार कुटुंबातील जयराम, जयमाला, कीर्ती, दीप्ती यांच्यासारख्या तालेवार कलावंतांबरोबर काम करताना आपली गायन साधनाच आपल्याला मदत करू शकणार आहे, याची पुरेपूर जाणीव शरद गोखले यांना होती. या सगळ्या कलावंतांबरोबर देशभर दौरे करताना त्यांनी आपली अभिजात संगीताची तालीम बंद होऊ दिली नाही. ज्या काळात संगीत हा प्राधान्याचा विषय असणाऱ्या आकाशवाणीचे शरद गोखले हे नेहमीचे यशस्वी कलावंत ठरले. संगीत रंगभूमीवरील दीर्घ कारकीर्दीबद्दल मिळणारे पुरस्कार हा अविभाज्य भाग होता. परंतु गोखले यांनी संगीतावरील आपले चिंतन सतत सुरू ठेवले. त्यांच्या निधनाने संगीत रंगभूमीवरील एक हुन्नर संपला आहे.
    ------------------------------------------------------------------------------

    पंडित शरद गोखले यांचे निधन

    जयराम शिलेदार यांच्या मराठी रंगभूमी संस्थेतील ज्येष्ठ गायक व अभिनेते पं. शरद घनश्याम गोखले (७१).

    संगीत सौभद्र, स्वयंवर, शाकुंतल, संशयकल्लोळ, स्वरसम्राज्ञी, विद्याहरण, शारदा, कान्होपात्रा, एकच प्याला ही त्यांची नाटके गाजली.

    गोखले ह्यांचा जन्म दि. २६ मे १९४० ला झाला. पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे त्यांनी संगीत अलंकारापर्यंतचे धडे गिरवले.

      August 5, 2017


  • गोविंद सदाशिव आपटे

    ज्योतिर्गणितज्ज्ञ गोविंद सदाशिव आपटे यांचा जन्म २६ जुलै १८७० रोजी झाला.

    त्यांच्या “पंचांग-चिंतामणी” या सूक्ष्म-सारणी ग्रंथामुळे पुढील अनेक वर्षांचे पंचांग तयार करता येते. “सर्वानंद लाघव” हाही त्यांचाच गणित-ग्रंथ.

    Govind Sadashiv Apte

      November 7, 2017