(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • य. गो. जोशी

    य.गो. जोशी यांची ’एक रुपया दोन आणे’ ही पहिली कथा यशवंत या मसिकात १९२९ साली प्रसिद्ध झाली. आणि याच मासिकाच्या कथास्पर्धेत य.गो. जोशींच्या ’शेवग्याच्या शेंगा’ या कथेस पहिले पारितोषिक मिळाले.

  • मिनार पिंपळे

    मिनार पिंपळे यांनी त्यांच बी. एस. डब्ल्यू. व एम. एस. डब्ल्यू चं शिक्षण चर्चगेटमधील निर्मला निकेतन या कॉलेजमध्ये पुर्ण केलं. लहानपणापासूनच त्यांना झोपडपट्यांमधील रहिवाश्यांसाठी काहीतरी भव्य, चांगले काम करण्याची मनी प्रचंड हुरहूर होती. पदव्योत्तर शिक्षण झाल्यानंतर त्यांनी युवा या संघटनेची स्थापना केली. मुंबईमधील झोपडपट्टयांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक उपाय योजना सुचवल्या व प्रत्यक्ष अंमलात सुध्दा आणल्या. परंतु या योजना अंमलात आणण्यासाठी त्यांनी स्थानिक बेरोजगार तरूणांची मदत घेतली. त्यांच्याशी जिव्हाळ्याच नात निर्माण करून त्यांना संघटित केलं. आज त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे व इतक्या वर्षांच्या साधनेमुळे आज अनेक झोपडपट्टयांमध्ये धडाडीच्या तरूणांची पथके उभी राहिली आहेत. हे तरूण स्वतःच या वस्त्यांच्या विकासासाठी अनेक उपाय योजना राबवीत आहेत. त्यांच्या बाहुंना बळ व पाठीला कणा देण्याचे काम मात्र युवाचे स्वयंसेवक करीत आहेत. अनेक तरूणांना गुन्हेगारी मार्गांपासून परावृत्त करून समाजाच्या आदर्श पुर्नरचनेसाठी त्यांना मानसिक व शारिरीक खाद्य पुरविण्यात या संघटनेचा मोलाचा वाटा आहे

  • गोविंद त्र्यंबक दरेकर (कवी गोविंद)

    अभिनव भारत या क्रांतिकारक संस्थेच्या कार्यात सावरकरांना जे सहकारी मिळाले त्यात आणि पुढील काळात सावरकरांनी ज्यांना ‘स्वातंत्र्यशाहीर’ या बिरूदाने गौरविले ते म्हणजे कवी गोविद त्र्यंबक दरेकर. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाचे स्वातंत्र्य हा विषय केंद्रीभूत मानून काव्य करणे, स्वातंत्र्य प्रेमाची सुक्ते आणि वीरतेची सुभाषिते गाणारे कवी गोविद यांचा उल्लेख स्वातंत्र्य शाहरी म्हणून यथार्थ वाटतो.

  • प्रा. राजाराम भोसले

    देशातील पहिला रेडिओ टेलिस्कोपचा प्रयोग यशस्वी करणारे प्रा. राजाराम भोसले यांनी आता कोल्हापुरात वेधशाळा आणि तारांगण उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. सूर्यापासून येणार्‍या रेडिओलहरी, त्यांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, सूर्य व पृथ्वी यांच्यातील अंतराचे मोजमाप अशा विविध विषयांवर त्यांनी देशातच नव्हे तर अमेरिका, कॅनडा तसेच “नासा” च्या प्रकल्पांत संशोधन केले आहे.

    आकाशाशी जडले नाते

  • डॉ. दीप्ती देवबागकर

    जीवतंत्रज्ञानासारख्या आधुनिक विषयातील संशोधनात स्वत:चे आगळे स्थान निर्माण करणार्‍या पुणे विद्यापीठाच्या प्राणीसास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दीप्ती देवबागकर विज्ञान प्रसारकही आहेत. विज्ञान लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. जनुकाचे कामकाज बदलल्यामुळे कॅन्सरच्या पेशंटांवर होणारे परिणाम कसे कमी करता येतील, यावर त्या महत्वपूर्ण संशोधन सध्या करीत आहेत.

    डॉ. दीप्ती देवबागकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला विज्ञानप्रसाराचा डीएनए हा लेख पुढील पानावर वाचा.

    डॉ. दीप्ती देवबागकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला विज्ञानप्रसाराचा डीएनए हा लेख वाचा.

    devbagkar-dipti-modified

  • अरविंद देशपांडे

    अरविंद देशपांडे यांच्या बरोबरचा सुलभा देशपांडे याचा संसार हा दोघंही नाटकात असल्याने कधी गंभीर, तर कधी गमतीदार असायचा. कारण अरविंद कधी दिलेली वचनं पाळत नसत. मग दर वाढदिवसाला एक चिठ्ठी सुलभाताईंना मिळे. ‘मी तुझं देणं लागतो. एक सिल्कची साडी.’

  • शिवराम महादेव परांजपे

    “काळ” साप्ताहिकाचे संस्थापक, वा “काळ-कर्ते” ही निबंधकार, पत्रकार, साहित्यिक-समीक्षक, फर्डे वक्ते शिवराम महादेव परांजपे यांची ओळख.

  • डॉ. शिवाजीराव पटवर्धन

    विदर्भातील थोर सामाजिक कार्येकर्ते व कॉंग्रेसचे निष्ठावंत सेवक.

  • माणिक सीताराम गोडघाटे (कवी ग्रेस)

    “इन्ग्रिड बर्गमन“ या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन माणिक गोडघाटेंनी “ग्रेस” हे साहित्यिक नाव धारण केले होते. मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसर्‍या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते. १९७१ ते १९७६ या काळात दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे ते सदस्य होते, तर “महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा”चे १९८२ ते १९८६ या काळात ते सदस्य होते.

  • जिश्नू संन्याल

    जिश्नू संन्याल हे क्रिडाक्षेत्राला लाभलेलं ठाण्यातील रत्न असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन खेळाद्वारे स्वत:चे व पर्यायाने ठाणे शहराचे नाव उज्ज्वल करणारे व्यक्तिमत्व आहे.