मुकेश माचकर

मुकेश माचकर हे महाराष्ट्र टाईम्स, केसरी, प्रहार, अशा नामांकित वृत्तपत्रांमधुन नियमीत स्तंभलेखन व प्रासंगिक लेखन करणारे तरूण पत्रकार आहेत. पत्रकारिता व लेखन या दोन्ही विभिन्न भुमिका समर्थपणे निभावताना त्यांनी त्यांची स्वतःची अशी अगदी वेगळी व मार्मिक अशी शैली निर्माण केल्यामुळे त्यांची गणती आज भारतातल्या निवडक काही जबाबदार व लोकप्रिय पत्रकारांमध्ये होते.



मुकेश माचकर हे महाराष्ट्र टाईम्स, केसरी, प्रहार, अशा नामांकित वृत्तपत्रांमधुन नियमीत स्तंभलेखन व प्रासंगिक लेखन करणारे तरूण पत्रकार आहेत. पत्रकारिता व लेखन या दोन्ही विभिन्न भुमिका समर्थपणे निभावताना त्यांनी त्यांची स्वतःची अशी अगदी वेगळी व मार्मिक अशी शैली निर्माण केल्यामुळे त्यांची गणती आज भारतातल्या निवडक काही जबाबदार व लोकप्रिय पत्रकारांमध्ये होते. कोणताही मराठी संबंधीचा प्रश्न असो वा भारतावर ओढविलेले संकट असो, अशा नाजूक वेळी त्यांची तडफदार व निडर लेखणी नेहमीच तळपली आहे. देशातील कुठल्याही घटकावर जाणीवपुर्वक अन्याय होत असताना त्यांच्या लेखणीने आजवर कधीच मौन बाळगलेले नाही.

माचकरांचा जन्म पुणे येथे झाला, व आपटे प्रशाला येथे त्यांच्या बालपणाची संवेदनशील घडण झाली. फर्ग्युसन कॉलेज पुणे तसेच रानडे इन्स्टिट्युट मध्ये महाविद्यालयीन व पत्रकारितेचे पदवी प्रशिक्षण घेतल्यानंतर, ते प्रहार व महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रांमधुन राजकीय विषयांवरची सदरे लिहायला लागले, व वाचकांना देशाचे राजकीय स्वरूप व चालु घडामोडींबद्दल जागृत करायला लागले. त्यांची खुमासदार व राजकारण्यांचे सरळ शब्दांमध्ये वाभाडे काढण्याची शैली इतकी प्रसिध्द झाली की राजकारण्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आणणारा आरसा अशी जनमानसात त्यांची प्रतिमा झाली. सध्या मुकेश माचकर हे प्रहार या उगवत्या मराठी वृत्तपत्राचे संपादक म्हणून आपली चमक दाखवित आहेत. सडेतोड लेखन ही त्यांची कधीही पुसली जाऊ न शकणारी ओळख आहे.

महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवानिमीत्त जेव्हा टाईम्स ऑफ इंडिया च्या मुंबई आवृत्तीमध्ये त्याबद्दल कुठलेच वृत्त प्रकाशित केले गेले नव्हते तेव्हा इतर सगळी वृत्तपत्रे मुग गिळुन गप्प बसलेली असताना त्यांनी टाईम्स ऑफ इंडिया चा मराठीद्वेश या मथळ्याखाली सामान्य जनतेमध्ये संतापजनक जागृतीची लाट आणली होती. असे फारच कमी राजकीय वाटा असतील जिथे त्यांची तेजस्वी लेखणी अजुनपर्यंत जावू शकलेली नाही.

Author