(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सुप्रिया पिळगांवकर

    चित्रपट, दूरचित्रवाणी, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांचे माहेरचे नाव सुप्रिया सबनीस. सुप्रिया पिळगांवकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९६७ रोजी झाला.

    सुप्रियाचा रंगभूमीवरचा प्रवेश मधुकर तोरडमलांच्या 'म्हातारे अर्क बाईत गर्क' ह्या व्यावसायिक नाटकाने झाला. त्याच दरम्यान सुप्रिया दूरदर्शनवर 'किलबिल' ह्या मुलांसाठीच्या कार्यक्रमात म्हातारीची भूमिका करत होती. योगायोगाने सचिनच्या आईच्या नजरेत ही 'तरुण' म्हातारी भरली आणि त्यांनीच सचीनकडे त्याच्या नवीन चित्रपटाच्या नायिकेसाठी सुप्रियाची शिफारस केली. सुरुवातीच्या नकारानंतर आई वडिलांनी सुप्रियाला चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली आणि सुप्रियाने 'नवरी मिळे नव-याला' द्वारा मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. चित्रपटादरम्यान दोघांमधे नाजूक बंध गुंफले गेले आणि प्रत्यक्षातली नवरी नव-याला मिळाली.

    १९८५ साली सचिन-सुप्रियाच्या सहजीवनाला सुरवात झाली. पहिल्या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनयाचे 'फिल्मफेअर' पुरस्कार मिळूनही सुप्रिया फारशी चित्रपटात दिसली नाही.

    मराठीसृष्टीवरील सुप्रिया पिळगांवकर यांच्यावर लिहिलेला संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

    ## Supriya Pilgaonkar

      August 17, 2017


  • वसंत बापट

    (25 जुलै 1922 ते 27 सप्टेंबर 2002)

    प्रा. वसंत बापट यांचा जन्म 1922 रोजी सातारा जिल्हयातील कह्राड येथे झाला. तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या स.प. महाविद्यालयात झाले. त्यानंतर `नॅशनल कॉलेज आणि `रामनारायण रूईया कॉलेज` हया महाविद्यायलयातुन मराठी व संस्कृत हया विषयाचे प्राध्यापक होते. 1974 पासून मुंबई विद्यापिठातील गुरूदेव रविंद्र टागोर अध्यासनाचे प्राध्यापक होते. साहित्य अकादमीचे सदस्य होते. प्रा. वसंत बापट हे स्वांतत्र्य चळवळीतही सहभागी झाले होते. 1942 च्या चलेजाव चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण भुमिका बजावली होती. ऑगस्ट 1943 ते जानेवारी 1945 पर्यंत ते तुरूगांत होते. 1947 ते 1982 ते पर्यंत ते मुंबई विद्यापिठात ते प्राध्यापक होते. 1983 ते 1988 ते साधनाचे संपादक होते. राष्ट्रसेवा दलाशी ते सलंग्न होते. 1972 साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

    लहानपणापासून बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि सानेगुरूजींच्या सहवासाचे संस्कार झाले. `बिजली` हया पहिल्या काव्यसंग्रहावर हया संस्काराचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. `अकरावी दिशा` , `सकीना` आणि `मानसी` हे त्यांचे बिजली नंतरचे काव्यसंग्रह होते. त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहील्या.

    प्रा. वसंत बापट यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.

    मराठी कवी वसंत बापट (29-Jul-2017)

    मराठीतील कवी वसंत बापट (17-Sep-2017)

    ज्येष्ठ कवी वसंत बापट (17-Sep-2021)

      June 8, 2015


  • प्रमोद व्यंकटेश महाजन

    स्व. प्रमोद व्यंकटेश महाजन हे भारतीय जनता पक्षातील (भाजप) दुसर्‍या पिढीतील महत्त्वाचे नेते होते. भारताच्या पंतप्रधानपदावर जाण्याची योग्यता असलेला अलिकडच्या काळातील एकमेव मराठी नेता अशी त्यांची प्रतिमा होती.

      April 21, 2011


  • रघुनाथराव ऊर्फ भाऊसाहेब चितळे

    दूध-खवा-चक्का या गोष्टींना पुणेकरांनी दिलेला प्रतिसाद पाहता मोठी मागणी पूर्ण करायची असेल तर स्वतंत्र दुकान हवे हे ओळखून भाऊसाहेबांनी १९५० मध्ये शनिपार येथे आणि चारच वर्षांनी डेक्कन जिमखान्यावर ‘चितळे बंधू मिठाईवाले’ची स्थापना केली.

      July 20, 2022


  • संगीतकार अवधूत गुप्ते

    नादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. त्यानंतर ‘सारेगपम’ या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही ते गाजले.

      June 8, 2017


  • राजे मालोजीराजे नाईक निंबाळकर

    मालोजीराजे कोल्हापुरात शिकत असताना त्यांनी कोल्हापूर संस्थानातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुरोगामी सुधारणांचा कारभार पहिला होता. समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेतील शिक्षणाचे महत्त्व त्यांनी जाणले होते.

      July 26, 2022


  • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी (तर्कतीर्थ)

    लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी हे मराठी लेखक, कोशकार, सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते.

    त्यांचा जन्म २७ जानेवारी १९०१ रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर इथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले.त्यांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा व राज्य ग्रंथ पुरस्कारांची सुरूवात केली. त्यांना १९५५ साली 'वैदिक संस्कृतीचा विकास' साठी पहिला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शिवाय त्यांना १९७३ साली राष्ट्रीय संस्कृत पंडित पुरस्काराने तर १९७६साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

    १९५४ साली दिल्ली येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९६० ते १९८० दरम्यान त्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. ते महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक महामंडळ पहिले अध्यक्ष होते.मराठी विश्वकोशाचे ते आद्य संपादक आहेत.प्रा. रा.ग. जाधवांनी 'शास्त्रीजी' हा तर्कतीर्थांच्या कार्याचा परिचय देणारा ग्रंथ लिहिला आहे. त्यांचा मृत्यू २७ मे १९९४ रोजी झाला.

    त्यांचे प्रकाशित झालेले साहित्य

    वैदिक संस्कृतीचा विकास
    मराठी विश्वकोश (संपादन)
    धर्मकोश (एकूण १६ खंडांचे संपादन)
    विचार शिल्प
    आधुनिक मराठी साहित्य
    समीक्षा आणि रस सिद्धांत
    हिंदू धर्मसमीक्षा
    श्रीदासबोध
    राजवाडे लेख संग्रह (संपादन)
    उपनिषदांचे भाषांतर
    संस्कृत संहितेचे वर्गीकरण (Catalogue of Sanskrit Scripts)

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

      September 12, 2015


  • उर्मिला कानेटकर कोठारे

    ‘मला आई व्हायचंय’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमातून घराघरात ओळखली जाणारी प्रतिभावंत अभिनेत्री म्हणजे उर्मिला कानेटकर. तिचा जन्म ४ मे १९८६ रोजी पुणे येथे झाला. उर्मिला ही एक उत्तम अभिनेत्री आहे सर्वांना माहित आहे मात्र ती एक उत्तम क्लासिकल डान्सर असल्याचे फार कमी चाहत्यांना माहित असेल. प्रसिद्ध कथ्थक गुरू आशा जोगळेकर यांच्याकडे उर्मिलाने कथ्थकचे शिक्षण घेतले आहे. उर्मिला ओडिसी नृत्यशैलीचेही शिक्षण सुजाता महापात्रा यांच्याकडून घेतले आहे. गांधर्व महाविद्यालयाची नृत्यालंकार ही पदवी तिने प्राप्त केली आहे. ‘श्रृंगारमणी’ हे टायटल सुद्धा मिळालं आहे. अभिनयासोबतच ती क्लासिकल डान्स शिकवण्याचे सुद्धा काम करत असते.

    उर्मिला कानेटकर कोठारे हिच्यावरील संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

    # Kanetkar-Kothare, Urmila

      June 5, 2017


  • अजय-अतुल (गोगावले)

    अजय-अतुल (गोगावले)

    अगदी मराठी-हिंदीच्या पलीकडेही जाऊन तेलुगू चित्रपट गीतांनाही त्यांनी संगीत दिलं आहे. सैराट मधील ‘याड लागले‘, “झिंगाट‘, “सैराट झालं जी‘, “आत्ताच बया‘ या चारही गाण्यांनी सर्वांनाच “याड‘ लावलं.

      June 17, 2022


  • महादेव मोरेश्वर कुंटे

    मराठीखेरीज संस्कृत व इंग्रजी भाषांत ग्रंथरचना, काव्यरचना करणारे आणि गुजराती, सिंधी, लॅटिन, फारसी व संस्कृत या भाषांचे जाणकार महादेव मोरेश्वर कुंटे यांचा जन्म १ ऑगस्ट १८३५ रोजी झाला.

    सोप्या मराठीत “राजा शिवाजी” हे वीररसप्रधान महाकाव्य त्यांनी लिहिले.

    “व्हिसिसिट्यूडस ऑफ आर्यन सिव्हिलायझेशन इन इंडिया” या त्यांच्या प्रबंधाला रोमच्या विद्वत्परिषदेने घेतलेल्या स्पर्धेत बक्षीस मिळाले होते.

    Mahadeo Moreshwar Kunte

      November 7, 2017