रितेश देशमुखची निर्मिती असलेल्या आणि चित्रपटसृष्टीत लक्षवेधी ठरलेल्या ‘यलो’ चित्रपटला यंदाच्या ६१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात विशेष परिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गौरी गाडगीळ या विशेष मुलीच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘यलो’ चित्रपटाने सर्वांचे लक्षवेधून घेण्यास भाग पाडले.
August 2, 2022
December 15, 2010
प्रमोद हिंदूराव यांनी लोकप्रतिनिधी या आपल्याला मिळालेल्या समाजसेवेच्या सुवर्णसंधीचा पुरेपूर फायदा उचलला आहे. ठाणे जिल्हा परिषदेने प्रथम त्यांच्या नेतृत्वाखाली, ठाणे जिल्ह्यामध्ये शिक्षण परिषद उत्तम प्रतिसादामध्ये घेतली होती. शिक्षण, महिला सक्षमीकरण, रस्ते विकास, आरोग्य संवर्धन, सांस्कृतिक, सामाजिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेली विकासकामे अतुलनीय आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यामधील अभिजात व निरागस कलेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांनी सुरू केलेली निबंध व चित्रकला स्पर्धा अवघ्या जिल्ह्यात चर्चिली गेली.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणार्या मुलांना उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात म्हणूने त्यांनी अफाट कार्य केले आहे. शाळांमधून बाक सुविधा, तसेच मोफत गणवेष वाटप, दप्तर वाटप, शूज-रेनकोट वाटप ही त्यांची उपलब्धी मानावी लागेल. जिल्हा नियोजन समितीमार्फत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणार्या गावठाणचे विस्तारीकरण करण्याबाबतची मागणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून त्यांनी केलेली आहे. विशेष म्हणजे आरोग्याच्या प्रगत सेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी केलेला “मोबाईल ओ.पी.डी.” हा अभिनव उपक्रम फारच यशस्वी झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना प्रगत आरोग्य सेवा उपलब्ध झाल्या आहेत.
याशिवाय रेल्वे प्रवाशांचे प्रश्न रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी रेल्वे परिषदेचे आयोजन ते सतत करीत होते. त्याच अनुषंगाने माळशेज रेल्वे सुरू करण्याबाबत जागृत रेल्वे प्रवासी परिषदेमार्फत दिल्ली येथे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सहाय्य रेल्वे बोर्डाकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेवून या प्रलंबित प्रस्तावाबाबत चर्चा केली होती.
त्यांनी सिडकोचे अध्यक्षपदह भूषविले आहे.
January 3, 2015
विकासाची दृष्टी असणारे आणि त्यासाठी अथक वेळ देणारे शिस्तीचे नेते म्हणून त्यांनी ओळख आहे. सर्वाचेच ऐकायचे हा त्यांचा स्वभाव असला तरी कुणाचे आणि कोणते काम करायचे याबाबत मात्र ते कमालीचे जागरूक असल्याचे मानले जाते.
July 26, 2022
एखाद्या मोठ्या साम्राज्याची स्नुषा होणं आणि त्या स्थानाचा अधिकार पेलणं ही गोष्ट सोपी नाही. त्यात महाराणी ताराबाई या साक्षात शिवछत्रपतींच्या स्नुषा. तेव्हा ही जबाबदारी पेलणं म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखं.
January 22, 2010
महाविद्यालयीन काळात सलग पाच वर्षे पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सहभाग आणि अनेक बक्षिसे पटकाविली आहेत. त्याच काळात महाराष्ट्र आणि बाहेरील मिळून एकूण ६५ वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविले आहेत. राज्य नाट्य स्पर्धेत ८ वर्ष सहभाग आणि अनेक बक्षिसे मिळवत २२ हौशी नाटकातून त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.
August 2, 2022
राजाभाऊ या नावाने परिचित असेलेले प्रा. राजेंद्र विठ्ठल शिरगुप्पे यांची नाटककार, कवी, साहित्यिक म्हणूनही ओळख आहे. कोल्हापूर. सावंतवाडी, गडहिंग्लज येथे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.
निपाणी येथील महिला बिडी कामगार व शेतकर्यांच्या तंबाखू आंदोलनापासून ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले. शिरगुप्पे यांचे “सडक” हे नाटक व त्यातील कविता आजही आंदोलकांच्या तोंडी आहेत.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीशी ते गेली दहा वर्षे जोडले गेले आहेत. धरणग्रस्त, देवदासी प्रथा निर्मूलनाच्या लढ्यातही ते सहभागी झाले होते. त्यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांत भाग घेतला आहे. नाट्यलेखन व दिग्दर्शन म्हणून त्यांची अनेक नाटके गाजली आहेत.
तुकोबांच्या पत्नीच्या जीवनावरील “तिच्या नवर्याचे वैकुंठगमन”, “कपान”, “होते कुरुप वेडे”, “उंटावरचा शहाणा”, “आम्ही क्रांतिसिंह आहोत”, “हा आणि बारावा” अशी नाटकांचे लेखनही त्यांनी केले.
किशोर, मासिक ऋग्वेद, लोकमत वगैरेंमध्येही त्यानी विपुल लेखन केले आहे. हिंदू-मुस्लिम समस्येवर आधारित “षड्यंत्र” या माहितीपटाची निर्मितीही त्यांनी केली होती. बसवाण्णांच्या तत्वज्ञानाचे ते गाढे अभ्यासक आहेत.
सांगली येथे झालेल्या दहाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद राजाभाऊ शिरगुप्पे यांनी भुषविले आहे.
## Shirguppe, Rajendra Vitthal (Rajabhau Shirguppe)
## Shirguppe, (Prof) Rajendra Vitthal
January 14, 2016
श्रीपादशास्त्री किंजवडेकर हे हिंदू धर्माच्या विविध पैलूंचे आणि योगशास्त्राचे अभ्यासक होते. मुक्ताबाईच्या ताटीच्या अभंगांचे संपादन त्यांनी केले. तसेच 'भक्तीच्या वाटा' हे सुगम पुस्तकही त्यांनी लिहिले. रुद्रार्थदीपिका, परिव्राजकाचार्य आदी त्यांची पुस्तके अभ्यासूंसाठी उपयुक्त ठरली. त्यांच्या अशा पुस्तकांची यादी बरीच मोठी आहे.
श्रीपादशास्त्री किंजवडेकर यांचे २१ ऑक्टोबर १९७७ रोजी निधन झाले.
## ShripadShastri Kinjavadekar
July 31, 2017
नितीन अंबाळे हा 28 वर्षीय तरूण, मराठी रंगभुमिवरील विवीध प्रकारांना स्पर्श करून आलेला अष्टपैलु कलाकार आहे. दिग्दर्शन, स्क्रीन प्ले, अभिनय, कथालेखन, संहितालेखन अशा सर्व प्रकारामध्ये त्याने असामान्य कौशल्य व अनुभव प्राप्त केला आहे.
August 16, 2011
व्यावसायिक व उद्योग वर्तुळात व्ही.आय.पी मॅन म्हणुन प्रसिध्द असलेल्या आणि व्ही.आय.पी ब्रॅंडचे सर्वेसर्वा जयकुमार पाठारे यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखं पण तितकंच प्रेरणादायी आहे. कोल्हापूरात एका मध्यमवर्गीय कुटंबात जन्मलेल्या जयकुमार यांच्या वडिलांचं निधन जयकुमार लहान असतानाच झालं.
June 26, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti