कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या महाराष्ट्र राज्य कॉन्सिलचे अध्यक्ष या नात्याने निनाद कर्पे हे भावी सीईओ घडविण्याचे आणि उद्दमशीलतेला प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत आहेत. सॉफ्टवेअर क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी भारतात आणून त्याच्याशी निगडित अनेक व्यवसायांची ओळख त्यांनी उद्दम जगताला करून दिली...
उद्दमशीलतेचा उमेदबिंदू
July 24, 2015
वेधस पंडित म्हणजे मराठी माणसाच्या तंत्रज्ञानावरील प्रभुत्वाला अधोरेखित करणारा, व भारताचा झेंडा अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये डौलाने फडकविणारा एक कर्तुत्ववान तरूण आहे. बालमोहन विद्यामंदिर येथे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या वेधसला लहान्पणापासूनच प्रत्येक गोष्टीला स्वतःचा वेगळा स्पर्श देण्याची सवय होती. रामनारायण रूईया, सी. ओ. इ. पी., व आय. आय. टी. अशा मुंबईमधल्या व पुण्यामधल्या नामांकित, व व्यक्तिस्वातंत्र्याला चालना देणार्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतल्यामुळे त्याच्यातील, सतत नाविन्याच्या शोधात असलेल्या तंत्रज्ञाला चांगला व रेखीव आकार मिळाला.
August 16, 2011
छत्रपती शिवाजी महाराजांचे एक अत्यंत विश्वासू सरदार. महाराजांसाठी जीवाची बाजी लावणारे बाजी प्रभू देशपांडे पावनखिंडीत शत्रूचा मुकाबला करताना धारातिर्थी पडले.
April 21, 2010
माती बरोबरच माणसांच्या मनांची मशागत करणारा नेता. राजकारणाच्या पुढे जाऊन कला, क्रीडा, शिक्षण, कृषी सहकार या क्षेत्रांची सखोल जाणीव.
August 30, 2010
सुप्रसिध्द नामधारक, श्री.गोंदवलेकर महाराजांचे भक्त प्रा. के. वि. बेलसरे यांना एम. ए.ची पदवी देणारे श्री. गुरूदेव रा. दा. रानडे हे ‘साक्षात्कार‘ या विषयाचे परमार्थाचे पायाशुध्द व्याकरण तयार करणारे स्वतः साक्षात्कारी पुरूष होते. पाश्चिमात्य राष्ट्रांत डॉ. अंडरहिल व पौर्वात्य राष्ट्रांत गुरूदेव रानडे हे योगी अरविंद, रामकृष्ण परमहंस या कोटीतले पुरूष होते. वैज्ञानिकाला अणुरेणू जेवढे महत्त्वाचे वाटतात, त्याप्रमाणे ‘साक्षात्कार‘ विद्येला ईश्वराचे अस्तित्व हे एक पारमार्थिक वास्तव प्रिय असते.
३ जुलै, १८५६ साली कर्नाटकातील जामखिंडी गावात त्यांचा जन्म झाला. मुलाने शिकावे, मिळवते व्हावे, सुखाने संसार करावा हे तत्कालीन नीतीपाठ त्यांनाही मिळाले. पुण्यातील परशुराम हायस्कूलमधून ते मॅट्रिकच्या परीक्षेत जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवून मुंबई युनिव्हर्सिटीत दुसरे आले. डेक्कन कॉलेजात प्राचार्य बेन व प्रा. वुडहाऊस या थिऑसॉफिस्ट प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या पहिल्या-दुसर्या वर्षीच्या परिक्षेत पहिल्या श्रेणीत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. गणित विषयात ते दुसर्या वर्गात बी.ए. झाले. अशातच त्यांना क्षयाची बाधा झाली. ‘जातो तो दिवस आपला‘ असे जीवन ते जगू लागले. तरीही एम. ए. परीक्षा ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले.
प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्यांनी ‘निबाळ‘ हे आपले खेडेगाव गाठले. अकादमी ऑफ फिलॉसॉफी अंॅड रिलिजन नावाचे अध्यात्मपीठ त्यांनी स्थापन केले. अॅनी बेझंट यांच्याशी त्यांची भेट झाली होती. गुरूदेवांच्या कृपाछत्राखाली तुम्ही सुखरूप आहात, हा आशीर्वाद त्यांनी दिला होता. पण अलाहाबादला कुलगुरू जगन्नाथ झा यांनी त्यांना विद्यापीठात तत्त्वज्ञान विषयाचे प्रमुख म्हणून बोलावले. विद्यापीठात १९२७ ते १९४६ पर्यंत प्राध्यापक , डीन, कुलगुरू इ. पदे त्यांनी भूषविली, तरी ‘साक्षात्कार‘ हा त्यांचा अनुभवविषय होता. ‘मिस्टिझम‘ हा मौनवाचक शब्द. ते सदा त्याच अवस्थेत असत. त्याचे संशोधन, विवरण, आकलन आणि प्रतिपादन हा त्यांचा स्थायी स्वभाव होता. ‘विश्वाचा मध्यबिंदू हा त्यांचा लेख जगभर गाजला .भूगर्भशास्त्रज्ञ पृथ्वीला मध्यबिंदू मानतात. तसा ईश्वर हा जगाचा मध्यबिंदू आहे पण ब्रांडाला परीघ नाही, हा त्यांचा सिध्दांत होता, पण तो आध्यात्मिक अनुभूतीवर आधारलेला आहे.
तासनतास ते भावसमाधीत स्थिरावत. दि. ६ जून, १९५७ मध्ये ते त्या समाधीत स्थिरावले. ‘परमार्थ‘ हा मंदबुध्दीच्या व अनीतीमान व्यक्तींसाठी नसतो. आत्मज्ञान, आत्मदर्शन, आत्मसाक्षात्कार या सर्व पारमार्थिक संज्ञा आहेत. त्या समजण्यासाठी सदाचरणी सत्योपासना हेच साधन आहे.
March 12, 2015
वृत्तवाहिन्यांवर राजकीय विश्लेषक म्हणून त्यांनी ठसा उमटविला होता. पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या दीक्षित यांची सडेतोड राजकीय विश्लेषक म्हणून ख्याती होती. अचूक आणि निष्पक्ष मांडणी हे त्यांचं वैशिष्ट्ये होतं. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं होतं.
June 18, 2022
जागतिक कीर्तीचे चित्रपट-कलादिग्दर्शक, चित्रपटदिग्दर्शक व निर्माता नितिन चंद्रकांत देसाई यांचा जन्म ६ ऑगस्ट १९६५ रोजी झाला.
नितिन चंद्रकांत देसाई यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले आहे. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला विद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले.१९८७ सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली.
प्रतिभा, प्रयत्न आणि प्रज्ञा या त्रयीच्या जोरावर आपले अढळ स्थान निर्माण करणारे नाव म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई!
एका चाळकरी मध्यमवर्गीय मुलानं रुपेरी पडद्यावर हालचाल करणारी चित्रं पाहिली, त्यामागचे भव्य सेटस् पाहिले आणि ते सारं मोहमयी वातावरण पाहताना आपणही असंच माणसाला मोहवून टाकणारं भव्य काही तरी निर्माण केलं पाहिजे असं मनाशी ठरवूनही टाकलं. अडीच खणांच्या खोलीत राहणाऱ्या माणसानं अडीच दशकांनंतर मुंबई-पुणे महामार्गावर चौक-कर्जत रस्त्यावर अडीचशे एकरात ते भव्य स्वप्न साकारलं- एन् डी स्टुडिओ! आज देशातील अग्रगण्य स्टुडिओमध्ये या स्टुडिओची गणना होते.
नितीन देसाई हे भारतीय चित्रपटसृष्टीमधील एक महत्वाचे नाव. गेल्या शतकातील ऐंशीच्या दशकापासून हे नाव छोट्या पडद्याला व मोठ्या पडद्याला आपलं रुपडं देत आलं आहे. भारतातील प्रत्येक मोठा चित्रपट किंवा दूरदर्शनवरील प्रकल्प हा नितीन देसाई यांच्या कलादिग्दर्शनाने सजत असतो. भारत की खोज सारखी ऐतिहासिक महत्वाची मालिका असो किंवा लगान सारखा अफाट चित्रपट असो. त्या प्रकल्पावर नितीन देसाई हे असणारच! त्यांनी पंधरा वर्षांपूर्वी खालापूर तालुक्यातील चौकजवळ हा स्टुडीओ उभारायला घेतला. एक भव्य स्वप्न सृष्टी येथे आकाराला येऊ लागली. हा स्टुडिओ मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरांपासून समान अंतरावर आणि हमरस्त्याला लागून आहे.
शेजारीच मोरबे धरणाचा सुंदर परिसर, सह्याद्रीच्या डोंगररांगा, वळणदार रस्ते, सहकार्याला कायम उत्सुक असणारे गावकरी आणि नयनरम्य पार्श्वभूमी ही या स्टुडिओची खासियत आहे. आज खालापूर कर्जतचे नाव एक कलापूर या नात्याने सर्वदूर पसरण्यात एन् डी स्टुडिओचा फार मोठा सहभाग आहे. स्टुडिओमुळे खरंतर या संपूर्ण परिसरातील अर्थकारण आणि समाजकारण बर् यापैकी बदललं आहे. या परिसरात भारतातील छोटे मोठे सर्व कलाकार येतात, हजारो जणांना रोजगार मिळतो, याबरोबरच एका व्यवसायाला जोडून अनेक नवनवे जोडधंदे सुरू होत जातात.
एकूणच सारा भाग हा जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे अनेक कंपन्या बंद पडत असताना, एन् डी स्टुडिओमुळे काही प्रमाणात सावरला गेला आहे. आमीर खानचा द रायझिंग हा येथे चित्रित केला गेलेला पहिला भव्य चित्रपट. त्यानंतर या स्टुडिओने मागे पाहिले नाही. मधुर भांडारकर यांचा गाजलेला ट्रॅफिक सिग्नल हा त्यानंतरचा महत्वाचा चित्रपट. १८५७ चा भारला गेलेला कालखंड असेल किंवा मुंबईची अफाट गर्दी वाहून नेणारा गजबजलेला हमरस्ता असेल, तो तेथे साकारला गेला. जोधा अकबर सारखा पिरियड ड्रामा असणारा चित्रपटही येथेच चित्रित झाला. आग्र्याचा भव्य किल्ला येथे दिमाखाने त्यातील सर्व बारकाव्यांसह स्टुडिओमध्ये उभा केला गेला.
ग्रेट कॉमेडी सर्कस, बिग बॉससारख्या अनेक लोकप्रिय आणि भव्य मालिकांचे निर्माण येथे झाले आहे. राजा शिवछत्रपति सारखी भारतीय दूरचित्रवाणीमधील आजवरची सर्वात भव्य मालिका जवळपास संपूर्णपणे येथेच चित्रित झाली. छत्रपतींची राजधानी, त्यांचा दरबार, राजगड, पन्हाळा, रायगड, शिवनेरीसारखे किल्ले उभे केले गेले, आणि ते आजही मालिका संपून गेल्यानंतर त्याच दिमाखात जतन केले गेले आहेत. यासंदर्भात बोलताना श्री नितीन देसाई म्हणाले की, हे सर्व सेट आम्ही निर्माण केले पण ते आम्ही मोडणार नाही, ते तसेच जतन करून ठेवणार, या प्रत्येक सेटला एक ऐतिहासिक महत्व आहे याची जाणीव आम्हाला आहे.
भारतीय कलाइतिहासाची ही सोनेरी पाने आहेत. हा स्टुडिओ म्हणजे लवकरच एक पर्यटन स्थळ म्हणून आम्ही विकसित करणार आहोत. आज अनेकदा ही मयसृष्टी आणि सर्वसामान्य माणसं यांच्यात अंतर पडलेले आपणांस जाणवते. हे अंतर या निमित्ताने कमी होईल आणी कलावंताबद्दलच्या आकर्षणाबरोबरच या कलावंताला आपली कला जोपासायला, पडद्यावरील आपली व्यक्तिरेखा साकारताना किती प्रकारचे कष्ट उपसावे लागतात याची नम्र जाणीव आम्ही करून देऊ शकू. एका दृष्टीने ते लोकशिक्षणच असेल.
आमच्या स्टुडिओमध्ये एकाच वेळी शेकडो कलावंतांची, सहयोगी तंत्रज्ञांच्या राहण्याची, जेवण्याची, अखंड विद्युत पुरवठ्याची आम्ही सोय करू शकतो. आज आमच्या कंपनीचं प्रचंड मोठं असं कार्यालय पवई येथे आहे. एका सामान्य कुटुंबात मी जन्माला आलेलो असल्यामुळे मला माझ्यासारखी परिस्थिती असणाऱ्या लोकांसमोर विनम्र असं उदाहरण ठेवता येतं आहे यासाठी मी परमेश्वराचा आभारी आहे. एन् डी स्टुडिओने आता स्वत:ची कंपनी स्थापन करून नव्या दूरचित्रवाणी मालिका, नवे चित्रपटही घडवायला सुरुवात केली आहे.
राजा शिवछत्रपति या मालिकेच्या निर्मितीबरोबरच तुफान गाजलेल्या महाराणी पद्मिनी, झाशीची राणी या मालिकांची निर्मिती एन् डी स्टुडिओने केली आहे. जगातील सात आश्चर्ये येथे उभी करून ज्यांना ज्यांना ही आश्चर्ये पहाणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी त्या सात आश्चर्यांच्या प्रतिकृती येथे उभारल्या जातील, येथे एक जागतिक दर्जाचं म्युझियम बनविण्याचा श्री देसाई यांचा मानस आहे.
एन् डी स्टुडिओ हे एका सामान्य परिस्थितीमध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीनं आपल्या जिद्द, चिकाट आणि कला यांच्या सहाय्याने साकारलेलं सत्य-स्वप्न आहे! नितिन देसाई यांच्यावर ‘आधुनिक युगाचा विश्वकर्मा: नितीन चंद्रकांत देसाई’
लेखक मंदार जोशी. हे पुस्तक सकाळ प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.
नितीन देसाई हे व्यक्तिमत्व एकूणात ‘नाही रे’ वर्गाला भुरळ घालणारं व्यक्तिमत्व आहे. खिशात काहीही नसताना, वरळीच्या चाळीत राहणार्याव एका सर्वसामान्य परिस्थितीतील बँक कर्मचाऱ्याचा हा मुलगा पुढे अवघ्या अडीच दशकात जागतिक कीर्तीचा कर्तबगार कलादिग्दर्शक, प्रॉडक्शन डिझायनर बनतो, १०० एकरांच्या एन्. डी. स्टुडिओचा मालक कसा बनतो याचा शोध हा मराठी मनाच्या कुतुहलाचा विषय आहे आणि हे कुतुहल शमविणारं हे पुस्तक आहे.
चित्रपटदिग्दर्शक व निर्माता नितिन चंद्रकांत देसाई (6-Aug-2021)
दिग्दर्शक नितीन देसाई (6-Aug-2017)
#NitinChandrakantDesai
May 5, 2022
राजा बढे हे नावाप्रमाणंच राजा-माणूस होते. राजा बढे हे नामवंत गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे कवी… रुबाबदार,प्रसन्न व्यक्तिमत्त्व, राजस छबी, कुसुमकोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमलवृत्तीचा हा प्रतिभासंपन्न कवी, पण मनात देशभक्तीचा स्फुलिग सांभाळणारा राष्ट्रप्रेमी म्हणजे राजा बढे.
July 25, 2022
May 25, 2010
महाविद्यालयीन काळात सलग पाच वर्षे पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सहभाग आणि अनेक बक्षिसे पटकाविली आहेत. त्याच काळात महाराष्ट्र आणि बाहेरील मिळून एकूण ६५ वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविले आहेत. राज्य नाट्य स्पर्धेत ८ वर्ष सहभाग आणि अनेक बक्षिसे मिळवत २२ हौशी नाटकातून त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.
August 2, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti