(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ऐश्वर्या साखरे

    अॅक्टिंग , डान्स , जिमनॅस्टिक , मल्लखांब अशी चौफेर आवड जपत , अभ्यासही तितक्याच कुशलतेने सांभाळणारी ' ऐश्वर्या साखरे '

    रुईया कॉलेजला बीएच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या ऐश्वर्याने लहानपणापासूनच नृत्याचे धडे गिरवायला सुरुवात केली. तिने डॉ.संध्या पुरेचांकडे भरतनाट्यमचं शिक्षण घेतले. भरतनाट्यममधील विशारद ही पदवीही तिने प्राप्त केली. याबरोबरच कथ्थकचीही डिग्री मिळवली.

    नृत्य म्हणजे तिचा जीव की प्राण. पण इतरांना ते शिकवायलाही तिला मनापासून आवडतं. म्हणूनच डान्स शिकता शिकता तिनं निरनिराळ्या शोज मध्ये परफॉर्म करायलाही सुरुवात केली. नुकताच सिमल्याच्या एका शाळेच्या शतकपूर्तीसाठी लहानग्यांचा डान्सही तिने बसवला होता.

    'डान्स ही माझी पहिली आवड असली तरी अॅक्टींगचीही मला प्रचंड ओढ आहे' असं ऐश्वर्या म्हणते. ' राहिले दूर घर माझे ', ' देवकी ', ' हिरवं कुंकू ' अशा सिनेमांत बालकलाकार म्हणून तिनं काम केलंय. त्यासोबतच अनेक जाहिराती आणि हिंदी मराठी मालिकांमधूनही ती तिची अभिनयाची आवड जोपासत असते.

    अभिनय आणि नृत्यासोबत मल्लखांब आणि जिम्नॅस्टिकचीही तिला आवड आहे. दादरच्या प्रभात पथकात मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक्स दोन्हीचं शिक्षण ती सध्या घेतेय. अभिनय आणि नृत्यासोबतच या क्षेत्रातही भरीव कामगिरी करण्याचा तिचा मानस आहे.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


      August 9, 2017


  • भाग्यश्री पटवर्धन

    १९८९ मध्ये भाग्यश्रीने ‘मैने प्या किया’ मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. मैने प्यार किया या चित्रपटामध्ये भाग्यश्री ने सलमान खानसोबत नायिकेची भूमिका केली होती. मैने प्यार किया प्रदर्शनावेळी भाग्यश्री केवळ १९ वर्षाची होती. मैने प्यार किया या चित्रपटामुळे ती रातोरात स्टार झाली. ह्यासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला होता.

      July 12, 2022


  • दिनकर पाटील

    मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक, कथालेखक व पटकथाकार अशी ख्याती असलेल्या दिनकर पाटील यांनी शंभरापेक्षाही अधिक चित्रपटांसाठी संवाद लिहिले यामध्ये “जय मल्हार”, “सांगत्ये ऐका”, “बेल-भंडारा”, “शिकलेली बायको”, “बाळ माझं नवसाचं”, “सुधारलेल्या बायका”, “पाटलाची सून”, “फटाकडी”, “कुंकवाचं लेणं”, “गुणवंताची कन्या”, “मोसंबी नारंगी”, असे एकाहून एक दर्जेदार चित्रपटांचा समावेश असून पन्नासाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन देखील पाटील यांनी केले.यामाध्ये काही उल्लेखनीय चित्रपट म्हणजे “रामराम पावणं”, “शारदा”, “पाटलाचं पोर”, “मूठभर चणे”, “कुलदैवत”, “उमज पडेल तर”, “प्रेम आंधळं असतं”, “मल्हारी मार्तंड”, “कामापुरता मामा”, “धन्य ते संताजी धनाजी”, “काळी बायको”, “कोर्टाची पायरी”, “जोतिबाचा नवस”, “पैजेचा विडा”, “भामटा”, “भटकभवानी”, “शिवरायाची सून ताराराणी”; तर हिंदीत “मंदीर”, आणि “घरबार”च्या दिग्दर्शनाची धुरा दिनकर पाटील यांनी सांभाळली होती.

      July 18, 2014


  • गुरुनाथ आबाजी (जीए) कुलकर्णी

    माणसाच्या वाट्याला येणारे सुखदुःख, राग, लोभ, आनंद, निराशा, यश, अपयश या सगळ्यामध्ये गुंडाळले गेलेले माणसामाणसामधील संबंध त्यातून ताण निर्माण करणारे मानवी विकार आणि आतक्र्य नियतीचे खेळ, त्यातून येणारी अर्थशून्यता या सगळ्याचा प्रत्यय देणारी कथा म्हणजे जी. एं. ची कथा. असा आगळावेळा कथाकार महाराष्ट*ाला मिळाला हे महाराष्ट्राचं भाग्यच. जी. ए. कुलकर्णींचा जन्म तालुका चिपोडी येथील एकसंबा या गावी १० जुलै १९३२ साली झाला.

      January 22, 2010


  • दत्तात्रेय श्रीधर खटावकर

    ड्रॉइंग आणि पेंटिंग, उपयोजित कला, आर्ट टीचर्स डिप्लोमा, विविध छंद वर्ग अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करताना खटावकर हे स्वत:ही समृद्ध होत गेले आणि त्यांच्या ज्ञानाने सलग २५ वर्षे सध्या कला क्षेत्रात नावाजलेले कलाकार विद्यार्थीही घडले.

      June 29, 2022


  • डॉ. आशा रवींद्र मंडपे

    ठाण्यातील संगीत क्षेत्रातील आणखी एक मानाचं नावं व्हायोलिनवादक आणि संगीत विषयात पत्रकारीता करणार्‍या डॉ. आशा मंडपे होय. आशाताईंनी महाराष्ट्रातील आदिवासी वाद्यांवर विशेष संशोधन केले.

      May 29, 2014


  • डॉ. रखमाबाई जनार्दन सावे

    Licentiate of the Royal College of Physicians and Surgeons’ ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचं नांव इंग्लंडच्या ‘मेडिकल रजिस्टर’मध्ये सनदशीर दाखल झालं.रखमाबाईंना शिक्षणात आर्थिक मदत करणाऱ्या ‘डफरिन फंडा’तर्फे एकूण सात रुग्णालये उघडण्यात आली. पहिलं दिल्लीत निघालं. त्यानंतर मुंबईत ‘कामा हॉस्पिटल’, नंतर मग सुरत, बडोदा, मद्रास अशी पुढची रुग्णालयं चालू झाली. रखमाबाईंनी डॉक्टरी व्यवसायाची सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली. तिथे त्यांची नेमणूक ‘हाऊस सर्जन’ म्हणून झाली.

      June 29, 2022


  • डॉ. कृष्णा कांबळे

    सेवाभावाच्या क्षेत्रात सेवाभाव हरपत चालला असताना सेवानिवृत्ती मंजूर नसलेला एक डॉक्टर कर्करुग्णांच्या काळजीने गेल्या ४४ वर्षांपासून झटतो आहे. नागपूरचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. कृष्णा कांबळे सेवाभावाचे मध्य भारतातील आदर्श उदाहरण ठरले आहेत. सामान्यांचे रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयातील रेडिओथेरपी विभागाच्या उभारणणीचे श्रेय त्यांचेच. आज हा विभाग आर्थिक तडजोड करुन जगू बघणार्‍या कर्करुग्णांसाठीआशेचा किरण बनला आहे.

    कर्करोगग्रस्तांचा तारणहार

      July 24, 2015


  • पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (पुलं)

    महाराष्ट्राचे ‘लाडके व्यक्तिमत्त्व’, ‘महाराष्ट्राचे आनंदयात्री’, ‘महाराष्ट्राचे भूषण’, ‘महाराष्ट्राचा अष्टपैलू कलावंत’ असा महाराष्ट्राचा अभिमान असणारे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे.

      January 22, 2010


  • वासुदेव गोविंद मायदेव

    वासुदेव गोविंद मायदेव यांनी अभिनयाला वाव देणारी “शिशुगीते” हा प्रकार मराठीत रुळवला. जुन्या अंकलिप्यांतील अनेक कविता त्यांनी लिहिल्या आहेत.

      August 23, 2017