(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कमलाकर विश्वनाथ सातपुते

    अभिनेता म्हणून गेली १४ वर्षे या क्षेत्रात आहे. मामा वरेरकर पुरस्कार (सर्वोत्कृष्ट अभिनेता), हास्यसन्मान पुरस्कार, दोन वेळा अल्फा गौरव साठी नॉमीनेशन. एकदा कला संस्कृतीसाठी नामांकित.<

      May 23, 2014


  • विठ्ठल सायन्ना

    मुंबईच्या बांधकाम इतिहासामध्ये विठ्ठल सायन्ना यांचे नाव अत्यंत आदराने व गर्वाने घेतले जाते.

    ठाणे व मुंबईत विस्तीर्ण पसरलेल्या व वेगवेगळ्या आकारांनी, तसेच बांधकामाच्या शैलींनी नटलेल्या गगनचुंबी इमारतींचे, विस्तीर्ण जाळे विणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मुंबई व ठाण्याची वास्तू घडण करणारे प्रसिध्द बांधकाम ठेकेदार अशी त्यांची संपुर्ण भारतामध्ये किर्ती पसरलेली होती. याला कारणेही तशीच आहेत. मुंबईच्या जन्मापासून तिच्या गळ्यामधील दुर्मिळ अलंकाराचे काम करणारे, गॉथिक वास्तुशास्त्राचा अद्वितीय नमुना असलेले, व संयुक्त राष्ट्र संघटनेकडून प्रसिध्द होणार्‍या वर्ल्ड हेरिटेज साईट्सच्या यादीमध्ये नोंद झालेले पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस व आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस या रेल्वे स्थानकाचा काही भाग त्यांनी बांधला होता.

    याशिवाय मुंबईतील अनेक इमारती व पायाभूत सुविधांची बांधणी त्यांच्या हस्ते झाली. मुंबईतील जनरल पोस्ट ऑफिस, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ( हल्लीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय) , स्मॉल कॉसेस कोर्ट, व इन्स्टीटयूट ऑफ सायन्स या इमारतींच्या निर्मीतीची जबाबदारी अतिशय समर्थतेने त्यांनी पेलली होती. त्यांचे सुपुत्र नारायण सायना यांची गणतीदेखील मुंबईतल्या दर्जेदार व नामांकित इमारत कंत्राटदारांपैकी होते. त्यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून याच व्यवसायामध्ये उंच भरारी मारली.

    त्यांच्याच नावाने ठाणे येथे विठ्ठल सायन्ना मंदीर उभे आहे.

      January 12, 2015


  • कीर्ती शिलेदार

    संगीत नाटके व स्वतंत्र मैफलींच्या निमित्ताने भारतभर तसेच इंग्लंड-अमेरिकेत त्यांचे कार्यक्रम झाले आहेत.सौंदर्यशोधक दृष्टीने शास्त्रीय संगीतातील अकारण होणारे शब्दोच्चारांचे दुर्लक्ष टाळले जावे, या हेतूने त्यांनी ’स्वर ताल शब्द संगती’या नावाचे हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे.

      June 24, 2022


  • मधुसूदन कालेलकर

    नाटककार, कथाकार आणि पटकथाकार म्हणून सर्वांना परिचित असलेलं नाव म्हणजे मधुसूदन कालेलकर. कालेलकरांचा जन्म २२ मार्च १९२४ रोजी झाला. त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण वेंगुर्ले या गावी झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईत वास्तव्य केले. साहित्य हा त्यचा आवडता विषय होता तर नाटकाविषयी प्रेम होते. ‘अखेर जमलं’ या मराठी चित्रपटासाठी त्यांनी विनोदी कथा लिहिली आणि तो चित्रपट चांगलाच गाजला.

      February 4, 2010


  • निलेश हरिश्चंद्र चव्हाण

    निलेश चव्हाण हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष आहेत. १८ डिसेंबर २०१२ रोजी त्यांनी या पदाची सूत्रे स्विकारली. ते “महाराष्ट्र नवनिर्माण सेने”कडून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीला उभे आहेत. माणसं जोडण्याची आवड आणि पारदर्शक व प्रामाणिक कामाची सवय या जोरावर त्यांनी लोकांमध्ये व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणले आणि “मनसेच्या ठाणे कार्यालयात गेल्यावर आपले काम होणारच” अशी भावना त्यांनी जनमानसात निर्माण केली. एका सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले निलेश चव्हाण हे व्यवसायाने स्थापत्य अभियंता (सिव्हील इंजिनिअर) आहेत त्यामुळे नागरी सुविधांच्या बाबतीत असलेला नियोजनाचा (प्लानिंग) अभाव त्यांना प्रकर्षाने जाणवतो.

      October 10, 2014


  • एकनाथ कुलकर्णी

    नाशिक येथील रहिवासी असलेले कुलकर्णी तेथील स्थानिक परिसरात त्यांच्या विविध वैद्यकीय कौशल्यांसाठी व रोगांच्या अचुक निदानासाठी वाखाणले गेलेले आयुर्वेदिक तज्ञ आहेत.

      August 22, 2011


  • निर्मलकुमार फडकुले

    लेखक, समीक्षक आणि संतसाहित्याचे अभ्यासक म्हणून निर्मलकुमार जिनदास फडकुले हे प्रसिद्ध आहेत. २० स्वलिखित, तर ७ संपादित पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.

      December 20, 2015


  • राजा ठाकूर

    १९५३ सालच्या ‘बोलविता धनी’ या चित्रपटापासून राजा ठाकूर यांची दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरु झाली. १९५३ ते १९७५ या २३ वर्षांत त्यांनी २० मराठी, २ हिंदी व ‘बिरबल ब्रदर’ या इंग्रजी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.

      August 24, 2017


  • शिवाजी सावंत

    शिवाजी सावंत यांच्या `मृत्युंजय` कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्काराने हुलकावणी दिलेली असली, तरी लोकपीठाने ही कांदबरी चांगलीच उचलून धरली. या कादंबरीची एक लाखाची प्रत नुकतीच छापली गेली. भारतीय ज्ञानपीठ संस्थेचाच `मूर्तीदेवी` पुरस्कार या कादंबरीला मिळाला वाड्गमयाद्वारा भारतीय जीवनमुल्याचे चित्रण करणारा लेखक या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतो, अजुन तरी एकमेव मराठी लेखकाला मिळालेला हा पुरस्कार आहे.

    सावंत यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 ला आजर्‍याच्या लाल मातीत झाला. कोल्हापुरच्या राजाराम हायस्कुलमध्ये त्यांनी वीस वर्ष अध्यापन केले. पुढे लोकशिक्षण मासिकाचे संपादन काही काळ केले. सावंत ह्यांनी वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी `मृत्यूजंय` लिहिली. कर्णाच्या या कथेने मराठी घरातल्या तीन-तीन पिढंयाना वेड लावले. ज्ञानपीठ संस्थेने त्यांचा हिंदी अनुवाद प्रसिध्द केला. त्याला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. गुजराती अनुवादाला गुजरात सरकारचे पारितोषिक मिळाले.

    त्यांच्या `छावा`, `लढत`, `युगंधर` या कादंबर्‍यांनाही वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला. मृत्युंजय प्रमाणेच कृष्णाच्या जीवनावरील `युगंधर` ही विविध भाषांत अनुवादिली गेली. कन्नड, मल्याळम, बंगाली, राजस्थानी, गुजराती व हिंदी या भारतीय भाषांमध्ये रूपांतरीत झालेल्या या कादंबरीमुळे त्यांचे नाव सर्वत्र पोहचले. या खेरीज इंग्रजीमध्येही ती पोहचली. `छावा` ही संभाजी राजांचे जीवन रेखाटणारी कादंबरी, श्रीकृष्णाच्या चारीत्रावर आधारीत `युगंधर` ही कांदबरी तसेच `मोरावळा` , `असे मन असे नमुने` ही व्यक्तिचरीत्रे लिहली. त्यांच्या कसदार लेखनाला भारतीय ज्ञानपीठाचा `मुर्तिदेवी` पुरस्कार मिळाला. गुजराथी रूपातंराला `साहित्य अकादमी पुरस्कार`, बडोदे साहित्य संमेल्लन व कामगार साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद.

      March 12, 2015


  • मोहन तोंडवळकर

    ‘कलावैभव’चे निर्माते मोहन तोंडवळकर यांचं आकस्मिक निधन ही सहा महिन्यांतली मराठी नाटय़सृष्टीवर आघात करणारी दुसरी मोठी दुर्दैवी घटना आहे. पाच महिन्यांपूर्वी ‘चंद्रलेखा’ संस्थेचे निर्माते मोहन वाघ यांचंही असंच आकस्मिक निधन झालं.

    मराठी नाटय़व्यवसायातील दुसरा बडा निर्माता असा लागोपाठ गेल्यानं नाटय़क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नाटकाचं वेड असलेले आणि नाटक सतत जगणारे असे हे दोन निर्माते होते. काहीएक रिस्क घेऊन वेगळ्या प्रकारची नाटके करण्याची धमक त्यांच्यात होती. त्यासाठी सर्वस्व पणाला लावण्यासही ते मागेपुढे पाहणारे नव्हते.

    दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांच्या पश्चात त्यांचा हा नाटय़निर्मितीचा वारसा पुढे नेणारे त्यांच्या कुटुंबीयांत कुणी दिसत नाही. मोहन तोंडवळकर हे व्यावसायिक नाटय़निर्मात्यांमधले ‘प्रायोगिक निर्माते’ म्हणून ओळखले जात. राज्य नाटय़स्पर्धा तसेच इतरत्र होणाऱ्या नव्या नाटकांच्या प्रयोगांना आवर्जून उपस्थिती लावून त्यातलं एखादं नाटक वा कलाकार त्यांच्या रत्नपारखी नजरेस पसंत पडला की व्यावसायिक गणितं बाजूला ठेवून, ते त्यांना व्यावसायिक रंगभूमीवर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत.

    विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, सई परांजपे, महेश एलकुंचवार, सुरेश खरे ते किरण पोत्रेकर, योगेश सोमणपर्यंत त्या-त्या काळातील नव्या लेखकांना त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचं धाडस दाखवलं. साहस हे त्यांच्या रक्तातच होतं. ते करताना त्यांनी परिणामांची कधीच पर्वा केली नाही.

    ‘काचेचा चंद्र’, ‘हिमालयाची सावली’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘मला उत्तर हवंय’, ‘महासागर’, ‘पुरूष’, ‘जास्वंदी’, ‘माणसाला डंख मातीचा’, ‘सावित्री’, ‘पर्याय’, ‘दुसरा सामना’, ‘गोष्ट प्रेमाची?’, ‘नातीगोती’, ‘राहिले दूर घर माझे’, ‘राव जगदेव मरतड’, ‘शॉर्टकट’, ‘एक हट्टी मुलगी’, ‘अपूर्णाक’, ‘कस्तुरीमृग’, ‘नांदा सौख्यभरे’, ‘नल-दमयंती’, ‘पाऊलखुणा’, ‘महायोग’, ‘मी राष्ट्रपती’, ‘सौभाग्य’, ‘वन रूम किचन’, ‘कार्टी काळजात घुसली’, ‘लफडा सदन’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘लपंडाव’, ‘अचानक’, ‘प्रासंगिक करार’ ते ‘शंभुराजे’पर्यंत कलावैभवने निर्मिलेल्या नाटकांचं वैविध्य पाहिलं तर त्यांच्या नाटय़निर्मितीच्या कक्षा किती लांब-रुंद आणि सखोल होत्या, याची कल्पना येते. नाना पाटेकरांपासून डॉ. अमोल कोल्हेंपर्यंत अनेक कलावंतांना त्यांनी आपल्या नाटकांतून पुढे आणलं. परंतु याचं श्रेय मात्र त्यांनी कधीच घेतलं नाही. ‘जो-तो आपापल्या कर्तृत्वानं पुढे येतो. मी फक्त निमित्तमात्र ठरलो. त्यात कसलं श्रेय घ्यायचं?,’ असा त्यांचा सवाल असे. त्यांचं वाचन उत्तम होतं. त्यामुळे संहितेतलं वेगळेपण त्यांना लगेचच जाणवे.

    लेखकाच्या प्रभावी नाटय़वाचनाला भुलून त्यांनी कधीच नाटकं स्वीकारली नाहीत. याबाबतीत ते स्वत:व्यतिरिक्त दुसऱ्या कुणावरही सहसा विसंबले नाहीत. नाटकाच्या बुकिंग प्लॅनवर एक नजर टाकली तरी त्यांना त्या नाटकाचं भवितव्य कळे. त्यामुळेच आपल्याला आवडलेलं नाटकही त्यांनी चालत नसताना कधी हट्टाग्रहानं सुरू ठेवलं नाही. लगेचच ते नाटक बंद करीत आणि पुढच्या नाटकाकडे ते वळत. अर्थात त्यापुढचं नाटकही ते धंद्याचं गणित मांडून करतील, असंही कधी घडलं नाही. कलावैभव संस्था काढण्याआधी ते जुनी नाटकं कंत्राटी पद्धतीनं लावीत. त्यासाठी बीपीटीतल्या आपल्या सहकाऱ्यांकडून ते कर्ज वगैरे काढत. मात्र व्यवहार चोख असल्यानं त्यांना हवे तेव्हा पैसे उभे करता येत. पण तोंडवळकरांनी एकाच उद्योगात स्वत:ला कधी अडकवून घेतलं नाही. त्यांनी नाटकांबरोबरच सीरियल्स, टेलिफिल्म्सचीही निर्मिती केली. त्यांना चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात उतरण्याची ऑफर दस्तुरखुद्द दादा कोंडके यांनी दिली होती. परंतु तोंडवळकर चित्रपट क्षेत्रापासून मात्र का कुणास ठाऊक, कटाक्षानं दूर राहिले.

    पल्लवी अ‍ॅडव्हर्टायझिंग ही जाहिरात संस्था काढून जाहिरातीची कामंही ते करीत. एखाद्याची एखादी गोष्ट आवडली तर त्या व्यक्तीला आवर्जून फोन करून ते कळवीत. नाटय़क्षेत्रात ही गोष्ट तशी दुर्मीळच म्हणावी लागेल. कुठलीही गोष्ट करताना फळाची अपेक्षा न धरता करणं, ही साधारणत: योग्यालाच साध्य होणारी गोष्ट तोंडवळकरांना साध्य झालेली होती. ते नेहमी म्हणत, ‘मी ‘आज’ जगतो. काल किंवा उद्याबद्दल मी बिलकूल विचार करीत नाही.’ त्यामुळेच ते नेहमी ‘आज’ला सामोरे गेले आणि म्हणूनच कायम समकालीन राहू शकले. जे. कृष्णमूर्तीच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता.

    वरकरणी ते आध्यात्मिक वृत्तीचे वाटत नसले तरी अंतर्यामी मात्र ते सगळ्यापासून अलिप्त असत. त्यांच्या जाण्यानं मराठी रंगभूमीचं केवढं मोठं नुकसान झालं आहे, हे लगेचच जाणवणार नसलं तरी प्रायोगिकांना व्यावसायिक रंगभूमीवर काहीएक सादर करायचं असेल, त्या प्रत्येक वेळी एक खंदा आधारस्तंभ हरवलाय, याची जाणीव त्यांना-आणि पर्यायानं सशक्त आशयाच्या नाटकांच्या भुकेल्या रसिक प्रेक्षकांना जाणवल्याशिवाय निश्चितच राहणार नाही.

      August 4, 2017