(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गुरुनाथ आबाजी (जीए) कुलकर्णी

    माणसाच्या वाट्याला येणारे सुखदुःख, राग, लोभ, आनंद, निराशा, यश, अपयश या सगळ्यामध्ये गुंडाळले गेलेले माणसामाणसामधील संबंध त्यातून ताण निर्माण करणारे मानवी विकार आणि आतक्र्य नियतीचे खेळ, त्यातून येणारी अर्थशून्यता या सगळ्याचा प्रत्यय देणारी कथा म्हणजे जी. एं. ची कथा. असा आगळावेळा कथाकार महाराष्ट*ाला मिळाला हे महाराष्ट्राचं भाग्यच. जी. ए. कुलकर्णींचा जन्म तालुका चिपोडी येथील एकसंबा या गावी १० जुलै १९३२ साली झाला.

      January 22, 2010


  • अजित वाडेकर

    कसोटी क्रिकेट संपले की क्रिकेटपटू काय करतात? कुणी आपल्या कार्यालयाचे काम इमानेइतबारे करायला लागतो. किमान पूर्वीच्या काळातील क्रिकेटपटू तरी हे करायचे. काही क्रिकेटपटू क्रिकेट प्रशिक्षकाच्या पेशाकडे वळतात. काहींनी समालोचकाचा माईक हातात धरला. काहींनी क्रिकेट अ‍ॅकॅडमीज् सुरू केल्या. काहींनी क्रिकेट प्रशासन व्यवस्थेकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. अजित वाडेकरांनी काय केलं?

    अजित वाडेकरांनी सर्वप्रथम आपल्या कार्यालयाला न्याय दिला. फावल्या वेळात त्यांनी अपंग क्रिकेटपटूंसाठी संघटन कार्य करायला सुरुवात केली. १९८८ मध्ये अपंग क्रिकेटपटूंची संघटना स्थापन झाली. तेव्हापासून आजतागायत या क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. आज या संघटनेने २३ राज्यांच्या संघटनांना आपल्या कृपाछत्राखाली घेतले आहे. रणजी करंडक, दुलीप करंडक, इराणी करंडक क्रिकेट स्पर्धाच्या धर्तीवर ही संघटना अपंगांसाठी क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करते. ३ वर्षांपूर्वी या संघटनेने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट मालिकेचे आयोजन केले होते.

    भारताने ही मालिका जिंकली होती. अपंगांसाठीच्या मिनी वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनाचा विचार ही संघटना करीत आहे.अपंग क्रिकेटपटूंच्या या भरारीला पंख देण्याचे काम अजित वाडेकरांनी केले. त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. आयपीएलसारख्या लिगवर करोडो रुपये उधळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघटनेला मात्र अद्याप अपंगांना मदतीचा हात द्यावासा वाटत नाही हे क्रिकेटचे दुर्दैव. सुदैवाने अपंग क्रिकेटपटंना अजित वाडेकरांसारखा मसिहा भेटला. ज्याने आपल्या प्रसिद्धीच्या वलयाचा अपंगांच्या क्रिकेटसाठी वापर केला. आपल्या नोकरीतील पदाचा लाभ अपंगांच्या क्रिकेटसाठी केला.

    वाडेकरांच्या या कार्याची दखल सातासमुद्रापलिकडच्या अमेरिकन क्रिकेट संघटनेने घेतली. त्यांना ‘हॉल ऑफ फेम’मध्ये त्यांनी स्थान दिले. सर गारफिल्ड सोबर्स, विवियन रिचर्डस, मायकेल होल्डिंग, सुनील गावसकर यांच्यासारख्या महान क्रिकेटपटूंच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये त्यांनी अजित वाडेकरांना बसविले. १९७१ ला वेस्ट इंडिजला कॅरिबियन द्विपसमूहात मालिकेत पराभूत करता येते हे स्वप्न वाडेकरांनी प्रत्यक्षात उतरविले होते. ब्रिटिशांना त्यांच्याच भूमीवर मालिकेत लोळविण्याचा पराक्रम वाडेकरांच्या भारतीय संघाने केला होता.

    १९७१ नंतर भारतीय क्रिकेट संघाकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन वाडेकरांनी बदलायला लावला. अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला, वाडेकरांनी प्रशिक्षक बनून तब्बल साडेतीन वर्षे विजयी संघ बनविले. वाडेकरांच्या यशाचा तो परिसस्पर्श सुदैवाने अपंग क्रिकेटपटूंनाही लाभला. वाडेकरांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेऊन त्यांना यंदाचा मदर टेरेसा ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट अ‍ॅवार्ड’ हा पुरस्कार देण्यात आला.

    सातासमुद्रापलिकडच्या लोकांना वाडेकरांमध्ये दिसले ते आपल्या इथल्या लोकांना दिसले नाही हे मोठे दुर्दैव आहे. मोदी यांची प्रकरणे आणि भ्रष्टाचाराच्या अन्य गोष्टींनी कलंकित झालेल्या भारतीय क्रिकेटला गरज आहे ती जुन्या, बुजूर्ग क्रिकेटपटूंना मानसन्मान देण्याची. विनू मांकड, विजय हजारे, र्मचट, अमरनाथ, यांच्यासारख्या क्रिकेटपटूंच्या स्मृती जतन करून ठेवण्याची; त्यांची स्मारके उभी करण्याची. अजित वाडेकरांच्या कार्याचा, क्रीडाकौशल्याचा गुणगौरव अमेरिकेत होऊ शकतो, मात्र त्यांच्या कर्मभूमीत मुंबईत का नाही? मुंबईच्या क्रिकेटने देशाला महान क्रिकेटपटू दिले. त्या महान क्रिकेटपटूंची ओळख भावी पिढीला कायमस्वरुपी राहावी याकरिता मुंबई क्रिकेट असोसिएशनने ‘हॉल ऑफ फेम’च्या धर्तीवर काहीतरी उभे करण्याचीगरज आहे.

    पदाधिकाऱ्यांच्या फोटोच्या गर्दीत हरविलेल्या क्रिकेटपटूंना पुढे आणण्याची गरज आहे. अजित वाडेकरांना मुंबई क्रिकेट संघटना विसरली. पण क्रिकेटची फारशी ओळख नसलेल्या ठिकाणी त्यांच्या नावाची पूजा बांधली जाते. हा विजय कुणाचा? अजित वाडेकरांच्या कर्तृत्वाचा तो निश्चितच गौरव आहे. त्यांना पुरस्कार देणाऱ्या संस्थेच्या विशाल दृष्टीकोनाचा तो एक पुरावा आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यासारख्या संघटनांमधील दूरदर्शीपणाच्या अभावाचे ते एक द्योतक आहे.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

      August 5, 2017


  • गणेश रामचंद्र राऊत

    नृत्य क्षेत्रात अल्पावधीत आपल्या कामाचा आदर्श निर्माण करणार्‍या गणेश राऊत यांचं शिक्षण शिवाजी विद्यालयातून झालं आहे. उत्तम खो-खो पटू असले तरी क्रीडा क्षेत्रातील राजकारणामुळे विचार बदलावा लागला.

      May 29, 2014


  • अश्विनी एकबोटे

    दुहेरी, दुर्वा, राधा ही बावरी, तू भेटशी नव्याने, अहिल्याबाई होळकर या मालिकांमधून त्या घराघरात पोहोचल्या होत्या. ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेमध्ये त्या रावणाच्या आईची, कैकसीची भूमिका करत होत्या. अरुंधती, उंच माझा झोका, असंभव या मालिकांमधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या होत्या.

      June 21, 2022


  • अभिनय बेर्डे

    अभिनय बेर्डे

    अभिनय बेर्डे – मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन फळीतील हे एक नाव. अभिनय सुप्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे ह्यांचा मुलगा आहे.

      August 12, 2020


  • पौर्णिमा अहिरे – केंडे

    पौर्णिमा अहिरे – केंडे

    नाटक, मालिका व चित्रपटांमधून रसिकांचे मन जिंकणार्‍या अभिनेत्री पौर्णिमा अहिरे केंडे यांचे देखील सांस्कृतिक क्षेत्रात ठाण्याचं नाव उज्वल करण्यासाठी मोलाचं योगदान आहे.

      May 23, 2014


  • राजाराम भालचंद्र पाटणकर (Ph.D)

    विचारवंत, समीक्षक, सौंदर्यमीमांसक. रा.भा.पाटणकरांचे सर्वच लेखन तर्कशुद्ध आणि समीक्षेच्या क्षेत्रात मोलाची भर घालणारे आहे.

      February 19, 2010


  • राजा मंगळवेढेकर

    “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला”, “कोणास ठाऊक कसा”… या बालगीतांचे व ६० हून अधिक पुस्तकांचे कर्ते. साने गुरुजींचे चरित्रकार म्हणून त्यांची ओळख

      August 22, 2017


  • कान्होजी आंग्रे

    कान्होजी आंग्रे

    सरखेल कान्होजी आंग्रे मराठा साम्राज्याचे पहिले आरमारप्रमुख होते. यांनी ब्रिटिश, डच आणि पोर्तुगीज नाविक फौजांविरुद्ध लढा देऊन मराठा आरमाराचे नेतृत्व केले. कान्होजींचा जन्म अलिबाग येथे झाला.

    कान्होजींना इ.स. १६९८ साली मराठा सरखेल तथा आरमारप्रमुखपदी नेमण्यात आले. यानंतर लगेचच त्यांनी भारताच्या जवळजवळ सगळया पश्चिम किनार्‍यावर प्रभुत्त्व मिळविले.

    अधिक माहितीसाठी वाचा..

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

      March 17, 2015


  • आनंदराव विठोबा अडसुळ

    आनंदराव विठोबा अडसुळ

    शिवसेनेचे खासदार. माजी केंद्रिय अर्थ राज्यमंत्री, सहकारी बॅंकांच्या युनियनचे नेते.

      April 14, 2010