सीताराम कुंटे

कुंटे, सीताराम

सुबोधकुमारांनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून नियोजन विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांची नियुक्ती झाली. सुबोधकुमार यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली. सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीबरोबरच कामगार संघटना व इतरांशीही सुबोधकुमार कायम फटकून वागले. कुंटे हेही कडक शिस्तीचे असले तरी सौम्य प्रकृतीचे मनमिळाऊ अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

राजकीय मंडळी आणि कामगार नेत्यांशी खेळीमेळीचे संबंध ठेवून गोड बोलून ते पालिकेत सौहार्दाचे वातावरण ठेवू शकतील. कुंटे हे १९८५ च्या आयएएस तुकडीतील अधिकारी. राज्य शासनाच्या सेवेत ते तब्बल २६ वर्षे असून त्यांनी सांभाळलेल्या विविध पदांपैकी ‘म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी, गृहनिर्माण सचिव पदावरील त्यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली. ग्रामीण आणि शहरी भागातील गरिबांसाठी गृहनिर्माणाच्या विविध योजना त्यांनी राबविल्या. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या अंमलबजावणीत गती आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ‘महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अ‍ॅक्ट’ मधील सुधारणांसह गृहनिर्माणविषयक कायदे व नियमांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणांसाठी त्यांनी भरीव काम केले. बिल्डरांनी वाऱ्यावर सोडून दिलेल्या गृहरचना संस्थांना जमिनीचीही मालकी मिळावी, यासाठी ‘डीम्ड कन्व्हेयन्स’ ची तरतूद करण्यामध्ये कुंटे यांचे योगदान आहे. सनदी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत असताना कुंटे यांनी लाला लजपतराय विधी महाविद्यालयातून २००६ ते २००९ या काळात कायद्याची पदवी मिळविली. ‘सिरक्यूस विद्यापीठा’अंतर्गत असलेल्या मॅक्सवेल स्कूलमधून त्यांनी ‘सिटिझनशिप अ‍ॅण्ड पब्लिक अफेअर्स’ विषयात प्रमाणपत्र मिळविले, ब्रिटनच्या बर्मिगहॅम विद्यापीठामधील स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. अर्थशास्त्राबरोबरच प्रशासन, शासकीय धोरणे, विधी आदी बाबींचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. महापालिकेत आर्थिक शिस्त आणण्यासाठी त्याचा बराच उपयोग होईल. मुंबई महापालिकेत त्यांनी याआधी अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केले आहे. त्यामुळे पालिकेतील कामकाजाचा त्यांना चांगला अनुभव आहे. अर्थसंकल्पात पाणीपट्टीसह अन्य सेवांसाठी करवाढीचा बोजा टाकलेल्या मुंबईकर जनतेला ते कोणता दिलासा देतात, हे लवकरच दिसून येईल.

Author