दुसऱ्या महायुद्धाने बोईंगला बऱ्याच प्रमाणात साथ दिली. तिकडे माणसांचे जीव का जाईनात पण “फ्लाईंग फॉर्ट्रेस” म्हणून ओळखले जाणारे बी-१७ हे विमान आणि त्यानंतर आलेली बी-२४ आणि बी-२९ ही विमाने खूपच गाजली.
September 28, 2021
सध्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांमध्ये अजय-अतुल हे नाव आवर्जून घेतलं जातं. केवळ मराठीतच नाही तर हिंदी आणि तेलुगू भाषांमधील चित्रपटांसाठीही या जोडीने संगीत दिग्दर्शन केलंय. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या जोडीचे संगीत अनेकांनाच मंत्रमुग्ध करतं. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानलाही त्यांनी मंत्रमुग्ध केले आहे.
या जोडीने आपल्या करीयरची सुरुवात विश्वविनायक या प्रसिद्ध अल्बमने केली. विश्वविनायक या अल्बममध्ये पारंपरिक आरती, स्तोत्रं त्यांनी वेगळ्या रूपात जगापुढे ठेवली. या वेगळेपणामुळे हा अल्बम जगभर लोकप्रिय झाला. संगीतकार असण्याबरोबरच चांगले गायक म्हणूनही त्यांची ओळख आहे. अनेक काँबो म्युझिकल गाणी आणि लोकगीतं त्यांनी स्वत:च गायली आहेत. त्या गाण्यांना त्यांचा आवाज चपखल आणि साजेसा वाटतो.
त्यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘सावरखेड एक गाव’ या चित्रपटातलं ‘वार्यावरती गंध पसरला’ हे गाणं असो किंवा ‘अगंबाई अरेच्चा’मधलं अतिशय मधुर चालीचं ‘मन उधाण वार्याचे’ हे गाणं असो किंवा ‘जत्रा’मधली ‘कोंबडी’, तसंच ‘दे धक्का’, ‘साडे माडे तीन’, ‘उलाढाल’, 'नटरंग' ‘जोगवा’, ‘बेधुंद’, ‘एक डाव धोबी पछाड’, ‘सही रे सही’ किंवा ‘लोच्या झाला रे’ सारखी मराठी नाटकांची, मालिकांची शीर्षकगीते, अनेक हिंदी चित्रपट, ‘झी मराठी’चे गौरवगीत… अगदी मराठी-हिंदीच्या पलीकडेही जाऊन तेलुगू चित्रपट गीतांनाही त्यांनी संगीत दिलं आहे.
सैराट मधील ‘याड लागले‘, "झिंगाट‘, "सैराट झालं जी‘, "आत्ताच बया‘ या चारही गाण्यांनी सर्वांनाच "याड‘ लावलं.
मराठी संगीताला ते पाश्चिमात्य नजरेतून पाहतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. मराठी संगीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे का असू शकत नाही? या संगीताला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले आहे. त्यासाठी हिंदी गाण्यांच्या तोडीची गाणी त्यांनी मराठीत निर्मिली. इतकेच नव्हे, तर एस्. पी. बालसुब्रमण्यम, हरिहरन, शंकर महादेवन, कुणाल गांजावाला, सुखविंदर, शान, चित्रा, सुनिधी चौहान, श्रेया, ऋचा शर्मा, सुजाता अशा अनेक अमराठी गायकांकडून त्यांनी मराठी गाणी गाऊन घेतली आहेत.
अनेकानेक पुरस्कारांनी त्यांना आजवर गौरवले गेले आहे.जोगवा या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
अजय गोगावलेचा (Ajay Gogavale) जन्म ११ सप्टेंबर १९७४ रोजी झाला.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
September 15, 2017
परिणामकारक, क्रांतिकारी बदल करणारे निर्णय घेणे, निर्णयांची अंमलबजावणी करणे, याला फार महत्त्व असते. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना गुन्हेगारीविरोधात धडक कार्यवाही केली. पोलिसांना अधिकार दिले. ‘एन्काऊंटर’ हा शब्द त्याच काळात रूढ झाला. राजकारणी आणि गुन्हेगार यांच्या संगनमताच्या काळात एन्काऊंटर हा शब्द रूढ करणे, ही खरी गुणवत्ता होती.पोलीसदलामध्ये सुधारणा, मुंबईतल्या टोळी युद्धाला आळा घालणे, आणि जनसामान्यांनमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे मंत्री म्हणून आजही त्यांचा गौरव होतो. पहिले प्रमोद महाजन आणि त्यानंतर गोपीनथ मुंडे, हे भाजप-सेना युतीमधला दुवा होते. दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला. तर निवळण्याचं काम गोपीनाथराव करायचे.
June 3, 2022
दादासाहेब फाळके यांनी सिनेमा कलेला जन्म दिला. पण त्या कलेचे संगोपन करून ती फुलवली कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी! त्यांचा जन्म २ जून १८९० रोजी झाला. ‘बाबूराव’ करवीर नगरीतील म्हणजे त्या काळच्या कोल्हापूर संस्थानातील एक असामान्य कलावंत! बाबूरावांचे मूळ नाव बाबूराव कृष्णराव मेस्त्री. लाकूडकाम, मूर्तिकला आणि चित्रकलेतील त्यांचे असामान्य कौशल्य पाहून कोल्हापुरातील चाहत्यांनी त्यांचे नामकरण बाबूराव पेंटर केले. ते एक चतुरस्र् कलाकार होते. कलाव्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी मुंबईत १९०८-०९च्या सुमारास फोटोग्राफीचा स्टुडिओ सुरू केला. पुढे केशवराव भोसले, बालगंधर्व यांच्या नाटकांसाठी पडदे रंगवले, इतकेच नव्हे तर त्यांनी ‘गंधर्व कंपनी’ला वेशभूषा, अलंकार, आभूषणे इत्यादींची डिझाइन्सही करून दिली. स्मारक-शिल्पे करण्यात तर त्यांचा हातखंडा होता. ज्या काळात चित्रपटनिर्मितीसाठी लागणा-या मूलभूत सुविधा, यंत्रसामग्रीही उपलब्ध नव्हती, त्या काळात बाबूरावांनी चित्रपटनिर्मितीचे साहस केले. १९१७ मध्ये कोल्हापूरला त्यांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ स्थापन केली व जवळजवळ २६ चित्रपटांची निर्मिती केली. ‘सावकारी पाश’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. हा चित्रपट चित्रपटनिर्मितीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड समजण्यात येतो. झुंजारराव पवार, व्ही. शांताराम, बाबूराव पेंढारकर, अनसूयाबाई आदींनी त्यात भूमिका केल्या होत्या.
बाबूराव हे स्वत: उत्तम इंजिनीअर व संकलक होते. आपल्याला चित्रीकरणासाठी लागणारा हवा तसा कॅमेरा त्यांनी स्वत: बनवून घेतला होता. ते सिनेमाचे पोस्टर, फोटो पाहूनच आपले आगामी सिनेमाविषयीचे मत बनवणार, हे गृहीत धरून बाबूरावांनी आपल्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’च्या ‘सिंहगड’ (१९२३) या चित्रपटाची लक्षवेधक पोस्टर्स तयार करून ग्रँट रोडचे ‘नॉव्हेल्टी थिएटर’ असे काही सजवले-नटवले की, त्या काळी अर्धी मुंबई खास ‘नॉव्हेल्टी’ पाहायला तिथे लोटली होती. त्यांचे ‘सिंहगड’चे पोस्टर काळाच्या ओघात नष्ट झाले; पण त्यांच्या ‘सतिसावित्री’, ‘कल्याण खजिना’, ‘सावकारी पाश’,‘शाहीर रामजोशी’ आदी चित्रपटांची पोस्टर्स, ‘उषा’ चित्रपटांचे बुकलेट आजही पाहायला मिळते, ही सर्व चित्रे म्हणजे दुर्मीळ कलेक्टर्स आयटम्स आहेत. आपल्या स्टुडिओत चित्र रंगवण्यासाठी चित्रफलकाच्या आधारासाठी लागणारा ईझल त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने डिझाइन केला होता. त्या ईझलसमोर एका जागेवर बसून चित्रकर्त्यांला काम करता येई. त्यांनी चित्रफलक वर-खाली करण्यासाठी व कोणत्याही उंचीवर स्थिर करण्यासाठी ईझलमध्ये पायाने दाबण्याच्या पॅडलची व्यवस्था केली होती. अशी सुविधा असलेला ईझल कुठल्याही पेंटरकडे नव्हता. बाबूराव उत्तम मोटार मेकॅनिकही होते. बोलपटांचे आगमन झाल्यावर ध्वनीने, दृश्यकलेवर आक्रमण केले असे समजून बाबूराव पेंटरांनी सिनेउद्योगातून निवृत्ती पत्करली. पण त्याआधी त्यांनी व्ही. शांताराम, बाबूराव पेंढारकर, दामले, फत्तेलाल, धायबर असे शिष्योत्तम तयार केले.सतत कलेचा ध्यास आणि नावीन्याचा शोध घेण्यात बाबूरावांनी आपली उभी हयात घालविली. मा.बाबूराव पेंटर यांचे १६ जानेवारी १९५४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 17, 2018
सलीम मर्चंट यांनी चित्रपटसृष्टीत आपल्या सुरेल गायकीने वेगळी ओळख निर्माण केली आहे.सलीम-सुलेमान जोडीपैकी एक म्हणजे सलीम मर्चंट यांनी सिनेसृष्टीत आपल्या गायकीने खूप लोकप्रिय गाणी गायली आहेत. सलिम आणि त्याचा मोठा भाऊ सुलेमान मर्चंट हे सलीम-सुलेमान या नावाने संगीतकार जोडी प्रसिद्ध आहे.
March 3, 2024
राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांनी कार्मिक व्यवस्थापनात काम केलं होतं. त्यांचे वडील, कामगार नेते पी. जी. सावंत हे सीटू या कामगार संघटनेत सक्रिय होते. मुंबईतील गिरणी कामगारांच्या चाळीतील हक्कांच्या रक्षणासाठी त्यांनी प्रयत्ने केले. मुंबईतील जुन्या चाळी आणि त्यांची पुनर्बांधणी व त्यावरील मालमत्ता करासाठी आंदोलनात पुढकार घेतला.
April 11, 2022
बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्याच्या मोहिमेत ते सहभागी होते. केशवराव व शंकरराव मोरे हे १९३० नंतर देशाच्या राजकीय चळवळीच्या मुख्य प्रवाहात आले. लोकमान्य टिळकांनंतर पुण्यातून जेधे यांनीच कॉंग्रेसला संजीवनी दिली.
November 12, 2021
पोलीस कचेरीतील कारकुनाची नोकरी १९५० मध्ये सोडून देऊन पिराजीरावांनी पूर्ण वेळ शाहिरीला वाहून घेतले. छ. शहाजी महाराजांनी त्यांना ‘शाहीर विशारद’ हा किताब व तहहयात मानधन दिले.
December 30, 2021
तब्बूचं पूर्ण नाव तब्बसुम फातिमा हाश्मी आहे, मात्र लोक तिला तब्बू म्हणून ओळखतात.तब्बूच्या आईवडिलांची फारकत झाली तेव्हा तब्बू खूप लहान होती, तब्बूने आपल्या वडिलांना पाहिलं नसल्याचंही सांगण्यात येतं. तब्बूने आपल्या बॉलीवूड करिअरमध्ये आपल्या लूक्स सोबत अनेक प्रयोग केले आहेत. मात्र तब्बूने आपली हेअर स्टाईल कधी बदलली नाही, तब्बू आपले काळेभोर लांब केस आपली संपत्ती मानते. रुक रुक, अरे बाबा रुक’ म्हणत ती या सिनेमासृष्टीत आली. आल्यापासून आपल्या एक एक चित्रपटामधून सुरू झालेली तिची ही यात्रा तिला शब्दश: विजयपथावर घेऊन गेली. एकाहून एक वेगवेगळय़ा प्रकारच्या भूमिका केलेल्या तब्बूने आपले स्वत:चे असे एक स्थान या चित्रपटसृष्टीत निर्माण केले आहे. ‘माचीस, ‘हुतुतू, ‘बॉर्डर, ‘चांदनी बार, ‘अस्तीत्व’ यासारख्या चित्रपटात सुंदर भूमिका केल्या आहेत. तब्बूला माचिस आणि चांदनी बारसाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, तब्बूचं लग्न झालेलं नाही. तब्बू ला फोटोग्राफीची आवड आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 3, 2017
मूळचे अकोल्याचे असणाऱ्या आनंद मोडक यांनी आपल्या गावातील शाळेत शिक्षण घेतले. त्यांचा जन्म १३ मे १९५१ रोजी झाला. तेथेच त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे घेतले. संगीतात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांनी पुण्याची वाट धरली. बा. सी. मर्ढेकरांच्या बदकांचे गुपित या काव्याला मा.मोडक यांनी संगीत दिले आणि तेथून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. हे काव्य रसिकांच्या पसंतीस उतरल्यानंतर मोडक यांनी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. पीडीएच्या `घाशिराम कोतवाल’मधूनही त्यांनी आपली चुणूक दाखवली होती. सतिश आळेकरांच्या `महानिर्वाण’ या नाटकाने त्यांना संगीतकार बनवले. नाटक, नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि नंतर पुढे चित्रपट असा त्यांचा संगीतप्रवास बहरत गेला. हे सर्व करत असताना त्यांनी महाराष्ट्र बँकेत नोकरीही केली.
सतत विविध प्रयोग करत राहणे हे आनंद मोडक यांच्या संगीताचे वैशिष्टय़ होते. तालवाद्याची साथ न घेता केलेली खानोलकरांची गाणी हा त्यातीलच एक प्रयोग. आनंद मोडक यांच्यावर कुमार गंधर्वांच्या गायकीचा प्रभाव होता, व ते मान्यही करत अस. मोडक हे अखेरच्या श्वासापर्यंत संगीत क्षेत्राशी संलग्न होते. आनंद मोडक यांनी रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांत आपल्या संगीताने ठसा उमटविला होता. मोडक यांचे साजणवेळा, अमृतगाथा, शेवंतीच बन, प्रीतरंग, अख्यान तुकोबाचे हे संगीत कार्यक्रमही लोकप्रिय झाले होते. ‘महानिर्वाण’, ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘बेगम बर्वे’, ‘महापूर’, ‘पडघम’, ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकांच्या आशयाला त्यांच्या संगीताने वेगळ्याच उंचीवर नेले होते. ‘२२ जून १८९७’, ‘कळत नकळत’, ‘सूर्योदय’, ‘चाकोरी’, ‘चौकट राजा’, ‘एक होता विदूषक’, ‘मुक्ता’, ‘दोघी’, ‘सरकारनामा’, ‘पाश’, ‘फकिरा’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘आरंभ’, ‘धूसर’, ‘यशवंतराव चव्हाण’, ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ या चित्रपटातील संगीतही रसिकांकडून तसेच समीक्षकांकडून अतिशय वाखाणले गेले. ‘एक झोका, चुके काळजाचा ठोका’, ‘जाई जुईचा गंध मातीला’, ‘युगा युगांचे नाते आपुले’, ‘श्रावणाच ऊन मला झेपेना’, ‘हे जीवन सुंदर आहे’, ‘तू तलम अग्नीची पात’, ‘वळणवाटातल्या मातीत हिरवे गंध’, ‘मना तुझे मनोगत मला कधी कळेल का’, ‘नाकावरच्या रागाला औषध काय’ ही त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनात दरवळत आहेत. आपल्या सांगीतिक कारकिर्दीत त्यांनी १० नाटके, ३६ चित्रपट, तसेच ७ हिंदी, व ८ मराठी मालिकांना संगीत दिले होते. त्यांच्या नावावर चित्रपट संगीतासाठीचे सर्वाधिक राज्य पुरस्कारांची नोंद आहे. `यशवंतराव चव्हाण’ हा त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला. आनंद मोडक यांचे २३ मे २०१४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 23, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti