(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दानशूर समाजसेवक भागोजी बाळूजी कीर

    दादरच्या जडणघडणीत, विशेषतः तिथल्या सामाजिक घडणीत काही मंडळींचा वाटा आहे. त्यांत एक भागोजी कीर हे आहेत. आज भागोजी कीर असते तर त्यांचा उल्लेख ‘मॅनेजमेंट गुरू’ असा झाला असता. त्यांची पुस्तकं निघाली असती. आयआयएममध्ये त्यांना लेक्चर देण्यासाठी पाचारण केलं गेलं असतं.

      March 16, 2022


  • ’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील लक्ष्मीकांत

    बऱ्याचदा लक्ष्मीकांतजींना ‘चाल’ लावण्यास विशेष आनंद वाटे, सोपी चाल हे त्यांचे वैशिष्टय़. ‘सरगम’चे परबत के उस पार, ‘खलनायक’चे चोली के पीछे क्या है, ‘हम पाँच’चे आती है पालखी सरकार की, ‘एक दूजे के लिए’चे हम बने तुम बने, ‘हम’चे जुम्मा चुम्मा दे दे ही उदाहरणे पुरेशी आहेत.

      November 3, 2021


  • अमेरिकन विनोदी लेखिका अर्मा बॉम्बेक

    अर्मा बॉम्बेक यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९२७ रोजी बेलब्रूक अमेरिका येथे झाला.

    अर्मा बॉम्बेक या अमेरिकेन लोकांची अत्यंत लोकप्रिय आणि जिचं साहित्य प्रचंड वाचलं जातं, अशी प्रसिद्ध विनोदी कथाकार!

    त्यांनी घरगुती प्रसंगावर आणि रोजच्या आयुष्यात नेहमी घडणाऱ्या प्रसंगांवर अत्यंत खुसखुशीत भाषेत मिश्कील लेखन करून प्रचंड लोकप्रियता मिळवली.

    ७० आणि ८०च्या दशकात त्यांचे ‘विट्स एंड’ हा सिंडिकेटेड कॉलम आठवड्यातून तीन वेळा जवळपास ९०० वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध व्हायचा. तिचं प्रत्येक पुस्तक बेस्टसेलर असायचंच. मातृत्व आणि बालसंगोपन हे तिचे विशेष जिव्हाळ्याचे विषय होते आणि त्या संदर्भात तिचं धमाल विनोदी लेखन प्रसिद्ध व्हायचाच अवकाश, की लगेच त्याच्यावर वाचकांच्या उड्या पडायच्या.

    दी ग्रास इज ऑल्वेज ग्रीनर ओव्हर दी सेप्टिक टँक, इफ लाइफ इज ए बोल ऑफ चेरीज व्हॉट अॅम आय डुइंग इन दी पिट्स?, फॅमिली – दी टाइज दॅट बाइंड.. अँड गॅग, आंट एर्माज कोप बुक, मदरहूड दी सेकंड ओल्डेस्ट प्रोफेशन, अशी त्यांची पुस्तकं लोकप्रिय आहेत. अर्मा बॉम्बेक यांचे २२ एप्रिल १९९६ रोजी निधन झाले.

      February 21, 2022


  • थोरले माधवराव पेशवे

    पानिपत येथे मराठयांचा पुष्कळ नाश होऊन नंतर थोडक्याच अवधीत नानासाहेब मरण पावले, तेव्हा ही संधी मराठ्यांवर स्वारी करण्यास उत्कृष्ट आहे असे पाहून निजामाने लढाई सुरू केली. त्यावेळी राघोबा प्रमुख असल्यामुळे सेनापती राघोबाने राक्षसभुवन येथे निजामाच्या सैन्यास गाठून लढाई दिली. त्यात राघोबाचा पराभव व्हावयाचा परंतु ऐनवेळी माधवरावानें आपल्या तुकडीनिशी निजामाच्या सैन्यावर हल्ला करून जय मिळविला. त्या मुळे निजामाचा उद्देश सिद्धीस न जाऊन त्यास पेशव्यांशी तह करावा लागला.

      February 16, 2022


  • बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सई लोकूर

    सई लोकूर मूळची बेळगावची. सईचे बालपण आणि शालेय शिक्षण सुध्दा बेळगावातच झाले. १२ वी नंतर ती मुंबईला आली. सई लोकूर ही गेली तीस हून अधिक वर्षे बेळगावातील नाट्यक्षेत्रात कार्य करणा-या विणा लोकूर यांची कन्या. सईच्या बालपणी तिच्या आईने खूप क्लासेस लावले होते.

      September 8, 2023


  • गायिका अपर्णा संत

    अपर्णा संत यांचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण श्री बैरागी बुवा, प्रभाकर जोशी. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १९७० रोजी झाला. श्रीमती वसुमती भागवत यांच्याकडे कोरेगाव आणि सातारा येथे झाले. श्रीमद् भगवद् गीतेतील तील तत्त्वज्ञान सांगणाऱ्या पंचवीस हिंदी व पंचवीस मराठी गाण्यांना अपर्णा संत यांनी चाली दिल्या आहेत. सध्या हा कार्यक्रम अपर्णा संत व आर्या आंबेकर सादर करत असतात. सुप्रसिद्ध दिग्दर्शक पंडित श्रीनिवास खळ्यांनी अपर्णा संत यांच्यासाठी जनाबाईचे अभंगाना चाली दिल्या आणि २००७ साली ‘अभंग जनाईचे’ ही अपर्णा संत यांची सी.डी यांच्या श्रीनिवास खळे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली प्रसिद्ध झाली आहे. अपर्णा संत यांनी संगीत क्षेत्रातील नामवंत ज्योत्स्ना भोळे गजानन वाटवे, अरुण दाते, सुरेश वाडकर, रवींद्र साठे श्रीधर फडके, सलील कुलकर्णी, स्वप्निल बांदोडकर यांच्या बरोबर कार्यक्रम केले आहेत.
    अपर्णा संत या भावसंगीत व चित्रपट संगीतावरील सांगीतिक विश्लेषणात्मक कार्यक्रम सादर करतात. संगीतकार मदन मोहन किंवा इतर अनेक संगीतकारांवरचे संगीतकारांच्या विविध सांगीतिक परिभाषेतील बद्दलचे कार्यक्रम त्या त्यांच्या विद्यार्थिनींना घेऊन कार्यक्रम सादर करत असतात.
    ‘गुरुवंदन’, ‘मधुबोली’, ‘इंडेमाऊ ची गाणी’ (बालगीते), ‘ही बहिण बहिणाबाईची’ हे अल्बम अपर्णा संत यांनी संगीत बद्ध केले आहेत. या अल्बम्स मध्ये सुरेश वाडकर, रवींद्र साठे, स्वप्निल बांदोडकर. आर्या आंबेकर. प्रियांका बर्वे प्रांजली बर्वे यांनी आवाज दिलेला आहे. तसेच शांताबाई शेळके यांच्या कवितांवर कार्यक्रम हे सर्व कार्यक्रम अपर्णा संत यांनी बसवलेले आहेत.
    ‘गाणं मनातलं’ हा स्वतः संगीत दिलेल्या वचनांचा रंगमंचीय आविष्कार त्या सादर करतात. ‘मल्हार अकॅडमी ऑफ म्युझिक” ही त्यांची स्वतःची संस्था असून या संस्थेद्वारे अपर्णा संत सुगम संगीत व ओंकार साधना प्रशिक्षण वर्ग १९९९ सालापासून घेत आहेत. अपर्णा संत यांना गाण्यासाठी उषा अत्रे पुरस्कार व रोटरी क्लब कडून पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा आगामी प्रोजेक्ट म्हणजे सुधीर मोघे यांच्या कवितांचा रंगमंचीय अविष्कार सादर करणे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      August 9, 2021


  • मराठीतील श्रेष्ठ दर्जाचे गीतकार व भावकवी भा. रा. तांबे

    मराठीतील श्रेष्ठ दर्जाचे गीतकार व भावकवी भा. रा. तांबे यांचा जन्म २७ ऑक्टोबर १८७४ रोजी मध्य प्रदेशातील मुगावली येथे झाला.

    भा.रा.तांबे हे मराठीतील श्रेष्ठ दर्जाचे गीतकार व भावकवी म्हणून प्रसिद्ध होते. केशवसुत यांच्यानंतरचे मराठीतील महत्वाचे कवी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. भा.रा.तांबे यांचे संपूर्ण नाव भास्कर रामचंद्र तांबे असे होते. ते ग्वाल्हेर संस्थानाचे राजकवी होते. म्हणून राजकवी तांबे या नावानेही ते ओळखले जातात. भा.रा. तांबे यांच्या कवितेचे वैशिष्ठय म्हणून आपणास त्यातील गेयता व भावमधुरता या गुणांचा उल्लेख करता येतो. त्यांनी आपल्या कवितांमधून जीवनाचे निर्दोष व आनंदी असे वर्णन केले आहे. म्हणून त्याच्या कवितेस संतुष्ट कविता असे यथार्थतेने संबोधता येईल.
    बालगीत व नाटयगीत हे काव्यप्रकारही त्यांनी तितक्याच समर्थपणे हाताळले व लोकप्रिय केले.

    त्यांच्या ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ ‘मधु मागशी माझ्या सख्या परी’ ‘कळा ज्या लागल्या जीवा’ ‘रुद्रास आवाहन’ ‘रुणझुणू ये’ यांसारख्या कविता स्मरणात राहतील अशाच आहेत. भा.रा.तांबे यांचे निधन ७ डिसेंबर १९४१ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      October 28, 2019


  • हृदयनाथ मंगेशकर यांच्या बद्दल लता दिदींच्या भावना

    हृदयनाथ मंगेशकर यांच्या बद्दल मा.लता दिदींच्या भावना.

    हृदयनाथ आमच्या पेक्षा लहान असला तरी कर्तृत्वाने तो खूप मोठा आहे. त्याचा संगीताचा अभ्यास प्रचंड आहे. अर्थात त्यासाठी त्याने अपार कष्ट घेतले आहेत. त्यातूनच त्याने संगीत क्षेत्रात आपले स्वत:चे स्वतंत्र स्थान व वेगळी शैली निर्माण केली आहे. आमिर खॉं साहेबांचा गंडा त्याने लहानपणीच बांधला. आमचे बाबा गेले ते तेव्हा तो अवघा चार वर्षांचा होता. सतत आजारी असायचा. त्यातच त्याच्या पायाला गंभीर आजार झाल्याने आम्ही सगळेच तेव्हा खूप काळजीत होतो. पुण्याच्या सर्व निष्णात डॉक्टरांना दाखविले. त्याचा पाय कापावा लागेल, तो चालूच शकणार नाही, असे सांगून डॉक्टरांनी आम्हाला घाबरवून सोडले होते. दरम्यान पुण्याहून आम्ही कोल्हापूरला राहायला गेलो होतो. दुखऱ्या पायाचा त्याला प्रचंड त्रास व्हायचा, धड चालता यायचे नाही, आशाच त्याला उचलून घेऊन जायची. अशात जडीबुटी व झाडपाल्याचा उपयोग करून औषधोपचार करणाऱ्या एका खेडवळ दिसणाऱ्या माणसाशी आमची भेट झाली. आम्ही बाळला त्याला दाखविले. त्याने कसलासा पाला औषध म्हणून दिला आणि पाण्यात गरम करून तो त्याच्या पायावरील जखमेवर बांधायला सांगितला. त्या उपायाने त्याचा पाय बरा झाला, पण पायात थोडासा दोष राहिला.

    हृदयनाथने संगीतबद्ध केलेली अनेक गाणी मी गायले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांना चालीत बांधून ते अभंग त्याने लोकांपुढे आणले. त्यातील ‘मोगरा फुलला’ या अभंगाची त्याने केलेली चाल, त्या अभंगाचा समजावून दिलेला अर्थ यामुळे मी त्याला माझा ‘गुरू’ मानायला लागले. ‘मोगरा फुलला’ गात असताना तो माझ्यापाशी आला व तो अभंग मला समजावून सांगितला. हा अभंग लिहिताना ज्ञानेश्वर त्यांच्यावर झालेला अन्याय, समाजाने त्यांना दिलेली वागणूक, केलेला छळ हे सगळे विसरून गेले होते. त्यांचे मन, सारा देह आणि विचार हे पूर्णपणे निर्विकार झाले होते असा विचार मी या अभंगाचा केला आहे. जी अवस्था ज्ञानेश्वरांची होती तसा निर्विकार भाव या अभंगातून व्यक्त व्हावा, दीदी ते तुझ्या गळ्यातून यावे, असे बाळने मला समजावून सांगितले. आज इतक्या वर्षांनंतरही या अभंगाची आणि ज्ञानेश्वरांच्या अन्य अभंगांची गोडी कमी झालेली नाही. यातील ‘घनू वाजे रुणझुणा’ सह सर्व अभंग आजही लोकप्रिय आहेत. यात ज्ञानेश्वरांच्या शब्दांचा सर्वात मोठा वाटा आहेच, पण अभंगांच्या चालीचे व संगीताचेही महत्त्वाचे योगदान आहे. बाळने केवळ अभंगांना चाल लावली नाही तर त्याने या सगळ्या अभंगांचा वेगळ्या पद्धतीने विचार केला, त्याचा अर्थ लावला. पुढे आम्ही ‘श्रीमद्भगवद्गीता’ केली. यातील श्लोकांना त्याने भूप, यमन आदी वेगवेगळ्या रागात बांधले. संत मीरा, कबीर, सुरदास यांचेही अभंग आम्ही केले. तसेच हृदयनाथने गालिबही तितक्याच ताकदीने केला. त्याचा गालिब पाकिस्तानातही लोकप्रिय आहे. हे सर्व करताना त्याने प्रचंड वाचन, अभ्यास केला आणि त्या सगळ्यासाठी मी त्याला माझा ‘गुरू’ मानते.
    ‘भावसरगम’ करण्यापूर्वी हृदयनाथ मराठी/हिंदी गाण्यांचा एक कार्यक्रम करायचा. त्यावेळी या कार्यक्रमात उषा, मीना ही गायल्या आहेत. हृदयनाथबरोबर तेव्हा प्यारेलाल, त्याचा भाऊ गोरख, आनंद, लक्ष्मीकांत आणि इतर मंडळी या कार्यक्रमात असायची. एकदा एका कार्यक्रमाला मी गेले होते. कार्यक्रम सुरू असताना हृदयनाथने मला व्यासपीठावर बोलाविले आणि एक गाणे गायला सांगितले त्याच्या विनंतीला मान देऊन मी त्या वेळी एक गाणे म्हटलेही. त्यांच्या एका कार्यक्रमाला ज्येष्ठ संगीतकार नौशाद आले होते. नौशाद यांनी संगीतबद्ध केलेल्या एका गाण्याची धून हृदयनाथने अगदी बरोबर वाजविली की नौशादजींनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याला दाद दिली. पुढे हृदयनाथने हाच गाण्यांचा कार्यक्रम ‘भावसरगम’ या नावाने सुरू केला. आज या कार्यक्रमाचेही सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.

    हृदयनाथची गाणी म्हणायला सोपी वाटत असली तरी प्रत्यक्ष गाताना ती किती कठीण असतात ते कळते. त्याचा जास्त ओढा कठीणतेकडेच आहे. त्याच्याकडे मी अनेक गाणी गायली आहेत. प्रत्येक गाणे गाताना मला खूप भीती वाटायची, आपली फजिती तर होणार नाही ना, असे वाटायचे. ‘मी डोलकर डोलकर’, ‘माझ्या सारंगा’ ही गाणी तशी सोपी आहेत पण ‘ मालवून टाक दीप’, ‘घन तमी शुक्र बघ राज करी’ ही व अन्य गाणी गायला कठीण आहेत. त्याला रागाचे, तालाचे आणि सुराचे ज्ञान खूप चांगले आहे. प्रत्येक गाणे संगीतबद्ध करताना त्याने या सगळ्याचा पुरेपूर वापर केला आहे. त्यामुळे विविध शैलीतील गाणी त्याने दिली असून ती सर्व गाणी इतक्या वर्षांनंतरही लोकांच्या गळ्यात आणि ओठावर आहेत. कोणत्या चांगल्या कवितेचे उत्तम गाणे होऊ शकते याची नेमकी जाण त्याला आहे. त्यामुळे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज, ग्रेस, सुरेश भट यांच्या चांगल्या कविता ही उत्तम गाणी म्हणून रसिकांपुढे आली. संगीत या कलेबरोबरच त्याच्याकडे उत्तम लेखनकलाही आहे. तो छान लिहितो.

    मी, आशा, मीना, उषा आम्हा सगळ्या बहिणींचा तो लाडका भाऊ आहे. आम्हा सर्व बहिणींसाठी तो सर्वस्व आहे.

    लता मंगेशकर
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    हृदयनाथ मंगेशकर यांची अजून काही गाणी.
    ये आखें देख कर.
    ही वाट दूर जाते.
    उष्काल होता होता.
    मी डोलकर डोलकर दर्याचा राजा
    चांदण्यात फिरताना.
    आनंदवन भुवनी.
    ने मजसी ने.

      October 26, 2016


  • लेखक मुन्शी प्रेमचंद

    साहित्य आणि कादंबरी क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी मुन्शी प्रेमचंद यांना ‘उपन्यास सम्राट’ म्हणूनही ओळखले जाते.

      July 31, 2021


  • सुविख्यात नृत्यांगना सीतारादेवी

    नर्तिका म्ह्णून त्यांनी चित्रपटात कामे केली तसेच अभिनयातही त्या उत्तम असल्यामुळे त्यांना चित्रपटांमध्ये नायिकेची भूमिकाही साकारायला मिळाली. मोठमोठया कलाकारांचा सानिध्य त्यांना लाभले त्यामध्ये पं .रविशंकर , उस्ताद अल्लारखाँ , बडे गुलाम अली खाँ यांनी सीतारादेवी यांच्या नृत्याचे कौतुक केले.

      December 8, 2021