(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्योतिषी शरद उपाध्ये

    त्यांचे ज्योतिषविषयक ‘राशीचक्र’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. या पुस्तकात त्यांनी १२ राशी व त्यांचे स्वभाव गुणवर्णन केले आहे. याच विषयावर आधारीत ते राशीचक्र व राशीरंजन हे एकपात्री कथाकथनाचे प्रयोग करतात.

      September 21, 2021


  • अभिनेत्री श्रद्धा कपूर

    बॉलिवूडमधील व्हिलन शक्ती कपूर यांची मुलगी असलेल्या श्रद्धा कपूरने आज बॉलिवूडमध्ये आपलं वेगळे स्थान निर्माण केले आहे. सुपरहिट सिनेमा ‘आशिकी-2’ मुळे श्रद्धाची हटके अशी ओळख निर्माण झाली.

      April 27, 2024


  • जगप्रसिद्ध नर्तक उदयशंकर

    उदयशंकर चौधरी ऊर्फ उदयशंकर मुळचे नाराली गावचे. त्यांचे वडिल जमीनदार होते. हारचौधरी ही त्यांना पदवी होती. पुढे चौधरी हेच रुढ झाले. त्यांचे वडिल संस्कृतचे पंडित होते. त्यांना तीन लहान भावंड होती. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९०० रोजी जन्म राजस्थान मधील उदयपुर येथे झाला. राजेंद्रशंकर, देवेंद्रशंकर, भुपेंद्रशंकर व रवीशंकर. पैकी रवीशंकर हे पुढे जगप्रसिद्ध सतार वादक झाले.

    १९१८ साली शिक्षणा साठी मुंबई जेजे स्कुल ऑफ आर्ट्स येथे प्रवेश घेतला.पुढे गंधर्व महाविद्यालयातही शिक्षण घेतले. १९२० साली लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ आर्ट्स येथे प्रवेश घेतला. तिथे भारतीय नृत्य व पाश्चात्य नृत्य यांचा सखोल अभ्यास करुन दोन्हीचे फ्युजन केले. १९३१ साली पँरीस येथे Indian Dance Academy ची स्थापना केली. जानेवारी १९३३ ला ते अमेरिकेत गेले. न्युयॉर्क मधे पहिला शो झाला. त्या नंतर अमेरिकेतील ८४ शहरात त्यांचे शो झाले. १९६२ साली ' संगीत नाटक अकादमी ' चा पुरस्कार त्यांना मिळाला.

    १९६५ साली कोलकाता येथे त्यांनी Udayshankar center for dance या संस्थेची स्थापना केली. १९७१ साली भारताच्या सरकारने त्यांना पद्मविभुषणने सन्माननीत केले. संपुर्ण युरोप, अमेरिका, रशिया सह जगातील अनेक देशात त्यांचे नृत्याचे कार्यक्रम झाले.

    त्यांना दोन अपत्य, आनंदशंकर व ममताशंकर. आनंदने न्रत्यातच आपले करियर केले. तर ममताने अभिनयात आपला ठसा ऊमटवला.
    सत्यजीत रे, मृणाल सेन सारख्या दिग्दर्शका सोबत काम केले. ममताने हॉलीवुड चित्रपटात बालकलाकार म्हणुन काम केले. उदयशंकर यांच्या कलेने भारतीय नृत्य जगभर प्रसिद्ध झाले. उदयशंकर यांचे निधन २६ सप्टेंबर १९७७ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      December 8, 2017


  • बॉलिवूडच्या जेष्ठ गायिका मीना कपूर

    मीना कपूर यांचे वडील विक्रम कपूर हे कलकत्त्याच्या न्यू थिएटर्स स्टुडिओचे अभिनेते होते. चित्रपट निर्माते पी.सी. बरुआ हेही त्यांचे नातेवाईक होते. यांमुळे कपूर यांचा चित्रपटात प्रवेश सुकर झाला. मीना कपूर यांनी आपल्या लहानश्या करीयरची सुरवात १९४६ साली नीनु मुजुमदार यांच्या आठ दिन या चित्रपटापासून केली. याला संगीत एस.डी.बर्मन यांचे हो. गायिका मीना कपूर या संगीतकार अनिल विश्वास यांच्या पत्नी. मीना कपूर यांचा संगीतकार अनिल विश्वास यांच्याशी १९५९ मध्ये विवाह झाला.

    मीना कपूर यांचे नाव घेताच चटदिशी आठवते ते गाणे म्हणजे "कुछ और जमाना केहता है" हे 'छोटी छोटी बाते' या स्वर्गीय मोतीलाल निर्मित चित्रपटातील अनिल विश्वास यानीच संगीतबद्ध केलेले सुरेख गीत, जे नादिरा यांच्यावर चित्रीत झाले होते. 'परदेसी' मधील 'रसिया रे मन बसिया रे' हे एक आणि "आँखे" मधील 'मोरे अटरिय पे कागा' हे आणखीन एक प्रकर्षाने आठवणारे गीत. अनिलदांच्या निधनानंतर 'अमर उत्पल' या त्यांच्या मुलांजवळ राहात असत अमर उत्पल या जोडीने बिग बी च्या 'शहेनशहा' चे संगीत दिग्दर्शन केले होते. मीना कपूर यांनी १२५ हून अधिक गाणी गायली होती. यातील सी रामचंद्र यांच्या बरोबरचे मेरी जान संडे के संडे', व'रसिया रे मन बसिया रे' ही त्यांची गाजलेली गाणी. मीना कपूर यांचे २३ नोव्हेंबर २०१७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    मीना कपूर यांची गाणी
    https://www.youtube.com/playlist…
    मेरी जान संडे के संडे'
    https://www.youtube.com/watch?v=eQT_HmOUdRc
    https://www.youtube.com/watch?v=Va739fEuuZg

      November 23, 2018


  • सुप्रसिद्ध अभिनेते सतीश दुभाषी

    विश्राम बेडेकरांच्या ‘ वाजे पाऊल आपले ‘ मध्ये त्यात त्यांनी डॉक्टर ऐनापुरे यांची भूमिका त्यांनी केली . ते त्यांचे पहिले व्यावसायीक नाटक. त्या वेळी त्यांना ४० रुपये नाईट मिळाली.

      December 14, 2021


  • सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते वसंतदादा पाटील

    सहकार क्षेत्रात दादांचा प्रत्येक शब्द अंतिम मानला जात असे. वसंतदादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले होते पण महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते, क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी – असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो.

      March 1, 2022


  • प्रसिद्ध तबला वादक झाकिर हुसेन

    तबल्याचा ठेका आणि द्रुत लयीत जुगलबंदीचा शेवट करताना एका उन्मनी अवस्थेत मानेला वारंवार झटका दिल्याने लयीत डोलणारे डोईवरचे केस, ही तबला नवाज झाकीर हुसेन यांची रसिकजनांच्या मनांवर ठसलेली प्रतिमा. त्यांचा जन्म ९ मार्च १९५१ रजी झाला. त्याच प्रतिमेच्या प्रेमात पडून सहज उमटणारी ‘वाह उस्ताद’ ही दाद आणि या सदासतेज, हसतमुख चेहरा व त्यांचे भारतीय संगीताला वैश्विक परिमाण मिळवून देणारे योगदान कितीतरी अमूल्य. भारतातील सर्वात प्रसिद्ध तबला वादक अशी ओळख असणारे मा. झाकिर हुसेन हे मा.अल्लाराखा खां यांचे सुपुत्र आहे. मा.झाकिर हुसेन यांचे बालपण मुंबई मध्ये गेले. झाकिर हुसेन संगीत जगात वयाच्या बाराव्या वर्षी तबला शिकण्यास सुरुवात केली मा.झाकिर हुसेन हे एक व्यक्तिमत्त्व बहुआयामी आहे. सोलो वादन, फ्युजन आणि साथसंगत हे तिन्ही प्रकार ते तितक्यानच तन्मयतेने व उत्तमरीत्या करतात. भारतीयांसाठी मा.झाकीर हुसेन हे सर्वश्रेष्ठ तबलावादक असले, तरीही जगाच्या व्यासपीठावर ते एक श्रेष्ठ संगीतकार म्हणून विराजमान आहेत. जगात सारे प्रवाह एकत्र येण्याचे श्रेय जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला जरी जात असले, तरीही संगीताच्या क्षेत्रात मा. झाकीर हुसेन यांनी ही प्रक्रिया अगदी सत्तरच्या दशकापासूनच सुरू केलेली आहे. मा.झाकीर हुसेन हे असे एकमेव तबलावादक आहेत, की ज्यांनी सर्व प्रकारच्या कलाकारांबरोबर आणि कला-प्रकारांबरोबर तबलावादन केलेले आहे. मग तो मा.गिरीजा देवी यांचा टप्पा असो, किंवा त्यांचीच ठुमरी किंवा झुला असो; तो मा.भीमसेन जोशी यांचा अभंग असो किंवा मा.जसराजजी यांचे भजन. हे सारे प्रकार आत्मसात करून त्यांनी या सर्वांबरोबर वादन केले आहे. इतकेच काय, तर देशातील प्रमुख गायकांबरोबर आणि वादकांबरोबर त्यांनी तबल्याची साथ करून प्रत्येकाची शैली सांभाळत आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले आहे. मा.झाकीर हुसेन स्वतः तबला या वाद्याला व्यासपीठावर प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय मा. रवि शंकर, उस्ताद अली अकबर खां आणि त्यांचे वडील उस्ताद अल्लाराखा खां यांना देतात. कारण भारतीय संगीत सर्वप्रथम देशाबाहेर या तिघांनी नेले. ते जगमान्य कलाकार झाले आणि त्यानंतर अनेक कलाकार देशात-परदेशात आपली कला सादर करू लागले. परंतु या साऱ्या प्रक्रियेत कळस जर कुणी चढवला असेल तर तो मा.झाकीर हुसेन यांनी! वीस वर्षांचे असताना झाकीर हुसेन अमेरिकेला गेले. त्यांना तिथे बोलावण्यात पंडित रविशंकर यांचा फार मोठा आग्रह होता. तोपर्यंत ते देशभर दौरे करीत होतेच, परंतु अमेरिकेतला तो अनुभव त्यांच्या आयुष्याला नक्कीच मोठी कलाटणी देऊन गेला. त्या काळातील अमेरिका हा उर्वरित जगासाठी एक ‘कल्चरल मेल्टिंग पॉट’ होता. यातूनच साहित्य-कला प्रांतात रूढी-परंपरा नाकारणारी प्रतिचळवळ म्हणजेच काऊंटर कल्चर मुव्हमेंट जन्माला आली. विशेषतः पूर्वेकडील संस्कृती, संगीत आणि अध्यात्म या सर्वांचे आकर्षण सामान्य अमेरिकी लोकांमध्ये वाढले. पं. रविशंकर, अली अकबर खां, उस्ताद अल्लाराखा खां अमेरिकेत प्रचंड लोकप्रिय होत गेले. याच काळात अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या मा.झाकीर हुसेन यांनी जगातील वेगवेगळ्या सांगीतिक परंपरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलाकारांबरोबर सांगीतिक वार्तालाप केला. त्यांनी आपली थोर परंपरा, आपले संगीत सर्वश्रेष्ठ असे काहीही मनात न आणता अगदी खुल्या मनाने या साऱ्या भिन्न परंपरा आत्मसात केल्या. त्या सर्वांमध्ये तबला या वाद्याला एक मानाचे स्थान मिळत गेले. आंतरराष्ट्रीय कलाकारांमध्ये जॉन मॅक्लॉलिन, मिकी हार्ट, हर्बी हन्कॉक, एरिक हर्लंड या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर मा.झाकीर हुसेन यांनी सहवादन केले. त्यातूनच त्यांना वैश्विक स्तरावर उत्तरोत्तर लोकप्रियतादेखील मिळत गेली. त्याचबरोबर भारतीय गायक-वादकांबरोबर त्यांचे जगभर दौरेही सुरू राहिले. सत्तर आणि ऐंशीची दशके अशी होती तेव्हा भारतातील संगीत तर सातासमुद्रापार जात होतेच, परंतु जागतिक पातळीवर अनेक सांगीतिक प्रवाह एकमेकांना प्रभावितही करीत होते. मा. झाकीर हुसेन यांनी या दोन्ही प्रकारच्या सांगीतिक प्रवाहात आपले विशिष्ट स्थान निर्माण केले होते. म्हणूनच नव्वदच्या दशकात जेव्हा जागतिकीकरण ही संकल्पना दृढ झाली, तेव्हा मा.झाकीर हुसेन हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे संगीतकार म्हणून ध्रुवस्थान प्राप्त झालेले नाव बनले! याचाच प्रभाव म्हणून १९९६ च्या अॅटलांटा ऑलिंपिकच्या उद्घाणटन समारंभाला ज्या संगीतकारांनी संगीत दिले, त्यातील एक नाव मा.झाकीर हुसेन हे होते. मास्टर्स ऑफ पर्कशन या संकल्पनेद्वारे ते भारतातल्या लोकसंगीत वादकांना दरवर्षी आपल्या बरोबर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर घेऊन जात आहेत. अनेक गुणी ज्युनियर कलाकारांबरोबर तबल्याची साथ करून ते त्यांना प्रोत्साहन देत आहेत. या कलाकारांमध्ये राहुल शर्मा, नीलाद्री कुमार, राकेश चौरासिया यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मागच्या वर्षी पुण्याला जेव्हा त्यांनी राहुल देशपांडे यांच्या सोबत तबला वाजवला, तीस वर्षांपूर्वी याच मा.झाकीर हुसेन यांनी देशपांडे यांचे आजोबा पं.वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर पुण्याला तबल्याची साथ केली होती. मा. झाकिर हुसेन यांना भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण, देऊन गौरवले आहे. त्यांना ग्रॅमी पुरस्कारही मिळाला आहे. संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल मा.झाकीर हुसेन यांना "एस.डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटीव अवॉर्ड' नुकतेच मिळाले आहे. मा.झाकीर हुसेन यांचे वास्तव्य पत्नी आणि दोन मुलींसमवेत कॅलिफोर्निया येथे असते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    झाकिर हुसेन यांचे तबला वादन.

    http://www.youtube.com/watch?v=wOUM8K0-Wkc&list=RDEMX5Bz5WHsWxd4Xz_V2LK_Xw

    https://www.youtube.com/shared?ci=rBMTQl_JG70

    https://www.youtube.com/shared?ci=ia22SQ-W40g

      March 9, 2017


  • भारतातील ‘द फर्स्ट वाईन लेडी’ अचला जोशी

    अमेरिका वारीहून भारतात परतताना अचला यांनी वाइनइस्ट सोबत घेऊन भारतामध्ये प्रवेश केला. प्रवासादरम्यान वाइन कशी बनवितात, त्याचे फायदे-तोटे याविषयी पुस्तकी ज्ञान घेतल्यानंतर मुंबईतील एका रविवारच्या दुपारी अचला या माहेरी गेल्या असताना डॉक्टर भावाला आलेल्या भेट वस्तू मधील पाच किलो द्राक्षाच्या पेटीवर अचला यांची नजर गेली. द्राक्षपेटीतून पहिले द्राक्ष जिभेवर विरघळल्यानंतर अचला यांना अमेरिकेतील त्या रेडवाइनशी जुळत्या चवीचा अंदाज आला. माहेरवाशीण आई घरची ही द्राक्षपेटी स्वत:च्या घरात त्या घेऊन गेल्यावर त्यांच्या पतीने तेवढय़ाच तडफेने द्राक्षाची वाइन बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले.

      March 19, 2022


  • हरहुन्नरी कलाकार वैभव मांगले

    टाइमपास’ चित्रपटातील ‘नया है यह’ हा डायलॉग म्हटला की डोळ्यांसमोर चेहरा येतो वैभव मांगले यांचा. टीव्ही मालिका, रंगभूमी आणि चित्रपट या तीनही माध्यमांमध्ये सध्या सर्वाधिक व्यग्र असलेले अभिनेता म्हणजे वैभव मांगले.

      June 20, 2022


  • मराठी अभिनेते आनंद अभ्यंकर

    आनंद अभ्यंकर यांचे शालेय शिक्षण नागपूरच्या सरस्वती हायस्कूलमध्ये झाले. शाळा, महाविद्यालयात किंवा गणेशोत्सवात नाटक बसवून त्या माध्यमातून अभ्यंकर यांनी छोट्या-छोट्या नाटकांमधून मराठी रंगभूमीवर प्रवेश केला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात आले. त्यांचा जन्म २ जून १९६३ रोजी झाला. त्यांची रंगभूमीच्या क्षेत्रातील खरी कारकीर्द पुण्याला सुरू झाली. गरवारे महाविद्यालयात त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी व्यवस्थापन शास्त्राचेही शिक्षण घेतले. बजाज ऑटोमध्ये काही काळ त्यांनी नोकरी केली. मुंबईत आल्यावर उमेदवारीच्या काळात मोहन जोशी यांच्या साथीने त्यांनी कामासाठी संघर्ष केला.

    शिक्षण आणि नोकरीच्या काळात त्यांनी काही नाट्य संस्थांसाठी काम करण्यास सुरुवात केली. ‘कुर्यात सदा टिंगलम्’द्वारे त्यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर भक्ती बर्वे यांच्याबरोबर ‘आई रिटायर होतेय’, आनंद म्हसवेकर लिखित-दिग्दर्शित ‘चॉइस इज युवर्स’ अशा नाटकांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या. ‘वादळवाट’, ‘असंभव’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘फू बाई फू’, ‘मला सासू हवी’, ‘शुभंकरोती’, ‘या गोजिरवाण्या घरात’ आणि सह्याद्री वाहिनीवरील गोंदवलेकर महाराजांच्या मालिकेच्या माध्यमातून अभ्यंकर घराघरात पोहोचले. तर ‘वास्तव’, ‘जिस देश में गंगा रहता हैं’, ‘अकलेचे कांदे’, तेरा मेरा साथ रहें, ‘मातीच्या चुली’, ‘चेकमेट’, ‘कुंकू लावते माहेरचं’, ‘ही पोरगी कोणाची’, ‘पप्पू कांट डान्स साला’, ‘आनंदाचे झाड’, ‘आयडियाची कल्पना’, ‘जन्म’, ‘बालगंधर्व’ ,‘स्पंदन’ अशा चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या. आनंद अभ्यंकर यांचे २३ डिसेंबर २०१२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      December 23, 2018