एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई करणारा पहिला नेपाळी शेर्पा तेनझिंग नोर्गे (Tenzing Norgay) यांचा जन्म २९ मे १९१४ रोजी झाला.
हिमालयातील एव्हरेस्ट या सर्वोच्च शिखराला नेपाळी भाषेत सागरमाथा म्हणजे आकाशदेवता म्हटले जाते; तर तिबेटीमध्ये या शिखराला चोमुलुंग्मा म्हणजे विश्वदेवता म्हटले जाते. हिमालयाची भव्यता, तेथील गूढगंभीर आणि अंतर्मुख करणारे वातावरण, निसर्गाची हरक्षणाला पालटणारी रूपे आणि नजर बांधून ठेवणारे दिव्य सौंदर्य लक्षात घेतले तर ही नावे किती अर्थपूर्ण आहेत, हे ध्यानात येते. अशा या शिखरावर पाऊल ठेवावे ही तमाम गिर्यारोहकांची आकांक्षा असते. त्याची पूर्ती होणे अवघड आहे, हे माहीत असूनही असे स्वप्न पाहणारे अनेक असतात. हिलरी यांच्यापूर्वी असे लोक होतेच. त्यांनीही हिमालयाला धडका दिल्या होत्या. परंतु तिथली हिमवादळे, फसवा निसर्ग, डोळे फिरविणा-या द-या आणि दमछाक करायला लावणारे चढ यांनी त्यांना पराभूत केले. हा सारा इतिहास माहीत असतानाही हिलरी एव्हरेस्टच्या मोहिमेमध्ये सामील झाले आणि शेर्पा तेनझिंग नोर्गेसह एव्हरेस्टवर पाऊल ठेवून त्यांनी एक नवीन पर्व सुरू केले. शिखरावर ते पंधराच मिनिटे थांबले होते.
२९ मे १९५३ साली श्री. शेर्पा तेनझिंग नोर्गे व श्री. एडमंड हिलरी यांनी सर्वप्रथम एव्हरेस्ट सर केले. या मोहिमेनंतर श्री. शेर्पा तेनझिंग नोर्गे यांच्या कौशल्याचा व अनुभवाचा फायदा सर्वांना मिळावा व गिर्यारोहण क्षेत्राचा भारतवर्षामध्ये प्रसार व विकास व्हावा या विचारातून श्री. पंडित नेहरू यांनी रक्षा मंत्रालयाच्या अख्यारीत हि संस्था दार्जिलिंग येथे स्थापन केली. शेर्पा तेनझिंग हे तिबेटी कि नेपाळी ह्यावर वाद होते. पण हा भला माणूस होता. शेर्पा तेनझिंग आणि हिलरी ह्यात 'आधी' शिखरावर कोण गेले असे फालतू वाद कित्येक पत्रकारांनी उपस्थित केले. आम्ही दोघे एकदमच पोचलो असे दोघेही सांगत.
शेवटी एकदा हा सगळा आचरटपणा असह्य होऊन तेनझिंग म्हणाले "हिलरी आधी पोचला आणि शिखरावर पोचणारा दुसरा माणूस हा जर अपमान असेल तर तो आयुष्यभरासाठी मी सोसेन!" एवरेस्टवर उभा असलेल्या तेनझिंग यांचा फोटो सगळ्यांनी पाहिला पण हिलरीचा फोटो नव्हता त्याबद्दल मिश्किलपणे एका मुलाखतीत म्हणाले होते "त्याला कॅमेरा कसा चालवायचा ह्याची माहीती नव्हती आणि एवरेस्टवरच्या मरणाच्या गारठ्यातल्या ठिकाणापेक्षा कितीतरी चांगली ठिकाणे आहेत जिथे मी त्याला हे शिक्षण देऊ शकेन!" तेनझिंग हा दार्जीलिंगमधल्या 'हिमालयन माऊंटेनिअरिंग इंस्टिट्यूट्चा' डायरेक्टर होते. १९७८ मधे 'तेनझिंग नोर्गे ऍडवेंचर्स' ही गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देणारी कंपनीही त्यांनी स्थापन केली. १९५९ रोजी पद्मभूषण देऊन आणि १९७८ साली 'तेनझिंग नोर्गे सन्मान पदक' देऊन भारत सरकारने गौरव केला होता.
तेनझिंग म्हणाले होते की "कारकीर्दीला ओझीवाहू हमालापासून सुरुवात करुन ते अनेक पदके लटकवलेला कोट घालून विमानातून ठिकठिकाणचा प्रवास करणारा आणि शेवटी उत्पनावर प्राप्तीकर भरण्याची चिंता करणारा मी पहिलाच शेर्पा असेन! शेर्पा तेनझिंग नोर्गे यांचे निधन ९ मे १९८६ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
बॉलिवूडमधील चित्रपट निर्माते चंदुलाल शहा यांचा जन्म १३ एप्रिल १८९८ रोजी जामनगर येथे झाला.
चंदुलाल शहा यांचे शिक्षण मुंबईत झाले. १९२४ साली ते स्टॉक एक्सेज मध्ये नोकरी करू लागले. नोकरी करत असताना आपले बंधू मा.जे. डी. शहा जे पौराणिक चित्रपट लेखक होते त्यांना मदत करू लागले. व "लक्ष्मी फिल्म कंपनी" या नावाने कंपनी स्थापन केली व १९२५ साली विमला या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.
चंदुलाल शहा यांनी १९२६ साली टाईपीस्ट गर्ल या नावाने पहिला चित्रपट दिग्दर्शत केला त्यात सूलोचना बाई व गोहरबाई होत्या. चंदुलाल शहा यांनी गोहरबाईना घेऊन नंतर ५ चित्रपट बनवले. चंदुलाल शहा यांनी स्वतः १९२७ साली गुणसुंदरी हा गुजराती मूकपट सादर केला. त्यात प्रमुख भुमिकेत गोहरबाई होत्या. पुढे दोन वर्षे गुजराती चित्रपटांची निर्मिती झालीच नाही.
चंदुलाल शहा यांनी १९२९ साली रणजीत स्टुडिओची स्थापना केली. १९२९ ते १९७० दरम्यान ३९ चित्रपट बनवले. चित्रपट निर्मिती याशिवाय मा. चंदुलाल शहा यांनी भारतीय चित्रपट उद्योगासाठी खूप काम केले. भारतीय चित्रपट उद्योगाचे रौप्य महोत्सव (१९३९) आणि भारतीय चित्रपट उद्योग (१९६३) सुवर्ण जयंती त्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा झाले.
त्यांनी भारतीय फिल्म फेडरेशन १९५१ मध्ये स्थापना केली व ते पहिले अध्यक्ष होते आणि अगदी पुढील वर्षी हॉलीवूडला एक भारतीय प्रतिनिधी नेतृत्व त्यांनी केले होते.
चंदुलाल शहा यांचे २५ नोव्हेंबर १९७५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
पं. विष्णु नारायण भातखंडे यांचा जन्म १० ऑगस्ट १८६० रोजी झाला. भातखंडे हे लहानपणी बासरी व महाविद्यालयात शिकत असतानाच सतार वाजवण्यास शिकले. सुरुवातीस गोपाळ गिरी यांच्याकडे व नंतर अंध वादक वल्लभदास दामुलजी यांच्याकडे त्यांनी सतारवादनाचे धडे घेतले.
ते १८८५ मध्ये बी.ए. व १८८७ मध्ये एल्.एल्. बी. झाले. मात्र तत्पूर्वीच ते १८८४ मध्ये काही पारशी संगीतप्रेमींनी चालविलेल्या‘गायनोत्तेजक मंडळी’ मध्ये (स्थापना १८७०) दाखल झाले होते. तेथे त्यांना त्या काळातील नामांकित गायक-वादकांचे गायन-वादन ऐकण्याची संधी मिळाली. ही संस्था त्यांच्या व्यासंगाची गंगोत्रीच ठरली व तेथे त्यांच्या संशोधनाला चाल नाही मिळाली. ह्या संस्थेत त्यांनी कितीतरी वर्षे विनावेतन संगीत शिकविले आणि वेगवेगळ्या थोर कलावंतांकडून पारंपारिक धृपदे, ख्याल, होऱ्या, तराणे, ठुमऱ्या यांची माहिती व चिजा गोळा करण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांना असे आढळून आले, की गायकांच्या चिजांमध्ये व्यक्त होणाऱ्या रागस्वरुपांचा प्राचीन ग्रंथातील रागविचारांशी व उपपत्तींशी नीट मेळ बसत नाही. शास्त्रीय स्वरलिपिपद्धतीचा प्रचार नसल्याने आणि उपपत्तींचे गायकांना ज्ञान नसल्याने ते पारंपारिक चिजांमध्ये बदल करीत आणि नवीनही चिजा बनवीत. त्यामुळे उपलब्ध रागरागिण्या व चिजा हाच संशोधनाचा व उपपत्तींचा पाया मानून भातखंड्यांनी आपल्या जन्मभर चालविलेल्या संगीतकलेच्या पद्धतशीर अभ्यासाला प्रारंभ केला. गायनोत्तेजक मंडळीच्या नियतकालिक बैठकांमध्ये ते वरील विषयासंबंधी पद्धतशीर विचार मांडू लागले. जुन्या ग्रंथांतील भाषा व विचार अस्पष्ट, संदिग्ध व शंकास्पद असल्याचे त्यांना आढळून आले. तद्वतच प्राचीन ग्रंथांर्गत संगीतशास्त्र व प्रत्यक्ष प्रचलित गानव्यवहार यांतील पूर्ण फारकतही त्यांच्या निदर्शनास आली होतीच. त्यातून संगीतशास्त्राची नव्याने आमूलाग्र फेरमांडणी करणे व प्रचलित संगीतव्यवहाराशी त्याची सांगड घालणे, हे त्यांना अत्यावश्यक वाटू लागले.
आपला वकिलीचा व्यवसाय सोडून त्यांनी संगीतसंशोधनाला सर्वस्वी वाहून घेतले. त्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रंमती केली (१९०४; १९०७ व १९०८-०९). ठिकठिकाणच्या संगीतकेंद्रांना भेटी देऊन तेथील शास्त्रकार व कलावंत ह्यांच्यासमवेत त्यांनी चर्चा केल्या. संगीतावरचे दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते यांचा शोध घेऊन, त्यांतील तत्वविचारांची चिकित्सा केली. महत्वाची हस्तलिखिते नकलून काढली. हिंदूस्थानी संगीतातील स्वरलिपिरचना,रागविचार, त्याचे आरोहावरोह, श्रुतिविचार,थाटपद्धती, वादी-संवादी स्वर इ. विषयांसंबंधी तात्त्विक सांगोपांग चर्चा व त्या अनुषंगाने विविध उपपत्ती त्यांनी आपल्या ग्रंथांतून मांडल्या. तसेच एक खास स्वरलिपिपद्धती प्रस्थापित केली.
पंडित भातखंडे यांच्या संगीतकार्याची त्रिसूत्री म्हणजे प्राचीन संगीतविद्येचे संशोधन, नव्या संगीतशास्त्राची नव्याने उभारणी आणि ह्या संगीतशास्त्राचा प्रचार व प्रसार होय. त्यासाठी त्यांनी संगीतविद्यालयाची स्थापना केली. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी आपली सरकारी संगीतपाठशाळा नव्या पद्धतीने चालवण्यासाठी भातखड्यांच्या हवाली केली (१९१६). ग्वाल्हेरचे महाराज माधवराव शिंदे यांनी त्यांच्या देखरेखीखाली ‘माधव संगीत महाविद्यालय’ नव्याने स्थापन केले (१९१८) आणि मुख्य म्हणजे भातखंडे यांनी लखनौला तेथील स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने ‘मॅरिज कॉलेज ऑफ हिंदुस्थानी म्यूझिक’ हे स्थापन केले (१९२६). या संस्थेचेच रुपांतर पुढे ‘भातखंडे संगीत महाविद्यालया’ मध्ये झाले. तसेच या संगीतविद्यालयांसाठी सुसूत्र असा अभ्यासक्रम त्यांनी आखला व त्यानुसार क्रमिक पुस्तकेही तयार केली. संगीतविषयक खुल्या चर्चा व विचारविनिमय यांद्वारे संगीप्रसार व्हावा, म्हणून संगीतपरिषदा भरवण्याची मूळ कल्पनाही त्यांचीच होय. त्यानुसार बडोदे (१९१६), दिल्ली (१९१८),वाराणसी (१९१९) व लखनौ (१९२४ व १९२५) येथे परिषदा भरवण्यात त्यांनी पुढाकार घेतला. शिवाय शास्त्रीय संगीताच्या प्रचारासाठी लक्षणगीतसंग्रहासारख्या ग्रंथरचनाही केल्या. बव्हंशी १९०८ ते १९३३ या कालावधीत त्यांनी आपली ग्रंथरचना केली.
त्यांची प्रमुख ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे :
स्वनिर्मिती ग्रंथ : (१) श्रीमल्लक्ष्यसंगीतम् वअभिनव रागमञ्जरी (संस्कृत); (२) हिंदूस्थानी संगीतपद्धती (मराठी, भाग ४, पृष्ठे सु. २,५००); (३) हिंदुस्थानी संगीतपद्धती क्रमिक पुस्तकमालिका (मराठी, भाग १ ते ६, एकूण चिजा १,८५२); (४) अ शॉर्ट हिस्टॉरिकल सर्व्हे ऑफ द म्यूझिक ऑफ अपर इंडिया (इंग्रजी); (५)अ कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ सम ऑफ द लीडींग म्यूझिक सिस्टिम्स ऑफ द फिफ्टीन्थ,सिक्सटीन्थ, सेव्हन्टीन्थ अँन्ड एटीन्थ सेंचुरीज(इंग्रजी); (६) हिंदुस्थानी म्यूझिक (इंग्रजी); (७)लक्षणगीतसंग्रह (३ भाग); (८) गीतमालिका (२३ मासिक अंक; प्रत्येक अंकात सु. २५ गीतांच्या बंदिशी); (९) पारिजात प्रवेशिका : पं. अहोबलकृत संगीतपरिजात ग्रंथाच्या स्वराध्यायावरील भाषा (मराठी); (१०)रागविबोधप्रवेशिका : पं. सोमनाथकृत रागवियोधग्रंथाच्या स्वराध्यायावरील भाष्य (मराठी).
तसेच त्यांनी काही संगृहीत ग्रंथही प्रकाशित केले,ते असे : (१) पं. रामामात्यकृत स्वरमेलकलानिधी(संस्कृत); (२) पं. व्यकंटमखीकृतचतुर्दण्डिप्रकाशिका (संस्कृत); (३) रागलक्षणम्(कर्ता अज्ञात); (४) राजा तुळजेंद्रकृतसंगीतसारामृतोद्धार (संस्कृत); (५) कवी लोचनकृत रागतरड्गणी (संस्कृत); (६) पुंडरीक विठ्ठलकृत सद्रागचन्द्रोदय; रागमञ्जरी, रागमाला,नर्तननिर्णय (चारही ग्रंथ संस्कृतामध्ये); (७) हृदयकौतुककृत हृदयकौतुक व हृदयप्रकाश(संस्कृत); (८) पं. भावभट्टकृतअनूपसंगीतरत्नाकर, अनूपसंगीतविलास वसंगीतअनूपांकुश (सर्व संस्कृतामध्ये); (९) पं. श्रीनिवासकृत संगीतरागतत्त्वविबोध (संस्कृत); (१०) श्रीकंठकृत संगीतकौमुदी (संस्कृत); (११) पूर्ण कविकृत नादोदधि (हिंदी); (१२)चत्वारिशच्छतरागनिरुपणम् (संस्कृत); (१३)अष्टोत्तरशतताललक्षणम् (संस्कृत; ग्रंथकर्ता अज्ञात); (१४) पं. काशिनाथशास्त्री अप्पा तुलसीकृत संगीतसुधाकर,संगीतरागकल्पद्रुमड्कुर, संगीतरागचन्द्रिका(सर्व संस्कृतामध्ये) व संगीतरागचन्द्रिकासार(हिंदी).
यांपैकी काही ग्रंथाची रचना त्यांनी टोपणनावाने केली. उदा., लक्ष्यसंगीत ग्रंथासाठी'भरतपूर्वखंडनिवासी चतुर पंडित' ; हिंदुस्थानीसंगीतपद्धतीसाठी ‘पं. विष्णुशर्मा’; तर चिजांसाठी‘चतुर’ व ‘हररंग’ ही नावे त्यांनी घेतली. शिवाय जुन्या संस्कृत ग्रंथांच्या प्रकाशनासाठी‘भारव्दाजशर्मा’ हे नाव स्वीकारले. त्यांची ही ग्रंथसंपदा व मौलिक संशाधन संगीतशास्त्रज्ञांच्या व कलावंतांच्या पुढील पिढ्यांना मार्गदर्शक व प्रेरक ठरले.
पं. भातखंडे यांचे १९ सप्टेंबर १९३६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.अरविंद मंगरुळकर,/ गिंडे / मराठी विश्वकोश
काव्यसंग्राहक संपादक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुराणवस्तू संग्राहक असलेले दिनकर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी हे नाव ‘राजा दिनकर केळकर म्युझियम’ या संस्थेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेच. त्यांचे संपूर्ण शिक्षण बेळगाव व पुणे येथे झाले. ते वास्तव्याला पुण्यातच होते. राम गणेश गडकरी हे त्यांचे गुरू होते.
दिनकर केळकर यांचा जन्म १० जानेवारी १८९६ रोजी झाला. अज्ञातवासी नावाने ते कवी म्हणूने ख्यातनाम झाले. १९१५ पासून ‘अज्ञातवासी’ या टोपणनावाने ते काव्यलेखन करत असत.
श्री महाराष्ट्र शारदा मंदिर, पुणे या संस्थेचे ते संस्थापक होते. शारदामंदिर तर्फे केळकरांनी महाराष्ट्र शारदा भाग १ या ग्रंथाचे संपादन केले. परशुरामपंत, तात्यासाहेब गोडबोले, चिपळूणकर, केशवकुमार ते कवी अनिल यांच्यापर्यंत कवींच्या निवडक कविता त्यात समाविष्ट आहेत. भा. रा. तांबे यांची कविता, ह. स. गोखले यांच्या ‘काहीतरी’ काव्यसंग्रहातील कवितांचेही ते संग्राहक होते. अज्ञातवासींची कविता ‘अज्ञातवास’, ‘अज्ञातवासींची कविता भाग १, भाग २’ या काव्य संग्रहात समाविष्ट केल्या आहेत. निसर्ग, प्रेमविषयक, वात्सल्याने भारावलेल्या, जीवन चितनपर, गुढात्मक अशी त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत.
केळकर यांचे काव्यसंग्रह त्यांच्या काळातील बी.ए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट होते. त्याचबरोबर त्यांनी अ.स. गोखले यांचा ‘काहीतरी’ काव्यसंग्रह, भास्करराव तांबे यांची कविता भाग २ चे संकलन, प्र. के. अत्रे लिखित ‘झेंडुची फुले’ या काव्यसंग्रहाचे संपादन-संकलन केले. त्यांनी आधुनिक कवींचा ‘महाराष्ट्र शारदा’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. तो त्या काळी गाजला होता. केळकर यांनी त्यांच्या काही कवितांमधून त्यांना वस्तू देणाऱ्या दानशूर आणि अज्ञात व्यक्तींचे आभार मानण्याचा प्रयत्न केला आहे.
नंतर पराकोटीच्या इतिहास प्रेमातून त्यांनी पुराणवस्तुंचा संग्रह जमविला व आपल्या दिवंगत पुत्राच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘राजा केळकर’ ह्या पुराण वस्तुसंग्रहालायाची निर्मिती केली. यासाठी दिनकर केळकरांनी व त्यांच्या पत्नीनी सतत भ्रमंती करून, आर्थिक झीज सोसून या ऐतिहासिक सुंदर अशा कलावस्तुंचा संग्रह केला. हा पुराण वस्तुंचा अमोल ठेवा त्यांनी १९७९ साली राज्य शासनाच्या ताब्यात दिला. आज मितीला केळकर संग्रहालय पाहण्यासाठी दिवसाला सरासरी तीनशेजण येतात. वर्षाला सव्वा ते दीड लाख लोक त्या संग्रहालयाला भेट देतात. संग्रहालयाची पूर्णवेळ देखभाल केळकर यांचे नातू सुध्नवा रानडे पाहत आहेत. संग्रहालयातील वस्तूंच्या जतनासाठी, विशेष लक्ष पुरवले जाते. केळकर यांनी तो अमूल्य संग्रह राष्ट्राची संपत्ती असून, राष्ट्रास अर्पण करावा या भावनेने १९७५ साली महाराष्ट्र शासनास भेट दिला.
दिनकर केळकर यांच्या इतिहास व संस्कृती संवर्धनातील भरीव योगदानाबद्दल त्यांना भारत शासनाने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. त्याचबरोबर संग्रहालय क्षेत्रातील विशेष कामगिरीकरता हैदराबादच्या ‘सालारजंग म्युझियम’च्यावतीने दिलेले पहिले सुवर्णपदक, इचलकरंजीच्या ‘फाय फाउंडेशन’चा पुरस्कार, ‘इंडियन असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स’तर्फे करण्यात आलेला सन्मान, पुणे महानगरपालिकेतर्फे झालेला सत्कार, पश्चिम जर्मनीचा ‘इंडियन सेंटर फॉर एन्करेजिंग एक्सलन्स’ पुरस्कार असे विविध सन्मान त्यांना मिळाले. इतिहास क्षेत्रातील त्यांच्या या अपूर्व कार्याबद्दल १९७८ साली पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय ‘डॉक्टरेट’ पदवी घेऊन त्यांचा गौरव केला.
दिनकर केळकर यांचे १७ एप्रिल १९९० रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
प्रेमनाथ यांचे वडील रायसाहेब कर्तारनाथ यांची अशी इच्छा होती की, आपल्या मुलाने लष्करात सामील व्हावं. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९२६ रोजी जबलपुर येथे झाला. ते स्वत: ऐकेकाळी रेवा स्टेटचे आय.जी.पी. होते. आपल्या मुलानेही प्रामाणिक आणि शिस्तप्रिय जीवन जगावं अशी त्याची भारी इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी प्रेमनाथला लष्करात पाठवलं सुध्दा, पण प्रेमनाथची स्वत:ची आवड वेगळीच होती. त्याला मुंबईच्या हिंदी चित्रपटसृष्टीत उडी घ्यायची होती.
एवढयासाठी त्याने सैन्यातून पळ काढला आणि मुंबई गाठली. इथे आल्यावर इंदौरचे एक नातेवाईक पृथ्वीराज कपूर यांच्या नाटक कंपनीतच होते. त्यांचा त्यांनी आश्रय घेतला. पण पृथ्वीराज कपूराना सगळी हकीकत कळल्यानंतर त्यांनी आपला मुलगा राज कपूर यांना सोबत घेऊन प्रेमनाथ यांना घरी जाण्यास सांगितलं. नाराज मनानं प्रेमनाथ घरी परतला. पण इथे एक भलतंच नाटक घडलं. प्रेमनाथबरोबर आलेल्या राज कपूरने प्रेमनाथची बहीण कृष्णा हिला बघितलं आणि पहिल्या नजरेतच तो तिच्या प्रेमात पडला. नंतर हे नातं अगदी घटट् झालं.
प्रेमनाथने याच नात्याला यशाची पायरी बनविण्याचं ठरवलं. पृथ्वी थिएटर्सच्या 'दीवार' नाटकात प्रेमनाथने ब्रिटीश माणसाची रंगविलेली भूमिका सगळयांना आवडली. ही भूमिका त्याला कपूर घराण्याशी जवळचं नातं जोडलं गेल्यामुळेच मिळाली होती. नंतर राज कपूरच्या 'आग' चित्रपटात 'चित्रकार राजाबाब' ची महत्त्वपुर्ण भूमिका प्रेमनाथला मिळाली. या चित्रपटातली प्रेमनाथची भूमिका खूप गाजली. प्रेमनाथला नायक म्हणून पहिला चित्रपट 'अजित' या नावाने मिळाला होता. यात त्याची नायिका होती मोनिका देसाई.
१९५१ साली प्रेमनाथची सात चित्रपट पडद्यावर आले. नंतर त्यांनी अनेक टॉपच्या हिरोईन्सबरोबर काम केले. हिंदी चित्रपटात प्रेमनाथला एक अशा अभिनेत्याच्या नात्याने ओळखले, जाते ज्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक नायक म्हणून राज्य करणारा म्हणून नाही तर खलनायक म्हणून लोकांच्या हृदयात आपली छाप उमटविली. शोर , अमीर गरीब, रोटी कपडा और मकान या सारख्या चित्रपटात त्यांना अभिनयासाठी फिल्म फेयर अवॉर्डने नावजले गेले.
ऐंशीच्या दशकात प्रकृती स्वास्थ्य खालावल्याने प्रेमनाथ यांनी चित्रपटात काम करणे काही अंशी कमी केले. या काळात त्यांच्या कर्ज, क्रोधी, देशप्रेमी यांसारखे चित्रपट प्रदर्शित झाले. १९८५ मध्ये आलेला हम दोनो हा प्रेमनाथ यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला. निर्माता निर्देशक सुभाष घई यांसोबत प्रेमनाथ यांची जोडी. बरीच नावाजली गेली.
सुभाष घई यांसोबत प्रेमनाथ यांनी कालीचरण, विश्वनाथ, गौतम गोविंदा, कर्ज, आणि क्रोधी यांसारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटात त्यांनी काम केले. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळीच जागा निर्माण केली होती. प्रेमनाथ यांचे ३ नोव्हेंबर १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
त्यांनी ‘गाढवाचं लग्न’ हे वगनाट्य मराठी रंगभूमीवर आणले. या वगनाट्याला राष्ट्रपती पारितोषिक, संगीत नाट्य अकादमीचे पारितोषिक मिळाले होते.
अक्षय कुमार ह्याचे खरे नाव राजीव हरीओम भाटिया आहे. त्यांचा जन्म ९ सप्टेबर १९६७ रोजी झाला. अक्षयचा बॉलीवूडमध्ये इथपर्यंत झालेला हा प्रवास त्याच्या निरंतर संघर्षाचे आणि मेहनतीचे फळ आहे. अन्यथा कोणतेही ग्लॅमरस आडनाव न लाभलेला अक्षय बॉलीवूडमध्ये यशस्वी ठरलाच नसता.'शेफ' म्हणून कारकिर्दीची सुरवात करणारा अक्षय आता बॉलीवूडमधला 'सबसे बडा खिलाडी' ठरला आहे. सुरवातीला एक्शनपट करणारा अक्षय आता एक्शन-विनोद-थ्रिलर यांची उत्तम भेळ सादर करणारा कलावंत ठरला आहे. खिलाडी सिरीज, यह दिल्लगी, मोहरा, मै खिलाडी तू अनाडी, दिल तो पागल है, हेरा फेरी, खाकी, मुझसे शादी करोगी, नमस्ते लंडन, हे बेबी, भुल भुलय्या, सिंग इज किंग असे यशस्वी चित्रपट त्याच्या नावावर आहेत. बॉलिवूडमध्ये खिलाडी कुमार म्हणून प्रसिध्द असलेल्या अभिनेत्याबाबतच्या काही रंजक गोष्टी.
लहान असताना अक्षय अतिशय मस्तिखोर मुलगा म्हणून प्रसिध्द होता. अभ्यासात रस नसलेल्या अक्षयला क्रिकेट आणि व्हॉलिबॉलसारख्या खेळात प्राविण्य होते. वयाच्या आठव्या वर्षी त्याने मार्शल आर्ट शिकण्यास सुरुवात केली. मार्शल आर्ट शिकण्यासाठी तो बँकॉकला गेला होता. तर, थायलंडला जाऊन त्याने मौय थायचे प्रशिक्षण घेतले.तेथे त्याने आचारी आणि वेटरचे कामदेखील केले. अक्षय कुमार हा कराटेचा ब्लॅकबेल्ट चँपियन आहे आणि विशेष म्हणजे एक जगप्रसिद्ध आचारी आहे. जो जिता वही सिकंदर’ चित्रपटातील दीपक तिजोरीच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारने ऑडिशन दिल्याचे फार कमी लोकांना माहित आहे. परंतु या भूमिकेसाठी त्याला नाकारण्यात आले होते. अक्षय डब्ल्यूडब्ल्यूईचा फार मोठा चाहता आहे. २०१० साली डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार केनला अक्षयने आपल्या घरी आमंत्रित केले होते.
त्वायकांडोमध्ये त्याने ब्लॅकबेल्ट मिळवला आहे.‘स्पेशल २६’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करेल याबाबतची अनुपम खेरबरोबरची पैज हरल्यावर अक्षयला टेबलावर नृत्य करावे लागले होते.भारतीय चित्रपटसृष्टीतील अक्षयच्या योगदानासाठी २००८ साली ‘युनिर्व्हसिटी ऑफ विण्डसर’ने त्याला कायद्यातील मानद पदवी देऊन सन्मानित केले. ९ हा आकडा आपल्यासाठी भाग्यवान असल्याचा अक्षय कुमारचा विश्वास आहे. आयुष्यातील अनेक चांगल्या गोष्टीचा संबंध ९ संख्येशी असल्याचे त्याचे मानणे आहे. त्याच्या मुलांचा जन्म नवव्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यातील आहे.
नियमित व्यायाम करणारा अक्षय दररोज सकाळी न चुकता मॉर्निंग वॉकला जातो. भारताबाहेर चित्रिकरण करत असताना तो नियमितपणे जिममध्ये जाऊन व्यायाम करतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
हे लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायक, अभिनेता व संगीतकार होते. सुधीर फडके यांचा पहिला चित्रपट हा हिंदीच होता आणि त्याचे नाव होते गोकुल. ज्याची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली होती. या चित्रपटातील जी. एम. दुराणी यांनी गायलेले ‘कहां हमारे श्याम चले’ हे अतिशय सुंदर गीत होते.
मोहम्मद रफी, यांनी आपली गायन शैली जी.एम.दुराणी यांच्या कडून प्रेरणा घेऊन केली असे बोलले जाते. जी.एम. दुराणी यांचे ९ सप्टेबर १९८८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
अभिषेक मनु सिंघवी हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकिलांपैकी एक आहेत. अभिषेक मनु सिंघवी हे एक भारतीय वकील, राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत.अभिषेक सिंघवी हे पश्चिम बंगालमधून राज्यसभेचे सदस्य असून ते काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून काम करतात.
तीन दुकानांची आठवण देणारी तीन टिंबे, तीन डॉट्स डॉमिनोजच्या लाल, निळ्या लोगोवर अवतरली. मुळात सुरुवातीला गडद लाल, निळा व शुभ्र पांढरा रंग वापरण्यामागे लोकांचं लक्ष वेधणं हा हेतू होता. हे तीन रंग खूप प्रामुख्याने दिसतात हे लक्षात घेऊन ते निवडताना तीन दुकानांची आठवण तीन टिंबांसह लोगोवर उमटली.
Copyright © 2025 | Marathisrushti