‘स्वामी’, ‘त्रिकाल’, ‘शांती’ या मालिकेतील विविध भूमिकांसोबत अनेक चित्रपट आणि नाटकातील भूमिका गाजवणारे अभिनेता रविंद्र मंकणी व्यवसायाने सिव्हिल इंजिनीअर आहेत. त्यांचा जन्म २१ मे १९५६ रोजी झाला.
रविंद्र मंकणी यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच झाशीची राणी या ऐतिहासिक हिंदी मालिकेतही त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. 'रवींद्र मंकणी' यांची 'स्वामी' या मालिकेत 'माधवराव पेशवे' यांची भूमिका खूप गाजली होती. त्यांनी मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'रमा माधव' या चित्रपटात 'नानासाहेब पेशवे' यांची भूमिका केली आहे.
रविंद्र मंकणी यांच्या २२ जून १८९७ व लिमिटेड माणुसकी या चित्रपटातील भूमिकेबद्दल पुरस्कार मिळाला होता. निवडुंग, स्मृतिचित्रे, वारस लक्ष्मीचा,बंद झरोके हे त्यांचे इतर चित्रपट.
आपला कलाकार या व्यवसायाबरोबरच रविंद्र मंकणी यांची पुण्यात रविराज पब्लीसीटी या नावाने प्रसिध्द अॅड एजन्सी आहे.
रविंद्र मंकणी हे जेष्ठ लेखक द.मा. मिराजदार यांचे जावई. रविंद्र मंकणी यांचा मुलगा सुश्रुत मंकणीसुद्धा चित्रपट सृष्टीत आहे. सुश्रुत याची संगीत अॅकेडमी पण आहे. गजेंद्र अहिरेंच्या 'नातीगोती' या सिनेमात तो पहिल्यांदा झळकला होता. 'स्वराज्य' या सिनेमात निगेटिव्ह भूमिका साकारुन त्याने अभिनयात वेगळी छाप उमटवली. 'ना ना नकोसे' आणि 'गुलमोहोर' या सिनेमांमध्येही तो झळकला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे.
आज १५ सप्टेंबर..आज अभियंता दिन म्हणुन साजरा केला जातो.
याचे कारण हा दिवस भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस आहे.
जन्म.१५ सप्टेंबर १८६१
मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे पिता श्रीनिवासशास्त्री विद्वान संस्कृत पंडीत होते. अशा वातावरणात त्यांच्यावर उच्च संस्कार होणारच.पण घरची हलाखीची होती.त्यांनी शालेय शिक्षण तालुक्याला एकटे राहुन गरीबीशी झुंज देत अव्वल गुणांनी पूर्ण केले.व ते बंगळुरूला उच्च शिक्षणासाठी आले.तेथेही त्यांनी विशेष गुणवत्ता किताब घेऊन B.A. केले.आता त्यांना तांत्रिक शिक्षणाची लागली.
गुणवंतांना गुणग्राहकांची कमी नसते. म्हैसुरुच्या राजांनी त्यांना पुण्यात अभियांत्रिकी पदवीसाठी शिष्यवृत्ती दिल्याने त्यांनी पदवी प्राप्त केली ती साधीसुधी नाहीतर सक्करपासून थेट दावणगेरी पर्यंत पसरलेल्या मुंबई राज्यात प्रथम क्रमांकात.या दैदिप्यमान यशाची नोंद सरकारने घेऊन त्यांची लगेच सन १८८४ मध्ये सहाय्यक अभियंता या पदावर थेट नेमणुक केली.येथेही त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला. या काळात त्यांनी खडकवासला धरणासाठी एका अभिनव अशा.स्वयंचलित गेटची निर्मिति केली. यामुळे विशिष्ठ पातळी वरील अतिरिक्त पाणीच वाहुन जाई. हे गेट भारतात प्रथमच झाले होते. या डिझाईनचे नावच पुढे विश्वैश्वरय्या गेट झाले. १९०७ साली त्यांनी सरकारी नोकरीतून निवृत्ती घेतली.
एखादा असता तर निवांत आयुष्य जगला असता.पण नियतिला त्यांच्या कडून अजून काही भव्य दिव्य करून घ्यायचे होते.त्यांची कीर्ती ऐकुन हैद्राबादच्या निजामांनी त्यांना सरकारचे विशैष सल्लागार म्हणुन पद दिले. येथे त्यांनौ हैद्राबाद परिसरातील दोन नद्यांवर धरणे बांधुन शहर पूरमुक्त केलेच पण त्यामुळे त्या शहराचा कायापालट होऊ शकला. म्हैसुर नरेशांनी त्यांना मुख्य अभियंता पदाची ऑफर.दिली व त्यांनी ती स्विकारली. म्हैसुरला ते १९२६ पर्यंत राहिले.त्यांनी कृष्णराज सागर धरण, वृंदावन उद्यान व अनेक विकासकामे पार पाडली.काही काळ ते दिवाणही होते.या व्यतिरिक्त उद्योग सिंचन शेती या क्षेत्रातही मौलिक योगदान दिले. पाण्याचा अपव्यय टाळुन पुरेपूर वापर करणारी ब्लॉक सिस्टिम ही त्यांचीच देणगी देशाला.
म्हैसुरचे पद सोडल्यानंतर निवृत्तीपश्चात केवळ अभियांत्रिकी नव्हेच तर उद्योग,अर्थ, नगरसुधार इ. कार्यात मोलाचे योगदान दिले.समर्थ भारत हे त्यांचे स्वप्न होते. त्यांना भारत सरकारने भारतरत्न देऊन सर्वोच्च बहुमान केला. मा. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे १४ एप्रिल १९६२ रोजी निधन झाले.
अभियंता दिना निमीत्त सर्व अभियंत्यांना अभिवादन व हार्दिक शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
क्षिती जोगचा जन्म १ जानेवारी १९८३ रोजी झाला. क्षितीची ‘दामिनी’ आणि ‘वादळवाट’ या मालिकेतील भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तसेच तिने ‘ये रिश्ता क्या कहलता है’, ‘साराभाई वर्सेस साराभाई’ अशा हिंदी मालिकेतूनदेखील आपल्या अभिनयाची छबी उमटविली आहे. त्याचबरोबर क्षितीने ‘संशय कल्लोळ’, ‘माई’ असे चित्रपटदेखील केले आहेत. तर ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकातल्या तिच्या अभिनयाचेही अनेकांनी कौतूक केले. नाटक, मालिका, चित्रपट यांमुळे क्षितीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. जेष्ठ अभिनेते अनंत जोग हे क्षिती जोगचे वडिल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
निम्मी यांचे नाव नवाब बानू आहे. राजकपूर यांच्या बरसात चित्रपटात त्यांचे निम्मी हे नाव ठेवण्यात आले. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३३ रोजी झाला.मुळात त्यांची बॉलिवूडमधील एंट्री मजेदार होती. त्या लाहोरहून मुंबईत आल्यानंतर सरदार अख्तर आणि महिबूब खान यांच्याकडे राहत होत्या. एकदा राजकपूर जद्दनबाई (नर्गिस यांची आई) यांच्याकडे आले होते. त्यावेळी त्यांना ‘बरसात’ या चित्रपटासाठी हिरोईन हवी होती. बऱ्याच मुली पाहिल्यानंतरही त्यांना हवी तशी हिरोईन मिळत नव्हती. जद्दनबाई कडे आल्यानंतर शेजारी बसलेल्या निम्मी यांच्याकडे त्यांचे लक्ष गेले. त्यांनी मेहबूब खान यांच्याजवळ जावून सांगितले, ‘ही मुलगी मला हिरोईन म्हणून हवी आहे’ त्यावेळी निम्मी काही बोलल्या नाहीत. त्यांना त्यांच्या आजी काय म्हणतील याची भीती होती. सरदार अख्तर यांनी त्यांच्या आजीशी संपर्क साधला, विशेष म्हणजे त्यांच्या आजीनेही होकार दिला. त्यानंतर त्यांची स्क्रीन टेस्ट झाली आणि त्या उत्तीर्ण होऊन, त्यांची बरसात चित्रपटासाठी निवड झाली. पन्नाशीच्या दशकात अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडलेल्या निम्मी यांचे नाव दिलीपकुमारसह अनेकांशी जोडले गेले. पन्नासाव्या दशकात मधुबाला, नर्गिस, नूतन, मीना कुमारी, गीता बाली, सुरैय्या यांच्यासारख्या अभिनेत्रींसोबत काम करताना निम्मी यांनी आपले स्थान वेगळे राखले. बरसात (१९४९), दीदार (१९५१), दाग (१९५२), उडन खटोला (१९५५) मेरे मेहबूब (१९६३), पूजा के फुल, अकाशदीप (१९६५), लव्ह अँड गॉड या चित्रपटातून निम्मी यांनी काम केले. दिलीप कुमार यांच्यासोबतच्या यशस्वी कारकीर्दीमुळे अनेकांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. यावेळी दिलीप कुमार यांच्याशी त्यांचे प्रेम असल्याचे वृत्त पसरले होते. अर्थात दिलीप कुमार आणि निम्मी यांनी याचा इन्कार केला. दिलीप कुमार यांचे प्रेम त्यावेळी मधुबाला यांच्यावर होते. निम्मी यांचे प्रेम पटकथालेखक एस. अली रझा यांच्यावर होते. रझा हे विख्यात कथालेखक, पटकथालेखक आगाजानी कश्मिरी यांचे भाचे. दोघेही लखनौ येथील. रझा यांच्याशी लग्न करून त्या मुंबईत स्थायिक झाल्या. महेबूब स्टुडिओ सोडण्यास निम्मी याच कारणीभूत ठरल्या. संपूर्ण आयुष्य तू याच स्टुडिओत राहून आपली कारकीर्द संपविणार आहे का? असा प्रश्न निम्मी यांनी विचारल्यानंतर रझा यांनी हा स्टुडिओ सोडला. निम्मी त्यांच्या लिखाणाच्या फॅन होत्या. आकाशदीप हा त्यांचा शेवटचा चित्रपट. निम्मी आणि त्यांच्या पतींना मूल नव्हते. त्यांना दोनदा अपत्य होऊ शकले नाही. त्यांनी आपल्या बहिणीचा मुलगा दत्तक घेतला. मरताना त्यांच्या बहिणीने त्यांच्याकडून तसे आश्वासन घेतले होते. ४२ वर्षे लग्नानंतर म्हणजे एस. अली रझा यांच्या निधनानंतर त्यांची ताटातूट झाली. जून १९९१ साली निम्मी या पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या. हिंदी अभिनेत्री किमी काटकर ही निम्मी यांची मुलगी आहे, अशा अफवा उठल्या होत्या.निम्मी या अत्यंत कमी बोलणाºया अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत्या. बॉलीवूडमधील समारंभ, पार्टीजमध्ये दिलीप कुमार यांच्यासोबत त्या बर्याचवेळा दिसून आल्या आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ.इंटरनेट
आज १२ सप्टेंबर.. लोकप्रिय मराठी अभिनेत्री पद्मा चव्हाण यांची पुण्यतिथी
त्यांचा जन्म दि. ७ जु्लै १९४८ रोजी झाला...
पद्मा चव्हाण या मराठी नाटकांत आणि चित्रपटांत कामे करणार्या एक लोकप्रिय अभिनेत्री होत्या. अप्रतिम स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना असलेल्या पद्मा चव्हाण इतक्या सुंदर होत्या की त्यांच्या नाटकांच्या जाहिरातीत त्यांच्या नावाआधी 'मादक सौंदर्याचा ऍटम बॉम्ब' असे छापलेले असे.
पद्मा चव्हाण यांचे १२ सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ - विकीपीडीया
१९७७ साली त्यांनी उत्पत्ति फिल्म प्रोडक्शनची स्थापना केली. जाहिरातबाजीत त्यांचा वेगळा ठसा आहे. नव्या उद्योगाला मार्गदर्शन करणे व युवकांना त्यांचा व्यवसाय धंदा करण्यात मदत करण्याचे कार्य सध्या ते करतात.
ज्येष्ठ अभिनेत्री व कळसुत्रीकार मीना नाईक यांचा जन्म १९ जून १९५१ रोजी झाला.
मीना या समाजभान असणारी रंगकर्मी व कळसुत्रीकार म्हणून ओळखल्या जातात. मीना नाईक या माहेरच्या मीना सुखटणकर होत.मीना नाईक यांचे शिक्षण मुंबईत झाले असून, त्यांनी १९७२ मध्ये मुंबईतील जे जे इंस्टिट्यूशन ऑफ एप्लाइड आर्ट येथून जे डी आर्टस् पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले तसेच मुंबई विद्यापीठामधून बी. ए. १९८० व म.ए. १९८३ साली पूर्ण केले.
१९७६ ते १९७८ या काळात त्यांनी पेपेट्री मध्ये अभ्यास केला. त्या वेळी त्यांना पेपेट्रीमध्ये मध्ये जपान फौंडेशन आणि भारत सरकार कडून दोन शिष्यवृत्ती मिळाल्या होत्या.
मीना नाईक यांनी समाजातील अनेक संवेदनशील विषयावर लघुपट व ऍनिमेशन चित्रपट तयार केले आहेत. त्यांनी 'वाटे वरती काचा ग' या नाटकाद्वारे बाललैंगिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. काही काळापूर्वी मीना नाईक यांनी बालकांवर होणाऱ्या लैंगिक शोषणावरील ‘पोक्सो’ कायद्याबाबत जनजागृती निर्माण करणाऱ्या ‘कळसूत्री’-निर्मित ‘अभया’ या एकल – महिला हा नाट्यप्रयोग राजभवन येथे राज्यपालांच्या उपस्थितीत झाला होता.
२०१० मध्ये त्यांना दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनी कडून हिरकणी ह्या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.
याच बरोबर त्यांनी दूरदर्शन वरचे किलबिल, अमृत मंथन अशा अनेक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे.
मीना नाईक यांनी यशवंतराव चव्हाण या चित्रपटात अभिनय केला आहे. नुकताच काम केलेला चित्रपट म्हणजे हृदयांतर.अभिनेत्री व निर्मात्या मनवा नाईक या त्यांच्या कन्या होत. ‘ढिनच्यॅक एंटरप्राइज’ या चित्रपटात मीना नाईक आणि मनवा नाईक या दोघी मायलेकी प्रथमच एकत्र काम करताना दिसल्या होत्या.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
मोहम्मद रफी यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी झाला. शास्त्रीय संगीताची तालीम मोहम्मद रफी यांनी उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद अब्दुल वाहिद खान, पंडित जीवनलाल मट्टो आणि फिरोज निजामी यांच्याकडे घेतली. रफीजींचा पहिला पब्लिक परफॉर्मन्स हा त्याच्या वयाच्या १३ व्या वर्षी लाहोर मध्ये झाला. पहिले गाणे 'गाँव की गोरी' या चित्रपटात त्यांनी १९४५ मध्ये गायले. त्याच दरम्यान गायना बरोबरच त्यांनी एक दोन चित्रपटात छोट्या छोट्या भुमिकाही केल्या. १९४७ मध्ये फाळणीनंतर रफीजींनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. १९४९ ते १९७० च्या दरम्यान रफीजींनी चित्रपट क्षेत्रात आपल्या जबरदस्त गायनाने चांगला जम बसवला व तो टिकवला देखील. १९६० चे दशक हे रफीजींसाठी खास होतं, त्याच वर्षी त्यांना 'चौदहवी का चाँद' च्या शीर्षक गीतासाठी पहिल्यांदाच फिल्मफेअर अॅ्वॉर्ड मिळालं. याच दशकात रफीजींनी दिग्गज संगीतकारांबरोबर काम करून अनेकानेक हिट गाणी दिली. रफीजी हे त्यांच्या उदार स्वभावासाठी प्रसिद्ध होते. किशोरकुमारजींच्या सिनेमातल्या गाण्यासाठी त्यांनी निव्वळ 'एक रुपया' मानधन घेतलं असही म्ह्टलं जातं. शम्मीसाठी त्यांनी ज्या धाटणीत गाणी गायली आहेत, ती गाणी कुणीही पडद्यावर न पाहता फक्त ऐकून सांगेल किंवा अंदाज बांधू शकेल की ही गाणी बहुतेक शम्मीवरच चित्रित झाली असतील असं ऐकिवात आहे की गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला शम्मी स्वतः स्टुडिओत रफीजींना भेटून सांगत असे की ह्या गाण्यावर मी असे हावभाव करणार आहे किंवा इथे थोडा अंगविक्षेप आहे. इ. 'दोस्ती' चित्रपटासाठी त्यांनी सुधीरकुमार या नवोदित कलाकारासाठी ३ ते ४ गाणी गायली. तीही त्याच्याच लकबीत. त्यापैकी 'चाहूंगा मैं तुझे... ' या गीताला फिल्मफेअर मिळाले. चित्रपटसृष्टीत सगळय़ांत गाजलेला दुरावा म्हणजे मा.लता मंगेशकर व मा.मोहमद रफी यांच्यातील साठच्या दशकातील दुरावा मानतात. मानधनावरून एका बैठकीत काही वाद होऊन रफी यांनी ‘ये महारानी (लता) जैसा चाहेगी वैसा ही होगा’ अशी कॉमेंट केल्याने केल्याने लताजींना खूप राग आला व त्यानंतर जवळपास पाच-सहा वर्षे दोघांमध्ये दुरावा होता. लता व रफी यांनी युगलगीते गाणे बंद केल्यावर दोन गट पडले. त्या काळचे काही नायक, शम्मी कपूर, राजेंद्रकुमार, प्रदीपकुमार इ. हे मोहमद रफी यांचा आग्रह धरायचे, लता मंगेशकर व मोहम्मद रफी यांच्या दुराव्याचे पर्यावसान एकमेकांबरोबर न गाण्याच्या निर्णयात रूपांतरीत झालं. पण 'दिल ने फिर याद किया' या चित्रपटाचं शिर्षकगीत गाण्यासाठी सोनिक ओमी यांना रफी, लता आणि मुकेश यांची निवड केली होती. पण नेमकं त्याचवेळी 'लता आणि रफी हे एकमेकांबरोबर गाणार नाहीत' असं दोघांनी जाहीर करून टाकलं. सुमन कल्याणपूर या नव्या तरूण गायिकेला ते गाणं दिलं. त्यांनी एकवेळ लताजींना वगळल, पण रफीजी मात्र त्या गाण्यात त्यांना जास्त महत्त्वाचे वाटले. ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ यांच्या यशामध्ये मो. रफी यांचा खूप मोठा वाटा होता. लक्ष्मीकांत प्यारेलाल मा.रफी यांना आपला गुरु मानायचे. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना सुरुवातीला संगीतकार म्हणून प्रोत्साहन देण्यात ज्या दोन व्यक्ती समोर होत्या त्यातील पहिले म्हणजे ‘रफी साहेब’ तर दुसऱ्या गानकोकिळा ‘लतादीदी’. रफी साहेबांनी आपल्या हिंदी चित्रपट संगीतातील सर्वात जास्त गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या सोबतच गायलेले आहे. आपल्या एकूण ३५ वर्षांच्या गायनाच्या कारकिर्दीत मा.रफीजीनी ४००० च्या वर गाणी गायली. ज्यात हिंदी, मराठीसह अन्य भाषेतल्या अनेक प्रकारच्या गाण्यांचा समावेश होता. गैरफिल्मी, गझल, भजन, क्लासिकल, सेमिक्लासिकल इ. या अनेक प्रकारांमध्ये रफीजींचे अनेक मूडही समाविष्ट आहेत. रफींना गाडय़ांचीही खूप आवड होती. या छंदापोटी त्यांनी थेट लंडनहून होंडा कार मागविली होती आणि ऑडी हे नाव सिनेमासृष्टीत फारसं कोणाला ठाऊक नव्हतं तेव्हा त्यांच्या दारात दिमाखात ऑडी उभी होती. त्यांना करमणूकीसाठी कॅरम, बॅडमिंटन व पत्ते खेळायला आवडत. तसंच पतंग उडवणे हा ही त्यांचा छंद होता.*मा.मोहम्मद रफी* यांचे ३१ जुलै १९८० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
एल्फिन्स्टनने १८२२ मध्ये हैंदशाळा व शाळापुस्तक मंडळी काढली, त्यांचे आधारस्तंभ नानाच होते. ही पहिली शैक्षणिक संस्था स. का. छत्रे यांच्या साह्याने स्थापिली.
Copyright © 2025 | Marathisrushti