‘हमने जिना सीख लिया ‘या हिंदी चित्रपटाद्वारे २००७ मध्ये सिद्धार्थ चांदेकर प्रेक्षकांसमोर आला. २०१० मध्ये आलेल्या अवधूत गुप्तेच्या “झेंडा” या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत त्याने पहिले पाऊल टाकले. ‘क्लासमेट ‘ या ब्लॉकबस्टर चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांकडून त्याला चांगलीच दाद मिळाली. पिंडदान, बालगंधर्व, सतरंगि रे, संशयकल्लोळ, वजनदार,ऑनलाईन बिनलाईन, लॉस्ट अँड फाउंड, बस स्टॉप, गुलाबजाम, वजनदार या चित्रपटांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
२०१२ पासून त्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कोकण विभाग संघटक म्हणून काम करत आहेत. फेब्रवारी २०१७ मध्ये रोहा तालुक्यातील वरसे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या पहिल्यांदा विजयी झाल्या. मार्च २०१७ मध्ये त्यांची रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी दोन वर्षे काम पाहिलं. २०१९ मध्ये श्रीवर्धनमधून आमदार म्हणून विजयी झाल्या.
संजीवनी मराठे कवयित्री तर होत्याच, शिवाय कविसंमेलनात स्वत:च्या कविता सुरेल आवाजात त्या गातही असत. शाळकरी वयातच त्या कविता लिहू लागल्या. तरुण वयात घरचा विरोध असताना त्यांनी रामभाऊ मराठे यांच्याशी विवाह केला होता. १९३२ साली कोल्हापूरला भरलेल्या साहित्यसंमेलनात त्यांचा काव्यक्षेत्रात प्रवेश झाला. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘काव्यसंजीवनी’ त्याच वर्षी प्रकाशित झाला. पुढे ‘राका,’ ‘संसार’, ‘छाया’, ‘चित्रा’, ‘चंद्रफूल’, ‘मी दिवाणी’ ‘आत्मीय’ अशा अनेक कवितासंग्रहातून आणि ‘भावपुष्प’ व ‘परिमला’गीतसंग्रहांतून त्यांची काव्यजीवनातील वाटचाल रसिकांना अनुभवता आली. संजीवनी मराठे यांच्या कविता तरल आणि संजीवक स्वप्नांची निर्मिती करणारी आहे. संजीवनी मराठे यांच्या कविता आणि गीते यांनी मराठी मनाला एकेकाळी मोहिनी घातली होती.
संजीवनी मराठे यांच्या बालकविताही लक्षवेधी आहेत. बालमनाची संवेदनशीलता लक्षात घेऊन त्यांनी शिशुगीते, कुमारगीते लिहिली आहेत. त्यात वात्सल्यभावनेचा परिपोष आढळतो. त्याचबरोबर मुलांचे खेळकर, चंचल, निरागस भावजीवन त्यात प्रतिबिंबित झालेले दिसते. मुलांशी संवाद साधत लिहिलेल्या या गीतांमध्ये गोडवा आहे. ‘बरं का ग आई’ आणि ‘नको बाई रुसू’ हे त्यांचे बालगीत संग्रह प्रसिद्ध आहेत. त्याशिवाय त्यांच्या काही कवितासंग्रहांमध्येही बालगीतांचा समावेश आहे. त्यांची ‘या गडे हासू या, या गडे नाचू या, गाऊ या मंगलगान,’ तसेच ‘सोनियाचा पाळणा, रेशमाचा दोर ग मधोमध विसावला, माझा चित्तचोर ग’ ही गाणी आजही लोकांच्या आठवणीत राहिलेली आहेत.
संजीवनीबाईंवर भा. रा. तांबे यांच्या भावगीतांचाही प्रभाव होता. आणखीही एका कवीचा त्यांच्यावर प्रभाव होता, तो कवी म्हणजे रवींद्रनाथ टागोर. टागोरांच्या ‘गीतांजली’ आणि ‘गार्डनर’मधील निसर्गरूपात परमतत्त्व पाहण्याच्या दृष्टीचा ठसा संजीवनीबाईंच्या कवितांमध्येही जाणवतो. संजीवनीबाईंच्या कविता वाचताना काळाच्या अंतरावरून तिच्या काही मर्यादा जाणवतात आणि ते साहजिकही आहे. आज मराठीतील स्त्रीकाव्य वेगळय़ा टप्प्यावर आहे. पण म्हणून त्यांच्या कवितेच्या परंपरेतील संदर्भखुणा विसरता येणे शक्य नाही. किंबहुना संजीवनीबाई, पद्मा गोळे, सरिता पदकी आणि शांता किलरेस्कर यांनी पुण्यात ‘साहित्यप्रेमी भगिनी मंडळ’ ही संस्था स्थापन करून आपली दूरदृष्टी व्यक्त केलेली आहे. संजीवनी मराठे यांचे १ एप्रिल २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
मराठीतले विज्ञानकथा लेखक लक्ष्मण लोंढे यांचा जन्म १९४५ रोजी झाला. बँकेत नोकरी करणाऱ्या लक्षण लोंढे यांनी वयाच्या ५०व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यांनी त्यानंत आपला पूर्ण वेळ विज्ञान कथा लेखनात घालविला. दुसरा आइन्स्टाइन ही त्यांची कथा इंग्रजीत ‘सायन्स टुडे’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. पुढे या कथेला कन्सास विद्यापीठाचा जागतिक सर्वोत्कृष्ट कथा म्हणून पुरस्कार मिळाला. तसेच कथेची निवड जगातील विज्ञान लेखकांसाठी सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या जेम्स गुन यांच्या ‘द रोड टू सायन्स फिक्शन’च्या १९८९ च्या आवृत्तीसाठी निवडली गेली.
आंतरराष्ट्रीय बहुमान मिळवणारे ते पहिले मराठी विज्ञान कथालेखक होत. ते सोबत साप्ताहिकामध्येच लक्ष्मणझुला नावाचे सदर लिहीत. कोणतीही वैज्ञानिक पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी विज्ञान लेखक म्हणून खूप चांगली कामगिरी केली. विज्ञान लेखक होण्यासाठी वैज्ञानिक पार्श्वभूमीपेक्षा जिज्ञासेची आवश्यकता असते हे त्यांनी दाखवून दिले. कथा लिहिण्यासाठी आवश्यक ते पुरेसे ज्ञान जवळ नसल्यामुळे कोणताही विषय त्यांनी निवडला की ते त्या विषयाचा एखाद्या वैज्ञानिकासारखाच अभ्यास करायचे.
त्या विषयाशी संबधित प्रकाशित झालेले साहित्याचे वाचन करून तो विषय पक्का करून सामान्यांना समजेल अशा भाषेत त्या विषयाची मांडणी ते करायचे. मराठी विज्ञान परिषदेत नवोदित विज्ञान लेखकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा व्हायच्या. या कार्यशाळेत नवोदित लेखकांच्या लेखनावर ते अत्यंत मार्मिक टिप्पणी करत असत. या टिप्पणीमुळे त्या लेखकाचा उत्साह वाढे. वैज्ञानिक कथांव्यतिरिक्त त्यांनी चरित्रे आणि ललित कथा-कादंबऱ्याही लिहिल्या. लक्ष्मण लोंढे यांचे ६ ऑगस्ट, २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
‘कुलवधू’ या गाजलेल्या मालिकेतून सुप्रिया पाठारे यांची छोट्या पडद्यावर एन्ट्री झाली. या मालिकेत त्या खलनायिकेच्या रुपात दिसल्या होत्या त्यानंतर जागो मोहन प्यारे या मालिकेतही त्यांची मुख्य भूमिका होती.
सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांची ओळख महाराष्ट्रातील व्यासंगी-प्राच्यविद्यापंडित व मराठी कोशसाहित्यकार, महामहोपाध्याय अशी होती.डॉ. श्री. व्यं. केतकर यांच्या ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश मंडळा’त सहसंपादक म्हणून त्यांची १९२१ मध्ये नियुक्ती झाली. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १८९४ पुणे येथे झाला. महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील वेदविद्या खंडाच्या संपादनकार्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. महाराष्ट्रात ऋग्वेदविषयक अध्ययनाचा पाया घालून त्यांनी संपूर्ण ऋक्संहितेचे मराठी भाषांतर प्रथम प्रकाशित केले (१९२८). ‘भारतीय चरित्रकोश मंडळ’ या संस्थेचे ते संस्थापक व अध्यक्ष आहेत. ह्या संस्थेतर्फे त्यांनी भारतवर्षातील प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन काळातील प्रसिद्ध व्यक्तींचे तीन कोश संपादून ते प्रसिद्ध केले (१९३२, १९३७, १९४६). त्यातील भारत वर्षीय प्राचीन चरित्रकोशाच्या सुधारलेल्या हिंदी आवृत्तीस (१९६४) अहिंदी प्रांतांत प्रकाशित झालेला सर्वोत्कृष्ट हिंदी ग्रंथ म्हणून मध्य प्रदेश सरकारचे पारितोषिक मिळाले (१९६७). अथर्ववेदाचे मराठी भाषांतरही त्यांनी केले आहे. यांशिवाय पतंजलीच्या महाभाष्याचा महाभाष्यशब्दकोश, पाणिनीच्या अष्टाध्यायीचा व गणपाठाचा शब्दकोश हे ही ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले आहेत. प्राचीन भारतीय स्थलकोश ते संपादित असून त्याचा प्रथम खंड प्रकाशित झाला आहे (१९६९). पुरीच्या श्री शंकराचार्यांकडून ‘महामहोपाध्याय’ (१९५७) व चिदंबरम्च्या शंकराचार्यांकडून ‘विद्यानिधि’ अशा उपाध्याही त्यांना प्राप्त झाल्या आहेत. एक मान्यवर संस्कृत पंडित म्हणून राष्ट्रपतींचे संस्कृत सन्मानपत्र त्यांना मिळाले (१९६५). त्यांच्या विद्वत्कार्याच्या गौरवार्थ रिव्ह्यू ऑफ इंडॉलॉजिकल रिसर्च इन लास्ट सेव्हंटी फाइव्ह यीअर्स हा इंग्रजी ग्रंथ राष्ट्रपतींच्याच हस्ते त्यांना अर्पण करण्यात आला (१९६७). पुणे विद्यापीठाने डी. लिट्. ही सन्मानपदवी त्यांस दिली (१९६९). १९७१ मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव केला. प्राच्यविद्यांच्या प्रसारार्थ त्यांनी केलेले ज्ञानकार्य चिरंतन स्वरूपाचे असून ते सर्व अभ्यासकांना प्रेरक ठरणारे आहे. सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांचे ६ जानेवारी १९८४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ विश्व कोष
आज ३० नोव्हेंबर
आज जेष्ठ गायीका सुधा मल्होत्रा यांचा वाढदिवस.
जन्म.३० नोव्हेंबर १९३६
लता मंगेशकर व आशा भोसले यांच्या प्रभावाच्या काळात सुद्धा सुधा मल्होत्रा यांनी स्वत:च्या आवाजात वेगळेपणा जपून गायली. सुधा मल्होत्रा यांनी अनेक हिंदी चित्रपट गीते गायली. तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको (दीदी), कश्ती का खामोश सफर है (गर्ल फ्रेंड - किशोर कुमार यांच्या बरोबर), सलामे हसरत कबूल करलो (बाबर), व मराठीत तर त्यांनी अमराठी असुन ठसा उमटवला. शुक्रतारा मंद वारा (अरुण दाते यांच्या बरोबर) आणि विसरशील खास मला ही गाणी मा.सुधा मल्होत्रानीच गायली आहेत. नंतर ती गाणी अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांनी अनुक्रमे ती गायली.
विसरशील खास मला” हे मालकंस रागातील नितांत सुंदर गीत. त्यावेळेस यशवंत देव आकाशवाणीवर संगीतकार म्हणून नोकरीला होते. दोन कार्यक्रमांमधील जागा भरून काढण्यासाठी त्यांना एक गाणे हवे होते. “विसरशील खास मला” हे गीत त्यांनी सुधा मल्होत्रा यांच्याकडून म्हणून घेतले. हे गीत अल्पावधीतच खूपच लोकप्रिय झाले. त्यावेळेस कामात खूप व्यस्थ असलेल्या आशा भोसले यांना हे गीत खूप भावले. त्यानंतर काही वर्षांनी आशा भोसले यांच्या विनंतीवरून यशवंत देव यांनी हे गीत पुन्हा एकदा आशा भोसले यांच्या आवाजात रेकॉर्ड केले. शुक्रतारा मंदवारा हे गाणे जवळ जवळ १०० चे वर सुधा मल्होत्रा शुक्रतारा मंदवारा या कार्यक्रमाच्या निमिताने अरुण दाते यांच्या बरोबर गायल्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी मो.ग. रांगणेकर यांच्या आशीर्वाद या नाटकात प्रथम काम केले.
आज ९ नोव्हेंबर..आज मराठी काव्यविश्वात मनसोक्त मुशाफिरी करणारे कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांचा वाढदिवस.
किशोर कदम यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९६७ रोजी झाला.
काही माणसांच्या लोकप्रियतेचे रहस्य त्यांच्या कामाइतकेच व्यक्तिमत्त्वातही असते. ते किशोर कदम यांच्यातपण आहे. किशोर कदम यांना महाराष्ट्राचा लाडका कवी आणि नट म्हणता येईल. संवेदनशील कलावंत म्हणून सुद्धा किशोर कदम यांनी रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. ‘गारवा’ या अल्बमसाठी त्यांनी लिहिलेल्या कविता विशेष गाजल्या. ‘गारवा’ची लोकप्रियता हा एक विक्रम आहे आणि तो कोणीच मोडू शकलेला नाही.
वृद्धांपासून युवकांपर्यंत अनेकांच्या ओठावर ‘बघ माझी आठवण येते का? ’सारख्या ओळी रुजू लागल्या. ‘ऊन थोडं जास्त आहे’ सारखं काव्य कविता न वाचणार्यांकच्याही कंठात जाऊन बसले. हे यश जितकं अल्बमची निर्मिती करणार्याा ‘राजश्री प्रॉडक्शन’च्या मार्केटिंग विभागाचं आहे. ‘गारवा’ हा अल्बम गाजल्यावर किशोर कदम यांना हिंदीत लिखाणासाठी विचारले गेले, पण लाखो रुपयाचं आमिष नाकारत त्याने हिंदीत लिहिणे त्या क्षणी नाकारले. किशोर कदम यांचे शिक्षण आर.व्ही.टी.एच.एस. शाळेत झाले. त्यांच्या वडिलांचे आणि भावाचे सलून होते. किशोर यांच्या घरच्यांनी त्यांना तू हवे ते कर, असे सांगितले. त्याच्या हातात कात्री-कंगवा येऊ दिला नाही. किशोर कदम यांचे अभिनयाचे शिक्षण सत्यदेव दुबे यांच्याकडे झाले. ते दुबेजींचा लाडका शिष्य होता.
पालेकर दिग्दर्शित ‘ध्यासपर्व’(मराठी), ‘कल का आदमी’(हिंदी) या चित्रपटांत त्याने काम केले. प्रा. र. धों. कर्वे या संततिनियमनासंदर्भात कार्य करणार्या’ जगावेगळ्या व्यक्तीची भूमिका त्यांनी ‘ध्यासपर्व’ या सिनेमात केली. श्याम बेनेगल यांच्या ‘सलीम’चाही तो हिरो होता. अरुण खोपकर यांनी बनवलेल्या नारायण सुर्वेंवरील लघुपटात त्यांनी सुर्व्यांची व्यक्तिरेखा साकारली. इतर कलावंत आणि किशोर यात फरक असा, की तो खूप वाचनात रमणारा कवी आहे. तत्त्वज्ञान, झेन बुद्धिझम, ओशो रजनिशांची पुस्तके, नेरुदा, सीझर वाह्येव्होसारखे स्पॅनिश कवी, हेन्री डेव्हिड थोरो असे वाट्टेल त्या विषयावरचे तो वाचत असतो. ‘टाइम्स म्युझिक’तर्फे ख्यातनाम कवी गुलजार व मराठी कवी सौमित्र यांनी स्वत:च सादरीकरण केलेल्या २४ कवितांची ‘तरीही’ ही सीडी ऐकणे, हा एक वेगळाच अनुभव आहे.
प्रेम आणि पाऊस या कवी सौमित्र यांच्या कवितेतील खास बाबी आहेत. त्याने गुलजार यांच्या अनेक कविता हिंदीतून मराठीत आणल्या. गुलजार यांनीदेखील त्याच्या कविता हिंदीत नेल्या. ते सध्या गुलजारांवरील ‘बात पश्मिनेकी’ हा कार्यक्रम सादर करतात. किशोर कदम यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत ज्येष्ठतेच्या यादीत घेतले जात आहे. नटरंग, जोगवा, फॅण्ड्री अशा अनेक चित्रपटांत उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांनी पुरस्कार मिळविले आहेत. किशोर कदम यांच्या बाबतची एक आठवण. आशा भोसले यांनी ‘आपली माणसं’ या चित्रपटासाठी एक गाणे गायले. ते गाऊन झाल्यावर त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. त्यांनी कुतूहलाने गीतकाराचे नाव विचारले. तो आशातार्इंच्या डोळ्यांत पाणी आणणारा गीतकार होते म्हणजेच, किशोर कदम ऊर्फ कवी सौमित्र. समुद्र हा त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. त्याच्या कवितांमधून अनेकदा समुद्राविषयी उल्लेख असतात.
उदाहरणार्थ
जगण्यास तेव्हा खरा अर्थ होता,
निरर्थास ही अर्थ भेटायचे
मनासारखा अर्थ लागायचा,
अन् मनासारखे शब्दही यायचे
नदी-सागराचे किनारे कितीही मुक्याने,
किती वेळ बोलायचे
निघोनी घरी शेवटी जात असता,
वळुनी कितीदा तरी पाहायचे
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
शास्त्रीय संगीताच्या रसिकांसाठी महेश काळे हे सुपरिचित नाव. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९७६ रोजी झाला. ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटातील गाण्यांमुळं हे नाव सर्वदूर पोहोचलं. विशेषत: तरुणाईच्या गळ्यातला ताईत म्हणून ओळखलं जाऊ लागलं. महेशचा गेल्या एक तपाचा हा प्रवास, हो तपच! तपश्चर्या, साधना या खेरीज दुसरा कुठलाही शब्द योजता येणार नाही अशी मेहनत करूनच महेशने हे यश मिळवलं आहे. स्वप्नवत वाटणारं हे यश मिळवताना स्वप्नात देखील बहुदा तो गाण्याचाच विचार करत असतो. महेशच्या गाण्याने लोकांना वेड लावलेलं आहे.
महेशने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून गाणं शिकण्यास सुरुवात केली. त्याची आई शास्त्रीय संगीताचे क्लासेस घेत असे, जेव्हा त्याची आई शास्त्रीय संगीताचे तास घेत असे, तेव्हा महेश आलापावरून नोटेशन तयार करायचा. याच काळामध्ये त्याला संगीताबद्दल ओढ निर्माण झाली. यानंतर मा.रवींद्र धांगुर्डे यांच्याकडे त्याने काहीकाळ शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले; पण खर्याग अर्थाने त्याच्यातील गायक श्रोत्यांसमोर आला तो अभिषेकीबुवांमुळे. दहावीच्या सुट्टीमध्ये महेश अभिषेकीबुवांकडून संगीताचा रियाज केला. बुवांबरोबर कायम राहून तो त्यांचा पट्टशिष्यच झाला. या पट्टशिष्यावर बुवांनी भरपूर मेहनत घेतली. यानंतर शौनक अभिषेकींनीसुद्धा त्याला मार्गदर्शन केले. बुवांच्या सहवासामुळे महेशला शास्त्रीय संगीतातील बारकावे कळून आले. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतानासुद्धा महेश पहाटे चार वाजता उठून अभिषेकीबुवांकडे रियाजासाठी जात असे. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर महेश उच्च शिक्षणाकरिता अमेरिकेमध्ये गेला. अमेरिकेत त्याने संगीतामध्ये (डबल) एम.एस. केले. अर्थातंच नोकरीच्या पुष्कळ संधी महेशसमोर चालून आल्या. परंतु, शास्त्रीय संगीतामध्ये असलेली ओढ. महेशला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून वडिलांची परवानगी घेऊन महेशने अमेरिकेच्या कॅलिफोनिर्यातील सनीवेल या ठिकाणी विद्यार्थ्यांकरिता शास्त्रीय संगीताचे क्लासेस सुरू केले. बघता बघता ३०० हून अधिक विद्यार्थी या क्लासला दाखल झाले. तेथे गेली १५ वर्षे तो या विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत आहे. गेल्यावर्षी जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सनीवेलमध्ये होते, तेव्हा महेशला राष्ट्रगीत गाण्याकरिता सांगण्यात आले. महेशने आपल्याबरोबर आपल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले, तर ही सुवर्णसंधी ठरेल, असे मत मांडले. त्यानुसार अमेरिकेमध्ये वास्तव्य करण्याऱ्या विद्यार्थ्यांसह त्याने आपल्या भारताचे राष्ट्रगीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर केले. लॉस एंजेलिसमध्ये प्रसिद्ध विंडप्लेअर पेद्रो युस्ताच यांच्या सोबत ‘रागाजॅझ’ बॅण्डमध्ये परफॉर्म केलंय. प्रख्यात कीबोर्ड आर्टिस्ट फ्रँक मार्टिन आणि प्रसिद्ध सॅक्सोफोनिस्ट जॉर्ज ब्रुक्स यांच्यासोबत परफॉर्म केलंय. हरिहरन, विक्कू विनायकम, झाकीर हुसेन अशा दिग्गजांबरोबर कोलॅबरेशन केलंय. प्रख्यात तालवाद्य कलाकार शिवमणींबरोबर आणि त्रिलोक गुर्टू यांच्यासोबतही परफॉर्म केलंय. प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णीनी रागमालेवर आधारित गाणं रचलं आहे. या डय़ुएटचं रेकॉर्डिग अलीकडंच प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवतीसोबत महेशनी केलं. सध्या ‘सूर निरागस हो’ या कार्यक्रमातून महेश आजवरचा गायनप्रवास उलगडतोय. देशविदेशातील तरुणवर्गाशी महेश संवाद साधतो सुरांच्या भाषेत. कट्यार काळजात घुसलीच्या गीत गायना साठी महेश काळेला सर्वोत्कृष्ट गायक हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. शास्त्रीय गाण्यासाठी पुष्कळ वर्षांनंतर मराठी गायकाने हा सन्मान प्राप्त केला आहे. महेश आई-वडील-गुरू व संगीतावर निष्ठा असणारा अतिशय नम्र साधक आहे. कट्ट्यार. नाटकासाठी भारतात महेशला पुन्हा भारतात आणण्याची संधी राहुल देशपांडे यांनी शोधून काढली. त्यांनी कट्यार काळजात घुसली हे संगीत नाटक सुरू करण्याचा निर्णय घेतला यावेळी सदाशिवच्या भूमिकेकरिता महेश काळे याला निवडले. त्याच्याशी अमेरिकेमध्ये संपर्क करून त्याला या संगीत नाटकाची स्क्रीप्ट पाठवली. महेश काळे यांनी अमेरिकेतच या स्क्रिप्टवर काम केले. तिथं तालमी करूनच तो भारतात आला. भारतात आल्याआल्या तो तत्काळ प्रयोगात सहभागी झाला. आज या नाटकाचे १०० हून अधिक प्रयोग पूर्ण झाले आहेत. राहुल देशपांडे आणि महेश काळे हे दोघेही समृद्ध गायक आहेत. राहुलच्या अनुभवाचाही उपयोग महेशला नक्कीच झाला आहे. कट्यार काळजात घुसली या चित्रपटात सदाशिवची भूमिका सुबोध भावे यांनी केली तरी महेश काळेनी सदाशिवची गाणी गायली. अरुणी किरणी या गीतामध्ये तर त्याने संपूर्ण चित्रपटाची झलकच प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. त्याचा आवाज, त्याची क्षमता आणि संगीताबद्दलची त्याची आसक्ती या गीतामधून आधोरेखित होते. ‘स्टार प्रवाह’वर ‘नकुशी.. तरीही हवीहवीशी’या मालिकेचं टायटल साँग महेशनं संगीतबद्ध केलं आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti