(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका वीणा सहस्त्रबुद्धे

    शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात नावलौकिक आणि प्रसिद्धी मिळाल्यावरही, आपण परिपूर्ण गायक आहोत, असा अहंकार त्यांनी कधीच बाळगला नाही. दररोज त्या गायनाचा रियाज नियमितपणे करीत असत. शास्त्रीय संगीताचे शिक्षण घराण्याच्या शिस्तबद्धतेनेच व्हायला हवे, असा त्यांचा आग्रह होता.

      June 29, 2017


  • अभिनेत्री शांता जोग

    त्यांना मराठी माणसानी डोक्यावर घेतली ती त्यांची अजरामर भूमिका होती ‘ नटसम्राट ‘ या नाटकातील ‘ सरकार ‘ ची म्हणजे कावेरी ची भूमिका.

      September 1, 2021


  • हिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा

    १९९४ मध्ये महेश भट्ट यांच्या ‘स्वाभिमान’ मालिकेतील ‘त्यागी’ या पहिल्याच भूमिकेतून सर्वांचे लक्ष वेधणारा अभिनेता आशुतोष राणा पुढे ‘दुश्मन’ आणि ‘संघर्ष’सारख्या चित्रपटांतून दज्रेदार आणि प्रभावी खलनायकाच्या भूमिकेत दमदारपणे उभा राहिला. दुश्मन सिनेमातील दमदार अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.

      April 15, 2019


  • दक्षिण भारतातील सुप्रसिध्द गायिका एस. जानकी

    गुंटूरमध्ये २३ एप्रिल १९३८ रोजी जन्माला आलेल्या एस.जानकी यांनी वयाच्या १९ वर्षांपासून गाण्यातील कारकीर्दीला सुरुवात केली. एस. जानकी या गेल्या साठ वर्षापासून गात आहे. जानकी यांना दक्षिण भारताची 'सुर कोकिळा म्हणतात. जानकी यांना दक्षिण भारतातील गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. आंध्र प्रदेशच्या त्यांनी आजवर तामीळ, कन्नड, तेलगु मल्याळी या भाषांमध्ये वीस हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.

    जानकी यांना गायनासाठी चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. जानकी यांना गायनासाठी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. पण त्यांनी पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता. पाच दशकांच्या गायनाच्या कारर्कीदीत सरकारने पुरस्कार देण्यास बराच उशीर केल्याने आपण हा पुरस्कार नाकारत आहोत असे मा.जानकी यांनी म्हटले आहे.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      April 23, 2017


  • जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर

    जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी झाला. नाना पाटेकर यांचे मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. नाना पाटेकर यांचे वडील दिनकर पाटेकर हे चित्रकार होते. नाना मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’चे विद्यार्थी होते. नाना पाटेकर यांनी ’गमन’ या १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. पुढे आठ वर्षे नाना चित्रपटात मिळेल ती भूमिका करत राहिले.

    सुरवातीला जाहिरात एजन्सीमध्ये काम केले. त्याच दरम्यान "हमीदाबाईची कोठी' या नाटकामध्ये भूमिका केली व मोठे यश मिळाले. अगदी सुरवातीला "दमन', "गड जेजुरी जेजुरी' आदी चित्रपटांमध्ये काम केले. रंगभूमीवर आपला ठसा उमटवल्यावर रुपेरी पडद्याकडे वळलेल्या पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली आहे.

    नाना पाटेकर यांनी अभिनय केलेला माफीचा साक्षीदार हा मराठी चित्रपट त्यांच्या अभिनयामुळे इतका गाजला की या चित्रपटाची हिन्दी आवृत्तीस ’फांसी का फंदा’ ही सुद्धा खुप गाजली. मोहरे आणि सलाम बॉम्बे या चित्रपटांमध्ये अभिनय केलानंतर त्यांना हिन्दी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खलनायकाचे काम मिळायला सुरुवात झाली नाना पाटेकर यांनी खलनायकाबरोबर अनेक चित्रपटांमध्ये नायकाची भुमिकासुद्धा केली आहे. अंधायुद्ध, परिंदा, अंगार, तिरंगा, क्रांतिवीर, वजूद, अब-तक-छप्पन, अटॅक ऑफ २६११, गुलाम-ए-मुस्तफा, टॅक्सी नं. ९२११, यशवंत, युगपुरुष, खामोशी, अपहरण, वेलकम, हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट.

    नाना पाटेकर यांनी प्रहार चित्रपटात एका सैनिकाची भूमिका साकारली होती. ही भूमिका पडद्यावर वास्तवदर्शी वाटावी म्हणून नाना भारतीय सैनिकांसोबत दिवस राहिले होते. विशेष म्हणजे ते त्यावेळी ते कलाकार म्हणून नाही तर एक सैनिक म्हणून राहिले होते.नाना यांनी सैनिकाच्या भूमिकेकरिता जवळपास तीन महिने पुण्याला जाऊन ट्रेनिंग घेतली होती. जेणेकरून प्रहार मधील कमांडोची भूमिका ते अधिक चांगल्या पद्धतीने साकारू शकतील. प्रहार या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते. सैनिकांसोबत राहत असताना नाना पाटेकर यांच्या धाडसी व्यक्तिमत्वाने भारावून गेलेल्या सैनिकांनी त्यांना 'कॅप्टन' या पदवीने सन्मानित केले.

    १९८९ साली ’परिंदा’ मध्ये केलेल्या खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्म फेअर पारितोषिक मिळाले. तसेच १९९२ साली ’अंगार’ या चित्रपटातील खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायक चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९९४ साली ’क्रांतिवीर’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. अपहरण या चित्रपटातील त्यांच्या खलनायकाच्या भुमिकेला सर्वोत्कृष्ट खलनायक फिल्मफेअर पुरस्कार आणि स्टार स्क्रीन पुरस्कार मिळाले. बंगाल फिल्म पत्रकारिता संघातर्फे बेस्ट ऍक्टर पुरस्कार अबतक छप्पन या चित्रपटातील भूमिकेकरिता मिळाला. इतरांपर्यंत संवाद फेकण्याची त्यांची शैली. या क्षणी त्यांच्या चेहर्या वर येणारे चढउतार नैसर्गिकच. मनात खोलवर दाबून ठेवलेला राग काढतेवेळी चेहर्याटवर येणारा संताप सहजरीत्या त्यांच्या अभिनयातून आपणास पहावयास मिळते. ही व यासारखी अनेक चित्रपटांतून त्यांनी आपले कलाकौशल्य दाखविले.

    हिंदी सिनेसृष्टीतील ट्रॅजिडीकिंग म्हणवणारे दिलीपकुमार, अभिनय सम्राट राजकुमार आणि यँग्री यंग मॅन अभिताभ बच्चन यांचीही अभिनयशैली निराळी, या महान नायकांच्या अभिनयक्षमतेला नानांची अभिनयक्षमताच टक्कर देऊ शकते असं म्हणायला हरकत नाही. ‘खामोशी’ चित्रपटातील नाना पाटेकरांची भूमिका अगदी वेगळीच. जिवंत अभिनय आपणास त्यांच्या चित्रपटातून पहावयास मिळतात. टेलिव्हीजन कार्टून मालिका ‘जंगल बुक’ याकरिता स्वतःचा आवाज दिला. यशवंत, आंच, वजूद या चित्रपटातून त्यांनी गाणी ही गायली. नाना पाटेकर यांचा अभिनय असलेला डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांचे प्रेरणादायी कार्य सांगणारा ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रिअल हिरो’ हा चित्रपट नक्की बघावा. तसेच गेल्या वर्षी जानेवारीत प्रदर्शित झालेला नाना पाटेकरचा 'नटसम्राट' शिरवाडकर यांचे 'नटसम्राट' या चित्रपटात गणपतराव बेलवलकर यांची भूमिका पेलणारे नाना पाटेकर यांनी ती भूमिका अतुच्य कळसावर नेऊन ठेवली. नानांनी देऊळ चित्रपटात पण सुंदर भूमिका केली आहे. अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या नाना यांना भारत सरकाने ‘पद्मश्री’ सन्मानाने गौरवले आहे.

    पत्नी निलकांती व मुलगा मल्हार पाटेकर हा त्यांचा परिवार. नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये मकरंद अनासपुरे याच्याबरोबर ‘नाम फाउंडेशन’ या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतक-यांना मदत करतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 1, 2019


  • हिम्मते मर्दा….

    ‘धंदा म्हटला म्हणजे तो बुडणारच! धंदा म्हणजे अळवावरचे पाणी! ज्याला नेकरी मिळत नाही तो धंद्यात पडतो!’ उद्योग व्यवसायाविषयी मराठी समाजात अशी विचित्र मनोवृत्ती असल्याचे मला आढळून आले आहे. इतर जमातीत उद्योग व्यवसाय असलेल्या कुटुंबात मुलगी देणे प्रतिष्ठेचे समजले जाते. आपल्याकडे मात्र अशा कुटुंबात मुलगी देण्याआधी शंभर वेळा विचार करण्यात येतो. अजुन तरी या मनोवृत्तीत विषेश फरक झाल्याचे निदान मला तरी आढळून आले नाही.

    मराठी माणूस हा नेहमी धंद्यात ‘पडतो’. तो कधी आपणहून धंद्यात येत नाही. जो माणुस धंद्यात ‘पडतो’ त्याचा धंदा पण शेवटी पडतोच’. पण जो माणूस आपणहून, स्वखुषीने, आत्मप्रेरणेने, जिद्धीने किंवा इर्षेने, आवडीने धंद्यात येतो त्याचा धंदा कधीच बुडत नाही तर तो तरतो, फोफावतो, मोठा होतो असे मी पाहीले आहे. मग या साठी त्याचे वय, शिक्षण, क्वालिफिकेशन्स, एक्सपिरियन्स, फॅमिली बॅकग्राऊंड, आर्थिक परिस्थिती, स्त्री का पुरुष, जात-पात-धर्म, तो मराठी मिडियम मधून शिकला का इंग्लीश मिडियम मधून शिकला या सगळ्या गोष्टी गौण, दुय्यम किंवा कमी महत्वाच्या म्हणजेच सबस्टँडर्ड ठरतात. याचे उत्तम उदाहरण आहे पुण्याचे एक उद्योजक सदाशीव रामा बोराटे उर्फ अण्णा.

    अठरा विश्वे दारीद्रय असलेल्या एका गरीब शेतकरी कुटुंबांत जन्मलेल्या एखाद्या खेडुत मुलाने लहानपणापासुनच कारखानदार, इंडस्ट्रियालीस्ट किंवा उद्योजक होण्याची स्वप्ने बघणे हा शुध्ध वेडेपणाच! त्यांतुन उत्तम नोकरी मिळविण्यासाठी लागणारी दणदणीत क्वॉलिफिकेशन्स हाताशी असताना चालुन आलेली चांगली नोकरी नाकारुन नोकरिचा दरवाजा स्वतःसाठी कायमचा बंद करण्याचे धाडस दाखवणे हा अजुन एक मुर्खपणा! त्यांतही स्वतःला कांही इन्कम नसताना हायस्कुल टीचर असलेल्या आपल्या बायकोला पण नोकरी सोडायला लावुन तिच्या येणार्याय नीयमीत उत्पन्नावर गदा आणणे हा तर मुर्खपणाचा कळसच! पण अशी मुर्ख किंवा वेडी माणसेच काहीतरी भरीव कामगिरी करुन दाखवत असतात. म्हणुनच ऍपलच्या स्टीव्ह जॉब्ज सारखे लोक ‘स्टे हंग्री, स्टे फूलीश’ ( Stay Hungry, Stay Foolish ) ‘ ऊपाशी रहा, मुर्ख बना’ असा उपदेश करत असतात ते उगीच नाही. सुप्रसिद्ध पार्श्व गायिका श्रीमती आशा भोसले एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या की घरची गरिबी आणि पोटातील भुकेची आग यामुळेच त्या श्रेष्ठ गायिका बनल्या. अशी पोटातील भुकेची आग व गरिबिचे चटके त्यांना बसले नसते तर त्या आत्तासारख्या श्रेष्ठ गायिका कधीच झाल्या नसत्या. आण्णा सुद्धा याच कॅटेगरीतले आहेत.

    कारखानदार होण्याचे स्वप्न जरी अण्णांनी उराशी तरी बाळगले असले तरी करखनदार व्हायचे म्हणजे नक्की काय करायचे हे कुठे माहित होते? अण्णासारखा ग्रामीण भागातून आलेला, बिना इस्त्रीचे साधे कपडे व चपला घालणारा, भाड्याच्या सायकलवर फिरणारा, किरकोळ शरिरयष्टी व अत्यंत सामान्य पर्सनॅलिटी असलेला, ज्याला धड इंग्रजीसुद्धा बोलता येत नाही असा, ज्याच्या खिशात गावाला जाण्यासाठी लागणार्यास एस.टी. भाड्याचे पैसे सुद्धा नसतात अशी दरिद्री अवस्था असलेला मराठी माणूस कारखानदार कसा होऊ शकेल असेच सर्वांना वाटायचे.

    पण जे मोठी स्पप्न बघायचे धाडस दाखवत असतात व त्या दिशेने प्रयत्न करत असतात त्यांची स्वप्ने नेहमीच खरी ठरतात. आज अण्णांचे एक नाही, दोन नाही तर चक्क पाच कारखाने आहेत. त्यातील दोन पुण्याला, दोन सातारला व एक चाकणला आहे. प्लॅस्टिक मोल्डिंगच्या क्षेत्रात त्यांच्या कंपनीचे मोठे नाव झाले आहेत. टाटा मोटर्स, फोक्स वॅगन, जनरल मोटर्ससाख्या मोठ्या कंपन्या त्यांचे ग्राहक आहेत. 90 कोटीच्या वर टर्वओव्हर आहे. 200 माणसे काम करीत आहेत. त्यांना चार मुले-तीन मुली व एक मुलगा आहे. त्यातील दोन मुली व मुलगा क्वालिफाईड इंजिनिअर तर एक मुलगी एम.बी.ए. आहे. बि.कॉम. झालेला त्यांचा पुतण्या ‘उत्तम’ हा उत्तम इंजिनिअर झाला आहे. प्लॅस्टिकला लागणारे मोल्ड बनवण्यात त्याने प्राविण्य मिळवले आहे. जर इंजिनिअर व्हायचे असेल तर त्यासाठी इंजिनिअरींगची क्वालिफिकेशन्स असलीच पाहीजेत असे नाही. जर आवड असेल तर कोणालाही उत्तम इंजिनिअर बनता येते याचे ‘उत्तम’ हे उत्तम उदाहरण आहे. ज्यांची भाड्याने जागा घेण्याची ऐपत नव्हती व भाड्याच्या सायकलवरून फिरायची पाळी होती त्याच अण्णांचे आज बंगले आहेत, गाड्या आहेत. थाटात फॅरीन टुर्स करत आहेत. नोकरीत हे कधीच जमले नसते असे त्यांचे म्हणणे आहे.

    अर्थात अण्णांचा हा प्रवास काही साधा, सरळ व सुखाचा झालेला नाही. पार्टनरने ऐन वेळेला दगा देणे, लोकांनी फसवणे किंवा टोप्या घालणे, अंडर एस्टिमेट करणे, थोड्याश्या मोबदल्यात त्यांच्या फॅक्टरीवर कबजा करण्याचा प्रयत्न करणे, बिझनेच्या मोठ्या मोठ्या थापा मारून त्यांना फुकटात राबवून घेणे, वेगळे घर घ्यायला पैसे नाहीत म्हणुन फॅक्टरीतच संसार थाटणे, केवळ तीन भांड्यांपासून संसाराला सुरवात करणे, हेवे दावे, लोकांच्या पोटात दुखणे अशा अनेक संकटांना तोंड द्यायची पाळी त्यांच्यावर आली. पण ते डगमगले नाहीत. याचवेळी त्यांना काही चांगली माणसे पण भेटली. असे असुनही आपल्या गावाशी असलेली नाळ त्यांनी कधी तुटु दिली नाही. आपल्या गावी पण त्यांनी कारखाना काढला होता. त्याला महाराष्ट्र सरकारचे पारितोषीक पण मिळाले होते. पण विजेच्या समस्येमूळे त्यांना हा कारखाना बंद करावा लागला.

    जास्तीत जास्त मराठी तरुणांनी उद्योग व्यवसायात यावे, कारखानदार व्हावे, लघु उद्योजक व्हावे, विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांनी या क्षेत्रात पुढे यावे, ग्रामीण भागात कारखाने काढावेत या साठी अण्णांचे तळमळीने प्रयत्न चालू असतात. यासाठी त्यांची विनामुल्य मार्गदर्शन देण्याची तयारी असते. त्यांचे म्हणणे आहे की लघु उद्योग हा मोठ्या उद्योगाचा पाठीचा कणा आहे. त्यांच्या पासून प्रोत्साहन घेऊन त्यांच्या गावाजवळील गावातील काही तरुणांनी कारखाने काढले आहेत. त्यांच्या जीवन चरित्रावर आधरलेले माझे ‘हिम्मते मर्दा’ हे पुस्तक इ-साहित्य प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाले असून ते विनामुल्य उपलब्ध आहे. यापासून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

    ज्यांना हे पुस्तक हवे आहे त्यांनी joshiulhas5@gmail.com या इ-मेल आयडीवर संपर्क साधावा. अण्णांशी संपर्क साधायचा असल्यास borate.sr@elite-group.co.in या इ-मेल आयडीवर संपर्क साधावा ही नम्र विनंती आहे.

    -- उल्हास हरी जोशी, मोः-9226846631

      January 25, 2016


  • मृणाल सेन

    मृणाल सेन याना इतकी जगभरातून अवॉर्ड्स मिळाली आहेत त्याची यादी काढायची झाली तर खूप मोठी होईल. त्याच्या अवॉर्ड्स मिळालेल्या चित्रपटांची नावे भुवन शोम , चोरस , मृगया , अकलेर संधने , कलकत्ता ७१ , खरजी , पूनासचा , आकाश कुसुम , अंतरेंन , ओका ओरी कथा , परशुराम , एक दिन प्रतिदिन ,खंडहर , एक दिन अचानक ह्या चित्रपटांना वेगवेगळ्या कामाबद्दल अवॉर्ड्स मिळली आहेत. मृणाल सेन यांनी अनेक डॉक्यूमेंटरीज बनवल्या आहेत. मृणाल सेन याना १९७९ साली पदमभूषण अवॉर्ड मिळाले , तर २००५ साली दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाले .

      July 18, 2021


  • मराठी नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट

    सुयोग नाटसंस्था सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी यांनी १ जानेवारी १९८५ रोजी स्थापन केली. त्यांचा जन्म १३ जून १९५१ रोजी झाला. ‘मोरूची मावशी’ या आचार्य अत्रेलिखित पहिल्याच नाटकाने हजाराहून अधिक प्रयोगांचा विक्रम केला होता. या नाटयसंस्थेच्या माध्यमातून ८० पेक्षा जास्त नाटके, १६ हजाराहून अधिक प्रयोग आणि हजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणा-या आठ नाटकांची निर्मिती त्यांनी केली. सुयोग नाटयसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी एका लग्नाची गोष्ट, कबड्डी कबड्डी, चार दिवस प्रेमाचे, मोरुची मावशी अशा एकाहून एक सरस विक्रमी नाटकांची निर्मिती केली. नाटकांच्या तारखा वाटपात प्रचंड उलाढाल करणारे निर्माते म्हणून सुधीर भट नेहमीच चर्चेत राहिले. त्यांचे सुरुवातीला मोरुची मावशी हे नाटक प्रचंड गाजले.

    ‘ती फुलराणी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’ या नाटकांना सुध्दा प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. मराठी नाटक सातासमुद्रापार युरोप, अमेरिकेत नेण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. त्यांच्या नाटकांना परदेशातही उत्तम प्रतिसाद मिळाला. काही काळ नाटय़निर्माता संघाचे ते अध्यक्षही होते. अ. भा. मराठी नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाचेही प्रदीर्घ काळ ते सदस्य राहिले. नाटय़व्यवसायाच्या तक्रारी आणि गाऱ्हाणी शासनदरबारी मांडण्यात आणि त्यांची सोडवणूक करून घेण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असे.

    जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन, नाटकांचे परदेश दौरे, नवे विषय हाताळणे आणि नाट्यप्रयोगांचे विक्रम ही त्यांची वैशिष्ट्ये होती. नटांची अत्यंत काळजी घेणारे, इंटिरियर डिझायनिंग करणारे, उत्तम खवय्ये आणि तेवढ्याच प्रेमाने खाऊ घालणारे म्हणून भट प्रसिद्ध होते. "मोरूची मावशी‘ हे नाटक प्रचंड गाजले. मात्र, "गांधी विरुद्ध गांधी‘ या नाटकाने व्यवसायात त्यांना खोट दिली. पण ते कधीच मागे हटले नाहीत. विजय चव्हाण, सुनील बर्वे, प्रशांत दामले यांची कारकीर्दही त्यांनी उभी केली.
    मराठी रंगभूमीचा शो मॅन म्हणूनही त्यांना ओळखले जात असे. सुधीर भट यांचे निधन १४ नोव्हेंबर २०१३ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 21, 2017


  • अभिनेता शंतनू मोघे

    अभिनेता शंतनू मोघे यांचा जन्म २८ जुलैला झाला.

    तरुण आणि दमदार कलाकारांच्या यादीत अभिनेता शंतनू मोघे यांचं नाव आग्रहाने घेता येईल.

    शंतनू मोघे हे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे चिरंजीव होत. शंतनु महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईतून पुण्यात आले. त्यांनी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला होता. सिंहगड कॉलेजमध्ये शिकत असताना तिथल्या कला गृप मध्ये सामील झाले. मग पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक, कॉलेज फेस्टिवल आदी मध्ये सहभागी झाले. अभिनयाची आवड लहानपणापासून होती. श्रीकांत मोघे हे मोठे अभिनेते म्हणून घराघरांत पोहोचलेलं एक व्यक्तिमत्व होते कायम त्यांना काम करताना बघत मोठे झाले. तर काका सुधीर मोघे हे मनामनांत पोहोचलेले मोठे कवी. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मुंबईत आले. पण काही दिवस चांगलं काम काही मिळत नव्हतं. नंतर मग दोन वर्ष नोकरी करत ऑडिशन देत गेले. मग हळूहळू चांगल्या संधी मिळू लागल्या आणि ह्या क्षेत्रात पूर्ण वेळ काम सुरू केले. या सुखांनो या ही त्यांची पहिली व्यावसायिक सीरियल होती. पुढे शंतनू यांनी अनेक मराठी नाटकात आणि चित्रपटात अभिनय केले आहेत.

    ‘स्वराज्यरक्षक संभाजी’या मालिकेत त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका खूपच गाजली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेनंतर अभिनेता शंतनू मोघे प्रेक्षकांना पुन्हा एकदा चरित्र भूमिका साकारताना दिसले होते. विप्र एंटरटेनमेंट आणि दिशादिपा फिल्म्स निर्मित 'श्री राम समर्थ' सिनेमात शंतनू मोघे यांनी समर्थ रामदास स्वामींच्या भूमिकेत दिसले. आता शंतनू मोघे पुन्हा एकदा मालिकाविश्वात दिसत आहेत. स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेत अविनाश देशमुख म्हणून त्यांचा प्रवेश झाला आहे.

    शंतनू यांना चरीत्रपटापेक्षा वेब सिरीजमध्ये काम करण्यास आवडते. शंतनु यांनी 'झी ५' वरील 'पॉयझन' या वेब सिरीजमध्ये काम केले आहे. शंतनू मोघे आणि प्रिया मराठे मराठीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. २०१२ मध्ये शंतनू मोघे यांनी अभिनेत्री प्रिया मराठे सोबत लग्न केले आहे.दोघेही मनोरंजन क्षेत्राशी संबंधित असून आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली आहे. प्रियाने नाटक, मालिक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांद्वारे प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मन जिंकून घेत तिने स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. प्रियाने सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत सावित्रीबाई देशमुख उर्फ रायबागण ही ऐतिहासिक भूमिका साकारली होती.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      July 28, 2021


  • मराठीतील लेखिका व समालोचक कुसुमावती देशपांडे

    मराठीतील लेखिका व समालोचक कुसुमावती देशपांडे यांचा जन्म १० नोव्हेंबर १९०४ रोजी झाला. विदर्भातील प्रसिद्ध वकील रावबहादुर रामकृष्ण रावजी जयवंत ह्यांच्या त्या कन्या. प्राथमिक शिक्षण अमरावतीला व पुढचे शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले. शिष्यवृत्तीसह त्या मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. नागपूर विद्यापीठाच्या बीएच्या परीक्षेत त्यांना सुवर्णपदक मिळाले, आणि मध्य प्रांत-विदर्भ सरकारची (सी.पी. ॲन्ड बेरार सरकारची) विशेष शिष्यवृत्ती मिळवून त्या इंग्लंडला गेल्या.

    पुढे इंग्रजी साहित्यातली लंडन विद्यापीठाची पदवी मिळवून कुसुमावती १९२९ला भारतात परतल्या. त्याच वर्षी त्यांचा आत्माराम रावजी देशपांडे ऊर्फ कवी अनिल यांच्याशी विवाह झाला. नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये केवळ मुलगे शिकत असल्याने त्यांना इंग्रजीच्या प्राध्यापकाची नोकरी स्त्री म्हणून नाकारली गेली. शेवटी गव्हर्नरपर्यंत जाऊन, भांडून कुसुमावतींनी ती नोकरी मिळविली.

    त्यानंतर त्यांनी काही काळ नागपूर आकाशवाणी केंद्रात आणि नंतर दिल्लीच्या केंद्रात त्यांनी कार्यक्रम संचालक म्हणून काम केले. ग्वाल्हेरला भरलेल्या त्रेचाळीसाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान कुसुमावतींना मिळाला. कुसुमावती देशपांडे यांचे १७ नोव्हेंबर १९६१ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 17, 2018