(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मास्टर कृष्णराव तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर

    आपलं सगळं आयुष्य नाटकाला वाहिलेला, सर्वार्थाने रंगभूमी कलाकार म्हणजे मास्टर कृष्णराव. त्यांचा जन्म २० जानेवारी १८९८ रोजी झाला.
    त्यांना सुरुवातीचे संगीत शिक्षण बाबूराव फडके यांचेकडून मिळाले. कृष्णरावांचे वडील पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांचा परिचय सवाई गंधर्वांशीझाला व त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले. १९१० साली मास्टर कृष्णरावांनी पं. भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले. आपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्टर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बालगंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र', 'एकच प्याला' यांसारख्या अनेक नाटकांत स्त्री-भूमिकाही केल्या.

    गुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम कृष्णरावांकडे आली. 'सावित्री', 'मेनका', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना मा.कृष्णराव त्यातील अभिनेत्यांना मार्गदर्शन करत असत. बालगंधर्वही त्यांना गुरुस्थानी मानायचे.

    नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा' यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व शब्दसौंदर्यासाठी वाखाणली गेली. कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'माणूस', 'गोपाळकृष्ण' यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या व इतर अनेक चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या गाजलेल्या 'अमरज्योती' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तीचा मळा' व 'मेरी अमानत' चित्रपटांत भूमिकाही केल्या. संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्टर कृष्णरावांनी १९२२ ते १९५२ दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत,भजन व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी रचलेले 'झिंजोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर. पी. एम. ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली.

    अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील, गायन व वादन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे १९४० ते १९७१ या काळात लिहिलेले 'रागसंग्रह' नामक सात खंड त्यांत समाविष्ट आहेत.

    वंदे मातरम हे गीत, ते बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरमला अनेकानेक विविध चाली लावून, त्यांतल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी पंडित नेहरूंची भेट घेऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्नं केला. पण नेहरूंनी आधीच जन गण मन निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली.मसापतर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार देण्यात येतो. मा.मास्टर कृष्णराव यांचे २० ऑक्टोबर १९७४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- ग्लोबल मराठी / विकिपिडीया

      January 20, 2017


  • लेखक जयवंत दळवी

    जयवंत दळवी यांच्या कादंबऱ्या आणि नाटके पाहिली तर मानवी स्वभावाचे अनेक कंगोरे त्यात दिसतात.

      August 28, 2021


  • सीमा हर्डिकर – जगू या स्वच्छंदे परि विज्ञाने

    सीमा नुसती शेती विषयात पदवीधर झाली नाही तर विद्यापीठात पहिली आली. त्याबरोबच ती बाळासाहेब सावंत आणि सर रॉंबट अलन Robart Alan सुवर्णपदकाची मानकरी ठरली. कृषी विद्यापीठातली सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून महाराष्ट्राच्या राज्यपालांनी कुलपती पदक प्रदान करून तिच्या यशावर सुवर्ण कळस चढवला.

      October 8, 2018


  • प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी गालिब

    मिर्ज़ा असद-उल्लाह बेग ख़ां उर्फ “ग़ालिब” हे एक प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १७९७ रोजी झाला. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज न पढणारे, रोजा न ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिब केवळ चार वर्षांचे असतांना त्यांचे वडील वारले म्हणून आजोबा आणि काकांनी पालनपोषण केले. लहानपणी त्यांनी इस्लामचे धडे घेतले, फारसी भाषा शिकले. मा.मिर्झा गालिब हे थोरल्या बाजीरावांची पत्नीे मस्तानी हिच्या वंशात जन्माला आले होते.

    गालिब यांनी फारसी भाषेत लिखाण काम सुरू केले. त्यांच्या साहित्यात जीवनाचे गंभीर तत्वज्ञान त्यांनी मांडले. वयाच्या ११व्या वर्षापासून गालिब शेर लिहीत होते. जीवनाच्या झळा सोसून मिर्झा गालिब यांनी त्या सुंदर करून काव्यातून मांडल्या. त्यांनी एकूण १८,००० च्या वर शेर फारसी भाषेत रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच १०००-१२०० शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले. मा.गालिब यांनी कधी कोणताही उद्योग-धंदा केला नाही. मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या सहकार्याने ते राहत. त्यांना स्वतःला प्रसिद्धी मिळविण्याची गरज वाटली नाही. उत्तर मोगल काळातील राजांच्या, उमरावांच्या दरबारी जाणेही त्यांना आवडत नसे. ते म्हणत माझ्या कविता माझ्या मृत्यूनंतरही अजरामर राहणार असल्याने माझे नाव आपोआपच सर्वत्र पसरणार.

    गालिबच्या काव्यावर मीर आणि आमीर खुसरो यांच्या रचनांचा प्रभाव होता. साहित्य निर्मिती करताना केवळ चौकट मोडून चालत नाही. त्यात तितकी ताकदही असावी लागते. गालिबने परंपरेला नावीन्याची झालर लावली. अभिजात सौंदर्याची बूज राखायला शिकवले. घराण्यातच सैनिकी पार्श्वभूमी असल्याने गालिबमध्ये बंडखोरीचे बीज होते. मिर्झा गालिब यांच्यावर हिंदीत १९५४ साली एक चित्रपट निघाला होता व दुसरा १९८८ साली दूरचित्रवाणीसाठी बनवला होता. पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक सोहराब मोदी तर दुसर्याा चित्रपटाचे दिग्दर्शक गुलझार होते. मिर्झा गालिब यांचे निधन १५ फेब्रुवारी १८६९ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    मिर्झा गालिब यांच्या काव्यातल्या सुप्रसिद्ध पंक्ती
    काबां किस नूर से जाओगे गालिब, शर्म तुमको मगर नहीं आती
    दिल-ए-नादाँ तुझे हुआँ क्या आखि़र इस दर्द की दवा क्या है
    नुक्ताचीं है ग़म-ए-दिल उस को सुनाये न बने
    ये नथी हमारी किस्मत कि विसाल-ए-यार होता
    हजारो ख्वाईशें ऐसी के हर ख्वाईश पे दम निकलें
    हैं और भी दुनियामें सुखन-वर बहुत अच्छे, कहते हैं कि गालिब का अंदाज-ए-बयाँ और

      December 27, 2017


  • विकिपीडिया चे सहसंस्थापक व प्रमुख जिमी वेल्स

    आज इंटरनेटवरील सर्वात महत्त्वाची संकेतस्थळे कोणती, असे जागतिक सर्वेक्षण कोणी केलेच, तर त्यात विकिपीडियाचे नाव नक्कीच पहिल्या दहा संकेतस्थळांत असेल. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९६६ रोजी अलाबामा राज्यातील हंट्सव्हिल येथे झाला.

    जिमी वेल्स हे मूळचे अमेरिकन. त्यांचे वडील एका वाणसामानाच्या दुकानाचे व्यवस्थापक होते. एका खासगी शाळेत ते शिकले. तेथेच त्यांना विश्वकोश वाचण्याचा छंद जडला. विकिपीडिया निर्मितीची प्रेरणा त्यातच कुठे तरी असावी. या शिवाय लहानपणापासूनच त्यांना संगणकाची ओढ होती. तासन् तास संगणकावर खेळ खेळणे, कॉम्प्युटर कोड तयार करणे हा त्यांचा आवडता उद्योग होता. त्यातूनच त्यांना या माध्यमाची महती लक्षात आली. पुढे त्यांनी अर्थशास्त्रात पीएच.डी. संपादन केली.

    अलाबामा आणि इंडियाना विद्यापीठात काही काळ प्राध्यापकीही केली. १९९६ मध्ये मात्र त्यांनी संगणक क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि दोन सहकाऱ्यांसह बोमीस हे वेबपोर्टल तयार केले. ते अश्लील मजकुराचे, छायाचित्रांचे पोर्टल होते. पण त्याचेही एक वैशिष्टय़ म्हणजे त्यावर सर्वसामान्य संगणक वापरकर्ता आपली छायाचित्रे अपलोड करू शकत असत. मात्र त्यांचा तो प्रयोग सपशेल फसला आणि जिमी वेल्स ऑनलाइन विश्वकोश निर्मितीकडे वळले. २००० साली त्यांनी ‘नूपीडिया’ हा ऑनलाइन विश्वकोश सुरू केला. तत्पूर्वी त्यांची लॅरी सँगर या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांशी ओळख झाली होती. १९९०च्या सुमारास वेल्स एक ऑनलाइन ग्रुप चालवत होते. त्यात आयन रँड या तत्त्ववेत्त्या लेखिकेच्या ऑब्जेक्टिव्हिजम या तत्त्वज्ञानाची चर्चा होत असे. त्यातूनच त्यांचा सँगर यांच्याशी परिचय झाला होता. या दोघांनी मिळून नूपीडिया चालवताना येत असलेल्या अडचणींचा वेध घेऊन, त्यात सुधारणा करून, १५ जानेवारी २००१ रोजी लॅरी सॅंगर ह्यांच्या सोबतीने ‘विकिपीडिया’ हे संकेतस्थळ सुरू केले.

    विकिपीडिया हे साईटचं विकी हे नाव एका सर्वर प्रोग्रॅममधून आलंय. विकी हा शब्द सुरवातीला एका कॉम्प्युटर प्रोग्रॅममधे वापरला गेला होता. १९९५ मधे वार्ड कॅनिंगहॅम यांच्यामुळे तो प्रचारात आला. त्यावेळेस 'विकी विकी वेब डॉट विकी' हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं. लोकांनी आपणांस हव्या त्या विषयावरील माहिती या संकेतस्थळावर अपलोड करावी. उपलब्ध माहितीत भर घालावी, ती संपादित करावी, असे या संकेतस्थळाचे स्वरूप आहे. आज इंग्रजी विकिपीडियामध्ये असे सुमारे ४८ लाखाहून अधिक लेख आहेत. असे माहितीपूर्ण लेख एकाच ठिकाणी असणे ही काही साधी गोष्ट नाही. कसलीही माहिती हवी असेल तर आपल्याकडे आता एक सोप्पा मार्ग उपलब्ध झालाय. गुगलवर आपल्याला हव्या असलेल्या माहितीचा की वर्ड सर्च केला की पहिला पर्याय येतो तो विकिपीडियाचा. विकिपीडियावर सगळ्या गोष्टींची बेसिक पण डिटेल माहिती उपलब्ध असते.

    आणि विशेष म्हणजे ही माहिती मोफत आणि सर्वांसाठी खुली असते. ही सगळी माहिती 'ओपन सोर्स लायसन्स'प्रमाणे उपयोगात आणली जाते. त्यामुळेच विकिपीडियाला एनसायक्लोपीडिया म्हणजेच विश्वकोश म्हणतात. लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेला विश्वकोश असे त्याबद्दल म्हणता येईल.

    ही सगळी माहिती किती महत्त्वाची आहे याचा प्रत्यय तसा प्रत्येकालाच - एखाद्या विषयावर लेख लिहिताना, प्रोजेक्ट तयार करताना, निबंध लिहिताना, शाळेचा गृहपाठ करताना जेव्हा आपण विकिपीडियाकडे धाव घेतो तेव्हा - येत असतो!

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      August 7, 2021


  • कीर्तनकार चारुदत्त आफळे

    कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचा जन्म ३ जून १९६७ रोजी झाला.

    चारुदत्त आफळे उर्फ बुवा शालेय वयापासून आजवर गेली ४० हून अधिक वर्षे चारुदत्त आफळे संगीत रंगभूमीवर कार्यरत आहेत. आफळे घराणे क्षेत्र माहुलीचे सज्जनगडाच्या पायथ्याचे. समर्थ रामदासस्वामींच्या समाधीमंदिराकडून आफळे कुटुंबाला कीर्तनसेवेचे व्रत मिळाले. हे व्रत चारुदत्त आफळे निष्ठेने चालवीत आहेत. वडील गोविंदस्वामी आफळे आणि आई सौ. सुधाताई गोविंद आफळे. गोविंदस्वामी आफळे हे तरुण - बाल - वृद्धांची अलोट गर्दी खेचणारे असे त्यांच्या काळातले ते एकमेव कीर्तनकार होते. तसेच सुधाताईही उत्तम कीर्तन प्रवचन करीत असत. त्या होमिओपॅथीक डॉक्टर ही होत्या. आणि हिंदुमहासभेच्या कट्टर कार्यकर्त्या होत्या. चारुदत्त आफळे यांनी मराठी विषय घेऊन B.A. पदवी प्राप्त केली व संगीत विषय घेऊन M.A. पदवी प्राप्त केली. आणि भक्तीसंगीत व नाट्यसंगीत यावर ते Ph.D. केली आहेत. आई वडिलांकडून मिळालेली समृद्ध कीर्तन विद्या जोपासत असताना – श्री. दत्तदासबुवा घाग, श्री. श्रीपादबुवा ढोले, श्री. सुंदरबुवा मराठे अशा नामवंत कीर्तनकारांचे मार्गदर्शन बुवांना लाभले. बुवांनी त्यांच्या आयुष्यातले पहिले कीर्तन वयाच्या पाचव्या वर्षी केले. शाळा महाविद्यालयात असताना देखील काही कीर्तने केली. पण पूर्णतः कीर्तन सेवा १९८८ पासून सुरु झाली. संगीत शिक्षणासाठी त्यांनी मुकुंदबुवा गोखले, पित्रे बुवा, पं.आगाशे बुवा, पं.शरद गोखले, मधुकर खाडिलकर, पं. विजय बक्षी, ऋषिकेश बडवे अश्या अनेकांचे मार्गदर्शन लाभले. शिलेदार यांच्या मराठी रंगभूमीच्या अनेक संगीत नाटकांना चारुदत्त आफळे यांनी ऑर्गन साथ केली आहे.

    १९८८ ते २०१८ या तीस वर्षांत देश विदेशातून ५००० चे वर कीर्तने त्यांनी केली आहेत. नाट्यप्रयोग, नाट्यगीते कार्यक्रम यांची संख्या वेगळी आहेच. महाराष्ट्रासह इंदोर, उज्जैन (मध्यप्रदेश), बडोदा (गुजरात), ग्वाल्हेर, लखनौ (उत्तरप्रदेश), दिल्ली, कोलकाता (बंगाल), हैद्राबाद (आंध्र), बेळगाव, बेंगलोर (कर्नाटक) इ. प्रांतातून कीर्तन, प्रवचने झाली. श्रीलंका, कुवेत, दुबई, मस्कत, दोहा, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया अशा परदेशातही कीर्तनाचा गजर पोहोचविला.

    कीर्तन करण्याबरोबर अनेक मुलामुलींना ते कीर्तनाचे प्रशिक्षण देतात. राजर्षी शाहू महाराजांवरील शाहू या मालिकेत बालगंधर्वांचे काम करण्याचेही त्यांना भाग्य मिळाले.हेमंती बॅनर्जी कृत बालगंधर्व वरील माहितीपटात बुवांनी बालगंधर्वांची भूमिका केली. ज्या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.

    नाट्यसेवेसाठी त्यांना पुणे मराठी ग्रंथालयाकडून पाटणकर पुरस्कार मराठी नाट्य परिषदेकडून – पं. पलुस्कर पुरस्कार, बालगंधर्व रसिक मंडळाकडून – बालगंधर्व पुरस्कार, मंगेशकर प्रतिष्ठानाकडून – मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, व या वर्षी पुणे महानगर पालिकेकडून "बालगंधर्व पुरस्कार" असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      June 3, 2022


  • विद्रोही कवी तुळसी परब

    ‘हिल्लोळ’, ‘धादान्त आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्या मधल्या कविता’, ‘कुबडा नार्सिसस’आणि ‘हृद’ हे त्यांचे चार कविता संग्रह आहेत.

      July 5, 2022


  • गायक नंदेश उमप

    लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्याबरोबर वयाच्या आठव्या वर्षी नंदेश रंगमंचावर गायला उभा राहिला. परिणामी ‘ये दादा आवार ये…’ म्हणणाऱ्या कोळणीपासून ते ‘नाय बा किस्ना असून उपकाल, संगत तुजी नाई बली ले’ म्हणणाऱ्या पेंद्याच्या बोबड्या गवळणीपर्यंत लोकशाहिरांची गायकी नंदेशने सहीसही उचलली.

      December 20, 2021


  • माई मंगेशकर

    माई मंगेशकर या मूळच्या धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावच्या होत. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची अपत्ये होय.

      June 16, 2022


  • प्रसिद्ध तबलावादक अहमदजान तिरखवाँ खान

    १९२८ च्या सुमारास भास्करबुवा बखले यांनी त्यांना महाराष्ट्रात आणले. त्यानंतरची दहा वर्षे ते गंधर्व नाटक मंडळीत होते. बालगंधर्वाचा सुरेल आवाज आणि तिरखवाँची भावनाकूल अशी सुसंवादी साथ यांमुळे नाटकातील पदे रंगून जात.

      January 13, 2022