अगदी पुराणात सुद्धा ज्याचा उल्लेख आहे आणि नेहमी जोडीने (जोडप्याने )जो फिरतो . जो आपल्या जोडीदाराला मरे पर्यंत सोडत नाही.दोघांपैकी एकच मृत्यू झालातर दुसरा अन्नपाणी वर्ज्य करून प्राणत्याग करतो.पायाची नखे ते चोच अशी किमान साडेपाच ते सहा फूट उंचीचा हा अत्यंत देखणा पक्षी. विस्तीर्ण पंख विखुरले तर तब्बल चौदा ते सोळा फुटांपर्यंत रुंद..! भातशेतातच स्वत:चं घर करणारा अन् त्यामध्ये किमान तीन ते चार किलो वजनाचं अंड घालून प्रजातींची संख्या वाढवणाऱ्या आणि गम्मत म्हणजे अंडी उबवण्याचा अधिकार फक्त मादीचाच या निसर्ग नियमालाही छेद देत अंडे उबणारा नर पक्षी, या पक्षाचे नाव आहे सारसपक्षी. या सारस पक्ष्यांवर शेतकऱ्यांची कुऱ्हाड कोसळत होती. २००० पर्यंत नामशेष होण्याच्या मार्गावर सारस होता. केवळ चार जोड्याच शिल्लक होत्या.
असे म्हणतात कि ज्यांचे पटत नाही अशा भांडणा-या पतीपत्नीला या सारस पक्षाच्या सान्निध्यात ठेवण्याची प्रथा भारतात एकेकाळी होती.करड्या रंगाचा ,लालभडक मान असलेला पक्षी याला एका शिका-यांनी मारताना वाल्मिकी ऋषींनी पहिला .वाल्मिकी ऋषींना खूप वेदना झाल्या . त्यांनी त्या शिका-यास शाप दिला आणि त्या तडफडून मरणा-या पक्षाला पाहून त्यांना 'रामायण' हे महाकाव्य सुचले अशी कथा आहे. असे म्हणतात एकमेकांसाठी जीवनभर जगणा-या सारस पक्षाच्या जोडीला पाहून त्यांना प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांच्या एकनिष्ठ प्रेमाची कथा लोकांना सांगावीशी वाटली . हि सारस पक्षाची जोडी अशी रामायण काळा पासून प्रसिद्ध आहे.रामायण हे महाकाव्य म्हणजे एक शोकांतिकाच आहे. विवाह झाल्यापासून त्रास ,वनवास, वियोग या वेदना रामायणात आहेत.प्रभू रामचंद्र आणि सीतेचा विवाह हा पुष्य नक्षत्रावर झाला होता.विवाह झाल्यानंतर त्यांना आजन्म वेदना आणि विरहच सोसावा लागला म्हणून कितीही शुभ असले तरी पुष्य नक्षत्र विवाह साठी वर्ज्य समजले जाते. .पतीपत्नी मध्ये सारस पक्षा सारखी निष्ठा असावी म्हणून भारतात न पटणा-या जोडप्याला या पक्षाच्या सान्निध्यात ठेवतात.
असे म्हणतात कि जहांगीर बादशहा यांनी हे पक्षी पाळले होते. दुधात पाव भिजवून जर या पक्षांना दिले तर हे पक्षी पावाचा तुकडा पाण्यात बुडवून धुतात आणि दुध वेगळे झाल्यावर पाव खातात.एकाद्या इमानी कुत्र्या सारखे माणसांच्या मागे हे पक्षी चालतात. उभ्या पिकातलं भात दाणे हे पक्षी खातात म्हणून शेतकरी या पक्षांना शेतात येऊ देत नाहीत. परंतु काहीही असले तरी अत्यंत आश्चर्य कारक या पक्षांचे जीवन असते.
संपूर्ण जगात हे पक्षी नामशेष होत आहेत. भारतात तर फक्त ४ जोड्या शिल्लक राहिल्या होत्या. गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी त्यांच्या नेहमीच्या रुक्ष कामातून वेळ काढला आणि हे पक्षी वाचवण्यासाठी पक्षी प्रेमी संघटनांच्या मदतीने या पक्षांचे संगोपन करून त्यांची संख्या वाढवली .
एक जिल्हाधिकारी काय करू शकतो याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे . आपल्या देशात असे अनेक अधिकारी आहेत कि ज्यांच्या कार्याला जनतेच्या शाब्बासकीची फक्त गरज असते. त्यांच्या कामाला आपण उत्तेजन दिले पाहिजे.अतिशय दुर्मिळ आणि वाल्मिकी मुनींना प्रिय असलेल्या सारस पक्षांना वाचवणा-या जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांना सलाम !!!!
-- चिंतामणी कारखानीस
प्रभाकर पेंढारकर हे चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचे सुपुत्र असलेल्या पेंढारकर यांनी अनेक दर्जदार चित्रपटांची निर्मिती केली.
वर्गीज कुरियन यांनी गावोगावच्या लोकांना गोळा करत अमूलचे काम उभे केले. देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. तसेच आपणही कोणापेक्षा कमी नाही असा आत्मविश्वास लोकांमध्ये वाढू लागला.
१९९० साली सचिन खेडेकर यांनी जीवा सखा या मराठी चित्रपटा द्वारे पदार्पण केले. या चित्रपटानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपट केले आहे. त्यांचा जन्म १४ मे १९६५ रोजी झाला.
मराठी चित्रपटांप्रमाणेच त्यांनी बॉलिवुडमध्येदेखील आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांनी आतापर्यत अनेक बॉलिवुड चित्रपट केले आहे. त्यांचा पहिला बॉलिवुड चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झाला आहे. जिद्दी असे या बॉलिवुड चित्रपटाचे नाव आहे.
आपली माणसे, चिमणी पाखरे, विधिलिखित, लालबाग परळ, शिक्षणाच्या आईचा घो, काकस्पर्श, फक्त लढ म्हणा असे अनेक मराठी चित्रपट त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय त्यांचा हा चित्रपट फारच गाजला होता.
रूस्तम, क्रिश ३, मुंबई कटींग, आजान, जंग, बादशाह, रॉक, अनुराधा, बबल गम, तीस मार खॉं असे अनेक तगडे बॉलिवुड चित्रपटदेखील त्यांनी केले आहेत.
त्यांची सिंघम या सुपरहीट बॉलिवुड चित्रपटातील गोठया नावाची भूमिका विशेष गाजली होती.कौन होईल मराठी करोडपती हा छोटया पडदयावरील त्यांचा कार्यक्रमाचे अॅकंरींग त्यांनी केले होते.सचिन खेडेकर यांना बॉलिवुड ,मराठी चित्रपट आणि छोटया पडदयावर देखील त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्यांच्या अभिनयाचे कौतुक नेहमीच ऐकण्यास मिळाले आहे. सैलाब या टीव्ही शोसाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कारदेखील मिळाला आहे. तसेच ऐतिहासिक भूमिकेसाठीदेखील त्यांना उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
त्यांचे खरे नाव इक्बाल हुसेन होते. हसरत जयपुरी यांनी सगळ्यात जास्त गाणी संगीतकार शंकर जयकिशन यांच्या साठी केली. त्यांचा जन्म १५ एप्रिल १९१८ रोजी झाला. बहारों फूल बरसाओ मेरा महबूब आया है' व में 'जिंदगी एक सफर है सुहाना' या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला हसरत जयपुरी यांनी आपल्या कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटात २००० पेक्षा जास्त गीते लिहिली.
जयकिशन आणि गीतकार हसरत जयपुरी यांची अभेद्य जोडी होती. हसरतसाहेबांच्या लेखणीतून प्रणयी गीतांचा जणू ओघच चालू असायचा आणि जयकिशन त्या गीतांना अशा काही आकर्षक चाली लावीत, की ऐकणारा बाकीचे सगळे विसरून गीत ऐकत बसयाचा.
जयकिशन यांच्या कन्या आणि मुंबईच्या अग्रगण्य फॅशन डिझायनर भैरवी जयकिशन यांनी आपल्या वडिलांचे वर्णन करताना म्हटले आहे की, माझे वडील ज्या पद्धतीने जीवन जगले त्याच्याच आधारे हसरत जयपुरींनी ‘अंदाज’मधील (१९७१) ‘जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना’ हे शीर्षकगीत लिहिले. हसरत जयपुरी यांचे १७ सप्टेंबर १९९९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
गोविंदा यांचे खरे नाव गोविंदा अरुण आहूजा आहे. बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये त्यांना गोविंदा या नावाने लोकप्रियता मिळाली. त्यांचा जन्म २१ डिसेंबर १९६३ रोजी झाला. गोविंदाने अनेक चित्रपटांमध्ये विविध पात्रे केली असून त्यापैकी त्यांचे विनोदी भूमिका असलेले चित्रपट विशेष गाजले. नव्वद च्या दशकात गोविंदा जितका त्याच्या चित्रपटांसाठी ओळखला जात होता तितकाच तो त्याच्या डान्ससाठी प्रसिद्ध होता. गोविंदाच्या डान्सचे आजही अनेक चाहते आहेत.
गोविंदाने जवळजवळ सर्वच अभिनेत्रींसोबत काम केले. मात्र गोविंदाला नीलमसोबत काम करायला अधिक आवडायचे. गोविंदाला तिच्याशी लग्नही करायचे होते. मात्र त्यांची ही जोडी केवळ रील लाईफपुरतीच मर्यादित राहिली. गोविंदाने १९८६मध्ये आपल्या करियरची सुरुवात केली. इल्जाम हा त्याने केलेला पहिला चित्रपट. हा चित्रपट त्या वर्षातील पाचवा सुपरहिट सिनेमा होता. या चित्रपटाच गोविंदाची हिरोईन म्हणून नीलमने काम केले होते. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आणि पाहता पाहता ही जोडी हिट झाली. लोकांनी या जोडीला डोक्यावर घेतल्यानंतर अनेक चित्रपटाच्या ऑफर्स यांना आल्या.
विनोदी संवाद फेकीच्या उत्कृष्ट शैलीमुळे त्यांचे विनोदी चित्रपट हिट ठरले. गोविंदा यांचा देशात खूप मोठा चाहता वर्ग आहे. गोविंदाचा अभिनय, विनोदाचे टायमिंग, संवादफेक एवढेच नाही तर खास गोविंदा स्टाईल नृत्य आजही अफलातून आहे. मा.गोविंदा हे माजी खासदार आहेत. ते उत्तर मुंबई मतदार संघामधून लोकसभा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविली होती. अभिनेता गोविंदा यांना दोन मुले आहेत. मोठ्या मुलीचे नाव नर्मदा आहे. तिने किशोर नमित कपूर इन्स्टिट्यूटमधून अभिनय क्षेत्राचा कोर्स केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक धडे पं. गोविंदराव अग्नी व पं. गोविंदप्रसाद जयपूरवाला यांच्याकडे घेतले. नंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे त्यांनी दहा वर्षे संगीताची तालीम घेतली.
अजित कडकडे यांनी सुरुवातीच्या काळात 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र' या संगीत नाटकांतून गाणाऱ्या पात्रांच्या भूमिका केल्या होत्या. एका मुलाखतीत त्यांनी सांगीतले होते की ‘संगीताचा कोणताही वारसा आमच्या घरात नव्हता. माझ्या मनात गाण्याचा कसलाही विचार नव्हता. मला डॉक्टहर व्हायचे होते. परंतु पं. अभिषेकीबुवांमुळे मी या क्षेत्रात आहे. मा.आर.एन.पराडकर यांची परंपरा अजित कडकडे चालवताना दिसतात. मा.अजित कडकडे यांनी गेल्या तीस वर्षांत दत्तगुरूंवर सुमारे चाळीस-पन्नास अल्बम केले आहेत, यातल्या बहुतांश रचना कवी प्रवीण दवणे यांच्या आहेत तर संगीत नंदू होनप यांचे आहे. ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी, अलौकिक दत्तात्रेय अवतार’ आदी त्यांची गाणी भक्तप्रिय ठरली आहेत. दत्तगुरूंवरील अन्य रचनांपैकी ‘त्रिगुणात्मक त्रमूर्ती दत्त हा जाणा’ ही पारंपरिक आरती तर घरोघरी म्हटली जाते. ‘मला हे दत्तगुरू दिसले’ हे आशा भोसले यांचं गीतही (आम्ही जातो आमच्या गावा) अजरामर आहे आणि रघुनाथ साळोखे यांनी गायलेलं ‘दत्त दर्शनाला जायाचं, जायाचं, आनंद पोटात माझ्या माईना’ हे गीतही आगळंवेगळं आहे. मा.अजित कडकडे आणि संगीतकार मा.नंदू होनप यांच्या भक्तिसंगीताने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. तब्बल ३५ वर्षे या जोडीने एकत्र काम केले. मा.अजित कडकडे यांना "संगीतकार प्रभाकर पंडित स्मृती पुरस्कार‘ मिळाला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विकिपीडिया
हे लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायक, अभिनेता व संगीतकार होते. सुधीर फडके यांचा पहिला चित्रपट हा हिंदीच होता आणि त्याचे नाव होते गोकुल. ज्याची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली होती. या चित्रपटातील जी. एम. दुराणी यांनी गायलेले ‘कहां हमारे श्याम चले’ हे अतिशय सुंदर गीत होते.
मोहम्मद रफी, यांनी आपली गायन शैली जी.एम.दुराणी यांच्या कडून प्रेरणा घेऊन केली असे बोलले जाते. जी.एम. दुराणी यांचे ९ सप्टेबर १९८८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
कळीदार कपूरी पान’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’ अशा दर्जेदार काव्य रचना करणारे कवि राजा बढे यांचा जन्म १ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला. राजा बढे हे नावाप्रमाणंच राजा-माणूस होते. राजा बढे हे नामवंत गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे कवी... रुबाबदार,प्रसन्न व्यक्तिमत्त्व, राजस छबी, कुसुमकोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमलवृत्तीचा हा प्रतिभासंपन्न कवी, पण मनात देशभक्तीचा स्फुलिग सांभाळणारा राष्ट्रप्रेमी म्हणजे राजा बढे. आजच्या पिढीला कदाचित राजा बढे हे नावसुद्धा माहीत नसेल. परंतु ज्यांच्या गीतांची सुदैवाने चिरफाड न होता त्यावर रिमिक्सचा मुलामा चढलेला नाही, अशी गीते राजा बढे यांच्या नावावर आहेत. राजा बढे यांचे जन्म नागपूरचा. प्राथमिक शिक्षण छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात झाले.
१९३५ मध्ये त्यांनी पंजाब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. पुण्याच्या दैनिक ‘सकाळ’ मध्ये संपादकीय विभागात त्यांनी नोकरी केली. नागपूरच्या दैनिक ‘महाराष्ट्र' मध्ये एक वर्ष ते सहसंपादक होते. त्याचवेळी ‘वागीश्वरी'च्या संपादक मंडळात ते कार्यरत होते. पुढे साप्ताहिक ‘सावधान' मध्ये मावकर-भावे यांच्यासोबत त्यांनी कार्य केले. दरम्यान कॉलेज करून पदवी प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न अपुरा राहिला. त्यांनी बरचसं स्फुटलेखन "कोंडिबा' या टोपणनावानं केलं. वयाच्या सतरा-अठरा वर्षांपासूनच कविता लिहू लागले. नवकवींच्या काव्यसंग्रहात राजा बढे यांच्या कवितांना विशेष स्थान असे. 'ओहोळ' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. कवितांची आवड जोपासणाऱ्या बढे आई-वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ म्हणून लहान भावंडांची जबाबदारी, पालनपोषण यातच सर्वस्व मानून स्वत: अविवाहित राहिले.
१९४० च्या आसपास चित्रपट व्यवसायात त्यांनी प्रवेश केला. ‘सिरको फिल्म्स' मध्ये दोन वर्ष त्यांनी कामे केली. १९४२ मध्ये ते "प्रकाश स्टुडिओ'त रुजू झाले आणि त्यांनी "रामराज्य' चित्रपटाची गाणी लिहिली. महेश कौल सोबत ‘अंगुरी' चित्रपटात काम केले. पुढं १९४४ मध्ये ते मराठी रंगभूमीकडं वळले. आळतेकर यांच्या "लिट्ल थिएटर्स'च्या "कलेसाठी सारस्वत' नाट्यप्रयोगात त्यांची भूमिका होती. ‘संत बहिणाबाई,' ‘गळ्याची शपथ' या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. १९५६ ते १९६२ या कालखंडात ते आकाशवाणीवर ‘निर्माता' म्हणून कार्यरत होते. आपल्या वाङ्मयीन अभिरुचीला पोषक ठरतील, अशा व्यवसायांसी धरसोड ते आयुष्यभर करीत राहिले, तरी आपले कवित्व ते सतत सांभाळून होते. "चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले', "दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी', "प्रेम केले काय हा झाला गुन्हा?' इत्यादी सुरेल भावगीतं त्यांनी लिहिली. स्त्रियांचे मनोभाव आकर्षकरीत्या शब्दबद्ध करण्यात बढे सिद्धहस्त होते. "वाट कशी चुकले रे', "कधी न पाहिले तुला', "होशी तू नामानिराळा', "काय कोणी पाहिले,' "मला मोहू नका' इत्यादी गीतांमधून व्याकुळता, विरहार्तता, मीलनातुरता असे मनोभाव त्यांनी नाट्यपूर्ण रीतीनं चितारले आहेत. संस्कृत काव्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. आपली भाषा अलंकृत करण्याची क्षमता त्यांच्यात असली तरी संस्कृत शब्दांच्या भाराखाली ती दडपली जाणार नाही, याचं भान बढे यांच्या गीतांमध्ये दिसतं.
बढे यांचा उर्दू शायरीचाही अभ्यास होता. त्या पद्धतीच्या भावाविष्काराचा ढंग आणि कल्पनाविलासाची पद्धत बढे यांनी त्यांच्या काही गझलसदृश भावगीतांमध्ये अंगीकारली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे बढे यांचं परमदैवत होतं. दिग्दर्शक विजय भट यांच्या 'रामायण' चित्रपटाकरिता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गीतकार म्हणून राजा बढे यांचे नाव सुचविले. या चित्रपटातील 'सृजनहो परिसा रामकथा, जानकी जीवन विरह व्यथा' हे बढे यांनी लिहिलेले गीत काळजाचा ठाव घेणारे ठरले. त्यानंतर महात्मा विदूर, गळ्याची शपथ अशी काही चित्रपटांसाठी गीतलेखन त्यांनी केले. हे करीत असताना व्यावसायिक हेतू त्यांनी कधीच ठेवला नाही. धोतर, कुडता असा वेष आणि वरण-भात प्रिय असणाऱ्या बढेंच्या लेखी पैशाला फारसे महत्त्व नव्हते. कामाला महत्त्व देणाऱ्या बढेंच्या अनेक भावगीतांमधून कवीच्या भावना हळुवार प्रकट होतात आणि मनाला विलक्षण आनंद देऊन जातात. म्हणूनच लता मंगेशकर, आशा भोसले बढे यांच्या गीतांवर प्रेम करीत. ‘हसताच नार ती अनार मनी फुले' ही बढे यांची गजानन वाटवे यांनी गायिलेली, ‘हसतेस अशी का मनी' लता मंगशकरांनी गायलेली, तर ‘चांदणे शिपीत जा' ही आशा भोसले यांनी गायिलेली गीतरचना , कुमार गंभर्वांनी ‘प्रेम केले काय हा झाला गुन्हा' ही बढे यांची गायिलेली रचना लोकप्रिय झाली. राजा बढे हे कट्टर हिदुत्ववादी होते. स्वा. सावरकर हे त्यांचे दैवत होते. त्यांचे राष्ट्रप्रेम त्यांच्या ‘क्रांतिमाला' या संग्रहातून वेळोवेळी दिसून येते. त्यात २१ कविता आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील देशभक्तिपर गीते आहेत.
प्रत्यक्ष सावरकरांनी ‘प्रस्तावनेत' ‘‘आपण स्वत:च नामवंत, सुप्रतिष्ठित प्रतिभासंपन्न साहित्यिक असल्याने, माझ्या प्रस्तावनेची गरज नाही'' असे गौरवोद्गार काढले आहेत. १९३५ ते १९५९ दरम्यानच्या सामाजिक-राजकीय घडामोडींचे पडसाद यात आहेत. ‘विस्मृतीत गुंफलेली क्रांतिमाला', ‘गगनात आज जो चंद्र सुखे मिरवावा । ते तेज घेऊनी करिती काजवे कावा । तो बाबू गेनू, कोतवाल उरलेले । विसरलो अनामिक किती बळी गेलेले', ‘सुजला सुफला देश आमचा', ‘हिमालय थिजला । थिजला धीरचा । गंगा सिधुतुनी वाहतो प्रवाह रुधिराचा' अशा सर्वच कवितांमध्ये मंगल पांडे, हुतात्मा फडके, चाफेकर, सेनापती बापट अशा क्रांतिवीरांची नावे गुंफून त्यांना विस्मृतीत टाकल्याचे दु:ख व्यक्त केले आहे. ‘घडू दे पुन्हा एकदा भारत' मधून सावरकरांच्या दिव्य देशभक्तीचा गौरव केलेला असून, ‘नवोन्मेषशाली कवींच्या कवे' असे सावरकरांना संबोधले आहे. राजा बढे यांनीच. १९६४ साली मुंबईत बढे यांच्या पुढाकाराने प्रथमच कथाकथनचा कार्यक्रम झाला, या कार्यक्रमात पु. ल. देशपांडे, गदिमा यांनी प्रथमच कथा कथन केल्या होत्या.
मुंबई आकाशवाणीवरच्या नोकरीनंतर बढे यांनी छोटे छोटे माहितीपट करून दिले. नंतर बंधू बबनराव यांच्या मदतीनं त्यांनी "स्वानंद चित्र' ही संस्था उभी केली आणि "रायगडचा राजबंदी' हा संभाजीमहाराजांच्या जीवनावरील चित्रपट काढला. गीत, गझल याप्रमाणेच ‘चारोळी' हा रचनाप्रकार बढे यांनी हाताळला. ‘कोंडिबा' हे टोपण नाव वापरून काही राजकीय वात्रटिका त्यांनी लिहिल्या... त्या मुंबईच्या ‘विविधवृत्त' साप्ताहिकातून प्रकाशित झाल्या होत्या. राजा बढे हे केवळ कवी नव्हते. काव्याखेरीज ‘किती रे दिन झाले,' ही पत्रमय कादंबरी; ‘स्वप्नगंधा',‘चतुर किती बायका,' ‘ही रात सवत बाई,' ‘पेचप्रसंग,' ‘अशी गंमत आहे' अशी पाच नाटके त्यांनी लिहिलीत... तरी बढेंची ओळख कवी म्हणूनच कायम राहिली. "गर्जा महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्रगीत म्हणजे कविवर्य राजा बढे यांच्या काव्यप्रतिभेचा परमोच्च बिंदू होय. १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली. या विजयानिमित्त बढे यांच्या या रचनेची ध्वनिमुद्रिका "एचएमव्ही'नं तयार केली.
शाहीर साबळे यांच्या खड्या आवाजातील आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांचा स्वरसाज असलेल्या या गीताने महाराष्ट्राची थोरवी सातासमुदापार पोहोचवली.. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ठिकठिकाणी कार्यक्रमांत ऐकवलं जाणारं हे गीत आजही तितकंच ताजं, टवटवीत आहे. राजा बढे यांना पान खायची भारी हौस होती. याच पानावर त्यांनी 'कळीदार कस्तुरी पान' लावणी लिहिली. ती सुलोचना चव्हाण यांनी अशा ठसक्यात गायिली की, भल्याभल्यांना पानाचा मोह आवरायचा नाही. पण अनेकांना ती राजा बढे यांनी लिहिली आहे, हे माहित पण नसेल.
त्यांनी एक कविता स्वतःविषयीच लिहिली... ते दोन "राजां'चं वर्णन होतं.
तेव्हा आणि आता...
एक राजा -
टोपी किंचित उंच, नीट कलती बाजूस डोकावित
खासे धोतर, पायघोळ अगदी, टाचेवरी लोळत..
ओठांनी रसरंग फेकित सदा या मंगलाचे धडे
आहे काय म्हणुन काय पुसतां? तो हाच राजा बढे..
दुसरा राजा -
टोपी सोडून, मुंबईस फिरतो, आता सदा बोडखा
बंगाली डगला, न पालट दुजा, खाक्या जुना सारखा..
आहे तोच विडा, अजूनही तसे, ते मंगलाचे सडे
जैसा नागपुरात, आजही तसा, तो हाच राजा बढे..
ज्येष्ठ दिवंगत कविवर्य वा. रा. कांत यांनी बढे यांच्याविषयी म्हटलं आहे:-
"आपल्या कवितेचा धर्म ओळखून शेवटपर्यंत मनाला आल्हाद देणाऱ्या कविता लिहिण्याचं ‘चांद्रव्रत' त्यांनी निष्ठेनं पार पाडलं, यातच त्यांची थोरवी आहे....हा कवी जन्मभर चांदणं शिंपीत जगला आणि चांदणं शिंपीत शिंपीत अचानक निघून गेला. ह्या "चांद्रव्रती'ची आठवण विझणं अशक्य!!'' राजा बढे यांचे ७ एप्रिल १९७७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
विश्राम बेडेकरांच्या ‘ वाजे पाऊल आपले ‘ मध्ये त्यात त्यांनी डॉक्टर ऐनापुरे यांची भूमिका त्यांनी केली . ते त्यांचे पहिले व्यावसायीक नाटक. त्या वेळी त्यांना ४० रुपये नाईट मिळाली.
Copyright © 2025 | Marathisrushti