ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या दहा वर्षांच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व काही केले.
December 28, 2021
मराठी व इंग्रजी भाषेतून कलासमीक्षेच्या क्षेत्रात त्यांनी पन्नासहून अधिक वर्षे कामगिरी केली. त्यांचा जन्म २१ मे १९२८ रोजी झाला. कला व नाटय़ क्षेत्रातील आस्वादपर समीक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. इंग्रजीमध्ये एमए पूर्ण केल्यानंतर सन १९५१ मध्ये ज्ञानेश्वर नाडकर्णी लंडनच्या भारतीय दूतावासात रुजू झाले. दोन वर्षांतच ते भारतात परतले आणि मुंबईतील महाविद्यालयांमध्ये १९५६ पर्यंत त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले. त्यानंतरची चार वर्षे त्यांनी जाहिरातींचे कॉपीरायटिंग केले. प्रामुख्याने त्यांनी शिल्पी अॅयडव्हर्टायझिंगसाठी कॉपीरायटर काम पाहिले. याच काळात त्यांनी फ्री प्रेस जर्नल साठी सहसंपादक म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. १९५९ ते १९६१ त्यांनी फ्री प्रेससाठी काम पाहिले तर १९६१ ते ६८ या काळात त्यांनी फिनान्शिअल एक्स्प्रेससाठी काम पाहिले. कलासमीक्षक या नात्याने त्यांनी इंग्रजी व मराठीत भरपूर लिखाण केले. साहित्य, चित्रकला, नाटक, चित्रपट आदी विविध कलाप्रकारांचा मागोवा घेताना याच काळात येऊ पाहणाऱ्या नवनव्या बदलांचा ते मनपूर्वक पाठपुरावा करीत असत. या विषयीचे लेखन त्यांनी भारतातील बहुतेक अग्रगण्य दैनिक व नियतकालिकांत सातत्याने केले. १९९६ साली त्यांच्या कलासमीक्षणाचा गौरव करणारे एक जंगी प्रदर्शन जहांगीर कलादालनात पार पडले. त्यावेळेस अनेक ज्येष्ठ- श्रेष्ठ कलावंतांनी त्यांच्या कलाकृती या प्रदर्शनासाठी त्यांच्या गौरवार्थ देऊ केल्या होत्या. त्यात एम. एफ. हुसेन, अकबर पदमसी यांचाही समावेश होता. याच प्रदर्शनप्रसंगी नाडकर्णीनी युवा कलाकांरांसाठी ज्येष्ठ कलावंतांच्या नावाने सुमारे १३ पारितोषिके जाहीर केली होती.
त्यांच्या कलासमीक्षण लेखांना जगभर चांगला प्रतिसाद मिळाला. फ्रान्स सरकारने कलाक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार देऊन १९८६ साली तर ब्रिटिश सरकारने १९९४ साली त्यांना गौरवचिन्ह बहाल केले. महत्त्वाचे म्हणजे शिल्पकलेच्या प्रांतात नवकलेचे वारे आणण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जगप्रसिद्ध शिल्पकार हेन्री मूर याच्या जन्मशताब्दी निमित्ताने ब्रिटिश सरकारने संपूर्ण वर्षभरासाठी एका महत्त्वपूर्ण प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्या प्रदर्शनाच्या पूर्वतयारीमध्ये नाडकर्णी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांना त्यासाठी सरकारने खास ब्रिटनमध्ये पाचारण केले होते. आर्टिस्ट्स सेंटर व बॉम्बे आर्ट सोसायटी या कलाक्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्थांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. त्यांना फ्रेंच सरकारतर्फे ‘अक्षरांचे शिलेदार’ हा किताब बहाल करण्यात आला होता.
ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी समीक्षक या नात्याने नियतकालिकांत जसे विपुल लिखाण केले; तसेच साहित्याच्या विविध प्रकारांतही त्यांच्या पुस्तकांनी आगळे स्थान मिळवले. पाऊस, भरती, चिद्घोष, प्रस्थान हे कथासंग्रह, दोन बहिणी, कोंडी, नजरबंदी, वलयांकित या कादंबऱ्या आदींबरोबरच विख्यात चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्यावरील ‘अनवाणी’ तसेच पिकासो, गायतोंडे, डी. डी. दलाल व हिचकॉक यांच्यावरील चरित्रग्रंथांचे लेखनही त्यांनी केले. अश्वत्थाची सळसळ, अभिनय, प्रतिभेच्या पाऊलवाटा, प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप आदी समीक्षा ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. ‘विलायती वारी’ हे प्रवासवर्णनात्मक पुस्तक त्यांनी लिहिले. बालगंधर्वावरील इंग्रजी चरित्राचे लेखन करून त्यांनी मराठीतील या बुजुर्ग कलावंताची जागतिक पटावर ओळख करून दिली.
ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचे २३ डिसेंबर २०१० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 23, 2018
जगातील इतर लोकांवर निस्सीम प्रेम करणारा, अमृता प्रीतम यांच्या बरोबरील प्रेमप्रकरण गाजवणारा, गुरुदत्तच्या प्यासामधील गीते रचणारा, मद्यपान आणि धूम्रपान यात आयुष्य फेकून देणारा.... आणि... यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचल्यानंतर 'लता मंगेशकरांनी' घेतलेल्या मानधनापेक्षा एक रुपया कायम जास्त मानधन'च' घेणारा...साहिर लुधियानवी हे आपल्या सर्वांनाच चित्रपट गीतकार म्हणून अधिक परिचित आहे.
साहिर लुधियानवी यांचे अब्दुल हयी हे मूळ नांव. ‘लुधियाना येथील एका मुस्लिम गुज्जर जमीनदार घराण्यात त्यांचा ८ मार्च १९२१ रोजी जन्म झाला. त्यांची मातृभाषा पंजाबी; त्यांनी ' साहिर लुधियानवी/ या टोपणनावाने उर्दू व हिंदी भाषांत गीतलेखन केले. त्यांचे वडील फाझल मुहम्मद हे इंग्रज राज्यकर्त्यांशी पूर्ण निष्ठा बाळगून होते; त्यांचा स्वभाव विलासी व स्वछंदी होता. साहिरांची आई सरदार बेगम ही त्यांची अकरावी पत्नी. ती अत्यंत स्वाभिमानी होती. आपल्या पतीची जीवनशैली तिला मान्य नव्हती.
पतिपत्नीमधील ताणतणाव अखेर विकोपाला जाऊन त्यांनी परस्परांपासून फारकत घेतली. त्या वेळी बाल्यावस्थेत असलेल्या साहिरांचा ताबा न्यायालयाने त्यांच्या आईकडे दिला. ह्या घटनांचा व तणावपूर्ण कौटुंबिक वातावरणाचा साहिरांच्या मनावर खोल विपरीत परिणाम झाला आणि तो आयुष्याच्या अखेरपर्यंत टिकून राहिला. आर्थिक विवंचना, सततचे भय व दु:ख अशा वातावरणात साहिरांची जडणघडण झाली. खरे तर अत्यंत चांगल्या परिस्थितीत जन्माला आलेल्या साहिरच्या नशीबात ही गरीबी वडिलांमुळे आली. आणि याची आठवण ठेवून साहिर यांनी स्वतःच्या आईला कधीही अंतर दिले नाही.
साहिर यांनी शिक्षण घेऊन काही काळ दिल्लीत राहून मग साहिर मुंबईला आले आणि हिंदी चित्रपटांसाठी गीते लिहू लागले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. शेकडो गीते त्यांनी लिहिली. त्यांपैकी प्यासा (१९५७), नया दौर (१९५७), धूल का फूल (१९५९), बरसात की रात (१९६०), फिर सुबह होगी, वक्त, ताजमहाल, हम दोनो(१९६१), गुमराह (१९६३), चित्रलेखा (१९६४), कभी कभी (१९७६) इ. चित्रपटांतील त्यांची गीते रसिकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली. ताजमहाल चित्रपटातील ‘जो वादा किया’ या गीतासाठी १९६४ मध्ये आणि कभी कभी चित्रपटातील ‘कभी कभी मेरे दिल में’ या गीतासाठी १९७७ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून दोन वेळा ‘फिल्मफेअर’चे पुरस्कार मिळाले.
गायक व संगीतकार यांच्या बरोबरीनेच चित्रपटगीतकारांनाही सन्मान, प्रतिष्ठा व स्वामित्वशुल्क मिळावे, यासाठी साहिर यांनी अविरत लढा दिला व गीतकारांना चित्रपटव्यवसायात प्रतिष्ठा मिळवून दिली. प्राचार्यांच्या हिरवळीवर एका मुलीसोबत बसल्यामुळे त्यांना कॉलेजमधून काढूनही टाकलेले होते. साहिर यांच्या आयुष्यात अनेक प्रेमिका आल्या. मात्र त्या सर्वांमध्ये 'अमृता प्रीतम' हे नांव सर्वात वर! अमृता प्रीतम 'साहिरने ओढलेल्या' सिगारेट्सची थोटके पेटवून स्वतः ओढायची. साहिरच्या मृत्यूनंतर तिचे असे म्हणणे होते की 'आता ती ओढत असलेल्या सिगारेटचा धूर ज्या जगात साहिर पोचला आहे तिथे पोचत असणार'!
गुलजार हे साहिल यांचे काही काळ रूममेट होते असे म्हणतात. भारत सरकारने साहिर यांना पद्मश्री देऊन सन्मान केला. याशिवाय ‘सोव्हिएट लँड-नेहरु पुरस्कार’ व ‘महाराष्ट्र उर्दू अकादेमी पुरस्कार’ देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. मा.साहिर यांचे निधन २५ ऑक्टोबर १९८० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 15, 2017
घाटे यांच्या साहित्यात कविता , व्यक्तिचित्रे , ललित निबंध , नाट्यप्रवेश , नाटके , क्रमिक पुस्तके, विद्यार्थ्यांसाठी पुस्तके अशा विविध प्रकारच्या साहित्याचा समावेश आहे. त्यांचे पांढरे केस हिरवी मने , काही म्हातारे व एक म्हातारी ह्यातील व्यक्तिचित्रे अप्रतिम आहेत.
August 12, 2021
आचार्य कृपलानी यांनी १९६३ मध्ये पहिल्यांदा जवाहरलाल नेहरु सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील हा पहिला अविश्वास प्रस्ताव ठरला होता. हा प्रस्ताव ३४७ मतांनी फेटाळण्यात आला आणि नेहरु सरकारवर याचे परिणामदेखील झाले नव्हते. मात्र, पहिला प्रस्ताव म्हणून त्याची इतिहासात नोंद झाली.
March 19, 2022
आगरकरांच्या लेखन कौशल्यासंदर्भात टिळक म्हणतात, “देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्त्व आले असले तर ते बऱ्याच अंशी आगरकर यांच्या विद्वत्तेचे व मार्मिकतेचे फल होय यात शंका नाही.“
June 17, 2022
आज ११ नोव्हेंबर.. आज ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा यांचा वाढदिवस
माला सिन्हा यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३६ साली कोलकाता,( बंगाल) येथे झाला.
माला सिन्हा यांचे मूळ नाव एल्डा आहे. रोशनआरा या बंगाली चित्रपटाव्दारे माला सिन्हा यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. गुरुदत्तच्या प्यासा चित्रपटात वहिदा रेहमान असतानाही माला सिन्हा यांनी 'हम आपकी आखोमें' या गाण्यातून आपला वेगळा ठसा उमटविला होता. १९५४ ते १९७४ अशा वीस वर्षांत जवळपास ६५ हिंदी चित्रपटांमध्ये अदाकारी करणारी आणि आपल्या मादक अदांनी लाखो सिने रसिकांना घायाळ करणारी नायिका म्हणजे माला सिन्हा. परवरिश या चित्रपटातील माला सिन्हा यांचे सौंदर्य अनेकांना घायाळ करणारे ठरले होते. दिल्लगी, गहरा दाग, गीत, अनपढ, हिमालय की गोद में, गुमराह, दिल तेरा दिवाना, मेरे हुजूर, होली आई रे, संजोग या चित्रपटांमध्ये माला सिन्हा यांनी प्रभावी अभिनय केला. माला सिन्हा ह्यांनी हिंदी बरोबरच बंगाली आणि नेपाळी चित्रपटांतून काम केले आहे. माला सिन्हा यांच्यावर चित्रित झालेली गाणी रसिकांना प्रचंड भावली. ये हरियाली और रास्ता..., धीरे धीरे चल चाँद गगन में... आपकी नजरोने समझा, प्यार के काबिल मुझे... झुमता मौसम मस्त महिना... यांसारख्या एकाहून एका सरस गाण्यांना अभिनेत्री मा.माला सिन्हा यांनी आपल्या अदाकारीने चार चाँद लावले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 11, 2016
गीता बाली यांचे नाव हरकिर्तन कौर. गीता बाली यांनी वयाच्या १२ व्या वर्षीच फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. १९५० च्या दशकात त्या स्टारसुध्दा झाल्या होत्या. त्यांच्या चाहत्यांच्या यादीत मा. शम्मी कपूर यांचे सुध्दा नाव सामील आहे. १९५५ मध्ये शम्मी कपूर यांनी घरच्यांना न सांगता गीता बाली यांच्याशी लग्न केले होते. कारण आपले घरचे या लग्नाला परवानगी देणार नाही याची शम्मी कपूर यांना भिती होती. शम्मी कपूर गीता बाली यांना एका चाहत्याप्रमाणे पसंत करत होते, असे शम्मी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. ते गीता यांच्यापेक्षा वयाने लहान होते, परंतु चार महिन्यांच्या भेटीने आणि बोलण्याने एकमेकांच्या प्रेमात पडले होते. शम्मीकपूर यांना भेटण्यापूर्वी गीता यांनी पृथ्वीराज कपूर आणि राजकपूर यांच्यासोबत काम केले होते.
राजकपूर यांच्यासोबत त्यांनी 'बांवरे नैन' आणि पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत 'आनंदमठ' सिनेमात दिसल्या होत्या. मुलींनी किंवा सूनांनी सिनेमात काम करू नये असा कपूर कुटुंबातील नियम होता. परंतु गीता बाली यांनी शम्मीकपूर यांच्यासोबत लग्न केल्या नंतर सुध्दा सिनेमांत काम चालू ठेवले. गीता बाली यांचे मा. भगवान यांच्या सोबतचे खूप चित्रपट गाजले. त्यांचा शेवटचा सिनेमा १९६३ मध्ये आलेला 'जब से तुमको देखा है' होता. बोनी कपूर,अनिल कपूर व संजय कपूर यांचे वडील सुरेंद्र कपूर मा.गीता बाली यांचे सेक्रेटरी होते.मा.गीता बाली यांचे २१ जानेवारी १९६५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 24, 2018
साहिर लुधियानवी यांचे खरे नाव अब्दुल हयी.
त्यांचा जन्म ८ मार्च १९२१ रोजी लुधियाना येथे झाला. लुधियानात साहिर यांनी शिक्षण घेऊन काही काळ दिल्लीत राहून मग मुंबईकडे मोर्चा वळवला. प्राचार्यांच्या हिरवळीवर एका मुलीसोबत बसल्यामुळे त्यांना कॉलेजमधून काढूनही टाकलेले होते. साहिर यांच्या आयुष्यात अनेक प्रेमिका आल्या. मात्र त्या सर्वांमध्ये ज्ञान पीठ पुरस्कार विजेत्या 'अमृता प्रीतम' हे नांव सर्वात वर!
नौजवान आणि प्यासा या हिंदी चित्रपटांनंतर साहिर यांनी अख्ख्या भारतालाच वेड लावले. आओ की कोई ख्वाब बुने ही त्यांची कविता अत्यंत सुंदर! तल्खिया, परछाईया व अनेक काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. साहिर यांचे काव्य उच्च दर्जाचे असूनही सुप्रसिद्ध असायचे व आहे. ही दोन टोके जमवणे अनेक कवींना अवघड जाते. मा.गुलजार हे मा.साहिल यांचे काही काळ रूममेट होते असे म्हणतात. सुरुवातीच्या काळात हलाखीची परिस्थिती आणी नंतर पैशाचा नुसता धबधबा यामुळे त्यांचे आयुष्य बरेचसे अनियंत्रीत स्वरुपाचेच होते. त्यांनी आयुष्यात लग्न केले नाही. मात्र या व्यक्तीमत्वावर आणि त्यांच्या काव्यावर अनेक स्त्रियांनी जान कुर्बान करण्यापर्यंत प्रेम केले हे मात्र खरे!
जगातील इतर लोकांवर निस्सीम प्रेम करणारा, अमृता प्रीतम बरोबरील प्रेमप्रकरण गाजवणारा, गुरुदत्तच्या प्यासामधील गीते रचणारा, मद्यपान आणि धूम्रपान यात आयुष्य फेकून देणारा.. .... आणि... यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचल्यानंतर 'लता मंगेशकरांनी' घेतलेल्या मानधनापेक्षा एक रुपया कायम जास्त मानधन'च' घेणारे...मा.साहिर लुधियानवी हे शायर आपल्या सर्वांनाच चित्रपट गीतकार म्हणून अधिक परिचित आहे. जो वादा किया वो निभाना पडेगा, कभी कभी मेरे दिल मे, चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो, तुम न जाने किस जहांमे खो अशी अजरामर गीते साहिर यांनी लिहिलेली आहेत. मा.साहिर लुधियानवी यांचे २५ ऑक्टोबर १९८० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
साहिर लुधियानवी यांची गाणी
https://www.youtube.com/shared?ci=-Le4BMzrr2c
https://www.youtube.com/shared?ci=4Qp_V08TtQI
भारत पाकिस्तानमधील युद्धाबाबत साहिर लुधियानवी यांनी रचलेली कविता
खून अपना हो या पराया हो
नस्ले-आदम का खून है आखिर
जंग मशरिक मे हो कि मगरिब मे (मशरिक = पुर्व, मगरिब = पश्चिम)
अम्ने-आलम का खून है आखिर (अम्ने-आलम = विश्व शान्ती)
बम घरोंपर गिरे के सरहदपर
रूहे-तामीर जख्म खाती है (रूहे-तामीर = निर्मीतीचा आत्मा)
खेत अपने जले कि औरोंके
जस्ति फाकोंसे तिलमिलाती है (जस्ति - जीस्त = जीवन)
इस लिये ए शरीफ इन्सानो
जंग टलती रहे तो बेहतर है
आप और हम सभीके आंगनमे
शम्मअ जलती रहे तो बेहतर है
March 11, 2017
कुंजालाल गांगुली व गौरी देवी हे त्यांचे आई-वडील. जेष्ठ कलाकार अशोक कुमार यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला. १९३६ मध्ये बॉंम्बे टॉकीज प्रॉडक्शनच्या जीवन नैय्या, या चित्रपटात मा.अशोक कुमार यांनी पहिल्यांदा काम केले. बॉलिवूडमधल्या दर्जेदार अभिनेत्यांपैकी ते एक होते. जीवन नैया या पहिल्याच चित्रपटाने नायक म्हणून लोकप्रिय केल्यानंतर त्याने तब्बल अर्धा डझन सिनेमात देविका राणीचा नायक म्हणून काम केलं. या व्यतिरिक्त ते इतर अभिनेत्रींसमोरही अनेक सिनेमांत हीरो म्हणून चमकले.
वय झाल्यावर मोठमोठ्या हीरोंना निष्टूरपणे बाजूला सारणार्यान या चित्रपटसृष्टीत आपल्याला अभिनेता म्हणून टिकून रहायचं आहे, हीरोगिरी नाही करता आली तरी चालेल हे अशोक कुमार यांनी वेळीच ठरवलं होतं. त्यामुळे राज कपूर - देव आनंद - दिलीप कुमार या तीन दिग्गजांसमोर पन्नासच्या दशकात टिच्चून उभं राहिल्यानंतर नायक म्हणून असलेल्या आपल्या मर्यादांची संपूर्णपणे जाणीव असलेल्या अशोक कुमार यांनी अगदी सहज हातातले पिस्तुल आणि सिगारेट टाकून काठी आणि पाईप कधी घेतले ते समजलंच नाही.
दादामुनींच्या बाबतीत दूरदर्शनवर केलेल्या कामगिरीचा उल्लेख केलाच पाहिजे. 'हम लोग' मालिकेच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक जितक्या उत्कंठेने वाट बघत असत, तेवढीच उत्सुकता त्या भागाच्या शेवटी दादामुनींच्या त्या भागावर केलेल्या छोट्याशा भाष्याची आणि त्यांच्या त्या विशिष्ट प्रकारच्या हातवारे करत वेगवेगळ्या भाषेत 'हम लोग' म्हणण्याचीही असे.
शम्मी कपूरबरोबर लग्नाच्या वरातीच्या पार्श्वभूमीवर केलेली पान परागची जाहिरातही प्रचंड लोकप्रिय झाली होती. सुमारे सहा दशकं त्यांनी बॉलिवूडवर आपल्या अभिनयाने भुरळ पाडली. या काळात त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले. भारतीय चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी भारत सरकारने १९८८ मध्ये अशोक कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने व १९९८ मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले.
अछुत कन्या, किस्मत, परिणीता, चलती का नाम गाडी, आशीर्वाद, छोटी सी बात, मिली, खुबसुरत, खट्टा मीठा, मि. इंडिया हे अशोक कुमार यांचे गाजलेले चित्रपट. रेल गाडी रेल गाडी हे बॉलिवूडमधील पहिले रॅप गाणे त्यांनीच गायले आहे. अशोक कुमार यांचे १० डिसेंबर २००१ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 5, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti