१९६० मध्ये होंडा यांनी उत्तर अमेरिकेच्या बाजारात पाऊल टाकले. त्यांच्या माेटारसायकलने कितीतरी ग्रँड प्रिक्स, मोटोक्रॉस आणि इनड्युरो स्पर्धा जिंकल्या आहेत.
हुस्नलाल व भगतराम हे दोघेही लाहोरच्या सुप्रसिद्ध संगीतकार पंडित अमरनाथ शर्मा यांचे धाकटे बंधू. त्यांचा जन्म १९१६ रोजी जालंधर येथे झाला. हुस्नलाल उत्कृष्ट व्हायोलिन वादक होते.
वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाने जगभर प्रसिद्ध झालेल्या डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म ५ डिसेंबर १९४३ रोजी झाला.
प्रा.डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी एम. ए.,पीएच.डी., मास्टर ऑफ ड्रॅमॅटिक्स या पदव्या प्राप्त केल्या होत्या. १९६६ ते १९६८ या कालावधीत मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तर १९६८ ते १९८० स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. २३ नाटय़महोत्सवाचे आयोजन, २०० पेक्षा अधिक नाट्यकथांची निर्मिती करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर दोन चित्रपटांत भूमिका, अशी त्यांची नाट्य-चित्रपट कारकीर्द होती.
‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगामुळे डॉ. देशपांडे यांचा प्रेक्षक-श्रोता जगभर होता. एकूण ५२ पात्रांचे विविध आवाज आणि कमीतकमी प्रभावी हालचाली हे या एकपात्री प्रयोगाचे खास वैशिष्टय़ होते. मराठवाडय़ाच्या ग्रामीण जीवन शैलीशी एकरूप असलेले आणि अस्सल व्यक्तिरेखा असणारा हा प्रयोग केवळ मराठवाडय़ातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि विविध देशांतील मराठी नाटय़रसिकांना भावला. ‘गीनिज बुक’मध्ये तब्बल दोन वेळा नोंद घेण्यात आलेले लक्ष्मण देशपांडे यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. ‘वऱ्हाड’चे लेखन, दिग्दर्शन आणि कलावंत या सगळ्या भूमिका डॉ. देशपांडे यांच्याच होत्या. तीन छोटे दिवे, तीन माईक आणि पंचा इतके छोटे साहित्य वापरून ५२ व्यक्तिरेखा उभ्या करणाऱ्या ‘वऱ्हाड निघालंय लंडन’ची सुरुवात १९८० मध्ये झाली.
डॉ. देशपांडे यांनी 'वऱ्हाड' लंडन, अमेरिका, कॅनडा, दुबई, मस्कत, ऑस्टेलिया, नायजेरिया, नैरोबी, कतार, कुवेत, थायलंड, सिंगापूर या देशांतही पोहोचवले. 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'ने त्यांच्या या कार्याचा १९९६ मध्ये प्रथमत: गौरव केला. आजपर्यंत या एकपात्री प्रयोगाचे ३ हजारांपेक्षा अधिक प्रयोग झाले होते. डॉ. देशपांडे यांनी डॉ. अनुया दळवी यांच्याबरोबर द्विपात्री 'नटसम्राट'चे शंभरावर प्रयोग केले. त्यांनी दोन चित्रपटांतही काम केले.
स्वेच्छानिवृत्तीनंतर ते परभणीच्या अ. भा. नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले. नाटकाच्या मिळकतीतून बरीचशी रक्कम त्यांनी नगिर्स कॅन्सर हॉस्पिटल (बाशीर्), अंधशाळा नाशिक आणि इतर ठिकाणी दिली. २००३ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाने सन्मानित केले तर २००४ ला त्यांना विष्णुदास भावे पुरस्कार प्रदान करण्यात आला. या शिवाय अनेक मान्यताप्राप्त पुरस्कार त्यांना देण्यात आले. प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे २२ फेब्रुवारी २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सावरकरांनी भोगलेल्या जन्मठेपेत त्यांना जो मानसिक त्रास झाला त्यापेक्षा अधिक त्रास त्यांच्या आत्म्याला देश स्वतंत्र झाल्यावर झाला असेल. त्यामुळे सावरकर प्रेमींना सुद्धा यातना होत आहेत. निवडणुका येतात आणि जातात परंतु त्यानिमित्ताने सामान्य वकूब असलेले जेव्हा महापुरुषांवर चिखलफेक करतात त्यामुळे यातना होतात. काही सामान्य बुद्धिमत्तेच्या राजकारण्यांनी सावरकरांचा उल्लेख “माफीवीर” असा केला आणि समाजात मोठे वादळ उठले.
जितेंद्र विजय भोपळे उर्फ जादूगार जितेंद्र रघुवीर यांचा जन्म २७ जानेवारी १९७८ रोजी पुणे येथे झाला.
रघुवीर भिकाजी भोपळे ऊर्फ जादूगार रघुवीर हे जादूगार घराण्याचे अध्वर्यू ते मूळचे चाकणजवळील आंबेठाणचे. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे रघुवीर पुण्यामध्ये आले आणि अनाथ विद्यार्थी गृहामध्ये माधुकरी मागून त्यांनी शिक्षण घेतले. एकदा रस्त्याने जात असताना राणा या राजस्थानी कलाकाराला त्यांनी जादूचे खेळ करताना पाहिले. त्यांच्याकडून जादूची ही कला रघुवीर यांनी आत्मसात केली आणि ७५ वर्षांपूर्वी पहिला व्यावसायिक प्रयोग केला.
गानहिरा हिराबाई बडोदेकर यांनी जादूगार रघुवीर यांना पहिल्यांदा परदेश दौऱ्यावर नेले आणि तेथून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. जादूगार रघुवीर यांनी आपल्या हयातीमध्ये ७ हजार २३ प्रयोग केले.
त्यांचे चिरंजीव विजय रघुवीर यांनी ६ हजार ३३० प्रयोग केले आहेत. जितेंद्र रघुवीर हे विजय रघुवीर यांचे चिरंजीव. बालपण व शिक्षण नुमवी प्रशालेत शिक्षण स.प. महाविद्यालय पुढे B.E. production engineering भारती विद्यापीठ पुणे पुण्यात झाले. नंतर उच्च शिक्षण अमेरिका येथे जाऊन एम.एस केले. जितेंद्र रघुवीर यांनी आपल्या शालेय शिक्षणा बरोबर वयाच्या ५ व्या वर्षांपासून जादूचे प्रयोग शिकायला आणि करायला सुरवात केली. जितेंद्र रघुवीर यांनी एम.एस करूनही नोकरी न करता आपला पिढीजात व्यवसाय पुढे नेला व त्याला ग्लॅमर दिले. जितेंद्र रघुवीर यांनी आपले आजोबा जादूगार रघुवीर यांच्या सारखेच २७ देशात प्रयोग केले आहेत.
जितेंद्र रघुवीर यांना आत्तापर्यत बालगंधर्व पुरस्कार, कलागौरव पुरस्कार,इंडियन मॅजीक ॲकाडमी पुरस्कार, अखिल मराठी नाट्य परिषद पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच जितेंद्र रघुवीर यांचा युनायटेड नेशन्स, भारत सरकार ऑस्टेलिया व फिजी सरकार यांनी गौरव केला आहे.
जितेंद्र रघुवीर यांच्या पत्नी अश्विनी देशपांडे भोपळे यांनी एच आर मध्ये एम.बी.ए केले असून त्या स्वत: भरतनाट्यम डान्सर आहेत. त्यांचा मुलगा ईशान व मुलगी आणि तनिशा यांनी आपल्या वडीलांच्या कडून जादूचे प्रयोग शिकायला आणि करायला सुरवात केली आहे. जितेंद्र रघुवीर हे आपला मुलगा ईशानला जादूच्या प्रयोग स्टेजवर सामील करून घेतात.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
कुंदनलाल सैगल ही आठ अक्षरे म्हणजे सप्तकातील पहिला ‘सा’ आणि वरचा ‘सा’ मिळून आठ स्वर, संगीतप्रेमींसाठी ही मंत्राक्षरे आहेत. महान गायक नट या उपाधीपेक्षाही वरती स्थान असलेला हा स्वर. त्यांचा जन्म ११ एप्रिल १९०४ रोजी झाला. अवघ्या पंधरा-सोळा वर्षांच्या कालखंडात कुंदनलाल सैगल यांनी संपूर्ण संगीतसृष्टीवर अमीट ठसा उमटविला. त्यांच्या गायकीचा प्रभाव अनेक गाजलेल्या गायकांवर निश्चितपणे जाणवतो.
‘जब दिल ही टूट गया’ हे ‘शाहजहाँ’ चित्रपटातील गीत ऐकताना ‘हम जी के क्या करेंगे’मधील ‘क्या’ हा स्वर गाताना उदास, हतबल आणि सकारण असा उच्चार हे सारेच भिडल्यावाचून राहत नाही. दोन्ही अंतऱ्यांमध्ये ‘इक भेदी लूट गया’ किंवा ‘हर साथी छूट गया’ ही विफलता समजण्यासाठी मूळ गाणे ऐकावेच लागते. ‘तदबीर’ चित्रपटातील संगीतकार लाल मोहम्मद यांनी स्वरबद्ध केलेले ‘मैं पंछी आजाद मेरा कहीं दूर ठिकाना रे, इस दुनिया के बाग में मेरा आना-जाना रे’ हे गीत अधिक वेगळे काही सांगत नाही. या गीताचा अंतराही पुरेसा संदेश देतो. ‘जीवन की परभात में आऊँ, सांज भये तो मैं उड जाऊँ, बंधन में जो मुझको बांधे वो दिवाना रे..’ हेच सैगल यांच्या बाबतीत खरे आहे. ‘शाहजहाँ’ याच चित्रपटातील ‘गम दिए मुस्तकिल..’ या गीतातील दोन वेगवेगळ्या पद्धतीत गायलेले.. ‘हाय हाय ये जालिम जमाना..’ ही या गीतातील खास बात आहे. ‘दिया जलाओ जगमग.. जगमग..’ हे खेमचंद प्रकाश यांनी स्वरबद्ध केलेले ‘तानसेन’ चित्रपटातील गीत जेव्हा सैगल स्वरात आपल्यासमोर येते, तेव्हा स्वरांचे झुंबर क्षणार्धात लख्ख प्रकाशमान झाल्याचे जाणवते. आणि हा प्रकाश उमलतो तो सुरुवातीच्या ‘दिन सूना सूरज बिना..’ पासूनच. ‘सो जा राजकुमारी..’ या अंगाई गीताने के. एल. सैगल यांचा गाण्यातील भाव ऐकताना आपण मोहरून जातो. ‘माय सिस्टर’ चित्रपटातील ‘दो नैना मतवारे’ हे लोकप्रिय गीत, ‘दिया जिसने दिल’ या गीतातील ‘दिल’ या शब्दावरील स्वरमेळ, ‘रुमझुम रुमझुम चाल तिहारी’ या गीतातील ‘हंसध्वनी’ राग, ‘देवदास’ चित्रपटातील ‘बालम आये बसो मोरे मन में’ ही तिमिर बरन यांची आकर्षक स्वररचना हे सारे सैगल माहौल निर्माण करणारे आहे. लोककवी मनमोहन एका कवितेत सैगलांबद्दल म्हणतात-
तुझ्याच कंठामध्ये अवचित
मधमाशी घे ‘मोहोळ’ बांधुनी
बुलबुल बसले बनात रुसुनी।
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी या सूरसम्राटाला मानवंदना देताना म्हटले होते-
अशीच संगीते आळवी तुझी कलावंता,
घडीभर जागव रे अमुची अशीच मानवता..
सैगल हे त्या काळचे सर्वात लोकप्रिय गायक. त्यांच्या आवाजाला इंग्लिश श्रोते ‘गोल्डन व्हॉइस’ म्हणायचे. सैगल यांची सर्वच गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या गैरफिल्मी गजलासुद्धा फार श्रवणीय आहेत. ‘बाबुल मोरा’ हे स्ट्रीट सिंगर चित्रपटातील गाणे अजूनही लोकांना फार आवडते. के.एल. सैगल यांचे १८ जानेवारी १९४७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
तापमान मोजण्याचे फॅरनहाइट हे प्रमाण विकसित करण्याचे श्रेय ज्यांना दिले जाते असे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट यांचा जन्म १४ मे १६८६ रोजी झाला.
डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट हे जरी जन्माने जर्मन असलेतरी शिक्षणानंतर त्यांचे सारे आयुष्य नेदरलँड्स देशात गेले.
इटलीचे भौतिकशास्त्रज्ञ इव्हान्जेलिस्टा टोरीसेली यांनी १६४३ साली हवेचा दाब मापणाऱ्या एका साध्या यंत्राचा अर्थात वायूदाबमापकाचा शोध लावला. लवकरच असे लक्षात आले की हवामानात जसजसे बदल होतात तसतसा हवेतील दाबही चढतो व उतरतो; सहसा दाबात घट झाल्यास वादळ येण्याचा संभव असतो. वातावरणातील आर्द्रतेचे मापन करणारे यंत्र अर्थात आर्द्रतामापक १६६४ साली तयार करण्यात आले. मग १७१४ साली डॅनियल फॅरनहाइट यांनी पाऱ्याचा तापमापक शोधून काढला. या उपकरणाच्या साहाय्याने अचूक तापमान मोजणे शक्य झाले.
आजही आपण अंगातील ताप मोजण्यासाठी वापरतो त्या तापमापीवर सेल्सियस सह फॅरनहाइट ची पट्टी असतेच पण बोलण्यात नेहमी गृहित धरले जाते ते फॅरनहाइट या एककाचे तापमान. (उदा. १०० डिग्री ताप)
डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट यांचे १६ सप्टेंबर १७३६ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मिलिंद सोमण यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९६५ रोजी स्कॉटलंडमध्ये झाला. तो पहिली सात वर्षे इंग्लंडमध्ये राहिला. नंतर त्याचे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले. मिलिंदला कारकीर्दीच्या सुरूवातीला जलतरणपटू व्हायचे होते. त्याने विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. व्यायामाने कमावलेली पिळदार शरीरयष्टी लाभलेल्या मिलींदला ठाकरसी फॅब्रिक्सची पहिली जाहिरात मॉडेल म्हणून मिळाली आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले. गायिका अलिशा चिनॉय हिच्या मेड इन इंडिया या संगीत व्हिडीओत केलेल्या भूमिकेपासून मिलींद प्रकाशझोतात आला. मात्र अभिनेता म्हणून मिलींद कारकिर्द कमीच यशस्वी राहिली. त्याने मराठी ,हिंदी आणि तमिळ चित्रपटातुन अभिनय केला आहे.
'टफ' या ब्रँडच्या पादत्राणासाठी मॉडेल मधू सप्रेसोबत त्याने केलेली जाहिरात वादग्रस्त ठरली.
'प्यार का सुपरहिट फॉर्म्युला' या चित्रपटाची मिलींद सोमण यांनी केली आहे.गेल्या वर्षी जगातील कठीण ट्रायलॉथॉन स्पर्धांपैकी एक असणाऱ्या झुरीच येथील ट्रायलॉथॉन स्पर्धेत मॉडेल आणि अभिनेता असणाऱ्या मिलिंद सोमणने बाजी मारली आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.विकीपिडीया.
आपल्या अभिनयाने आणि प्रभावी दिग्दर्शनाने मराठी सिनेनाट्य सृष्टीत आगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांचा जन्म १७ जून १९५१ रोजी झाला.
अभिनय, दिग्दर्शन आणि नेपथ्य यांची चांगली जाणकारी असलेले रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध असलेले मा.विनय आपटे चाळीस वर्ष मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. विद्यार्थीदशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता ते रंगभूमीवर आले. मा.विजय बोंद्रे यांनी त्यांना रंगभूमीवर आणले. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी ‘मेन विदाऊट शॉडो’ हे नाटक केले. या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांनी लागोपाठ तीन वर्षे राज्य नाट्य स्पर्धेत दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळवून हॅटट्रिक केली. ‘थिएटर ऑफ अॅीव्हेलिबिलटी’ आणि नंतर ‘बहिष्कृत’ या एकांकिकामध्ये समुहाचा नेपथ्य म्हणून वापर करून त्यांनी आगळा प्रयोग केला. नाट्यदिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनदेखील प्रसिद्ध होते.
विनय आपटे यांची कारकीर्द मुंबई दूरदर्शनवर निर्माता म्हणून सुरू झाली. मुंबईत दूरदर्शनची सुरुवात झाल्यानंतर त्यांनी अनेक वर्ष नाटक विभाग सांभाळला. दूरदर्शनसाठी त्यांनी ‘गजरा’सारख्या अनेक कार्यक्रमांचीही निर्मिती केली. नाटके, युववाणी अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली होती. छबिलदासच्या प्रायोगिक नाटकांतूनही सुरुवातीला त्यांनी अभिनय केला होता. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या आपटे यांनी विविध माहितीपट, जाहिराती यांनाही आपला आवाज दिला होता. तसेच अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. महेश मांजरेकर, श्रीरंग गोडबोले, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, अतुल परचुरे, सुकन्या कुलकर्णी यांना व्यावसायिक नाटकांत व दूरदर्शन मालिकांमध्ये आपटे यांनी प्रथम संधी दिली होती.
‘मी नथुराम बोलतोय’ या बहुचर्चित आणि गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. विजय तेंडुलकर यांच्या ‘मित्राची गोष्ट’ ‘अॅनन्टीगनी’ या प्रायोगिक नाटकांतूनही त्यांनी अभिनय केला होता. त्यांच्या ‘एका लग्नाची गोष्ट’मधील त्यांची बाबाची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. तर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘दुर्वा’ या मालिकेत ते काम केले होते. तसेच त्यांनी ‘गांधी’, ‘सत्याग्रह’, ‘चांदनी बार’, ‘धमाल’, ‘आंदोलन’ यासारख्या हिंदी चित्रपटात व काही हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते. ‘दुसरा सामना’, ‘वन रूम किचन’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘रानभूल’, ‘कबड्डी कबड्डी’, ‘डॅडी आय लव्ह यू’ ही त्यांनी काम केलेली काही गाजलेली नाटके होती, तर ‘कुसुम मनोहर लेले’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ सारख्या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले.
‘रानभूल’ या नाटकात त्यांनी फिरत्या रंगमंचाचा वापर केला होता. नाटककार प्र. ल. मयेकर यांच्याबरोबर त्यांची चांगली जोडी जमली होती. ‘गणरंग’ ही व्यावसायिक नाटकांची निर्मिती करणारी संस्थाही स्थापन केली होती. अखिल मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. गंगाराम गवाणकर यांच्या ‘करायचं ते दणक्यात’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. विनय आपटे यांचे ७ डिसेंबर रोजी २०१३ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
त्यांची गाजलेली नाटके
रानभूल, डॅडी आय लव्ह यू, तुमचा मुलगा करतो काय?, कबड्डी कबड्डी, शुभ बोल तो नाऱ्या, अफलातून.
गाजलेले चित्रपट
एक चालीस की लास्ट लोकल, सत्याग्रह, आरक्षण, राजनीती, जोगवा.
गीतकार इन्दीवर यांचे खरे नाव श्यामल बाबू राय, इन्दीवर यांना लहान पणा पासून लेखक, संगीत आणि गायन लेखन याची आवड होती. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२४ रोजी झाला. बाबू भाई मिस्त्री यांच्या चित्रपट 'पारसमणि' मधील इन्दीवर यांची गाणी गाजली.
निर्माता-दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या चित्रपटात मा.इन्दीवर गाणी लिहिली. 'उपकार' मधील "क़स्मे वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या..." ही गाणी काय किंवा 'पूरब और पश्चिम' मधील "दुल्हन चली वो पहन चली" और "कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे" ही गाणी तर अजून ही अवीट वाटतात मा. इन्दीवर यांनी संगीतकार जोड़ी कल्याणजी-आनंदजी च्या बरोबर "छोड़ दे सारी दुनिया किसी के लिये...", "चंदन सा बदन..." और "मैं तो भूल चली बाबुल का देश..." अशी सुंदर गाणी लिहिली आहेत.
राकेश रोशन यांच्या चित्रपटात इन्दीवर यांनी सदाबहार गाणी लिहिली. 'कामचोर', 'ख़ुदग़र्ज', 'खून भरी मांग', 'काला बाज़ार', 'किशन कन्हैया', 'किंग अंकल', 'करण अर्जुन' व 'कोयला' या राकेश रोशन यांच्या चित्रपटातील गाणी मा.इन्दीवर यांनी लिहिली. त्यांच्या या गाण्या मुळे राकेश रोशन यांचे चित्रपटातील गाणी आज आपण आठवणीने ऐकतो. विजय आनंद यांच्या 'जॉनी मेरा नाम' या चित्रपटातील "नफ़रत करने वालों के सीने में...", "पल भर के लिये कोई हमें..." ही गाणी मा.इन्दीवर यांचीच.
मनमोहन देसाई यांच्या 'सच्चा-झूठा' या चित्रपटातील "मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनियां..." हे इन्दीवर यांचे गाणे आज ही लग्नात वाजवले जाते. 'सफ़र' या चित्रपटातील इन्दीवर यांचे "जीवन से भरी तेरी आंखें..." व "जो तुमको हो पसंद..." ही गाणी तर लाजबाब.
१९७५ मध्ये 'अमानुष'या चित्रपटासाठी इन्दीवर यांना 'फ़िल्म फेयर पुरस्कार' मिळाला. इन्दीवर यांनी ३०० पेक्षा जास्त चित्रपटांसाठी गाणी लिहिली. २७ फेब्रुवारी १९९७ मा.इन्दीवर यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
इन्दीवर यांनी लिहीलेली काही गाणी
दिल ऐसा किसीने मेरा तोडा
फुल तुम्हे भेजा है खत में
गरजत बसरत
जिंदगी का सफर
चंदन सा बदन
जो तुमको हो पसंद
मधुबन खुशबु देता है
एक तु जो मिला
पास बैठो तबीयत बहेल जायेगी
एक बार तु कहदे
इस दिल मे बसा था प्यार तेरा
ओठों से छु लो तुम
कोई जब तुम्हारा
दिल एैसा किसीने
Copyright © 2025 | Marathisrushti