अरुण साधू यांनी पत्रकारिता केलीच परंतु त्यांनी स्तंभलेखक ते कथाकार , कादंबरीकार , विज्ञानलेखक , इतिहास लेखक म्हणून भरपूर लेखन केले. १९९५ पासून २००१ पर्यंत ते पुणे विद्यापीठमध्ये वृत्तपत्रविद्या आणि संपादन विभाग येथे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. १९८५ मध्ये त्यांनी इंटरनॅशनल रायटर्स वर्कशॉप , आयोवा सिटी अमेरिका येथे भारताचे प्रतिनिधीत्व केले.
अच्युत अभ्यंकर यांनी किराणा घराण्याचे अध्वर्य कै.पं. फिरोझ दस्तूर यांकडून शास्त्रीय संगीताच्या प्रेमाखातर, त्याची जोपासना व प्रचाराचा विडा उचललेल्या अभ्यंकरांनी आकाशवाणी येथे उच्च श्रेणीचे कलाकार म्हणून अनेक गाण्याचे कार्यक्रम केले. तसेच देश – विदेशांत असंख्य मैफिली सादर करुन नावलौकीक प्राप्त केला. आपले गुरु कै. पं. फिरोझ दस्तुर यांचा अनमोल ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याच्या कार्यात स्वत:ला झोकून देऊन श्री. अभ्यंकर यांनी ठाण्यातील अनेक संगीत संस्थात संगीत विद्यादानाचे अमूल्य काम केले आहे. जे अजूनही अविरत चालू आहे. गेले अनेक वर्षे ते विद्यादान करत असून त्यातील काही विद्यार्थ्यांनी संगीतातील उच्च पदव्या प्राप्त केल्या आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.मराठीसृष्टी
बॉलीवूडमधील लोकप्रिय विनोदी अभिनेता देवेन वर्मा यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म २२ आक्टोबर १९३७ रोजी झाला
देवेन वर्मा यांनी अनेक चित्रपटांत विनोदी भूमिका अतिशय खूबीने वठवल्या होत्या.
हिंदी चित्रपटसृष्टीत ‘अंगूर’, ‘खट्टामिठा’ या चित्रपटांमधील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. विनोदाचे टायमिंग साधण्यात हातखंडा असलेल्या देवेन यांना ‘चोरी मेरा काम’, ‘चोर के घर चोर’ आणि ‘अंगूर’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट हास्यकलाकाराच्या श्रेणीत सन्मानित करण्यात आले होते.
देवेन वर्मा यांनी १५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. चमत्कार, जुदाई, इश्क, चोर के घर चोर, अंगुर, खट्टा-मीठा, कोरा कागज, चोरी मेरा काम यातील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. ‘दोस्त असावा तर असा’, ‘हा खेळ सावल्यांचा’ या मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले होते.
त्यांनी स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरु करत काही चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शनही केले होते.
देवेन वर्मा यांचे २ डिसेंबर २०१४ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
शंकरदास केसरीलाल हे शैलेंद्र यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म ३० ऑगस्ट १९२३ रोजी झाला. १९४७ साली एका कार्यक्रमात काव्यवाचनाचे त्याला निमंत्रण आले. तेथे त्याने ‘जलता है पंजाब’ ही कविता सादर केली. त्या कार्यक्रमाला राज कपूर उपस्थित होते. त्याने शैलेंद्र यांची कविता ऐकली आणि ते भारावले. त्याने शैलेंद्र यांना गाठले. तेव्हा राज कपूर ‘आग’ बनवत होता. ‘आग’साठी गीतलेखनाचा प्रस्ताव त्याने शैलेंद्र यांच्या समोर ठेवला; शैलेंद्र यांनी तो नाकारला. नंतर पुलाखालून बरेच पाणी गेले. शैलेंद्रचे दोनाचे चार हात झाले.
संसाराचा गाडा नीट हाकण्यासाठी पैशांची वानवा जाणवू लागली. एकेदिवशी त्याने सरळ आरके स्टुडिओ गाठला. आरके कॅम्पमध्ये तेव्हा ‘बरसात’चे काम सुरू होते. राज कपूरने या अनोख्या शैलीच्या गीतकाराला ‘बरसात’च्या गीतलेखनाची संधी दिली. शैलेंद्रने ‘बरसात मे हमसे मिले तुम...’ आणि ‘पतली कमर है, तिरछी नजर है’ ही दोन गाणी लिहिली. तेव्हा पासून राज कपूर यांच्या सर्व चित्रपटात मा.शैलेंद्र यांनी गाणी लिहिली. शैलेंद्रच्या गाण्याने ‘आरके’ला एक नवी ओळख दिली. केवळ राज कपूरचा गीतकार ही ओळख पुसणारा म्हणून ‘गाइड’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ‘गाइड’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील माइलस्टोन. यात शैलेंद्र यांच्या गाण्यांचा वाटा निश्चितच सर्वात मोठा.
‘तेरे मेरे सपने अब एक रंग है’, ‘गाता रहे मेरा दिल’, ‘मोसे छल किये जा’, ‘वहाँ कौन है तेरा’ असे गानमोती या ‘गाइड’च्या माळेत शैलेंद्रने गुंफले आहेत. ‘काँटो से खीच के ए आँचल’ हा त्यातील मुकुटमणी ठरावा. १९५८ मध्ये 'ये मेरा दीवानापन है...' (फ़िल्म- यहूदी) च्या साठी १९५९ मध्ये 'सब कुछ सीखा हमने...' (फ़िल्म- अनाडी) १९६८ साली 'मै गाऊं तुम सो जाओ...' (फ़िल्म- ब्रह्मचारी) सर्वश्रेष्ठ गीतकार म्हणून मा.शैलेंद्र फ़िल्मफ़ेयर पुरस्कार मिळाला होता. आवारा हूँ, रमैया वस्ता वैया, दिल के झरोखे में तुझको बिठा कर,मुड मुड के ना देख मुड मुड के,पिया तोसे नैना लागे रे,दिल की नज़र से, अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहा खतम, अशी अनेक संस्मरणीय गाणी मा.शैलेंद्र यांनी दिली.
गुलजार हे गीतकार बनण्यात शैलेंद्र यांचं मोठं योगदान होते. गुलजार साहेबांनीच म्हटल्या प्रमाणे, "शैलेंद्र चित्रपट सृष्टीने दिलेले सर्वात थोर गीतकार होते. शंकर जय किशन , सचिन देव बर्मन, देव आनंद , पंडित रविशंकर, बिमल रॉय यांच्या बरोबर त्यांनी अजरामर राहील इतकं अद्वितीय काम केलं आहे. "खूप कमी लोकानां माहित असेल की राज कपूर यांनी अभिनय केलेला 'तीसरी कसम' 'हा चित्रपट या शैलेंद्र निर्मित होता. पण हा चित्रपट चालला नाही. मा.शैलेंद्र १४ डिसेंबर १९६६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
शैलेंद्र यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=A6LEw97vXR4
https://www.youtube.com/watch?v=hu9tojGQ2BY
भाऊ अशी ओळख असलेले मा.शशिकांत सुतार हे त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे शिवसेनेचे उपनेते म्हणून कायम चर्चेत राहिले आहेत. साधेपणा हे तर भाऊंचे आभूषण, पांढऱ्या पायजमा कुर्त्यात वावरणाऱ्या भाऊ हे आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जुने सहकारी होत.
नारायण राणे हे मुख्यमंत्री असताना अधिवेशनाच्या कालावधीत एकदातरी ठाण्याच्या मामलेदार मिसळचा बेत व्हायचा असे सांगितले जाते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही चिरंजीव अमित ठाकरे व अन्य नेत्यांसह मामलेदार मिसळची चव चाखलेली आहे.
प्रसिद्ध बंगाली व हिंदी अभिनेत्री सुमिता संन्याल यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९४५ रोजी दार्जिलिंग येथे झाला. सुमिता संन्याल यांचे खरे नाव मंजुळा संन्याल होते. पण पहिल्या चित्रपटासाठी त्यांनी स्वतःचे नाव सुचारिता असे ठेवले. पण फिल्ममेकर कनक मुखोपाध्याय यांनी तिचे नाव सुमिता केले. त्यांनी १९६० साली बंगाली चित्रपट 'खोका बाबुर प्रत्याबर्तन'द्वारे चित्रपट सृष्टीत प्रवेश केला होता. १९७० मध्ये 'सगीना महतो' चित्रपटात तिने दिलीप कुमार यांच्याबरोबर काम केले होते.
सुमिता संन्याल यांनी ४०हून अधिक बंगाली भाषेतील सिनेमे केले. तर हिंदीमध्ये त्यांनी गुड्डी, मेरे अपने, आशीर्वाद, कुहेली या सिनेमांमध्ये काम केले होते. तसेच काही हिंदी नाटक-मालिकांतही त्यांनी काम केले होते. १९७१ मध्ये आलेल्या 'आनंद' या सिनेमात सुमिता यांनी अमिताभ बच्चन यांची प्रेयसी रेणू ही भूमिका साकारली होती. आनंद’च्या लोकप्रियतेच्या काळात पंचविशी नुकतीच ओलांडलेल्या या सोज्वळ अभिनेत्रीने तिच्या अभिनय आणि रूपाने त्या जमान्यातील तरुणाईला अक्षरश: वेड लावले. सुमिता संन्याल यांनी एडिटर सुबोध रॉय यांच्याशी लग्न केले होते. सुमिता संन्याल यांचे ९ जुलै २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
सुमिता संन्याल यांच्यावर चित्रित झालेली काही गाणी.
इक था बचपन
https://www.youtube.com/watch?v=rqGZDkAO_8M
ना जिया लागे ना
https://www.youtube.com/watch?v=VG5YgmHANUI
ना जिया लागे ना बंगाली मध्ये गाणे
https://www.youtube.com/watch?v=cbfTaMTTdHA
झिर झिर बरसे सावनी आखियां
https://www.youtube.com/watch?v=QbwjZVo0dq0
बलवीरराज अर्थातच शशी कपूर हे नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यापुढे येतो तो देखणा चेहरा. त्यांचा जन्म १८ मार्च १९३८ रोजी कोलकता येथे झाला.घरंदाज, अदबशीर आणि अगदी सज्जन व्यक्तिमत्त्व. बहुतेक लोकप्रिय चित्रपटांमधून शशी कपूर असेच दिसले. प्रामाणिक, लाघवी, शांत, संयमी आणि बघता क्षणी नायिकेला प्रेमात पडायला लावणाऱ्या भूमिका त्यांच्या वाटय़ाला जास्त आल्या आणि त्याच लक्षात राहिल्या. शशी कपूर यांचे शिक्षण मुंबईत झाले. वयाच्या दहाव्या- बाराव्या वर्षापासूनच त्यांनी अभिनय करायला सुरुवात केली. १९४८ साली आलेल्या ‘आग’ व १९५१ साली आलेल्या ‘आवारा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी राजकपूरच्या बालपणाच्या भूमिका केल्या. हा गोड दिसणारा, गोड हसणारा छोकरा पुढे त्यांच्या त्याच हास्यासाठी व अवखळपणासाठी प्रसिद्ध झाला. घरातूनच मिळालेला अभिनयाचा वारसा त्यांनीही जपला. मात्र, तरीही वडिल पृथ्वीराज कपूर यांच्यासह थिएटरमध्ये ते बरीच वर्ष रमले. तरुणपणी इतर कपूरांप्रमाणे त्यांनीही सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली. १९६१ साली आलेल्या ‘धर्मपुत्र’ या चित्रपटात शशीकपूर पहिल्यांदा नायक म्हणून चमकले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी नायक म्हणून ११६ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. जब जब फूल खिले या सिनेमातली नंदा आणि शशी कपूर यांची जोडी विशेष गाजली. कपूर यांच्या नावावर अनेक यशस्वी चित्रपट आहेत. जब जब फुल खिले, शर्मिली,कभी कभी, बसेरा, पिघलता आसमान, रोटी कपडा और मकान अशा एका हून एक विलक्षण चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांचा ‘दिवार’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड ठरला. अमिताभ बच्चन आणि शशी कपूर या जोडीने तर बॉक्सऑफिसवर एकच धमाल उडवून दिली.. दीवार, रोटी कपडा और मकान, त्रिशूल, दो और दो पाच, नमक हलाल, सिलसिला, शान, कभी कभी या हीट फिल्म्स या जोडीने दिल्या आणि प्रेक्षकांच मनोरंजन केलं. मा.शशी कपूर यांच्या सत्यम् शिवम् सुंदरम्, जब जब फूल खिले या चित्रपटातील अभिनय खूपच गाजले. मा.शशी कपूर हे देव आनंद व राजेश खन्नाप्रमाणे ‘रोमॅन्टिक हीरो’ म्हणून स्त्री-चाहत्यांत आपले स्थान निर्माण करू शकले. ती त्याची मोठीच मिळकत. हिंदी चित्रपटांबरोबरच मा.शशी कपूर यांनी दोन इंग्रजी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये भूमिका करणारे मा. शशी कपूर हे पहिले भारतीय अभिनेते ठरले. अनेक अमेरिकन व ब्रिटीश चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या. ‘फिल्मवालाज’ या त्यांच्या निर्मितीसंस्थेच्या वतीने त्यांनी जुनून व कलियुग ३६ चौरंगी लेन अशा विविध चित्रपटांची निर्मिती केली. हिंदी रंगभूमीसाठी शशी कपूर यांनी दिलेले योगदानही महत्त्वाचे आहे. आपल्या वडिलांच्या पृथ्वी थिएटरचीची त्यांनी पुर्नउभारणी केली. शशी कपूर यांना २०११ मध्ये ‘पद्मभूषण’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. सिनेक्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी मा.शशी कपूर यांना २०१४ साठी दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. १६० चित्रपटांत त्यांनी काम केले असून तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
शशी कपूर यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=VO3EHeCKbEE
https://www.youtube.com/watch?v=jZ-CQMDwiSc
बडोद्यातील कीर्तनकार पिंगळेबुवा यांच्याकडे भास्करबुवानी गायनकलेचा श्रीगणेशा केला. त्यांचा जन्म१७ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला. पुढे ख्यातनाम बीनकार बंदे अलीखाँ यांनी बखलेंची शिकवणी घेतली. फैजमहंमदखाँ, नथ्थनखाँ आग्रेवाले यांच्याकडे भास्करबुवांचे पुढचे शिक्षण झाले. या सगळ्या अथक मेहनतीनंतर भास्करबुवा बखले यांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर या घराण्यांच्या गायकींवर प्रभुत्व मिळवले. नाट्यगीत, ठुमरी, भजन, टप्पा, पंजाबी लोकसंगीत, लावणी, गझल, ध्रुपद धमार, आणि ख्यालगायन या सगळ्यांवर भास्करबुवांची विलक्षण हुकमत होती. संगीतकलेवरील त्यांचे प्रभुत्व पाहून लोक त्यांना देवगंधर्व म्हणू लागले.
शास्त्रीय संगीतावर आधारित चिजांच्या चाली मराठी आणून भास्करबुवांनी मराठी नाट्यगीते संगीतबद्ध केली. किर्लोस्कर व गंधर्व नाटक कंपन्यांत त्यांनी संगीत विषयाचे प्रमुख गुरू म्हणून काम केले. बालगंधर्व, मास्टर कृष्णराव, गोविंदराव टेंबे आदींनी भास्करबुवा बखले यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. जालंधर, सियालकोट, कराची, म्हैसूर येथील मैफिली भास्करबुवांनी गाजवल्या.
त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीतर्फे 'रामराज्यवियोग' या नाटकात मंथरेची, संगीत सौभद्र या नाटकात नारदाची आणि संगीत शाकुंतलात शकुंतलेची भूमिकाही साकारल्या होत्या. त्यांनी व गोविंदराव टेंबे यांनी संगीत मानापमान व संगीत स्वयंवर नाटकांच्या पदांच्या चाली बांधल्या होत्या. याशिवाय भास्करबुवा बखले यांनी संगीत द्रौपदी व संगीत विद्याहरण या नाटकांचे संगीत दिग्दर्शनही केले होते. दुर्दैवाने भास्करबुवांच्या आवाजातली एकही कलाकृति ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध नाही. १९११ साली भास्करबुवांनी भारत गायन समाज ही संस्था हिंदुस्तानी संगीत पद्धतीच्या प्रसारार्थ स्थापली. गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांनी स्थापन केलेल्या पुणे भारत गायन समाज संस्थेच्या भास्कर संगीत विद्यालयातर्फे शास्त्रीय संगीताचे शिक्षण दिले जाते. संस्थेच्या संगीत अभ्यासक्रमाला १९६२ मध्ये राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक संगीत विद्यालये ही भास्कर संगीत विद्यालयाशी संलग्न आहेत. त्यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या संगीताबद्दल लिहिलेले अर्धेमुर्धे पुस्तक भास्कबुवांच्या शैला दातार या नातसुनेने पूर्ण करून प्रकाशित केले आहे. पुण्याचा भारत गायन समाज दरवर्षी भास्करबुवांच्या स्मृतिदिनी संगीत समारोह आयोजित करतो. भास्करबुवांच्या स्मरणार्थ १९२६ मध्ये स्थापन झालेला मुंबईतील कल्याण गायन समाज, वर्षभर विविध संगीत सभा तर घेतोच, शिवाय त्यांच्या वर्षदिनी देवगंधर्व संगीत महोत्सव भरवतो. चंदीगडमधील प्राचीन कला केंद्र दरवर्षी अखिल भारतीय भास्करराव नृत्य व संगीत संमेलन आयोजित करते. पुणे विद्यापीठ पंडित बी.ए.ला संगीतात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला भास्करबुवा बखले पुरस्कार देते. भास्करबुवा बखले यांचे ८ एप्रिल १९२२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ- इंटरनेट
१९७३ मध्ये विजय अमृतराज यांनी विंबल्डनच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची बहुमोल कामगिरी केली होती. अमेरिकेच्या यू.एस. ओपनचा उपांत्यपूर्व सामन्यात विजय अमृतराज पोहोचले होते जिथे यान कोडेस और केन रोजवेल यांच्या सारख्या दिग्गजांना त्यांनी पराभूत केले होते.
Copyright © 2025 | Marathisrushti